आकर्षक गणेशमूर्तीसांठी प्रसिद्ध असलेल्या पेणमधून यंदा २८ हजारहून अधिक गणेशमूर्ती परदेशात पाठविण्यात आल्या. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दहा हजार जास्त गणेशमूर्ती निर्यात केल्या गेल्या. पेणच्या गणेशमूर्तींना आता परदेशातूनही पेणच्या गणेशमूर्तींना विशेष मागणी होऊ लागली आहे.

पेणच्या गणशमूर्ती यंदा कुठे?

पेण तालुक्यातील गणेशमूर्ती कार्यशाळांमधून यंदा शाडू मातीच्या, तसेच प्लास्टर ऑफ पॅरिसच्या परदेशात पाठवल्या गेल्या. यंदा थायलॅण्ड, इंडोनेशिया, श्रीलंका या आशियाई देशात; तसेच अमेरिका खंडात अमेरिका, कॅनडा येथे; युरोपमध्ये इंग्लंड, जर्मनी या देशात; शिवाय मॉरिशस, सौदी अरेबिया, दुबई येथे गणेशमूर्ती पाठविण्यात आल्या.

Comrade Subhash Kakuste no more
सत्यशोधक कम्युनिस्ट नेते सुभाष काकुस्ते यांचे निधन
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Eurasian Water Cat Pune District, Indapur,
पुणे जिल्ह्यात प्रथमच दुर्मीळ ‘युरेशियन पाणमांजरा’चा शोध, इंदापूरमधील विहिरीमध्ये पडलेल्या पाणमांजराची सुटका
Crime against MNS candidate in Nashik East Constituency
नाशिक पूर्व मतदार संघातील मनसे उमेदवाराविरुध्द गुन्हा, पक्ष सचिवाच्या घरात लूट
nashik vidhan sabha
नाशिक परिक्षेत्रात २५ दिवसांत ५० कोटींचा मुद्देमाल जप्त, १७ हजार गुन्हेगारांविरुध्द कारवाई
ageing population increasing in india
वृध्दांच्या लोकसंख्येचा दर वाढता, काय आहेत आव्हानं?
rbi digital awareness loksatta
जनजागृतीवर ५९ कोटींचा खर्च, तरीही सर्वसामान्यांच्या २,८८० कोटींवर डल्ला…बँकेत तुमचे पैसे…
PM Vidyalakshmi Scheme
उच्च शिक्षण घेऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांना मिळणार १० लाखांपर्यंत शैक्षणिक कर्ज; काय आहे ‘पंतप्रधान विद्यालक्ष्मी योजना’?

गणेशमूर्तींची परदेशवारी कशी होते?

परदेशातून प्रामुख्याने अनिवासी भारतीय ऑनलाईन पद्धतीने गणेशमूर्तींची अगाऊ नोंदणी करतात. त्यानुसार परदेशात या गणेशमूर्ती पाठवल्या जातात. साधारणपणे पेणमधील कार्यशाळांमधून दहा इंचापासून सहा फुटांपर्यंतच्या गणेशमूर्ती परदेशात पाठवल्या जातात. मूर्तीची मोडतोड होऊ नये यासाठी विशेष खबरदारी घेतली जाते. जेएनपीटी बंदरातून कंटेनरमधून गणेशमूर्ती जगभरात पाठवल्या जातात. ४० फूट लांब कंटेनरमध्ये साधारण दीड हजार लहान गणेशमूर्तीं जातात. तर दोन ते सहा फूट आकाराच्या पाचशे गणेशमूर्ती पाठवता येतात.  

हेही वाचा >>> नॉर्वेमध्ये मृतावस्थेत आढळलेल्या रशियन गुप्तहेर व्हेलची कहाणी; हेरगिरीसाठी कसा केला जातो प्राण्यांचा वापर?

परदेशात पाठवणी कधी होते?

पेणमध्ये गणेशमूर्ती बनविण्याचे काम वर्षभर सुरू असते. वर्षभरात ३६ लाख गणेशमूर्ती पेण तालुक्यातील साडेपाचशेहून अधिक कार्यशाळांमध्ये तयार केल्या जातात. दरवर्षी साधारणपणे सत्तर कोटी रुपयांची उलाढाल होत असते. परदेशात गणेशमूर्ती पोहचण्यासाठी ४० ते ६० दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी या मूर्ती पोहोचणे गरजेचे असते. त्यामुळे यावर्षी मार्च महिन्यापासूनच गणेशमूर्तींच्या निर्यातीला सुरुवात झाली होती. मेअखेर पर्यंत ही निर्यात सुरू होती.

परदेशातून मागणीत वाढ का झाली?

