जयेश सामंत

तिसरी, चौथी मुंबई म्हणून विकसित होत असलेल्या कल्याण, डोंबिवली, बदलापूर, भिवंडी, १४ गावे आणि २७ गावांच्या परिसरात होत असलेले वाढते नागरीकरण लक्षात घेऊन नवी मुंबईतील नियोजित विमानतळापासून भिवंडीपर्यंत नवा वळण रस्ता उभारण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच केली. २०१४ मध्ये राज्यात भाजप-शिवसेना युतीचे सरकार स्थापन झाले आणि ठाणे तसेच आसपासच्या परिसरातील मेट्रो, उन्नत मार्ग, खाडीपूल यांसारख्या मोठ्या विकास प्रकल्पांना वेग मिळू लागला. मुंबईतील स्कॉय वॉकसारख्या प्रकल्पांच्या उभारणीवर कोट्यवधी रुपयांचा खर्च करणाऱ्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने याच काळात ठाण्याकडे लक्ष वळविल्याचे पाहायला मिळते. एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास विभागाचे मंत्रीपद येताच मोठ्या आणि बहुचर्चित विकास प्रकल्पांचा ओघ ठाण्याच्या दिशेने वाढू लागला. आता तर राज्याचे मुख्यमंत्रीपद शिंदे यांच्याकडे आहे. त्यामुळे सरकारच्या विकासाचा केंद्रबिदू हा मुंबई महानगर क्षेत्र आणि त्यातही ठाणे जिल्हा ठरू लागला आहे.

grand alliance government accelerate the shaktipeeth highway work after election victory
निवडणुकीत प्रचंड बहुमत… आता महायुती सरकारकडून शक्तिपीठ महामार्गाला गती?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Thane Traffic Branch, Thane Police ,
ठाणे वाहतूक शाखेच्या विभाजनाचा प्रस्ताव, वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी ठाणे पोलिसांची निर्णय
portfolio, investment , Alphaportfolio Concept ,
चला अल्फापोर्टफोलिओ तयार करूया
policy will be prepared to resolve issues related to biodiversity parks says madhuri misal
राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचे ‘बीडीपी’बाबत मोठे वक्तव्य, म्हणाल्या…
Muralidhar Mohol
सहकारातील त्रिस्तरीय पतरचनेची साखळी मजबूत करण्याची गरज- मुरलीधर मोहोळ
Chief Minister Devendra Fadnavis announcement regarding land registration Mumbai news
कोणत्याही कार्यालयातून दस्तनोंदणीची मुभा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
Aaple Sarkar, devendra fadnavis, mumbai,
‘आपले सरकार’द्वारे सेवांमध्ये वाढ करा : मुख्यमंत्री

हेही वाचा >>> विश्लेषण: ‘समृद्धी’मुळे बदललेल्या वाटा वन्यजीव स्वीकारतात का?

मुंबई महानगर प्रदेशाची व्याप्ती किती आहे?

मुंबईपासून अलिबागपर्यंतच्या काही तहसील क्षेत्रापर्यंत ६३२८ चौरस किलोमीटर इतक्या मोठ्या क्षेत्राची मुंबई महानगर प्रदेशात गणना होते. यामध्ये मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड या पाच जिल्ह्यांचा समावेश होतो. याशिवाय नऊ महानगरपालिका, नऊ नगरपालिकांसह अडीच कोटींपेक्षा अधिक लोकसंख्येचे क्षेत्र या पट्ट्यात मोडते. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणासह (एमएमआरडीए), महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी), म्हाडा, सिडको, सार्वजनिक बांधकाम विभागासारख्या मोठ्या शासकीय संस्थांमार्फत या क्षेत्रात विकासकामे सुरू असतात. राज्य सरकारमधील वरिष्ठ सूत्रांनुसार, या संपूर्ण पट्ट्यात सद्य:स्थितीत चार लाख ६५ हजार कोटी रुपयांची विकासकामे सुरू आहेत अथवा त्यासाठी गुंतवणूक केली जात आहे. राज्याच्या सर्वांगीण विकासाचे कितीही दावे केले जात असले तरी इतक्या प्रचंड प्रमाणात गुंतवणूक ही केवळ मुंबईसह आसपासच्या पाच जिल्ह्यांमधील पायाभूत सुविधांच्या उभारणीवर सध्या सुरू आहे.

मुंबई महानगर क्षेत्रात सुरू असलेल्या पायाभूत सुविधांची व्याप्ती किती मोठी आहे?

मुंबई महानगर क्षेत्राच्या विकासाची मोठी जबाबदारी महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या खांद्यावर असली तरी राज्य सरकारच्या इतर संस्थांमार्फतदेखील या संपूर्ण भागात कोट्यवधी रुपयांचे अवाढव्य असे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. सद्य:स्थितीत मुंबई महानगर विकास प्राधिकरण, राज्य रस्ते विकास महामंडळ, मुंबई महापालिका आणि भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणामार्फत मुंबई महानगर प्रदेशात दोन लाख कोटी रुपयांचे पायाभूत सुविधा प्रकल्प सुरू आहेत. याशिवाय मुंबई मेट्रो रेल प्राधिकरण, बुलेट ट्रेन प्राधिकरण, सिडकोकडून दीड लाख कोटी, सिडको- म्हाडा- झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण आणि सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत ७० हजार कोटी, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरणामार्फत १६ हजार ७०० कोटींचे प्रकल्प सुरू आहेत. यामध्ये प्रामुख्याने रस्ते, रेल्वे, मेट्रो, बांधकाम क्षेत्र, विमानतळाची उभारणी तसेच पाणीपुरवठा प्रकल्पांचा समावेश आहे.

हेही वाचा >>> चीनचे परराष्ट्र मंत्री आफ्रिकेत? चीनच्या मनात नक्की आहे तरी काय?

ठाणे जिल्ह्यातील विकासकामांना राज्य सरकारची साथ कशी मिळत आहे?

मुंबई महानगर क्षेत्रातील पाच जिल्ह्यांपैकी पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांसाठी सर्वाधिक निधी सध्या ठाणे जिल्ह्याच्या दिशेने रवाना होत असल्याचे अगदी स्पष्टपणे दिसत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, एकट्या ठाणे जिल्ह्यात सध्याच्या घडीला एक लाख ५१ हजार २७१ कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांची आखणी करण्यात आली आहे. त्यापाठोपाठ मुंबई उपनगरात (एक लाख २६ हजार कोटी), मुंबई शहर (६३ हजार २८५ कोटी), रायगड (९८ हजार ५७४ कोटी) आणि पालघर जिल्ह्यात २५ हजार ९९३ कोटी रुपयांची गुंतवणूक वेगवेगळ्या प्रकल्पांमध्ये केली जात आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची सूत्रे येताच ठाणे आणि आसपासच्या परिसरातील पायाभूत सुविधांच्या उभारणीतील गुंतवणुकीचा वाटा मोठ्या प्रमाणावर वाढविण्यात आला आहे. ठाणे, कल्याण मेट्रो प्रकल्पांपाठोपाठ ठाणे सागरी किनारा मार्ग (२१७० कोटी), ऐरोली-काटई नाका फ्रीवे (१७७० कोटी), ठाणे-बोरिवली भुयारी बोगदा (१३ हजार २०० कोटी) याशिवाय नवी मुंबई विमानतळ ते कळवा उन्नत मार्ग यांसारख्या मोठ्या प्रकल्पांची आखणी पूर्ण करण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्याच्या या विकासवाटा मुंबई महानगर प्रदेशासाठी अतिशय महत्त्वाच्या ठरणार आहेत.

चौथ्या मुंबईचेही ‘कल्याण’ कसे होते आहे?

विकासाच्या आघाडीवर एरवी गावकुसाबाहेरील वस्त्या अशा पद्धतीने हेटाळणी केली जाणारी कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर, भिवंडी यांसारख्या शहरांनाही गेल्या काही वर्षांत अच्छे दिन आल्याचे चित्र आहे. वडाळा-ठाणेपाठोपाठ ठाणे-भिवंडी-कल्याण या मेट्रो मार्गाचे काम सध्या वेगाने सुरू आहे. कल्याणची ही मेट्रो पुढे थेट तळोजापर्यंत नेण्यात येणार आहे. डोंबिवलीलगत मोठ्या संख्येने उभ्या राहात असलेल्या नागरी वसाहतींसाठी हा मेट्रो प्रकल्प निर्णायक ठरू शकेल असे चित्र आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खासदार पुत्र डाॅ. श्रीकांत यांच्या आग्रहामुळे या संपूर्ण पट्ट्यात विकासकामांसाठी हजारो कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारकडून उभा केला जात आहे. याच भागात कल्याण विकास केंद्राची आखणी केली जात आहे. हा नवा मेट्रो मार्ग या भागातील उद्योगांसाठीदेखील पूरक ठरणार आहे. ऐरोलीपासून काटईपर्यंत उभारला जाणारा उन्नत मार्ग कल्याण, डोंबिवलीकरांना मुंबईशी जोडणारा नवा मार्ग ठरू शकणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत आखण्यात आलेला विरार-जवाहरलाल नेहरू बंदरापर्यंतच्या नव्या रस्त्यामुळे ठाणे, कल्याण, डोंबिवली या भागांनाही अवजड वाहतुकीपासून दिलासा मिळू शकणार आहे. कांजुरमार्ग ते बदलापूर हा ४५ किलोमीटर लांबीचा आणि १३ हजार ५०० कोटी रुपयांच्या प्राथमिक रकमेचा प्रकल्प सध्या तरी कागदावर असला तरी तोदेखील अभ्यासाच्या पातळीवर काहीसा पुढे सरकला आहे. प्रतिमुंबईच्या विकासाचा वेग या प्रकल्पांमुळे कमालीचा वाढू शकणार आहे. मुख्यमंत्री आणि त्यांचे खासदार पुत्र यांच्या रेट्यामुळे महाराष्ट्रात पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी केल्या जाणाऱ्या गुंतवणुकीत ठाणे जिल्हा अव्वल ठरतोय हे यानिमित्ताने स्पष्टपणे दिसू लागले आहे.

Story img Loader