मराठवाड्यात जायकवाडी धरण भरल्याचं कौतुक होतंच होतं. दुष्काळी भागात पाणी आल्याचे मोठे अप्रुप असते. लातूर व धाराशिव हे दोन जिल्हे वगळता गोदावरी तटावर पाण्याचा संघर्ष नेहमीचा. पण जेव्हा पाणी येते तेव्हा ते सगळे वापरले जात नाही. पाण्याचा आणि पिकाची सांगड न घालता जायकवाडीचा पाणी वापर नक्की होतो कसा आणि किती, याविषयी.

जायकवाडीच्या पाण्याचा वापर होतो कसा‌?

जायकवाडी धरण ९७.३० टक्के भरले आणि मराठवाड्यातील मंडळींनी सुटकेचा नि:श्वास टाकला. जायकवाडी धरणाचे बारा दरवाजे उघडून गोदावरीच्या पात्रात पाणी साेडण्यात आले. जायकवाडी धरण १९७४ मध्ये पूर्ण झाले. म्हणजे मराठवाड्यातील सर्वांत मोठी सिंचन सुविधा निर्माण होऊन बरोबर ५० वर्ष झाली. गोदाकाठ तसाही संपन्न होताच. डाव्या कालव्यावर एक लाख ४१ हजार ६४० हेक्टर शेतीला पाणी उपलब्ध झाले. उजव्या कालव्यावर ४१ हजार ६८२ हेक्टर जमीन पाण्याखाली आली. पण कालपरत्वे हे दोन्ही कालवे पूर्ण क्षमतेने वाहूच शकले नाहीत. कालव्यांचे सिमेंटचे अस्तरीकरण केव्हाच गायब झाले आहे. आता त्यांच्या दुरुस्तीचा एक प्रस्ताव मान्य करणे बाकी आहे. तर दुसऱ्या कालव्याचे काम आताशी सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरपासून परभणीपर्यंत शेवटच्या टोकाला पाणी पोहोचत नाही. कालवे, चाऱ्या, पोटचाऱ्या नादुरुस्तच आहेत. त्यामुळे जेव्हा पाणी आवश्यक असते तेव्हा ते मिळतेच असे नाही, हे शेतकऱ्यांनाही माहीत होऊन गेले आहे. गोदावरीवरील कालव्याच्या आधारे शेतीला पाणी दिले जाते ते पाच जिल्ह्यांना. यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड आणि अहमदनगर जिल्ह्यातील ३८६ गावांचा समावेश आहे. त्यातील अनेक गावांमध्ये प्रमुख पीक आहे ऊस. जालना जिल्ह्यात काही प्रमाणात मोसंबीचे उत्पादन चांगले आहे. पण गोदाकाठच्या आणि कालव्याच्या आधारे सिंचन होणाऱ्या गावात नगर – नाशिक जिल्ह्यात पाऊस होतो की नाही याची आवर्जून नोंद ठेवणारी मंडळी मराठवाड्यात आहेत.

Traders reported that price of coriander decreased compared to last week and price of fenugreek is on rise
कोथिंबिरेच्या दरात घट; मेथी तेजीत, फळभाज्यांचे दर स्थिर
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Marathwada vidarbh farmers
विश्लेषण: सोयाबीनच्या हमीभावावरून शेतकऱ्यांची नाराजी का? ७० हून अधिक मतदारसंघांमध्ये ठरणार निर्णायक मुद्दा?
maharashtra vidhan sabha elections 2024, Rajura,
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर थेट आंदोलन न करणाऱ्या ॲड. चटप यांना मतदार स्वीकारणार का?
wpi inflation hits 4 month high in october on rising food prices
भाज्यांमधील किंमतवाढ ६३.०४ टक्क्यांवर; घाऊक महागाई दराचाही चार महिन्यांतील सर्वोच्च स्तर
loksatta editorial no interest rate cut by rbi retail inflation surges in october
अग्रलेख : म्हाताऱ्या शब्दांचा आरसा…
reserve bank of india latest marathi news
विश्लेषण: १४ महिन्यांतील उच्चांकी चलनवाढीमागे कारणे कोणती? व्याजदर कपात आणखी लांबणीवर? जीडीपी वाढही मंदावणार?

हेही वाचा >>> पाकिस्तानच्या समुद्रात आढळला प्रचंड खनिज तेलसाठा? उत्खननाची क्षमता किती? उद्ध्वस्त अर्थव्यवस्थेची भाग्यरेखा बदलेल?

जायकवाडी धरण भरले कितीदा?

गेल्या ५० वर्षांत जायकवाडी धरण ९० टक्क्यांपेक्षा १५ वेळा भरले. पण त्यातील पाण्याचा साठा ५० टक्के आणि त्यापेक्षा कमी होता ती वर्षे होती २१. म्हणजे धरण बांधल्यापासून ५० टक्क्यांपेक्षा अधिक धरण भरण्याचे प्रमाण तसे चांगले. म्हणजे ३६ वेळा त्यात लक्षणीय पाणीसाठा होता. ५० ते ७० टक्क्क्यांपेक्षा अधिक पाच वेळा, ७० ते ९० टक्क्यांपर्यंत सात वेळा धरण भरले. राज्यात उजनी आणि जायकवाडी ही धरणे मोठी. मराठवाड्यातील सर्वाधिक क्षमतेचे म्हणजे तब्बल १०२ अब्ज घटफूट ( टीएमसी ) जलसाठा जायकवाडीमध्ये होतो. गेल्या काही वर्षांत या धरणामध्ये खूप गाळ आल्याचा दावा केला जातो. तो किती असेल याचे फक्त अंदाज आहेत. त्यामुळे धरणांमधील पाणी कमी झाले की त्यातील गाळाचे हिशेब मांडले जातात. समन्यायी पाणी वाटपाच्या लढ्यातही गाळाचा साठा हा मुद्दा पुढे केला जातो.

