जम्मू आणि काश्मीर विधानसभेसाठी नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसने युती जाहीर केली. पुढील महिन्यात तीन टप्प्यांत ९० जागांसाठी मतदान होईल. विधानसभेच्या एकूण ११४ जागा असून त्यातील २४ जागा या पाकव्याप्त काश्मीरमधील आहेत. काश्मीर खोऱ्यात ४७ तर हिंदुबहुल जम्मू विभागात ४३ जागा आहेत. जम्मूत भाजपचे प्राबल्य आहे. तर काश्मीर खोऱ्यात नॅशनल कॉन्फरन्सचा व्यापक जनाधार असून. काही जागांवर मेहबूबा मुफ्ती यांच्या जम्मू काश्मीर पीपल्स डेमॉक्रेटिक पक्षाचे चांगले अस्तित्व आहे. एकूणच विधानसभेला चौरंगी ते पंचरंगी असा सामना होईल. तूर्त तरी नॅशनल कॉन्फरन्स-काँग्रेस यांची आघाडी चार पावले पुढे आहे.

लोकसभेत धक्कादायक निकाल

लोकसभेला काश्मीरमध्ये तीन तर जम्मूत दोन जागा आहेत. लडाखमध्ये लोकसभेचा वेगळा मतदारसंघ आहे. अनुच्छेद ३७० हटविल्यानंतर लडाखला स्वायत्त विकास परिषद असल्याने तेथे विधानसभा नाही. गेल्या विधानसभेला तेथे चार मतदारसंघ होते. काश्मीर खोऱ्यातील लोकसभेच्या तीनपैकी दोन जागा नॅशनल कॉन्फरन्सने जिंकल्या तर बारामुल्लामध्ये अब्दुल रशीद यांनी कारागृहात असताना विजय मिळवला. त्यांनी ओमर अब्दुलांचा पराभव केला. विशेष म्हणजे या लोकसभेअंतर्गत येणाऱ्या १२ विधानसभा मतदारसंघांत त्यांना आघाडी मिळाली. त्यामुळे विधानसभेला रशीद यांचे काही उमेदवार अपक्ष म्हणून रिंगणात उतरण्याची चिन्हे आहेत. लोकसभेला भाजपने काश्मीर खोऱ्यातील तीनही जागांवर उमेदवार दिले नव्हते. भाजपला जम्मूतील ४३ जागांपैकी विधानसभेच्या २९ मतदारसंघांत आघाडी मिळाली. यंदा जम्मूत काँग्रेस अधिकाधिक जागा लढवून भाजपला रोखण्याच्या प्रयत्नात आहे. भाजपला त्यांनी जर वीस जागांवर रोखले तर त्यांचा सत्तेचा मार्ग बिकट होईल.

maharashtra assembly elections 2024 security need in maharashtra
‘सेफ’ राहण्यासाठी, एक होण्यापेक्षा…
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
Govt Issues New Rules To Stop Misleading Ads By Coaching classes
विश्लेषण : शिकवणी वर्गांच्या जाहिरातींना चाप?
slum MIDC
एमआयडीसीलाही झोपड्यांच्या जागा, ‘क्लस्टर’साठी साडेबारा टक्के योजनेचा प्रस्ताव
crores of rupees seized from car in khed shivapur toll naka area
अन्वयार्थ : हजार कोटी सापडले, त्याचे पुढे काय झाले?
Clashes between BJP MLAs and marshals in the Assembly in Jammu and Kashmir
जम्मू-काश्मीर विधानसभेत धक्काबुक्की
maharashtra vidhan sabha election 2024 ,
बेलापूरच्या प्रचारात राम, कृष्ण, गजाननाचा गजर !
tension in malad aksa village over rehabilitation of ineligible residents of dharavi
जमीन मोजणीला विरोध; अपात्र धारावीकरांच्या पुनर्वसनावरून मालाड अक्सा गावात तणाव

हेही वाचा >>> भारतातील ‘या’ राज्यात तयार होणार कुतुबमिनारपेक्षाही तीन पट उंच स्कायडेक; काय असेल या प्रकल्पाचे वैशिष्ट्य?

नॅशनल कॉन्फरन्सला आघाडी

लोकसभा निकालात विधानसभानिहाय विचार काश्मीरमधील ३६ मतदारसंघांत नॅशनल कॉन्फरन्सला आघाडी मिळाली. भाजपला २९, काँग्रेसला ७, पीडीपीला ५ तर जम्मू व काश्मीर पीपल्स कॉन्फरन्सला एकमेव मतदारसंघात आघाडी मिळाली. ही आकडेवारी पाहता विधानसभेला इंडिया आघाडी मजबूत स्थितीत आहे असे चित्र आहे. मात्र पीडीपीच्या मेहबुबा मुफ्ती या स्वतंत्र लढणार आहेत. आमच्या धोरणाला पाठिंबा दिला तर आम्ही काँग्रेस-नॅशनल कॉन्फरन्सला सहकार्य करू असे त्यांनी स्पष्ट केले. नॅशनल कॉन्फरन्स-काँग्रेसमध्ये जागावाटप आव्हानात्मक असल्याचे पक्षाच्या नेत्यांनीच स्पष्ट केले आहे.

