मंगळ ग्रहाचा अभ्यास करण्यासाठी अमेरिकी अंतराळ संस्था ‘नासा’ने मोहीम आखली आहे. या मोहिमेअंतर्गत मंगळावरील वातावरण असलेले एक कृत्रिम ‘मंगळस्थान’ तयार करण्यात आले. अंतराळात न जाता पृथ्वीवरच राहून या ‘मंगळस्थाना’च्या माध्यमातून नासाच्या शास्त्रांनी मंगळाचा अभ्यास केला. या मंगळस्थानी गेलेले चार जण वर्षभरानंतर नुकतेच बाहेर आले. नासाची ही मंगळ मोहीम काय आहे? आणि अशा ‘आभासी’ मोहिमेचा अंतराळ संशोधनासाठी खरोखर उपयोग होईल का? याविषयी…
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
नासाची मंगळ मोहीम काय आहे?
मानवाने चंद्रावर यशस्वी अवतरण केले या घटनेला आता ५५ वर्षे झाली असून आता मंगळावर मानवी पाऊलखुणा उमटवण्यासाठी अमेरिकी अंतराळ संस्था ‘नासा’ मोहीम आखत आहे. त्यासाठी नासाने महत्त्वाकांक्षी ‘क्रू हेल्थ अँड परफॉर्मन्स एक्सप्लोरेशन ॲनालॉग’ (सीएचएपीईए) मोहीम आखली. या मोहिमेअंतर्गत नासाने वर्षभर चाललेले पहिले ‘मार्स सिम्युलेशन’ पूर्ण केले. या मोहिमेंतर्गत १७०० चौरस फुटांचे थ्रीडी- प्रिंटेड ‘मंगळस्थान’ बनवण्यात आले. ह्युस्टनमधील जॉन्सन अंतराळ केंद्रामध्ये तयार करण्यात आलेल्या आभासी मंगळस्थानात मंगळावर असलेले कृत्रिम वातावरण तयार करण्यात आले. एक वैद्यकीय अधिकारी, मोहीम तज्ज्ञ आणि दोन प्रशिक्षित संशोधक आदींचा समावेश असलेल्या या मंगळस्थानात असंख्य आव्हानांना सामोरे जावे लागले. २३ जून २०२३ रोजी या चौघांनी या मंगळस्थानात प्रवेश केला. हे मंगळस्थान पृथ्वीबाहेर गेले नाही, मात्र मंगळावरील वातावरण तयार करण्यात आल्याने या संशोधकांना मंगळाचा अभ्यास करता आला. वर्षभरानंतर ६ जुलै २०२४ रोजी हे संशोधक बाहेर आले आहेत.
हेही वाचा >>> सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री, आता चहाही महागणार? कारण काय?
कृत्रिम मंगळस्थानावर चौघांचे विलगीकरण…
मंगळावरील मानवी मोहिमेसाठी तयार करण्यात आलेल्या नासाच्या व्यापक धोरणाचा भाग म्हणून हा प्रयोग करण्यात आला. अंतराळवीरांना या रक्तवर्णी ग्रहावरील दीर्घ कालावधीच्या मोहिमेदरम्यान सामोरे जावे लागणाऱ्या शारीरिक आणि मानसिक आव्हानांबद्दल महत्त्वपूर्ण माहिती या प्रयोगामुळे प्रदान झाली. ‘सीएचएपीईए’ मोहिमेचे प्राथमिक उद्दिष्टच आभासी मंगळावरील वातावरणाचा अभ्यास करून मानवी आरोग्य आणि कार्यक्षमतेचे मूल्यांकन करणे हे होते. त्यासाठी या कृत्रिम मंगळस्थानी वैद्यकीय अधिकाऱ्याचेही विलगीकरण करण्यात आले होते. ३७८ दिवसांच्या मुक्कामादरम्यान, मंगळावरील जीवनाची प्रतिकृती तयार करण्यासाठी अनेक आव्हानांना सामोर जावे लागले. त्यामध्ये सिम्युलेटेड स्पेसवॉक (किंवा मार्सवॉक), पृथ्वीशी संप्रेषण विलंब, उपकरणे निकामी आणि मर्यादित संसाधने यांचा समावेश होता.
