ठाणे रेल्वे स्थानकातील प्रवाशांचा भार कमी व्हावा यासाठी ठाणे आणि मुलुंड स्थानकांदरम्यान मनोरुग्णालयाच्या जागेवर नवे स्थानक उभारण्यात येणार आहे. या स्थानकाबाहेरील परिसरात रस्ते, वाहनांसाठी पूल, विद्युत व्यवस्था आणि प्रवाशांसाठी आवश्यक असलेल्या सोयीसुविधा उभारणीची कामे महापालिकेकडून गेल्या काही वर्षांपासून सुरू आहेत. मुख्य स्थानक उभारणीची कामे लवकरच सुरू होण्याचे संकेत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिल्यामुळे गेले अनेक वर्षे कागदावर असलेले या स्थानकाच्या उभारणीला वेग येणार आहे. ठाणे आणि आसपासच्या शहरांचे मोठ्या प्रमाणावर होत असलेले नागरीकरण पहाता नव्या स्थानकाचा प्रश्न मार्गी लागणे अतिशय गरजेचे आहे. घोडबंदर, विस्तारणारे वागळे इस्टेट, वर्तकनगर यासारखा परिसर तसेच जुन्या स्थानकाच्या दोन्ही बाजूंना उभ्या रहाणाऱ्या नव्या वस्त्यांसाठी मेट्रो, उड्डाणपूल, उन्नत मार्गांची उभारणी ही जशी काळाची गरज आहे त्याचप्रमाणे नवे स्थानक लवकरात लवकर कार्यान्वित होणे आवश्यक मानले जात आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा