आंतरराष्ट्रीय दहशतवादी आणि अल कायदा या संघटनेचा म्होरक्या ओसामा बिन लादेन याचा ‘मृत’ मुलगा जिवंत असून, ९/११ सारख्याच आणखी एखाद्या विध्वंसक हल्ल्याची तयारी पाश्चिमात्य देशांविरुद्ध करतोय, अशी माहिती पुढे येत आहे. हमझा बिन लादेन हा आता अल कायदाची सूत्रे अफगाणिस्तानातील तालिबान राजवटीच्या आश्रयाने चालवत आहे. तो २०१९मधील कारवाईत मरण पावला या अमेरिकेच्या दाव्याबाबत त्यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित होते. 

हमझा बिन लादेन जिवंत? 

‘द मिरर’ या इंग्लंडमधील पत्राने याविषयी दावा केला आहे. अफगाणिस्तानातील ब्रिटिश गुप्तहेरांच्या हवाल्याने दिलेल्या या बातमीत म्हटले आहे, की ३४ वर्षीय हमजा काबूलपासून १०० मैलांवर असलेल्या जलालाबाद शहरात राहात असून, त्या परिसरात जवळपास दहा दहशतवादी तळ चालवत आहे. त्याला तालिबान राजवटीचे संरक्षण आणि पाठबळ मिळत आहे. आणखी एका वृत्तानुसार ओसाबा बिन लादेनचा सर्वांत मोठा मुलगा अब्दुल्ला बिन लादेन हाही त्याच्या भावाला अर्थात हमझाला येऊन मिळाला असून, अल कायदाचे जाळे विस्तारण्यासाठी त्याला मदत करत आहे.

Image of a news headline
कोण आहे पाकिस्तानातून भारतात हल्ले घडवणारा रणजीत सिंह नीता? ट्रक ड्रायव्हरने कशी केली खलिस्तान झिंदाबाद फोर्सची स्थापना?
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
three KZF terrorist involved in Gurdaspur grenade attack killed
Punjab Grenade Attacks : पंजाबमध्ये ग्रेनेड हल्ला करणारे तीन दहशतवादी एन्काउंटरमध्ये ठार; यूपी आणि पंजाब पोलि‍सांची संयुक्त कारवाई
Eknath Shinde Shivsena Reaction on Raj Uddhav Meet
Raj Uddhav Meet : राज ठाकरे-उद्धव ठाकरे भेटीवर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया, “ते दोघं एकत्र….”
zakir hussain account first post after demise
झाकीर हुसैन यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर कुटुंबियांकडून पोस्ट; ‘तो’ खास फोटो शेअर करत लिहिलं…
uddhav Thackeray Bhaskar Jadhav
बिनखात्याच्या ४१ मंत्र्यांचा अनोखा विक्रम, भास्कर जाधव म्हणाले…
man throws acid on his Son in Law in Kalyan
Kalyan Crime : हनीमूनला काश्मीरला जाणार होता जावई, भडकलेल्या सासऱ्याने केला अॅसिड हल्ला; कल्याणमधली घटना
Deputy Chief Minister Eknath Shinde visited Smriti Mandir premises and talk about RSS
एकनाथ शिंदे म्हणाले, “संघाकडून निस्वार्थ भावनेने काम कसे करावे…”

हेही वाचा >>> Shivaji Maharaj Samadhi in Raigad: छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी कुणी शोधली? टिळक की महात्मा फुले?

दहशतवादाचा त्रिवेणी संगम?

अफगाणिस्तानमधे राजधानी काबूलवर दोन वर्षांपूर्वी १५ ऑगस्ट रोजी तालिबानने दुसऱ्यांदा कब्जा केला. यानंतर तेथे पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. काही प्रांतांमध्ये आयसिस-खोरासान किंवा आयएस-के या संघटनेचे अस्तित्व होते. त्यांचे आणि तालिबानचे काही बाबतीत मतभेद आहेत. मात्र आता आयएस-के संघटनेने तालिबानशी जुळवून घेतले आहे. अल कायदा आणि तालिबान यांचेतर नेहमीच सौहार्दाचे संबंध होते. इस्लामिक राजवटीविषयी दोन्ही संघटनांची मते सारखी आहेत. तालिबान, अल कायदा आणि आयएस-के असा दहशतवादाचा त्रिवेणी संगम अफगाणिस्तानमध्ये मूळ धरू लागला आहे. ही बाब पाश्चिमात्य जगत तसेच भारतासाठीही डोकेदुखीची ठरू शकते. विशेष म्हणजे आता या विषवल्लीला पायबंद घालण्यासाठी अमेरिकी लष्करही अफगाणिस्तानात उपस्थित नाही.    

