अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन गेल्या आठवड्यात पहिल्या अध्यक्षीय निवडणूक वादचर्चेत (डिबेट) अडखळल्यामुळे आणि चाचपडल्यामुळे त्यांना निवडणुकीतच उतरवू नये आणि त्यांनी स्वतःहून पायउतार व्हावे, असा मतप्रवाह प्रबळ बनला आहे. खुद्द बायडेन यांनी माघार घेणार नसल्याचे ठामपणे म्हटले असले, तरी त्यांचा उत्तराधिकारी शोधण्याची वेळ नजीक आल्याचे डेमोक्रॅटिक नेत्यांना वाटते. विद्यमान उपाध्यक्ष कमला हॅरिस यांचे नाव यात आघाडीवर आहे. रॉयटर्स आणि सीएनएन या दोन्हींच्या पाहण्यांमध्ये कमला हॅरिस या डोनाल्ड ट्रम्प यांना तोडीस तोड लढत देऊ शकतील, असे आढळून आले.

कमला हॅरिस कोण?

आशियाई-अमेरिकी आणि आफ्रिकी-अमेरिकी वंशाच्या कमला हॅरिस २०२०मधील अध्यक्षीय निवडणुकीनंतर अमेरिकेच्या पहिल्या महिला उपाध्यक्ष बनल्या. इतक्या उच्च पदावर जाणाऱ्या त्या पहिल्याच मिश्रवर्णी महिला ठरल्या. त्यांची आई श्यामला गोपालन या तमीळ तर वडील डोनाल्ड जे. हॅरिस हे जमैकन-अमेरिकन होते. कायदा या विषयात उच्च शिक्षण घेतल्यानंतर सुरुवातीस त्या कॅलिफोर्निया राज्यात प्रशासकीय आणि कायदा क्षेत्रात नोकरी करत होत्या. पुढे डिस्ट्रिक्ट अॅटर्नी, अॅटर्नी जनरल आणि सिनेटर असा त्यांचा प्रवास राहिला. २०१६मध्ये अमेरिकेच्या सेनेटमध्ये दाखल झालेल्या त्या दुसऱ्या आफ्रिकी-अमेरिकी महिला आणि पहिल्या आशियाई-अमेरिकी महिला ठरल्या.

Gopal Shetty Take back From Election
Gopal Shetty : गोपाळ शेट्टींची माघार, देवेंद्र फडणवीस यांची शिष्टाई यशस्वी, बोरीवलीतलं बंड शमवण्यात भाजपाला यश
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Saturday Night Live program
अमेरिकेतील प्रचार अखेरच्या टप्प्यात, कमला हॅरिस लोकप्रिय टीव्ही कार्यक्रमात ; ट्रम्प यांचा उत्तर कॅरोलिनावर भर
loksatta editorial Donald Trump 2024 presidential campaign
अग्रलेख: सुज्ञ की सैतान?
बंडखोरीचा चेंडू फडणवीसांच्या कोर्टात; ‘अकोला पश्चिम’मध्ये हरीश आलिमचंदानींच्या भूमिकेकडे लक्ष; रिसोडमध्ये महायुतीत मिठाचा खडा
close race between Kamala Harris and Donald Trump in US election 2024
अमेरिकेत अध्यक्षपदासाठी डोनाल्ड ट्रम्प आणि कमला हॅरिस यांच्यात अभूतपूर्व चुरस! अधिक मते मिळूनही होऊ शकतो पराभव?
maharashtra vidhan sabha election 2024 cm eknath shinde strict stance against rebels in shiv sena
तुम्ही कामाला लागा, महायुतीतल्या विरोधकांना मी बघून घेतो; बंडखोर आणि नाराजांबाबत मुख्यमंत्र्यांची कठोर भूमिका
congress mallikarjun kharge on ups
‘पंतप्रधान मोदींचा हलक्या दर्जाचा प्रसिद्धीचा प्रयत्न’, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची टीका; ‘एक्स’वरील पोस्टवरून दोघांमध्ये उडाले खटके

हेही वाचा >>> ब्रिटनमध्ये मजूर पक्षाच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार… कीर स्टार्मर!

जनमत पाहण्या काय सांगतात?

