रशियाने युक्रेनवरील हल्ला अधिक तीव्र केला आहे. या हल्ल्यात रशियाने खार्किव्ह प्रांताला लक्ष्य करताना युक्रेनचे कच्चे दुवे अतिशय निष्ठूरपणे उघड केले आहेत. युद्धाची सद्यःस्थिती आणि तातडीने होणारे परिणाम यावर एक नजर टाकूया.

खार्किव्हमध्ये घनघोर…

उत्तर खार्किव्ह प्रांतातील या शहरावर गेल्या आठवड्यात शुक्रवारी रशियाने मोठ्या प्रमाणात तोफांचा मारा आणि हवाई हल्ले केले. हा भाग युक्रेनने १८ महिन्यांपूर्वीच रशियाच्या ताब्यातून सोडवून घेतला होता. नव्या हल्ल्यामुळे युक्रेनचा दळणवळणाचा आधीच मर्यादित असलेला मार्ग अधिक आकुंचन पावत आहे. अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की आणि युक्रेनच्या इतर अधिकाऱ्यांनी असा दावा केला आहे की, रशियाची वॉवचान्स्क या शहराच्या दिशेने होणारी आगेकूच उधळून लावण्यात आली आहे. मात्र, तेव्हापासून रशिया वॉवचान्स्क शहराशी रस्ते मार्गाने होणारा संपर्क खंडित करण्याचा प्रयत्न करत आहे. रशियाने शुक्रवारी युक्रेनच्या सीमाभागात ६० किलोमीटरच्या पट्ट्यात एका संपूर्ण तुकडीनिशी हल्ला चढवला. या चढाईत आपण अनेक गावे ताब्यात घेतल्याचे रशियाने सांगितले. हा प्रदेश सीमाभागातील ‘ग्रे झोन’ म्हणून ओळखला जातो. त्यापूर्वी रशियाने या वर्षामध्ये पूर्वेकडील डॉनेत्स्क भागात स्वतःची आक्रमण क्षमता आजमावून पाहिली. त्या चढाईमध्ये रशियाने हळूहळू पण लक्षणीय प्रगती केलेली दिसून येत आहे.

Image of Indian nationals returning home or a related graphic
Russia-Ukraine War : रशिया-युक्रेन युद्धात केरळच्या तरुणाच्या मृत्यूनंतर भारत आक्रमक, युद्धात लढत असलेल्या भारतीयांना परत पाठवण्याची मागणी
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
uddhav Thackeray Devendra fadnavis
“पुढील मकर संक्रांतीपर्यंत ठाकरे-फडणवीस एकत्र”, आमदार रवी राणांचा दावा
Binil and Jain were among the several Indian youths who had travelled to Russia
रशिया-युक्रेन युद्धात भारतीय तरुणाचा मृत्यू, एक गंभीर; अनेक महिन्यांपासून मायदेशी पाठवण्याची विनवणी केली, पण…
Ajit Pawar discussion with Amit Shah in Delhi
अजित पवारांची दिल्लीत अमित शहांशी चर्चा
lokmanas
लोकमानस: उद्याोग हवे तर अणुऊर्जा अपरिहार्य
Russia paying students in cash to have babies
मुलं जन्माला घालण्यासाठी ‘या’ देशात विद्यार्थ्यांना का दिले जात आहेत पैसे? नेमका हा प्रकार काय?
bjp devendra fadnavis stand on dhananjay munde resignation as minister post
धनंजय मुंडे यांचे मंत्रिपद भाजपवर अवलंबून

हेही वाचा >>> विश्लेषण : पोलिसांच्या आक्रमक कारवाईमुळे नक्षलवादी चळवळीला धक्का?

युक्रेनसमोरील आव्हाने

यावर्षी युक्रेनमध्ये सीमेपलिकडून होणाऱ्या हल्ल्यांमध्येही वाढ झालेली आहे. युक्रेनचे सैन्य विखुरलेले आहे, त्यांची मारकक्षमता रशियापेक्षा कितीतरी कमी आहे, हवाई संरक्षण सज्जता अतिशय अपुरी आहे, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांच्याकडील सैन्यबळ अतिशय कमी आहे. त्यातच कोरड्या हवामानामुळे रशियन सैन्याची यांत्रिक ताकद अधिक परिणामकारक ठरत असून युक्रेनच्या संकटांमध्ये भरच पडली आहे. युक्रेनच्या संरक्षण गुप्तचर विभागाचे उपप्रमुख मेजर जनरल स्किबिस्की यांनी अलिकडेच ‘इकॉनॉमिस्ट’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, त्यांची समस्या अतिशय साधी आहे. त्यांच्याकडे शस्त्रास्त्रे नाहीत. एप्रिल आणि मे हे दोन महिने आव्हानात्मक असतील हे त्यांना माहीत आहे.

