जयेश सामंत
लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे महाराष्ट्रातील दौरे वाढले आहेत. शिर्डी, नवी मुंबईपाठोपाठ महाराष्ट्रातील एक टोक असलेल्या सोलापूरात येत्या शुक्रवारी पंतप्रधानांचा दौरा होत आहे. ‘प्रधानमंत्री आवास योजने’तील ९० हजार लाभार्थ्यांना घरकुलाचे वाटप व कोट्यवधी रुपयांच्या पायाभूत सुविधांच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने पंतप्रधानांचा हा दौरा आयोजित करण्यात आला आहे. येत्या २२ तारखेला अयोध्येत राम मंदिर उद्धाटनाचा भव्य सोहळा आयोजित केला जात असताना देशभरातील पायाभूत सुविधांच्या सक्षमीकरणासाठी केल्या जाणाऱ्या कामांचा प्रभाव पाडण्याचा प्रयत्नही भाजपकडून केला जात आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही ‘राम आणि काम’ अशा दोन्ही आघाड्यांवर वातावरणनिर्मिती करण्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रयत्न दिसतो आहे. शिवडी-न्हावाशेवा अटल सेतूचे लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते करताना मुंबई महानगरचा चेहरामोहरा बदलण्याची क्षमता असणाऱ्या प्रकल्पांसाठी आपले सरकार कसे काम करत आहे याची पद्धतशीरपणे मांडणी मुख्यमंत्र्यांनी गेल्या आठवड्यात केली. आगामी लोकसभा निवडणुकांना ‘राम आणि काम’ अशा दुहेरी अजेंड्यानेच सामोरे जायचे अशी स्पष्ट रणनीती मुख्यमंत्र्यांच्या गोटात पक्की झाल्याचे यानिमित्ताने दिसू लागले आहे.

हेही वाचा >>> चंद्राबाबू नायडूंवर कोट्यवधींच्या गैरव्यवहाराचा आरोप, काय आहे कौशल्य विकास महामंडळ घोटाळा?

Nagpur It is now possible to know status of autopsy report in AIIMS with click police as well as family
एम्समधील शवविच्छेदनाची स्थिती आता एका ‘क्लिक’वर, पोलीस, नातेवाईकांची पायपीट थांबणार
Mahakumbh 2025 Mamta Kulkarni Kinnar Akhada
Mahakumbh 2025: इंजिनीअर्स, डॉक्टर्स व तरुणांना किन्नर आखाड्याचे आकर्षण का?
Crime against city president of Shinde group fraud of Rs 1 crore 56 lakh by lure of job
शिंदे गटाच्या शहराध्यक्षाविरुद्ध गुन्हा, नोकरीचे आमिष दाखवून…
Deputy Chief Minister Eknath Shinde orders to open MSRDC office for new Mahabaleshwar project satara news
नवीन महाबळेश्वर प्रकल्पासाठी महाबळेश्वरमध्ये कार्यालय सुरू करा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश
cm devendra fadnavis prohibiting appointments of private secretaries in government offices
खासगी व्यक्तींच्या नियुक्तीस मनाई; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयाने मंत्र्यांना धक्का
Vishnu Bhangale suspended from the Thackeray group, is now Jalgaon district head of Shinde group
जळगावमध्ये ठाकरे गटातून निलंबित, विष्णू भंगाळे आता शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख
News About Eknath Shinde
Eknath Shinde : ठाकरे-फडणवीसांची भेट, महायुतीत एकनाथ शिंदेंच्या नाराजीचा दुसरा अंक?
Eknath Shinde on Santosh Deshmukh Murder Case
Eknath Shinde: “कुणाचेही लागेबंधे असले तरी…”, संतोष देशमुख प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा इशारा

‘अटल सेतू’चा प्रभाव किती टिकेल?

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून उभारण्यात आलेल्या ‘अटल सेतू’च्या लोकार्पणानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधानांच्या उपस्थितीत मुंबई महानगर पट्ट्यात विकासाचे बिगूल वाजविण्याचा नव्याने प्रयत्न केला. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना या प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली होती. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात येताच नगरविकास विभागाची सूत्रे शिंदे यांच्याकडे आली. तेव्हापासूनच शिंदे यांनी या प्रकल्पाच्या पाहाणीचे दौरे वाढविले. या सागरी सेतूचा आवाका लक्षात आल्याने या कामाला वरचेवर भेटी देणे, आढावा घेणे, त्यानिमित्ताने प्रसिद्धीत राहण्याची कल्पकता शिंदे यांनी सुरुवातीपासून दाखवली. त्यामुळे अटल सेतूच्या लोकार्पण सोहळ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रभाव असतानाही या सेतूच्या कामावर आपली छाप सोडण्यात मुख्यमंत्री यशस्वी ठरल्याचे पाहायला मिळाले. या सेतूच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांची प्रतिमा ‘विकास पुरुष’ अशी करण्याचा प्रयत्न त्यांच्या निकटवर्तीयांकडून पद्धतशीरपणे करण्यात आला असला, तरी आगामी निवडणुकांपर्यंत या सेतूचा प्रभाव जनसामान्यांवर किती टिकेल हे पाहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मुंबई महानगर प्रदेश मुख्यमंत्र्यांसाठी महत्त्वाचा कसा?