ओसामा, अल-जवाहिरीनंतर…

२००१मध्ये ९/११ हल्ल्यानंतर अमेरिकेने अफगाणिस्तानातील तालिबान आणि अल कायदाविरुद्ध दहशतवादविरोधी लढा तीव्र केला. यात दोन्ही संघटनांचे मोठे नुकसान झाले, परंतु समूळ नायनाट झाला नाही. ९/११चा सूत्रधार ओसामा बिन लादेन परागंदा झाला. अखेरीस तो पाकिस्तानातील अबोटाबाद येथे २०११मध्ये मारला गेला. त्याच्या नंतर अल कायदाची सूत्रे चालवणारा आयमान अल-जवाहिरी २०२२मध्ये काबूलमध्ये मारला गेला. दरम्यानच्या काळात हमझा बिन लादेन त्याच्या चार बायकांसह इराणमध्ये लपून राहात होता, असे म्हटले जाई. त्याला अफगाणिस्तानातील गझनी प्रांतात हवाई हल्ल्यात ठार केले, असा दावा २०१९मध्ये अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. पण त्यांना पुरावा सादर करता आला नव्हता. हमझा आणि अल कायदाचा आणखी एक म्होरक्या सैफ अल-अदेल हे अफगाणिस्तानातील गझनी, कंदाहार, हेरात, हेलमांड या भागांमध्ये लपून राहात आणि इराणमध्ये जा-ये करत. इराणमध्ये त्यांचा माग काढून त्यांना संपवणे अमेरिकी सैन्यदलांसाठी तुलनेने अवघड होते. मात्र अफगाणिस्तानातून अमेरिकी फौजा माघारी गेल्यानंतर तालिबानी राजवट पुनर्प्रस्थापित झाली आणि अल कायदाच्या दहशतवाद्यांचे फावले. तालिबान आणि अल कायदा यांच्यातील दुसऱ्या मैत्रीपर्वाची ती जणू सुरुवात ठरली. 

हेही वाचा >>> Sanchi Stupa: अशोकापासून ते आधुनिक युगापर्यंत सांची स्तूपाने भारतीय संस्कृतीचा इतिहास कसा जपला?

पुढे काय?

अल कायदा आणि आयसिस-खोरासान यांच्या संयुक्त कारवायांना आणि घातपाती योजनांना आवर घालणे आव्हानात्मक ठरणार आहे. अफगाणिस्तानात आजही गरीबी आणि उपासमार मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे दहशतवादी संघटनांसाठी मनुष्यबळ मिळवणे सोपे बनले आहे. तालिबानवर दबाव आणून हमझासारख्या दहशतवाद्यांचा माग काढून त्यांचा बंदोबस्त करणे हा एक मार्ग आहे. पण यासाठी आंतरराष्ट्रीय इच्छाशक्तीची गरज आहे. सध्याच्या दुभंगलेल्या परिप्रेक्ष्यात हे जवळपास अशक्य दिसते.

भारतासाठी डोकेदुखी वाढणार?

तालिबानच्या बरोबरीने अल कायदा सक्रिय झाल्यास भारतासाठी ही बाब डोकेदुखीची ठरू शकते. गेल्या काही महिन्यांमध्ये काश्मीर खोऱ्यात आणि जम्मूमध्येही दहशतवाद्यांची घुसखोरी वाढलेली आहे. चीन सीमेवर काही तुकड्या पाठवणे अपरिहार्य बनल्यामुळे जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराची उपस्थिती काहीशी शिथिल बनली आहे. याचा फायदा उठवण्याचा प्रयत्न पाकिस्तानच्या पश्चिमेकडील दहशतवादी गट करू शकतात. सध्या तालिबान सरकार आणि पाकिस्तान सरकारमधून विस्तव जात नसला, तरी काश्मीरमध्ये घुसखोरीच्या मुद्द्यावर दोन्ही सरकारांचे मतैक्य होऊ शकते.    

Story img Loader