मंगल हनवते
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
बीकेसीतील वाहतूक व्यवस्था मजबूत करण्यासाठी आणखी एक वाहतूक व्यवस्थेचा अत्याधुनिक पर्याय पुढे आणला आहे. हा पर्याय म्हणजे पॉड टॅक्सी. उन्नत मार्गावरून धावणारी पॉड टॅक्सी शक्य तितक्या लवकर सुरू करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे.
आंतरराष्ट्रीय दर्जाचे आर्थिक केंद्र म्हणून विकसित होत असलेल्या वांद्रे-कुर्ला संकुलाच्या परिसरातील वाहतुक कोंडीचा प्रश्न अत्यंत गंभीर होत चालला आहे. बीकेसीत येण्या-जाण्यासाठी वेगवान वाहतूक व्यवस्थेचा पर्याय निर्माण करून देण्यासाठी पॉड टॅक्सीचा पर्याय मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) आणला आहे. ही पॉड टॅक्सी म्हणजे काय? हा प्रकल्प कसा असेल? त्यामुळे प्रवाशांना नेमका काय फायदा होणार? याचा हा आढावा….
बीकेसीत वाहतूक व्यवस्थेची सद्यःस्थिती कशी?
नियोजन प्राधिकरण म्हणून एमएमआरडीएने वांद्रे पूर्व येथे नवीन आर्थिक केंद्र विकसित केले आहे. हे केंद्र म्हणजे वांद्रे-कुर्ला संकुल म्हणजेच बीकेसी. आज बीकेसी हे मुंबईतील आंतरराष्ट्रीय दर्जाचे आर्थिक केंद्र म्हणून विकसित होत आहे. आज या आर्थिक केंद्रात आंतरराष्ट्रीय कंपन्यांची कार्यालये, विविध देशांच्या वाणिज्य कचेऱ्या, बँकांची मुख्यालये, सरकारी-खासगी शाळा, रुग्णालय तेथे आहेत. त्यामुळे बीकेसीत दररोज सुमारे चार लाख नागरिक नोकरीनिमित्त येतात तर लाखो नागरिक विविध प्रकारच्या कामासाठी बीकेसीत येतात. त्यामुळे बीकेसीत येणाऱ्या जाणाऱ्यांची आणि वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे. उपलब्ध रस्ते, वाहतूक व्यवस्थेचे पर्याय अपुरे पडत आहेत. वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर झाला आहे. गर्दीच्या वेळी बीकेसीत येणे किंवा बीकेसीतून बाहेर पडणे नागरिकांसाठी अत्यंत अवघड ठरते.
हेही वाचा >>> विश्लेषण : ‘चारशेपार’साठी भाजपच्या पूर्वेपासून दक्षिणेपर्यंत मोर्चेबांधणीला कितपत यश? भाजपकडे किती नवे मित्र?
पॉड टॅक्सी का?
बीकेसीतील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी काय करावे लागेल याचा अभ्यास एमएमआरडीएकडून करण्यात येत आहे. त्याचवेळी मेट्रो, उन्नत रस्ते प्रकल्प बीकेसीत आणण्यात आले आहेत. बीकेसीतून धावणाऱ्या मेट्रो मार्गिका कार्यान्वित झाल्यानंतर बीकेसीतील वाहतूक व्यवस्था मजबूत होईल आणि वाहतूक कोंडी दूर होईल, असा दावा केला जात आहे. असे असताना आता बीकेसीतील वाहतूक व्यवस्था मजबूत करण्यासाठी आणखी एक वाहतूक व्यवस्थेचा अत्याधुनिक पर्याय पुढे आणला आहे. हा पर्याय म्हणजे पॉड टॅक्सी. उन्नत मार्गावरून धावणारी पॉड टॅक्सी शक्य तितक्या लवकर सुरू करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे.
पॉड टॅक्सी प्रकल्प कसा आहे?