आकर्षक रंगसंगती आणि सुबक गणेशमूर्तींसाठी पेणच्या गणेशमूर्ती प्रसिद्ध आहे. ग्राहकांचा कल, आवड लक्षात घेऊन नवनवीन गणेशमूर्ती तयार केल्या जातात. यात यंदा रत्नजडित आणि वस्त्रालंकारित मूर्तींची भर पडली आहे. दरवर्षी भारतातून परदेशात स्थलांतरित होणाऱ्या नागरिकांची संख्या वाढते आहे. हे भारतीय नागरिक ज्या देशात स्थायिक होतात, त्या देशातून ते पेणच्या गणेशमूर्तींसाठी मागणी नोंदवत असतात. त्यामुळे मागणीत दरवर्षी वाढ होत जाते.

भौगोलिक मानांकनाचा फायदा कसा झाला?

पेणच्या गणेशमूर्तींच्या नावाखाली बरेचदा ग्राहकांना इतर ठिकाणी बनविण्यात आलेल्या गणेशमूर्ती विकल्या जात होत्या. त्यामुळे ग्राहकांची फसवणूक होत होती. ही फसवणूक टाळण्यासाठी ग्रेट मिशन कन्सल्टन्सी ग्रुपच्या मदतीने पेणच्या गणेशमूर्तीकार आणि व्यवसायिक मंडळाने भौगोलिक मानांकनासाठी प्रस्ताव चेन्नई येथे पाठवला होता. केंद्र सरकारच्या पेटंट विभागाने या प्रस्तावाला मान्यता दिली. पेटंट विभागाने याबाबत गॅझेट प्रसिद्ध केले, ज्यामुळे पेणच्या गणेशमूर्तींना राजमान्यता प्राप्त झाली आहे. आता पेणच्या गणेशमूर्तींच्या नावाखाली इतर ठिकाणी बनविण्यात येणाऱ्या गणेशमूर्ती विकता येत नाही. तसे केल्यास संबधितांवर कायदेशीर कारवाई होऊ शकणार आहे. भौगोलिक मानांकन प्राप्त झाल्यानंतर पेणच्या गणेशमूर्तींची मागणी झाली असल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा >>> पृथ्वीवरील ‘गेटवे टू हेल’ म्हणून ओळखला जाणारा रहस्यमयी खड्डा काय आहे? त्याचा आकार वाढणं धोक्याचा इशारा आहे का?

थायलॅण्ड, इंडोनेशियातून मागणी वेगळी कशी?

जगभरातून पेणच्या गणेशमूर्तींना मागणी होत असली तरी थायलॅण्ड आणि इंडोनेशियातून गणेशमूर्तींना होणारी मागणी वेगळी ठरते. कारण या दोन देशातून परदेशी नागरिक गणेशमूर्ती मागवत असतात. थायलॅण्ड आणि इंडोनेशियात हिदूं धर्माचे आचरण करणारे परदेशी नागरिक मोठ्या संख्येने आहेत. या नागरिकांकडून दरवर्षी गणेशोत्सव साजरा केला जातो. यासाठी पेणमधून दरवर्षी हजारो गणेशमूर्ती मागवल्या जातात. थायलॅण्डमधील परदेशी नागरिक दरवर्षी यासाठी पेणमध्ये येतात. आपल्या पसंतीच्या गणेशमूर्ती निवडतात. त्यांची मागणी कार्यशाळांकडे नोंदवतात. या नागरिकांनी मागणी केल्या गणेशमूर्ती त्यानंतर परदेशात पाठवल्या जातात. एवढेच नव्हे तर थायलॅण्डमधील काही मंदिरांत पेणमध्ये तयार करण्यात आलेल्या गणेशमूर्ती आणि दुर्गामूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. यासाठी विशेष मागणी करून मूर्ती घडवून घेण्यात आल्या आहेत.

निर्यातीला प्रोत्साहनाची गरज…

सध्या पेणमधून ज्या गणेशमूर्ती परदेशात पाठविल्या जातात, त्या गणेशमूर्ती  स्थानिक मूर्तिकार आपापल्या क्षमतेनुसार आणि जोखमीवर पाठवत असतात. मात्र त्यांना असंख्य अडचणींना सामोरे जावे लागते. इतर निर्यातदारांवर अवलंबून राहावे लागते. ही निर्यात सुलभ व्हावी यासाठी एखादे विशेष निर्यात सुविधा केंद्र असावे अशी मूर्तिकारांची अपेक्षा आहे. परदेशात गणेशमूर्ती पाठवणे अधिक सुलभ होऊ शकेल, यासाठी शासनाने सहकार्य करावे अशी अपेक्षा मांडली जाते.

harshad.kashalkar@expressindia.com