सहा महिन्यांपूर्वी अमेरिकेतील तऱ्हेवाईक उद्योगपती इलॉन मस्क याने अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा देणार नाही, असे जाहीर केले होते. मस्क आज जे म्हणतो, त्याचे पालन उद्या करेलच असे नाही. त्यानुसार, काही महिन्यांतच त्याने रिपब्लिकन उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांना पाठिंबा देण्यास सुरुवात केली. इलॉन मस्क जे करतो, ते थोडेथोडके नसते. ट्रम्प यांच्या प्रचारासाठी त्याने ‘एक्स’ या स्वतःच्या मालकीच्या समाजमाध्यम व्यासपीठाचा वापर केलाच. पण ट्रम्प यांच्यासमवेत तो प्रचारसंभांनाही हजेरी लावू लागला. ट्रम्प यांच्या प्रचारासाठी त्याने जवळपास १३ कोटी डॉलर ओतल्याची चर्चा आहे. याशिवाय नोंदणीकृत मतदारांनी मतदान करावे यासाठी दिवसाला १० लाख डॉलरची लॉटरी चालवण्यासाठी अचाट कल्पनाही त्याचीच. आता चर्चा आहे, ती ट्रम्प प्रशासनात मस्कची भूमिका काय  राहील याची. तसेच त्याच्या कंपन्यांना ट्रम्पकृपेचा किती फायदा होईल याचीही.

ट्रम्प यांच्या घरात मुक्काम…

५ नोव्हेंबर रोजी अमेरिकेत मतदान झाले आणि त्यानंतर काही तासांमध्येच विविध राज्यांतून निकाल येऊ लागले होते. ट्रम्प त्याच्या काही दिवस आधी फ्लोरिडात पाम बीच येथील मार-ए-लेगो या त्यांच्या रिसॉर्टसम निवासस्थानी दाखल झाले होते. इलॉन मस्कही त्यांच्या मागोमाग फ्लोरिडात दाखल झाला. निकालाच्या वेळी मस्क ट्रम्प यांच्या निवासस्थानीच होता. निकालानंतर ट्रम्प यांनी काही जागतिक नेत्यांशी संवाद साधला त्यावेळीही मस्क त्यांच्या बरोबर होता. युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्याशी बोलताना ट्रम्प यांनी तो कॉल स्पीकरवर घेतला. आपल्यासमवेत मस्कही आहे असे ट्रम्प यांनी सांगताच, अवघडलेल्या झेलेन्स्की यांनी मस्कचे स्टारलिंक इंटरनेट सेवेबद्दल आभार मानले. ट्रम्प यांच्या कुटुंबियांबरोबर मस्कने रविवार गोल्फकोर्सवर व्यतीत केला. अनेकांच्या मते मस्क ट्रम्प यांच्या कुटुंबातील सदस्यांसारखा वावरत होता, तर काही राजकीय निरीक्षकांनी त्याला ‘व्हाइस प्रेसिडेंट’ असे बिरूदही बहाल केले!

Donald trump, Elon Musk, Vivek Ramaswamy, Minimum Government, Maximum Governance
विश्लेषण : इलॉन मस्क, विवेक रामस्वामी ‘सरकार कार्यक्षमता’ मंत्री… ‘टीम ट्रम्प’ आतापासूनच का भरवतेय धडकी?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Donald Trump
Donald Trump : एलॉन मस्क, विवेक रामास्वामींचा डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्रिमंडळात समावेश; करणार नोकरशाहीची साफसफाई
Rights and Duties of the Opposition in democracy
चतु:सूत्र : लोकशाहीत विरोधी पक्षाची गरज
america election
समोरच्या बाकावरून : आता निवडणुकीचे ट्रम्प प्रारूप?
electing Donald Trump as the President of the United States for the second time
दुसरे ट्रम्पपर्व आणि भारत
world eyes on donald trump dealing with big tech during his second term of us president
बलाढ्य टेक कंपन्यांसाठी ट्रम्प यांच्या विजयाचा अर्थ काय ?

हेही वाचा >>> विश्लेषण : ‘कॉप २९’ची एवढी चर्चा का?

ट्रम्प यांच्यावरील ‘पैज’ फळली?