मुंबई महानगर प्रदेशात मोडणाऱ्या मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात लोकसभेच्या १० तर विधानसभेच्या ६० जागांचा समावेश होतो. याशिवाय नवी मुंबईस लागूनच असलेल्या रायगड जिल्ह्यात लोकसभेच्या दोन तर विधानसभेच्या सात जागांचा समावेश आहे. ठाणे जिल्हा हा मु्ख्यमंत्र्यांचा बालेकिल्ला असला तरी मुंबई आणि रायगड पट्ट्यातही त्यांना चांगल्या कामगिरीची आशा आहे. विशेष म्हणजे या संपूर्ण पट्ट्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे प्रभावक्षेत्र राहिले आहे. अलीकडच्या काळात या भागात भाजपची ताकददेखील मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. असे असले तरी मुख्यमंत्र्यांच्या पक्षाचा उद्धव ठाकरे यांच्याशी कडवा सामना याच भागात होताना पाहायला मिळणार आहे. मुंबईत उद्धव ठाकरे यांना शिंदे यांच्याकडून फटका बसावा अशा पद्धतीची रणनीती भाजपच्या गोटातही आखली जात आहे. ठाकरे यांची संघटनात्मक ताकद मोडून काढण्यासाठी महानगर प्रदेशातील अनेक नेते, पदाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच त्यांच्या पक्षात आणले आहे. हे करत असताना या प्रदेशातील विकास प्रकल्पांच्या माध्यमातून आणखी वातावरणनिर्मिती करण्याचा मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न दिसतो आहे.

हेही वाचा >>> विश्लेषण : सरकारी अधिकाऱ्यांविरोधात भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल करण्यापूर्वी लागणारी पूर्ण परवानगीची अट नेमकी काय आहे? जाणून घ्या..

‘विकासाचे शिल्पकार’ ही प्रतिमा बिंबविण्याचा प्रयत्न कसा?

मुंबई महानगर प्रदेशात गेल्या काही वर्षांपासून हजारो कोटी रुपयांच्या प्रकल्पांची कामे सुरू आहेत. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून हजारो कोटी रुपयांचे कर्ज काढून अनेक प्रकल्प पुढे रेटले जात आहेत. मुंबई, ठाण्यातील मेट्रो प्रकल्प, दक्षिण मुंबईतील भुयारी मार्ग, मुंबई महापालिकेचा सागरी किनारा मार्ग, नवी मुंबई विमानतळ, ठाणे-डोंबिवलीतील वेगवेगळे विकास प्रकल्प, पालघरमधील सूर्या धरण प्रकल्प तसेच समूह विकास योजनेची आखणी केली जात आहे. मागील चार वर्षांपासून राज्याचा नगरविकास विभाग शिंदे यांच्याकडे आहे. ‘अटल सेतू’सह मुंबई महानगर पट्ट्यात वेगाने सुरू असलेल्या विकास प्रकल्पांची आखणी याच विभागाच्या माध्यमातून सुरू आहे. याशिवाय मुंबई-नागपूर समृद्धी मार्ग, नवा ठाणे खाडी पूल, रस्ते विकास महामंडळामार्फत रायगड जिल्ह्यात आखल्या जाणाऱ्या नव्या शहरांच्या निर्मितीचा विभागही मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत येतो. त्यामुळे ‘विकासाचे शिल्पकार’ अशी स्वत:ची प्रतिमा उभी करण्यात त्यांना काही प्रमाणात यशही आले आहे. मुंबई, ठाण्यातील डीप क्लीन ड्राइव्हसारखा प्रकल्प असो अथवा शहरातील रस्त्यांचे काँक्रीटीकरण, वेगवेगळ्या मार्गाने विकासाचा झोत स्वत:कडे कसा राहील यासाठी ‘टीम मुख्यमंत्री’ सतत प्रयत्नशील असल्याचे दिसून येते.

‘राम आणि काम’ हा पॅटर्न नेमका कसा आहे?

मुंबई महानगर पट्ट्यात विकास प्रकल्प, राज्यातील वेगवेगळ्या भागात शासन आपल्या दारीसारखा उपक्रम आणि शिवसंकल्प यात्रेनिमित्त राजकीय दौरे काढत मुख्यमंत्री पायाला भिंगरी लावून राज्याचा दौरा काढताना दिसत आहेत. हे करत असताना अंबरनाथ तालुक्यातील मलंग मुक्ती, ठाण्यातील कोपिनेश्वर मंदिराची साफसफाई, मलंगगडाच्या पायथ्याशी वारकरी, भजनी मंडळींचे महोत्सव आयोजित करत हिंदुत्ववादी नेता ही आपली प्रतिमाही ठसविण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री करताना दिसत आहेत. राम मंदिर अक्षत सोहळ्याच्या ठाण्यातील शुभारंभ सोहळ्यात सहभागी होताना आनंद दिघे यांच्या नावाचा जागर करताना ‘साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट’ सांगण्याची एकही संधी मुख्यमंत्री सोडताना दिसत नाही. अटल सेतूच्या शुभारंभालाही रामनामाचा जप करत केलेली वातावरणनिर्मिती लक्षवेधी ठरली. एकीकडे विकास प्रकल्पाची आखणी करायची आणि हिंदुत्ववादी मराठा नेता अशी स्वत:ची प्रतिमा उभी करण्याची पद्धतशीर रणनीती मुख्यमंत्र्यांच्या गोटात आखली जात आहे. राम आणि कामाचा हा पॅटर्न त्यांच्या किती उपयोगी ठरेल हे मात्र येत्या काळात स्पष्ट होईल.

Story img Loader