एमएमआरडीएच्या प्रस्तावानुसार वांद्रे पूर्व रेल्वे स्थानक ते कुर्ला पूर्व रेल्वे स्थानक बीकेसी मार्गे असा ८.८ किमीचा पॉड टॅक्सीचा मार्ग एमएमआरडीएकडून बांधण्यात येणार आहे. हा मार्ग उन्नत असेल. स्वयंचलित जलद सार्वजनिक वाहतूक प्रणालीअंतर्गत हा प्रकल्प राबविला जाणार आहे. ८.८ किमीच्या मार्गात ३८ स्थानके असतील. प्रति सहा प्रवासी क्षमतेची ही पॉड टॅक्सी ३.५ मीटर लांब, १.४७ मीटर रुंद आणि १.८ मीटर उंच असेल. ताशी ४० किमी वेगाने ही टॅक्सी धावणार आहे. या प्रकल्पासाठी १०१६.३८ कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. सार्वजनिक-खासगी तत्त्वावर हा प्रकल्प राबविला जाणार आहे. या मार्गासाठी ५००० चौ मीटर जागेवर डेपो बांधला जाणार आहे. अशा या पॉड टॅक्सीद्वारे कुर्ला ते बीकेसी किंवा वांद्रे ते बीकेसी अंतर पाच ते सहा मिनिटांत पार करता येणार आहे. मात्र त्यासाठी प्रवाशांना प्रति किमी मागे २१ रुपये असे तिकीट मोजावे लागणार आहे. शेयर रिक्षा, रिक्षा आणि बेस्ट बस पेक्षा हा पर्याय काहीसा महाग असेल. पण हा अतिवेगवान आणि आरामदायी अत्याधुनिक वाहतूक व्यवस्थेचा पर्याय असल्याने या पर्यायासाठी नागरिक हा आर्थिक भार उचलतील असा दावा एमएमआरडीएकडून केला जाता आहे.
हेही वाचा >>> भारताने EFTA सह व्यापार करारावर केली स्वाक्षरी; कसा फायदा मिळणार? जाणून घ्या
प्रकल्प यापूर्वीच जाहीर?
बीकेसीतील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी एमएमआरडीएने २०१० मध्येच पॉड टॅक्सीचा पर्याय आणला. बीकेसी ते वांद्रे स्थानक आणि बीकेसी ते शीव स्थानक अशी पॉड टॅक्सी सुरू करण्याचा निर्णय एमएमआरडीएने त्यावेळी जाहीर केला. हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी पावले उचलली. पण काही कारणाने हा प्रकल्प मार्गी लागू शकला नाही. पण आता मात्र १४ वर्षांपासून रखडलेला हा प्रकल्प प्रत्यक्ष मार्गी लावण्याचा निर्णय घेतला आहे.
पॉड टॅक्सी प्रवास केव्हापासून?
वांद्रे ते कुर्ला बीकेसी मार्गे अशी ८.८ किमीचा पॉड टॅक्सी प्रकल्प उभारण्यासाठी आणि पॉड टॅक्सी सेवा सुरू करण्यासाठीचा प्रस्ताव एमएमआरडीए प्राधिकरणाच्या ५ मार्चच्या बैठकीत यासंबंधीचा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता. या बैठकीत एमएमआरडीएचे अध्यक्ष, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता पॉड टॅक्सी प्रकल्पाच्या बांधकामाचा मार्ग मोकळा झाला आहे. या मार्गाच्या बांधकामासाठी दोन दिवसांत निविदा काढण्यात येणार आहेत. जो कोणी निविदाकार तिकिटातून मिळणाऱ्या महसुलातील सर्वाधिक महसूल एमएमआरडीएला देईल त्याची कंत्राटदार म्हणून नियुक्ती केली जाणार आहे. नियुक्त कंत्राटदारावर पॉड टॅक्सीचा मार्ग बांधण्याची आणि ३० वर्षांसाठी या सेवेचे संचालन, देखभाल करण्याची जबाबदारी असेल. आता निविदा प्रक्रिया पूर्ण करून याच वर्षात कामाला सुरुवात करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे. हा मार्ग २०२६ पर्यंत पूर्ण करून पॉड टॅक्सी सेवा सुरू करण्याचेही एमएमआरडीएचे नियोजन आहे. ही सेवा कार्यान्वित झाल्यास वांद्रे ते बीकेसी मार्गावर एकूण २०८ पॉड टॅक्सी धावणार आहेत.