रॉयटर्स-इपसॉस आणि सीएनएन वाहिनी या दोन संस्थांनी नुकत्याच घेतलेल्या दोन स्वतंत्र जनमत पाहण्यांमध्ये कमला हॅरिस यांच्या नावाला चांगला पाठिंबा मिळताना दिसून आला. रॉयटर्स-इपसॉसच्या पाहणीत त्या डिबेटनंतर तीनपैकी एका डेमोक्रॅट सदस्याला बायडेन यांनी माघार घ्यावी असे वाटते. ८१ टक्के सदस्यांची हॅरिस यांना, तर ७८ टक्के सदस्यांची बायडेन यांना पसंती आहे. ट्रम्पविरुद्ध सामना झालाच, तर हॅरिस यांना ४२ टक्के आणि ट्रम्प यांना ४३ टक्के मते मिळतील, असे आढळले. सीएनएन पाहणीत ट्रम्प यांना ४९ टक्के, तर हॅरिस यांना ४७ टक्के मते मिळाली. बायडेन यांना अशाच चाचणीत ४३ टक्के मते मिळाली होती. या सगळ्या चाचण्यांमधून दोन बाबी स्पष्ट होतात. पहिली बाब म्हणजे, बायडेन यांच्याविषयी डेमोक्रॅटिक नेतृत्वाच्या मनात किन्तु असला तरी सर्वसामान्य मतदारांचा त्यांना असलेला पाठिंबा तितकासा घटलेला नाही. दुसरी बाब म्हणजे, कमला हॅरिस या बायडेन यांना तोडीस तोड पर्याय ठरू शकतो हेही दिसून येतो.

कमला हॅरिस यांचे म्हणणे काय?

खुद्द कमला हॅरिस यांनी मात्र त्या डिबेटनंतर सातत्याने बायडेन यांची पाठराखण केलेली दिसते. बायडेन यांची कामगिरी सुरुवातीस धीमी होती. पण त्यांनी व्यवस्थित पकड घेतली, असे हॅरिस यांनी म्हटले होते. त्यांच्या उमेदवारीविषयी चर्चा सुरू असली, तरी कमला हॅरिस यांनी बायडेन यांच्याविषयी सातत्याने आदरपूर्वक आणि जबाबदारीने विधाने केली आहेत.

हेही वाचा >>> अबकी बार ब्रिटनमध्ये ‘४००’ पार! निर्विवाद बहुमत मिळवणाऱ्या मजूर पक्षाचा काय आहे इतिहास?

बायडेन यांचे म्हणणे काय?

अटलांटात सीएनएन वाहिनीच्या स्टुडिओत झालेल्या वादचर्चेनंतर नॉर्थ कॅरोलायना येथे एका मेळाव्यात बायडेन यांनी काही बाबी मान्य केल्या. मी आता म्हातारा झालोय. पूर्वीप्रमाणे वाद घालू शकत नाही. पण अध्यक्ष म्हणून जबाबदारी निभावण्यास सक्षम आहे, असेही त्यांनी सांगितले. आपण कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नसल्याचे त्यांनी अलीकडे वारंवार म्हटले आहे. मध्यंतरी ते माघार घेणार असल्याच्या चर्चेला यातून पूर्णविराम मिळाला.

कमला हॅरिस यांचे गुणदोष कोणते?

कमला हॅरिस यांनी कधी काळी म्हणजे २०२०मध्ये अध्यक्षपद उमेदवारीसाठी बायडेन यांना आव्हान दिले होते. पण सुरुवातीच्या प्रायमरीजमध्ये (पक्षांतर्गत निवडणुका) फार भरीव काही करता न आल्यामुळे त्यांनी माघार घेतली. उपाध्यक्ष म्हणून सुरुवातीच्या काळात त्यांना म्हणावी तशी लोकप्रियता लाभू शकली नव्हती. मेक्सिको सीमा प्रश्न, आंतरराष्ट्रीय संबंध या आघाड्यांवर त्यांची कामगिरी निस्तेज होती. मात्र हळूहळू त्यांनी कारभारावर पकड घेण्यास सुरुवात केली आहे. गर्भपाताच्या मुद्द्यावर त्यांनी आक्रमरपणे डेमोक्रॅटिक पक्षाची बाजू मांडली. आफ्रिकी-अमेरिकी, आशियाई-अमेरिकी, हिस्पॅनिक वंशियांमध्ये त्यांना मान्यता आणि लोकप्रियता मिळू लागली आहे. त्या काहीशा फटकळ आणि मोठ्याने हसणाऱ्या असल्यामुळे त्यांची पूर्वी समाजमाध्यमांत टर उडवली जायची. पण बायडेन यांच्या अडखळत्या आणि रंगहीन  व्यक्तिमत्त्वाच्या पार्श्वभूमीवर हे कथित अवगुण आता गुण ठरू लागले आहेत.