पेप्सिको, युनिलिव्हर यांसारख्या बहुराष्ट्रीय कंपन्या भारतामध्ये हलक्या प्रतीच्या किंवा कमी पोषक उत्पादनांची विक्री करत असल्याचे एका स्वयंसेवी संस्थेच्या अहवालात उघड झाले आहे. त्यामुळे गरीब देशातील जनतेचे आरोग्य धोक्यात आहे का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

‘एटीएनआय’च्या अहवालात काय?

‘ॲक्सेस टू न्यूट्रिशन इनिशिएटिव्ह’ (एटीएनआय) या आरोग्य मानांकन प्रणालीमध्ये असे आढळले आहे, की ३० कंपन्यांच्या उत्पादनांचे सरासरी गुण कमी उत्पन्न असलेल्या देशांसाठी ५ पैकी १.८ होते. विशेष म्हणजे उच्च उत्पन्न असलेल्या देशांसाठीही या उत्पादनांचे गुण २.३ इतके होते. यामध्ये ५ ही सर्वोत्तम तर १ ही सर्वात वाईट श्रेणी मानली जाते. या प्रणालीअंतर्गत ३.५ पेक्षा जास्त गुण असलेली उत्पादने आरोग्यदायी मानली जातात. ‘एटीएनआय’च्या जागतिक निर्देशांकानुसार नेस्ले, पेप्सिको आणि युनिलिव्हर या कंपन्या अल्प उत्पन्न गटातील देशांमध्ये आरोग्य मानांकन प्रणालीवर कमी पोषणमूल्ये असलेली उत्पादने विकत असल्याचे आढळले. या अभ्यासासाठी ‘एटीएनआय’ने ३० मोठ्या कंपन्यांच्या उत्पादनांचे मूल्यमापन केले. या संस्थेने २०२१ नंतर प्रथमच अशा प्रकारचा अहवाल सादर केला आहे.

carbon border tax
‘कार्बन बॉर्डर’ टॅक्स काय आहे? भारतासह चीन याचा विरोध का करत आहे?
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Baba Siddique Murder Investigation Latest Update
Baba Siddique Murder : बाबा सिद्दिकींचे मारेकरी गोळीबार करून पळाले नाहीत, लीलावती रुग्णालयात जाऊन…, पोलीस चौकशीत खुलासा
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : “त्यांनी मला आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न केला, पण…”, चांदीवालांच्या गौप्यस्फोटावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
saudi arabia snowfall
सौदी अरेबियाच्या रखरखीत वाळवंटात झाली चक्क बर्फवृष्टी; कारण काय?
munabam beach kearala controversy
मुनंबम वक्फ जमिनीचा वाद काय? ख्रिश्चन आणि हिंदू रहिवाशांचा याला विरोध का?
Donald Trump Won US Presidential Election 2024
Donald Trump Won US Election 2024: दुसऱ्या टर्मसाठी डोनाल्ड ट्रम्प यांचा अजेंडा ठरला; पहिल्याच भाषणात केला उल्लेख, म्हणाले…
who are intersex people
इंटरसेक्स लोक कोण असतात? समाजात वावरताना त्यांना कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागतो?

हेही वाचा >>> विश्लेषण: १४ महिन्यांतील उच्चांकी चलनवाढीमागे कारणे कोणती? व्याजदर कपात आणखी लांबणीवर? जीडीपी वाढही मंदावणार?

या अहवालाचा अर्थ काय?

बहुराष्ट्रीय खाद्य आणि पेय कंपन्या भारतासारख्या कमी उत्पन्न गटात समावेश होणाऱ्या देशांमध्ये कमी आरोग्यदायी म्हणजेच निकृष्ट खाद्य व पेय उत्पादनांची विक्री करतात, त्यामुळे या उत्पादनांचा लोकांच्या आरोग्यावर काय परिणाम होतो याबद्दल चिंता निर्माण होत असल्याचे या अहवालात दिसून आले आहे.

‘एटीएनआय’च्या संशोधकांचे काय म्हणणे आहे?

