जूनच्या तिसऱ्या आठवड्यात पृथ्वीच्या उत्तर गोलार्धामध्ये प्रचंड उष्णतेची लाट आली आहे. हवामान बदलामुळे हे संकट उद्भवल्याचे संशोधनातून स्पष्ट होत असून येत्या काही दशकांमध्ये अशाच प्रकारच्या उष्णतेच्या लाटा येत राहतील असा इशाराही शास्त्रज्ञांनी दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हवामान बदलामुळे उष्णता का वाढत आहे?

जीवाश्म इंधनाच्या ज्वलनामुळे वातावरणात अधिकाधिक कार्बन वायू स्वरूपात सोडला जातो. त्यामुळे सूर्याकडून आलेली उष्णता हवेमध्ये जास्त प्रमाणात अडकून राहते. त्यामुळे कालांतराने सरासरी जागतिक तापमान वाढते. औद्योगिक क्रांती झाल्यापासून जागतिक सरासरी तापमान जवळपास १.३ अंश सेल्सियस इतके वाढले आहे. त्यावेळी पाश्चिमात्य देशांनी मोठ्या प्रमाणात कोळसा आणि अन्य जीवाश्म इंधनाचे जाळण्यास सुरुवात केली. त्याचा हा परिणाम आहे.

नवीन इशारा काय सांगतो?

औद्योगिक क्रांतीमुळे हवामान बदल झाला नसता तर आता उष्णतेच्या लाटांदरम्यान पारा इतका चढला नसता. इतकेच नाही तर, हवामान बदलामुळे उष्णतेच्या लाटांचे एकंदरीतच प्रमाण वाढले आहे आणि त्या अधिक धोकादायक झाल्या आहेत. या महिन्याच्या सुरुवातीला ‘यूसीएलए’चे हवामान शास्त्रज्ञ डॅनियल स्वेन यांनी यासंबंधी माहिती दिली आहे. याला पाठिंबा देणारे इतके पुरावे उपलब्ध आहेत की आता हे विधानही बिनमहत्त्वाचे वाटू लागले आहे असे ते म्हणाले.

हेही वाचा >>> विश्लेषण : देशातील हरभरा टंचाई किती गंभीर?

हवामान बदलासह इतर घटक

जागतिक तापमानवाढीबरोबरच, उष्णतेच्या लाटांना कारणीभूत होणारे अन्य घटक आणि हवामानाच्या अवस्थाही आहेत. प्रादेशिक परिसंचारण घटकांबरोबरच ‘एल निनो’ किंवा ‘ला निना’ यासारख्या हवामान परिस्थितांचाही मोठा परिणाम होतो. तसेच, भूपृष्ठाचा प्रकारही महत्त्वाची भूमिका बजावते. काळी जमीन आणि बांधकाम झालेली जमीन अधिक उष्णता शोषून घेते, तर परावर्तित पांढरी जमीन किंवा जंगल किंवा पाणथळीसारख्या नैसर्गिक यंत्रणा कमी उष्ण होते.

हवामान बदलाचा नेमका परिणाम कसा शोधतात?

विशिष्ट उष्णतेच्या लाटेवर हवामान बदलाचा नेमका किती परिणाम झाला हे शोधण्यासाठी शास्त्रज्ञ तुलनात्मक अभ्यास (ॲट्रिब्युशन स्टडी) करतात. गेल्या दशकात याप्रमाणे शेकडो संशोधने करण्यात आले आहेत. संगणकीय सदृशीकरणाचा (कम्प्युटर सिम्युलेशन्स) वापर करून, गत शतकातील हवामानाची सध्याच्या बदललेल्या हवामानाशी तुलना करून हा अभ्यास करण्यात आला. गेल्या शतकभरात मानवाने वातावरणाचे रासायनिक स्वरूप बदलले नसते तर हवामान यंत्रणा आजच्यासारखी झाली असती का याचा शोध त्याद्वारे घेण्यात आला.

हेही वाचा >>> तब्बल ९० टक्के लोकसंख्या मुस्लीम; तरीही या देशात हिजाबवर बंदी का घालण्यात आली?

यातून काय दिसले?

या अभ्यासांमधून काही महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्या. उदाहरणार्थ, एप्रिल महिन्यात दक्षिण आशियात आलेल्या धोकादायक उष्णतेच्या लाटांची शक्यता ४५ पटींनी वाढली. म्हणजेच गेल्या शतकात हवामान बदल झाला नसता तर उष्णतेची लाट येण्याची शक्यता ४५ पट कमी होती. कोलकाता शहराच्या सरासरी तापमानात गेल्या शतकभरात तब्बल १० अंश सेल्सियसने वाढ झाल्याचेही या संशोधनांमधून समोर आले.

नजीकच्या भविष्यात काय होऊ शकते?

आजच्या घडीला सर्व कार्बन उत्सर्जन थांबले तरीही आधीच वातावरणात इतका कार्बन सोडण्यात आला आहे की, पुढील काही दशकांमध्ये हवामान बदलामुळे तापमान वाढ होतच राहील. हवामान बदलावरील आंतरसरकारी समितीबरोबर (इंटरगव्हर्नमेंटल पॅनेल ऑन क्लायमेट चेंज) काम करणाऱ्या शास्त्रज्ञांच्या मते, सरासरी जागतिक तापमान औद्योगिक क्रांतीपूर्व काळातील तापमानापेक्षा १.५ अंश सेल्सियस जास्त राखायचे असेल तरीही, २०३०पर्यंत जगाला १९९५च्या तुलनेत कार्बन उत्सर्जन निम्मे करावे लागेल आणि २०५०पर्यंत शून्य कार्बन उत्सर्जनाचे ध्येय गाठावे लागेल. मात्र, १९९५पासून जागतिक कार्बन उत्सर्जन वाढतच आहे. सध्याच्या वेगाने २१००मध्ये जागतिक तापमानात २.७ अंश सेल्सियस इतकी वाढ होण्याचा धोका आहे.

उष्णतेच्या लाटांचा आरोग्यावर परिणाम

उष्णतेचा आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. उष्णतेमुळे हवामानाशी संबंधित मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक आहे. त्याशिवाय हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग, मधुमेह, मानसिक आरोग्य, दमा यांचा धोका अधिक असतो. तसेच, काही संसर्गजन्य रोगांचा प्रसार होण्याचा धोका वाढू शकतो. विशेष म्हणजे अधिक उष्णतेमुळे अपघातांचे प्रमाणही वाढते असे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले आहे. २००० ते २०१९ या कालावधीत दरवर्षी उष्णतेशी संबंधित मृत्यूचे प्रमाण जवळपास चार लाख ८९ हजार इतके होते. यातील ४२ टक्के मृत्यू आशियात तर ३६ टक्के मृत्यू युरोपमध्ये ओढवले.

nima.patil@expressindia.com