किती क्षमतेने विसर्ग केला म्हणजे पूर येतो?

जायकवाडी धरणातून होणारी सुरक्षित विसर्ग क्षमता एक लाख १६ हजार घनफूट प्रतिसेकंद एवढी असते. एक लाख ८४ हजार घनफूट पाणी प्रतिसेकंद वेगाने सोडले तर काही गावे बाधित होतात. नदीने धोक्याची पातळी ओलांडली म्हणजे पाणी नदी पात्राबाहेर आले तर २६६ गावे बाधित होऊ शकतात. पण अशी परिस्थिती फारशी येत नाही. तेवढा पाऊस पडत नाही. २००६ मध्ये एकदा दोन लाख ५० हजार घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाणी सोडावे लागले होते. तेव्हा आलेल्या पुरानंतर गोदाकाठी पुरामुळे फारसे नुकसान झाले नाही. जलक्षेत्रातील तज्ज्ञ म्हणतात, की कोणत्याही नदीची परिक्रमा जेव्हा तिचे रूप अक्राळविक्राळ असते तेव्हा करावी. गोदावरीची सारी क्षमता नाशिक ते जायकवाडी याच पट्ट्यात विशाल स्वरूपाची. त्यामुळे २९०९ दशलक्ष घनमीटर म्हणजे १०२ टीएमसीच्या धरणाच्या २७ दरवाज्यातून पाणी सोडण्याची वेळ तशी कमीच येते. सध्या जरी जायकवाडीतून विसर्ग सुरू करण्यात आला असला तरी तो क्षमतेच्या मानाने खूपच कमी आहे.

हेही वाचा >>> Problem of ‘unmanaged’ waste: लांच्छनास्पद: प्लास्टिकच्या प्रदूषणामध्ये भारत जगात अव्वल, नवीन अभ्यास काय सांगतो?

समन्यायी पाणीवाटपाचा मुद्दा?

जायकवाडीतील धरणातील पाण्याच्या उपयोगावरून बरेच वादविवाद आहेत. जायकवाडीमध्ये जर ६५ टक्क्यांपेक्षा कमी पाणी असेल आणि नगर व नाशिक जिल्ह्यातील धरणे भरलेली असतील तर १५ सप्टेंबर रोजीच्या पाणी पातळीच्या आधारे समन्यायी पाणीवाटपाचे सूत्र मेंढीगिरी समितीने ठरवून दिले होते. आता हे सूत्रच कालबाह्य झाल्याचा दावा करत ते बदलण्यासाठी नाशिक व नगर जिल्ह्यातील नेत्यांनी न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत. या याचिकांच्या सुनावणी दरम्यान धरणातील पाण्याच्या वापरावरून प्रश्न उपस्थित केले जातात. जायकवाडीमधील पाणी मद्यनिर्मितीसाठी वापरले जाते. पण त्याचे एकूण प्रमाण खूपच कमी आहे. पण मराठवाड्यात वाढलेला ऊस आणि त्याचे परिणाम याची चर्चाही मराठवाड्यात गंभीरपणे झाली. सुनील केंद्रेकर या प्रामाणिक अधिकाऱ्याने पाणी वापर, टंचाई आणि ऊस याचा सहसंबंध सांगणारा एक अहवाल तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला होता. पुढे त्यांनी नोकरीतून सेवानिवृत्ती स्वीकारली. पण तो अहवाल मराठवाड्यातील पाणी वापरावर भाष्य करतो. या अहवालातील तपशील असे सांगतो की, मराठवाड्यात ५४ लाख हेक्टरवरील लागवडीपैकी ११ टक्के भूभाग सिंचनाखाली आहे. एकूण लागवडीत ५.७९ टक्के भूभागावर ऊस. आता ५४ साखर कारखान्यांतून गाळप होते. साखर वाढली तसे मराठवाड्यात अल्कोहोल वाढले. कमी क्षेत्रातील सर्वाधिक पाणी घेणारे पीक म्हणजे ऊस. त्यामुळे जायकवाडीचा लाभ होतो तो बहुतांश ऊस उत्पादकांना. त्यावर उभे ठाकलेल्या कारखान्यांना आणि कारखान्यांच्या माध्यमातून उभ्या राहणाऱ्या मतदारसंघांना. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्याचा योग्य उपयोग होतो काही मोजक्याच व्यक्तींना. माजलगाव धरणातील पाणीसाठा, परळी औष्णिक वीज केंद्रासाठी लागणारे पाणीही जायकवाडीतूनच मिळते. त्यामुळे जायकवाडी भरते की नाही याची उत्सुकता अनेक विभागात असते. जवळपास ३०० हून अधिक पाणीपुरवठा योजना जायकवाडी जलाशयावर अवलंबून आहेत. पुरवठ्यातील अडचणीमुळे हैराण असणारे संभाजीनगरमधील नागरिकही जायकवाडी भरले की आपल्याला पिण्याचे पाणी मिळेल, असा विचार करतात.