जयेश सामंत
लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे महाराष्ट्रातील दौरे वाढले आहेत. शिर्डी, नवी मुंबईपाठोपाठ महाराष्ट्रातील एक टोक असलेल्या सोलापूरात येत्या शुक्रवारी पंतप्रधानांचा दौरा होत आहे. ‘प्रधानमंत्री आवास योजने’तील ९० हजार लाभार्थ्यांना घरकुलाचे वाटप व कोट्यवधी रुपयांच्या पायाभूत सुविधांच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने पंतप्रधानांचा हा दौरा आयोजित करण्यात आला आहे. येत्या २२ तारखेला अयोध्येत राम मंदिर उद्धाटनाचा भव्य सोहळा आयोजित केला जात असताना देशभरातील पायाभूत सुविधांच्या सक्षमीकरणासाठी केल्या जाणाऱ्या कामांचा प्रभाव पाडण्याचा प्रयत्नही भाजपकडून केला जात आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही ‘राम आणि काम’ अशा दोन्ही आघाड्यांवर वातावरणनिर्मिती करण्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रयत्न दिसतो आहे. शिवडी-न्हावाशेवा अटल सेतूचे लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते करताना मुंबई महानगरचा चेहरामोहरा बदलण्याची क्षमता असणाऱ्या प्रकल्पांसाठी आपले सरकार कसे काम करत आहे याची पद्धतशीरपणे मांडणी मुख्यमंत्र्यांनी गेल्या आठवड्यात केली. आगामी लोकसभा निवडणुकांना ‘राम आणि काम’ अशा दुहेरी अजेंड्यानेच सामोरे जायचे अशी स्पष्ट रणनीती मुख्यमंत्र्यांच्या गोटात पक्की झाल्याचे यानिमित्ताने दिसू लागले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा