रस्‍ते अपघातांमुळे भारतात दरवर्षी जवळपास १.५ लाख लोक मृत्‍युमुखी पडतात, अशी कबुली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. हे अपघात कसे कमी होणार, याविषयी…

नितीन गडकरी काय म्हणाले?

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्‍या मते भारतात युद्ध, दहशतवाद आणि नक्षलवादापेक्षा रस्ते अपघातात जास्त मृत्यू होतात. देशात दरवर्षी ५ लाख रस्ते अपघात होतात, ज्यामध्ये १.५ लाख लोकांचा मृत्यू होतो आणि ३ लाखांवर लोक जखमी होतात. यामुळे देशाच्या सकल राष्‍ट्रीय उत्‍पादनाचे (जीडीपी) तीन टक्के नुकसान होते. अपघातांसाठी अनेकदा चालकांना जबाबदार धरले जाते, परंतु काही वेळा रस्ता अभियांत्रिकी चुकते. अपघात कमी करण्यासाठी सर्व महामार्गांची सुरक्षा पडताळणी आणि लेनची शिस्‍त पाळणे आवश्यक आहे. रस्ते अपघातात जखमी झालेल्या लोकांचे प्राण वाचवण्यासाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय रुग्णवाहिका तसेच त्यांच्या चालकांसाठी नवीन नियम बनवत आहे.

Two youths attacked with a koyta in Khadki crime news Pune news
पुणे: खडकीत दोघा तरुणांवर कोयत्याने वार
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
samruddhi expressway 233 deaths
दोन वर्षे, दीड कोटी वाहने, १४० अपघात, २३३ मृत्यू!
Best Bus accident, Inquiry committee BEST,
Best Bus Accident : मृतांच्या नातेवाईकांना दोन लाखांची तातडीची मदत, बेस्ट उपक्रमाकडून चौकशी समिती स्थापन
mankhurd subways in pathetic condition waiting for repairs
मानखुर्दमधील भुयारी मार्ग डागडुजीच्या प्रतीक्षेत
Kurla Best bus accident, Sanjay More ,
Kurla Bus Accident : कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरणी चालक संजय मोरेला अटक
pune two wheeler accident marathi news
पुणे : सातारा रस्त्यावर बीआरटी मार्गात दुचाकींची समोरासमोर धडक, दोघे जण जखमी
diarrhea, Badlapur, girl died diarrhea Badlapur,
अतिसाराने चिमुकलीचा मृत्यू, बदलापुरातील दुर्दैवी घटना, अंधश्रद्धेचा संशय

रस्‍ते अपघातांची आकडेवारी काय?

पोलीस विभागांकडून मिळालेल्‍या माहितीच्‍या आधारे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय ‘भारतातील रस्ते अपघात’संबंधी वार्षिक अहवाल प्रकाशित करते. त्‍यानुसार देशात २०२० मध्‍ये ३ लाख ७२ हजार १८१ अपघात झाले. २०२१ मध्‍ये ४ लाख १२ हजार ४३२ तर २०२२ मध्‍ये ४ लाख ६१ हजार ३१२ अपघातांची नोंद झाली. अपघातांमध्‍ये मृत्‍यूचे प्रमाण चिंताजनक आहे. २०२२ मध्‍ये तब्‍बल १ लाख ६८ हजार ४९२ लोकांना अपघातांमध्‍ये प्राण गमवावे लागले आहेत. रस्‍त्‍यांवरील खड्डयांमुळे देखील मोठ्या प्रमाणात अपघात झाले आहेत. देशात २०२० मध्‍ये खड्ड्यांमुळे ३ हजार ५६४, २०२१ मध्‍ये ३ हजार ६२५ तर २०२२ मध्‍ये ४ हजार ४४६ अपघात घडल्‍याची माहिती देण्‍यात आली आहे. महाराष्‍ट्रात २०२० मध्‍ये २४ हजार ९७१, २०२१ मध्‍ये २९ हजार ४७७ आणि २०२२ मध्‍ये ३३ हजार ३८३ अपघात झाले आहेत.

हेही वाचा >>> जिथून करोना पसरला त्याच वुहान प्रयोगशाळेत तयार झाली लसीची मात्रा, काय आहे याचं महत्त्व?

रस्‍ते अपघातांची कारणे काय?

अतिवेगाने वाहन चालवणे, निष्काळजीपणे वाहन चालवणे, दारू पिऊन वाहन चालवणे तसेच वाहतूकविषयक नियमांचे पालन न करणे यांसह अनेक घटक रस्‍ते अपघातांसाठी कारणीभूत मानले जातात. २०२२ मध्ये एकूण अपघातांपैकी ७२.३ टक्के अपघात केवळ वाहन वेगाने चालविल्यामुळे झाले आहेत. वेगाने वाहन चालविल्यामुळे ७१.२ टक्के मृत्यू आणि ७२.८ टक्के लोक जखमी झाले आहेत. २०२१ च्या वेगाने वाहन चालविण्याच्या घटनांची तुलना केल्यास एकूण अपघातांमध्ये १२.८ टक्के, मृत्यूंमध्ये ११.८ टक्के आणि जखमींच्या संख्येत १५.२ टक्के एवढी वाढ झाली आहे. चुकीच्या दिशेने वाहन चालविणे हे अपघाताचे दुसरे मोठे कारण असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे; ज्यामुळे झालेल्या अपघातांची संख्या ४.९ टक्के एवढी दाखविण्यात आली आहे.

हेही वाचा >>> हवेतील जंतू पसरवत आहेत का साथीचे रोग?

कोणत्‍या उपाययोजना?

स्टॉकहोम करारातील बांधिलकीनुसार, सरकारने २०३० पर्यंत रस्त्यावरील मृत्यू आणि जखमींचे प्रमाण ५० टक्‍क्‍यांहून कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यासाठी, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने ‘४ ई’ म्हणजे एज्युकेशन (शिक्षण), इंजिनिअरिंग (अभियांत्रिकी) (रस्ते आणि वाहने दोन्ही), एन्फोर्समेंट (अंमलबजावणी) आणि इमर्जन्सी केअर (आपत्कालीन सेवा) असा दृष्टिकोन स्वीकारला आहे.  रस्त्यांचा वापर करणाऱ्यांची वर्तणूक, रस्त्यांच्या पायाभूत सुविधा, वाहनांचे मापदंड, वाहतूक नियमांची अंमलबजावणी तसेच अपघातांना प्रतिबंध करण्यात तंत्रज्ञानाची भूमिका अशा विविध पैलूंवर देखील मंत्रालय काम करत आहे. त्‍यासाठी केंद्र आणि राज्य सरकार अशा दोघांच्याही अखत्यारीतील सर्व संस्थांनी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे.

सरकारचे उपक्रम काय आहेत?

रस्ते सुरक्षेबाबत प्रभावीपणे जनजागृती करण्यासाठी मंत्रालयाने समाज माध्‍यमे, इलेक्ट्रॉनिक आणि मुद्रित माध्यमांतून प्रचार आणि जनजागृती मोहीम राबवणे, तसेच जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि रस्ते सुरक्षा बळकट करण्यासाठी दरवर्षी राष्ट्रीय रस्ता सुरक्षा माह /सप्ताह पाळण्‍यात येत आहे. मंत्रालयाअंतर्गत  सर्व रस्ते  यंत्रणांच्या अधीक्षक अभियंता किंवा समकक्ष स्तरापर्यंतच्या तांत्रिक अधिकाऱ्यांसाठी रस्ते  सुरक्षा लेखापरीक्षक अभ्यासक्रम अनिवार्य करण्यात आला आहे.  राष्ट्रीय महामार्गांवर अपघातप्रवण क्षेत्र ओळखणे आणि ते दुरुस्त करण्यास प्राधान्य दिले जात आहे.

संरक्षणात्‍मक उपाययोजना कोणत्‍या?

रस्‍ते वाहतूक मंत्रालयाने वाहनातील १५ फेब्रुवारी २०२२ च्या अधिसूचनेद्वारे मोटारसायकल चालवताना किंवा त्यावरून नेताना चार वर्षांखालील मुलांसाठी सुरक्षा उपायांशी संबंधित निकष निर्धारित केले आहेत. तसेच सेफ्टी हार्नेस, क्रॅश हेल्मेटचा वापर करण्याची सूचना केली असून वेग मर्यादा ताशी ४० किमी निश्चित केली आहे. रस्ते अपघात रोखण्यासाठी वास्तव वेळात माहितीचे विश्लेषण करण्यासाठी अपघातविषयक तपशीलवार इलेक्ट्रॉनिक अहवाल (ई-डीएआर) आणि स्वयंचलित वाहन तपासणी केंद्रांची उभारणी यांसारखे उपक्रम देखील हाती घेण्यात येत आहेत.

mohan.atalkar@expressindia.com

Story img Loader