भाजपकडून कोंडी करण्याचा प्रयत्न

नॅशनल कॉन्फरन्स तसेच काँग्रेस यांच्या आघाडीवर शिक्कामोर्तब होताच भाजपने राष्ट्रीय पक्ष म्हणून काँग्रेसची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेसला समाजमाध्यमांवरून काही प्रश्न विचारले. यात अनुच्छेद ३७० पुन्हा आणण्यास पाठिंबा आहे काय, दोन ध्वजांबाबत भूमिका काय, पाकिस्तानशी चर्चा करण्याची मागणी मान्य आहे काय, याबाबत स्पष्टीकरण मागितले. काही मुद्द्यांवर राष्ट्रीय पक्ष या नात्याने काँग्रेसने सावध भूमिका घेतली आहे. गेल्या आठवड्यात विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे काश्मीरमध्ये होते. पक्ष कार्यकर्त्यांचा सन्मान राखूनच आघाडी केली जाईल असे त्यांनी नमूद केले. अनुच्छेद ३७० बाबत भाष्य केले नाही. जम्मू आणि काश्मीरला राज्याचा दर्जा देण्याबाबतही स्पष्टीकरण दिले. मात्र वादग्रस्त मुद्द्यांना बगल दिली.

मैत्रीपूर्ण लढतींचा पर्याय?

लोकसभेला नॅशनल कॉन्फरन्सने जम्मूमध्ये काँग्रेसला मदत केली होती. आता विधानसभेला जम्मूतील काही जागांवर त्यांना लढण्याची इच्छा आहे. तर श्रीनगर जिल्ह्यात काँग्रेसला काही जागा हव्या आहेत. मात्र नॅशनल कॉन्फरन्सची त्याला तयारी नाही. जम्मू जिल्ह्यात ११ पैकी ९ जागा देण्यात नॅशनल कॉन्फरन्स तयार आहे. लोकसभेला जम्मू विभागातील ७ मतदारसंघात काँग्रेस पुढे होती. काश्मीर खोऱ्यात काँग्रेसने नॅशनल कॉन्फरन्सला पाठिंबा दिला होता. आता विधानसभेलाही काश्मीरमध्ये जादा जागा मागू नका असे या पक्षाच्या नेत्यांनी अप्रत्यक्षपणे सुचवलेय. जवळपास ७५ टक्के जागांवर सहमती झाल्याचे नॅशनल कॉन्फरन्सच्या काही नेत्यांनी स्पष्ट केले. जम्मू आणि काश्मीरमध्ये दशकभरानंतर विधानसभा निवडणूक होत आहे. त्यामुळे एकेका मतदारसंघात मोठ्या संख्येने इच्छुक आहेत. यात काही जागांवर मैत्रीपूर्ण लढतींच्या पर्यायाचा विचार केला जाऊ शकतो.

भाजपच्या रणनीतीकडे लक्ष्य

काश्मीर खोऱ्यात भाजपला विधानसभेला कधीही यश मिळाले नाही. यंदाही या ४७ जागांवर पक्षाला फारसे यश मिळेल अशी अपेक्षा नाही. येथे त्यांचे संघटनही कमी आहे. त्यामुळे किमान ८ ते १० अपक्षांना पुरस्कृत केले जाऊ शकते. पक्षाच्या हिंदुत्ववादी भूमिकेने काही जण थेट भाजपची उमेदवारी घेण्यास उत्सुक नाहीत. याखेरीज अल्ताफ बुखारी यांचा जम्मू काश्मीर अपनी पार्टी व गुलामनबी आझाद यांचा डेमॉक्रेटिक आझाद पोग्रेसिव्ह पार्टी हे भाजपला जवळचे मानले जातात. त्यांच्यातील काही उमेदवारांना भाजप बळ देणार काय, हा मुद्दा आहे. कारण लोकसभेला काश्मीर खोऱ्यात भाजपने उमेदवार उभे केले नव्हते. अपनी पार्टीचे तीनही उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर राहिले होते. याला काही प्रमाणात भाजपचे बळ असल्याची चर्चा होती.

समीकरणे बदलली

अनुच्छेद ३७० हटविल्यानंतर वातावरण बदलले आहे. काश्मिरी पंडितांबरोबरच गुज्जर मते भाजपला पडतील अशी शक्यता आहे. भाजपने निवडणुकीच्या तोंडावर प्रभारी म्हणून राम माधव यांची नियुक्ती केली. काश्मीरमध्ये सर्वपक्षीयांशी त्यांचा संपर्क मानला जातो. भाजप-पीडीपी सरकार आणण्यात त्यांचेच योगदान होते. त्यामुळे राम माधव काश्मीरमध्ये भाजपसाठी काही चमत्कार करणार काय, याची चर्चा सुरू आहे. काश्मीरमध्ये पर्यटन मोठ्या प्रमाणात वाढले आहे. तो मुद्दाही भाजप प्रचारात आणणार. याखेरीज भाजपने काश्मीर खोऱ्यात बाहेरील पक्षातून काही नेते घेतले आहेत. काँग्रेस-नॅशनल कॉन्फरन्स यांच्या आघाडीने उमेदवारीची संधी मिळणार नाही असे काही जण भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे. त्यांना उमेदवारी काश्मीर खोऱ्यात ताकद वाढविण्याचा भाजपचा प्रयत्न असू शकतो. नॅशनल कॉन्फरन्स व काँग्रेस यांना सत्तेची संधी अधिक आहे. जम्मू आणि काश्मीर दोन्हीकडेही या पक्षांचे उत्तम प्रभाव आहे. राज्यपाल नियुक्त पाच जागा आहेत. ज्याची केंद्रात सत्ता त्यांचे हे पाच सदस्य असतील हे उघड आहेत. त्यामुळे विधानसभा ९५ सदस्यांची राहून, बहुमताचा आकडा ४८ आहे.

hrishikesh.deshpande@expressindia.com