पीक लागवड आणि जेवण बनवणे…
मंगळ ग्रहाचा अभ्यास करणे हा मुख्य उद्देश या प्रयोगाचा अजिबात नव्हता. मंगळावरील वातावरणात, अशा परिस्थितीत मानव कसे जुळवून घेऊ शकतो याचा अभ्यास करण्यात आला. मंगळावर अंतराळवीर पाठवण्याच्या आव्हानांसाठी अधिक चांगली तयारी करण्याच्या दृष्टीने हा प्रयोग महत्त्वाचा होता. पीक लागवड, जेवण तयार करणे, वैज्ञानिक प्रयोग आणि निवासस्थानाची देखभाल यांसारख्या क्रियाकलापांमध्ये या मोहिमेत सहभागी झालेले सदस्य गुंतले होते. मोहिमेत सहभागी सदस्यांचे पोषण आणि त्यांच्या कामगिरीवर होणारा परिणाम यांचाही अभ्यास करण्यात आला. संसाधन वाटप आणि दीर्घ कालावधीच्या अंतराळ प्रवासासाठी जोखीम यांचे मूल्यांकन करण्यात आले असून भविष्यातील मंगळ मोहिमेसाठी त्याचा उपयोग होणार आहे, असे नासाच्या शास्त्रज्ञांनी सांगितले. या सिम्युलेशनमधून शिकलेले धडे प्रत्यक्ष मंगळ मोहिमेदरम्यान अंतराळवीरांचे आरोग्य आणि कार्यक्षमता यांचा अभ्यास करण्यासाठी आणि त्यादृष्टीने नियोजन करण्यासाठी अमूल्य असतील, असा विश्वास शास्त्रज्ञांनी व्यक्त केला.
हेही वाचा >>> रशियाचा झार जेव्हा भारत गिळंकृत करायला निघाला होता!
सहभागी सदस्यांचे मत काय?
केली हॅस्टन, आंका सेलारीउ, रॉस ब्रॉकवेल आणि नॅथन जोन्स असे चौघे जण या कृत्रिम मंगळस्थानी होते. त्यापैकी केली या मोहिमेच्या प्रमुख होत्या. या मंगळस्थानातून बाहेर आल्यानंतर त्यांनी जोरदार ‘हॅलो’ म्हणत संवादाची सुरुवात केली. ‘‘तुम्हा सर्वांना ‘हॅलो’ म्हणण्यास सक्षम असणे खरोखरच खूप छान आहे,’’ असे केली म्हणाल्या. या मोहिमेतील वैद्यकीय अधिकारी असलेल्या जोन्स यांनी सांगितले की, ‘‘ या मोहिमेतील बंदिवासातील ३७८ दिवस त्वरेने गेले.’’ नासाच्या उड्डाण संचालनाचे उपसंचालक केजेल लिंडग्रेन यांनी कृत्रिम मंगळस्थानाचा दरवाजा ठोठावल्यानंतर या चारही मोहीम सदस्यांनी एकमेकांबद्दल आणि धीराने बाहेर वाट पाहणाऱ्यांबद्दलची कृतज्ञता तसेच संभाव्य मोहिमेविषयी शिकलेल्या धड्यांबद्दल सांगितले. मंगळावर मोहीम आणि पृथ्वीवरील जीवन यांबाबतही त्यांनी सांगितले. या मोहिमेत सहभागी झालेले नासाचे शास्त्रज्ञ ब्रॉकवेल यांनी सांगितले की, या मोहिमेने त्यांना पृथ्वीवरील प्रत्येकाच्या फायद्यासाठी शाश्वत जगण्याचे महत्त्व सांगितले.
नासाच्या पुढील मोहिमा कोणत्या?
पहिली ‘सीएचएपीईए’ मोहीम यशस्वी झाल्याने २०२५ व २०२६ मध्ये आणखी दोन मोहिमा नासाने नियोजित केल्या आहेत. सिम्युलेटेड स्पेसवॉक आयोजित करणे, शारीरिक व मानसिक आरोग्याशी संबंधित आणि कार्यप्रदर्शनाशी संबंधित घटकांवर डेटा गोळा करण्याचे काम सुरू ठेवण्यात येणार असल्याचे नासाने सांगितले. जॉन्सन अंतराळ केंद्राचे उपसंचालक स्टीव्ह कोर्नर म्हणाले की, ‘‘पहिल्या ‘सीएचएपीईए’ मोहिमेमध्ये पोषण आणि त्याचा त्यांच्या कार्यक्षमतेवर कसा परिणाम झाला यावर लक्ष केंद्रित केले गेले. लाल ग्रहावर मानव पाठवण्याची तयारी करत असताना हा प्रयोग महत्त्वाचा आहे. मंगळ हे आमचे ध्येय आहे. या प्रकल्पाला जागतिक अंतराळ संशोधनाच्या प्रयत्नात अग्रेसर होण्याच्या अमेरिकेच्या उद्देशातील एक महत्त्वाचे पाऊल आहे.’’
sandeep.nalawade@expressindia.com