संजय बापट

यंदाच्या हंगामात साखर उत्पादनात घट होण्याची भीती व्यक्त करीत केंद्र सरकारने साखरेची निर्यात आणि इथेनॉल निर्मितीवर बंदी आणली होती. मात्र उत्पादनात वाढ झाल्याने हे निर्बंधही लवकरच हटविण्याचे संकेत केंद्राकडून मिळत आहेत.

धारावीकरांसाठी देवनारमध्येही भूखंड; क्षेपणभूमीची १२५ एकर जागा देण्याचा राज्य सरकारचा निर्णय
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
dcm devendra fadnavis inaugurate Cyber Security Project
अत्याधुनिक साधनांमुळे सायबर गुन्हेगार आपल्यापेक्षा पुढे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Government constructions in Maharashtra,
ऐन निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील सरकारी बांधकामे ठप्प, ही आहेत कारणे
Farmers Complaints Regarding Soybean Guaranteed Price and Procurement Centre karad
सोयाबीनला हमीभाव अन् खरेदी केंद्रही नाही; शेतकऱ्यांच्या लुटीच्या तक्रारी
Notice of Maharashtra Pollution Control Board regarding polluting company Pune news
प्रदूषण करणाऱ्या कंपनीचे वीज, पाणी बंद करा! महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा दणका
Bhoomipujan of Naina projects tomorrow by Prime Minister
कृषी क्षेत्राबाबत मोदी सरकारचा आणखी एक मोठा निर्णय
Dead fish gifted to Chief Engineer of Environment Department
पिंपरी : …अन् पर्यावरण विभागाच्या मुख्य अभियंत्याला दिले मृत मासे भेट

साखरेची देशांतर्गत गरज किती?

यंदाचा गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी देशात सन २०२२-२३ च्या हंगामाप्रमाणेच एकूण ३३० लाख टनाच्या आसपास साखरेचे उत्पादन होण्याचा अंदाज होता. पण उत्तर प्रदेशात उसावर कीड पडल्यामुळे आणि तेथील गूळ उत्पादकांनी उसाला चांगला भाव दिल्यामुळे शेतकऱ्यांनी यंदा कारखान्यांपेक्षा गुऱ्हाळांना ऊस दिल्याने तेथील साखर उत्पादनात काहीशी घट झाली. पण डिसेंबर-फेब्रुवारीदरम्यान झालेल्या मान्सुनोत्तर पावसामुळे महाराष्ट्रात ऊस उत्पादनासह साखर उतारा आणि साखर उत्पादनात हंगाम पूर्व अंदाजापेक्षा १५ ते २० टक्के वाढ झाली आहे. परिणामी हंगामअखेर देशात साखर उत्पादन सुमारे ३२० लाख टनांवर जाण्याचा अंदाज आहे.

देशाची एका वर्षांची साखरेची गरज आता वाढली असून ती २८० ते २८५ लाख टन इतकी झाली आहे. त्यात घरगुती आणि औद्योगिक वापराचा समावेश आहे. त्यातही घरगुती वापर ५० लाख टनांच्या घरात असून उर्वरित साखर शीतपेये, मिठाई, चॉकलेटसह अन्य उद्योगांकडून वापरली जाते. देशांतर्गत वापर आणि तीन महिन्यांचा सुमारे ६५ ते ७० लाख टन सारखेचा राखीव साठा ठेवून शिल्लक साखरेच्या निर्यातीस सरकार परवानगी देते. यंदा मात्र निवडणूक वर्ष आणि देशांतर्गत साखरेचे उत्पादन घटण्याचा अंदाज लक्षात घेऊन केंद्र सरकारने साखर निर्यातीवर निर्बंध घातले आहेत.

यंदाचा गळीत हंगाम कसा आहे?