ट्रम्प निवडून आले त्याच्या दुसऱ्या दिवसापासूनच इलॉन मस्कचे नशीब फळफळणार याची चिन्हे दिसू लागली. त्याच्या टेस्ला कंपनीचा शेअर वॉल स्ट्रीट शेअर बाजारात १५ टक्क्यांनी वधारला. रातोरात मस्कच्या संपत्तीमध्ये २० अब्ज अमेरिकन डॉलरची वाढ झाली आणि ती २८५ अब्ज डॉलपर्यंत जाऊन पोहचली. लवकरच इलॉन मस्कची संभावन ‘ट्रिल्यनेयर’ अशी करावी लागेल असा आर्थिक विश्लेषकांचा होरा आहे. टेस्ला कंपनीमध्ये मस्कचे १३ टक्के भागभांडवल आहे. जुलै महिन्यात पेनसिल्वेनियातील बटलर येथे ट्रम्प यांच्यावर प्रचारसभेदरम्यान जीवघेणा हल्ला झाला आणि त्यातून ते बचावले. त्याच दिवशी ट्रम्प यांना पाठिंबा देत असल्याचे इलॉन मस्कने जाहीर केले. यानंतरच्या काळात एक्स या समाजमाध्यमाच्या व्यासपीठावर ट्रम्प यांचा प्रचार मस्कने सुरू केला. विशेषतः बेकायदा निर्वासितांबाबत ट्रम्प यांनी सुरू केलेल्या (अप)प्रचाराला मस्कने बळ दिले. त्याचा मोठा फायदा झाला असावा, असे राजकीय विश्लेषकांना वाटते. पे-पल, टेस्ला, स्पेसएक्स या गुंतवणुकींप्रमाणेच ट्रम्प यांच्यातील गुंतवणूकही मस्कला फळली, असेच म्हणावे लागेल.

हेही वाचा >>> ‘या’ देशात स्थापन होणार सेक्स मंत्रालय? डेटिंग अन् लग्नासाठीही सरकार पुरवणार आर्थिक साह्य? कारण काय?

ट्रम्प यांचा लाडका..

डोनाल्ड ट्रम्प सहसा स्वतःच्या कुटुंबियांपलीकडे कोणामध्येही भावनिक गुंतवणूक करत नाहीत. मस्क याच्या बाबतीत त्यांनी अपवाद केला असावा. मस्क त्यांच्या समवेत अनेक प्रचारसभांना हजर होता. त्यांचा प्रचार करताना प्रसंगी उड्याही मारत होता. ट्रम्प यांच्या सभेत एरवी कोणीही ‘स्टार’ प्रचारक नसायचा. पण मस्क याची उपस्थिती ट्रम्प यांच्याइतकीच लक्षवेधक ठरू लागली. ज्या तन्मयतेने इलॉन मस्क ट्रम्प यांच्या प्रचारात शिरला, ते पाहता दोघांमध्ये काही तरी छुपा सौदा झाला असावा, अशी चर्चा सुरू झाली आहे.

‘लाभार्थी’ इलॉन मस्क?

ट्रम्प यांनी मस्कची नेमणूक अद्याप कुठेच केलेली नाही. आपल्या उद्योगांचा पसारा सोडून मस्कही ट्रम्प यांच्या प्रशासनात थेट सहभागी होण्याची शक्यता नाही. पण जगातील सर्वशक्तिमान राजकीय नेता आणि जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती यांची मैत्री निव्वळ शुभेच्छांच्या देवाणघेवाणीपुरती मर्यादित राहणार नाही हे नक्की. मस्कच्या मार्फत नवीन प्रशासनामध्ये काटकसर आणि कार्यक्षमता राबवण्याचा आपला प्रयत्न राहील, असे ट्रम्प यांनी प्रचारसभांतून म्हटले आहे. म्हणजे नक्की काय भूमिका मस्कला मिळणार, याविषयी स्पष्टता नाही. चिनी मालावर ६० टक्के शुल्क आकारणाचा निर्णय प्रत्यक्ष अमलात आल्यास, मस्कला फायदा होईल. कारण चिनी इलेक्ट्रिक मोटारींमुळे टेस्लाच्या विक्रीवर परिणाम होऊ लागला आहे. बीवायडी या चिनी मोटार कंपनीने तर टेस्लाला मागेही टाकले होते. स्पेसएक्स या कंपनीकडे सध्याच जो बायडेन प्रशासनाची अनेक कंत्राटे आहेत. मात्र इलॉन मस्कच्या अनेक अद्भुत आणि खर्चिक कल्पनांना या प्रशासनाकडून पाठिंबा मिळालेला नाही. ट्रम्प यांच्या अमदानीत ती अडचण राहणार नाही. फेडरल नियामकांनी आतापर्यंत मस्क याचे अनेक प्रकल्प रोखून धरले होते. त्यांच्यावरील निर्बंध ट्रम्प यांच्या अमदानीत उठवले जाऊ शकतात.