‘एटीएनआय’चे संशोधन संचालक मार्क विजन यांनी रॉयटर्स वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत आपली भूमिका स्पष्ट करताना या कंपन्यांच्या धोरणावर प्रकाश टाकला. ते म्हणाले की, या कंपन्या जगातील गरीब देशांमध्ये सर्वात जास्त सक्रिय आहेत आणि तिथे ज्या उत्पादनांची विक्री केली जाते त्याचा दर्जा निम्न आहे. आरोग्यासाठी ही उत्पादने योग्य नाहीत हे अगदी उघड आहे. या देशांच्या सरकारांनी अधिक खबरदारी घ्यायला हवी यासाठी हा धोक्याचा इशारा असल्याचे त्यांनी पुढे म्हटले आहे.

हेही वाचा >>> या’ देशात महिलांना पंचविशीनंतर विवाहास मनाई, प्रस्तावावरून नागरिक संतप्त; कारण काय?

या अहवालाचे वैशिष्ट्य काय?

‘एटीएनआय’च्या निर्देशांकाने प्रथमच बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या उत्पादनांची कमी आणि उच्च उत्पन्न गटातील देशांमध्ये केल्या जाणाऱ्या विक्रीचे मूल्यांकनाचे विभागणी केली आहे. त्यातूनच ही धक्कादायक आकडेवारी उघड झाली आहे. अहवालातील निष्कर्षांबद्दल ‘एटीएनआय’ने सांगितले की पाकिटबंद खाद्यपदार्थ जागतिक लठ्ठपणाला वाढत्या प्रमाणात कारणीभूत असतात, त्यामुळे हा निर्देशांक महत्त्वाचा आहे.

जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा

जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, जगातील एक अब्जापेक्षा जास्त लोकांना लठ्ठपणाचा त्रास असून त्यापैकी ७० टक्के लोक कमी आणि मध्य उत्पन्न असलेल्या देशांमध्ये राहते. बटाट्याचे चिप्स, कोला पेये यासारख्या जंक फूडच्या सेवनामुळे जागतिक पातळीवर लठ्ठपणाचा विकार वाढत असल्याचे आढळले आहे. ‘एटीएनआय’ने संशोधनात नमूद केलेल्या नेस्ले, पेप्सिको आणि युनिलिव्हर या कंपन्यांनी या देशांना विशेष करून लक्ष्य केले आहे. या कंपन्यांच्या उत्पादनामध्ये जास्त प्रमाण जंक फूडचे आहे. मुळात जंक फूड आरोग्यासाठी धोकादायक आहेत. त्यातही या उत्पादनांची गुणवत्ता आरोग्याच्या कसोटीवर निम्न दर्जाची असेल तर त्यातून निर्माण होणारा धोका मोठा आहे हे उघड आहे.

धोरणाविरोधात भूमिका घेणारे सेलेब्रिटी

भारतात, ‘फूड फार्मा’ म्हणून प्रसिद्ध असलेले रेवंत हिमतसिंगकांसारख्या इन्फ्लुएन्सरनी बहुराष्ट्रीय कंपन्या करत असलेल्या आरोग्य नियमांचे उल्लंघनाविरोधात आघाडी उघडली आहे. ते आपल्या कार्यक्रमांमध्ये उघडपणे या कंपन्यांच्या उत्पादनांवर टीका करतात. या कारणांमुळे या कंपन्यांनी हिमतसिंगकांविरुद्ध अनेक खटलेही दाखल केले आहेत. हिमतसिंगकांचे समाजमाध्यमांवर लाखो फॉलोअर आहेत.

कंपन्यांची प्रतिक्रिया काय आहे?

नेस्लेने ‘रॉयटर्स’ला दिलेल्या प्रतिक्रियेत असे म्हटले आहे की, अधिक सकस खाद्यपदार्थांची विक्री वाढवण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. तसेच लोकांना संतुलित आहाराबद्दल मार्गदर्शन करण्यासाठीही वचनबद्ध आहोत. विकसनशील देशांमध्ये पोषणमूल्यांची कमतरता भरून काढण्यासाठी नेस्ले आपली उत्पादने अधिक पौष्टिक करत आहे असे नेस्लेच्या प्रवक्त्यांनी ‘रॉयटर्स’ला ईमेलद्वारे सांगितले. तर पेप्सिकोच्या प्रवक्त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. गेल्या वर्षी या कंपनीने बटाट्याच्या चिपमधील सोडियमचे प्रमाण कमी करण्याचे आणि धान्याचे प्रमाण वाढवण्याचे ध्येय निश्चित केले होते.

nima.patil@expressindia.com