यंदाच्या गळीत हंगामात मराष्ट्रात साखर उत्पादनात झालेल्या वाढीमुळे देशांतर्गत साखरेची चिंता मिटली आहे. देशात यंदा सहकारी आणि खाजगी अशा ५३५ साखर कारखान्यांनी गाळप हंगाम घेतला असून आतापर्यंत ३१९ लाख मेट्रिक टन साखर उत्पादित केली असून ती मागील वर्षांच्या ३३० लाख टनाच्या तुलनेत ११ लाख टनांनी कमी आहे. याचाच अर्थ यंदाचा हंगाम संपल्यानंतर मागील वर्षांच्या तुलनेत १० लाख टन कमी साखरेचे उत्पादन होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. आजमितीस देशातील डझनभर राज्यात साखर कारखाने सुरू आहेत. तहीही देशातील साखर उत्पादनात महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि कर्नाटक या तीन राज्यांत ८३ टक्के साखर उत्पादन होते. चालू हंगामात महाराष्ट्रात २०७ कारखान्यांनी १०९.५० लाख टन साखर उत्पादन घेतले आहे. महाराष्ट्राच्या खालोखाल उत्तर प्रदेशात १२१ कारखान्यांनी गाळप हंगाम घेतला असून (मागील वर्षांच्या १०४ लाख टनाच्या तुलनेत) यंदा १०५ लाख टन साखरेचे उत्पादन केले आहे. तर कर्नाटकातील ७६ कारखान्यांनी ५० लाख टन साखरेचे उत्पादन केले आहे.

साखर उद्योगासमोरील संकट कोणते?

गतवर्षी पावसाची अनियमितता आणि वातावरणातील बदलामुळे उसाच्या पिकावर मोठा परिणाम झाला होता. महाराष्ट्राप्रमाणेच देशातही साखरेचे उत्पादन घटण्याचा अंदाज केंद्र सरकारनेही व्यक्त केला होता. त्यातच निवडणुका डोळयांसमोर ठेवून देशांतर्गत साखरेचे भाव स्थिर ठेण्यासाठी केंद्र सरकारने गणपती, दिवाळी अशा मोठया सणांसाठी राखीव कोटयातील साखर बाजारात आणली होती. परिणामी राखीव साठयात झालेली घट आणि साखर उत्पादनात घट होण्याचा अंदाज अशा दुहेरी अडचणीत सापडलेल्या केंद्र सरकाने साखर निर्यातीवर निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला तसेच चालू गळीत हंगाम सुरू होताच ७ डिसेंबर रोजी एका आदेशान्वये रसापासून इथेनॉल निर्मितीवर बंदी घातली. इंधानामध्ये १० टक्के इथेनॉल मिक्स करण्याचे केंद्राचेच धोरण आहे. त्यानुसार इथेनॉल निर्मितीस प्रोत्साहन देण्यासाठी राज्यातील साखर उद्योगाला प्रोत्साहनही देण्यात आले. त्यानुसार हंगामापूर्वी सुमारे ४५ लाख टन साखर निर्मिती होणारा रस इथेनॉल निर्मितीकडे वळविण्याचे धोरण जाहीर करण्यात आले होते.

महाराष्ट्रातील परिस्थिती काय आहे?

राज्यात गेल्या वर्षी मान्सूनचे उशिरा झालेले आगमन आणि विलंबाने ऊस पट्टयात झालेला पाऊस यामुळे ऊस पीक संकटात आले होते. त्यामुळे राज्यात हंगामाच्या सुरुवातीस ८५ लाख टन साखरेचा अंदाज सहकार विभागाने व्यक्त केला होता. मात्र डिसेंबर- फेब्रुवारी तर सुधारित अंदाजानुसार ९५ लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन होईल असा अंदाज सहकार विभागाने व्यक्त केला होता. पण डिसेंबर-फेब्रुवारीदरम्यान झालेला मान्सुनोत्तर पाऊस उसासाठी फायद्याचा ठरला. या पावसामुळे ऊस उत्पादनासह साखर उतारा आणि साखर उत्पादनात हंगाम पूर्व अंदाजापेक्षा १५ ते २० टक्के वाढ झाली. त्यामुळे राज्यात अनपेक्षितपणे १०९.५० लाख टन साखरेचे उत्पादन झाले असून अजूनही मराठवाडा आणि सोलापूर भागातील काही कारखाने सुरू असल्याने साखरेच्या उत्पादनात वाढ अपेक्षित आहे.

sanjay.bapat @expressindia.com