दोन्ही बाजूंची सद्यःस्थिती 

युक्रेनच्या गुप्तचर विभागाचा अंदाज आहे की, दोन वर्षांपूर्वी रशियाने संपूर्ण आक्रमण केल्यापासून युक्रेनबरोबरच रशियाचेही प्रचंड नुकसान झाले असले तरी सध्या युक्रेनमध्ये जवळपास पाच लाख रशियन आहेत. तसेच लढाईसाठी मध्य रशियात राखीव दलाच्या तुकड्यादेखील उभारल्या जात आहेत. उत्तर सीमेवरील हल्ल्यानंतर रशियन लष्कराच्या सेव्हर (उत्तर) नावाच्या नवीन राखीव तुकड्या उभारण्यात आल्या आहेत. वॉशिंग्टनमधील ‘इन्स्टिट्यूट फॉर स्टडी ऑफ वॉर’च्या अहवालानुसार, सेव्हर हे संचालनात्मकदृष्ट्या सक्रिय गट आहेत. रशियाने खार्किव्हवर आक्रमण करण्यासाठी ६० हजार ते एक लाख सैनिकांची उभारणी करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना ५० हजारांचे सैन्य उभारण्यात यश आल्याचा अंदाज आहे. या ५० हजार सैनिकांची लढाऊ क्षमताही भरपूर असल्याचे सांगितले जाते.

नवीन सेव्हर तुकड्यांना किती यश?

या नवीन सेव्हर तुकड्यांच्या सहाय्याने रशियन सैन्याने पुन्हा एकदा युक्रेनची सीमा ओलांडण्याचा प्रयत्न केला. मात्र उपलब्ध पुराव्यांवरून असे दिसते की त्यांना फारसे यश मिळाले नाही. किंबहुना या तुकड्यांचे नुकसानच झाले. मात्र त्यामुळे रशियाचे दीर्घकालीन नुकसान झाल्याचे  मानले जात नाही. कारण युक्रेनचा कोणताही भूभाग ताब्यात घेणे हे या सेव्हर तुकड्यांचे ध्येय नव्हते तर युक्रेन सैन्याची ताकद कमी करण्यासाठीच या तुकड्या तयार करण्यात आल्या होत्या असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

मात्र लष्कराच्या इतर सुसज्ज विभागांची युनिट्स त्यांच्याबरोबर आली तर रशियाच्या महत्त्वाकांक्षा वाढू शकतात. अशा प्रकारचे इतर विभागांची सुसज्ज युनिट्स युक्रेनवरील आक्रमणासाठी सहभागी होऊ शकतात असे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. युक्रेनच्या विशेष सशस्त्र दलाने ‘सीएनएन’ला सांगितल्याप्रमाणे रशिया पुढील आक्रमणाची तयारी करत आहे.

हेही वाचा >>> डिजिलॉकरवर पाहता येणार दहावी-बारावीचा निकाल; डिजिलॉकरचे आणखी किती फायदे ? कितपत आहे सुरक्षित?

युक्रेन सैन्याच्या मर्यादा

युक्रेनच्या एका माजी लष्करी अधिकाऱ्याचे असे म्हणणे आहे की मनुष्यबळाची कमतरता असल्यामुळे युक्रेनला मोठ्या प्रमाणात तोफा आणि इतर सामग्रीने सज्ज असे सैन्य सातत्याने आपल्या सीमेवर तैनात करता येत नाही.

पुढील शक्यता

युक्रेनच्या माजी लष्करी अधिकाऱ्याच्या मते, ही परिस्थिती आणखी बदलण्याची शक्यता आहे. मात्र बदललेली परिस्थिती युक्रेनच्या दृष्टीने फारशी आशादायक नसेल. रशियाचे सैन्य सीमाभागावर अधिक मनुष्यबळ तैनात करू शकते किंवा सुरुवातीला मिळालेल्या यशाची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न करू शकते. म्हणजेच युक्रेनच्या सैन्याला मागे ढकलून पुढे मार्गक्रमण करू शकते यामध्ये युक्रेनचा अधिकाधिक भूभाग रशियाच्या ताब्यात जाण्याची शक्यता आहे. तसेच रशियन सैन्य पश्चिमेकडील सुमी प्रांतावर आक्रमण करण्याची शक्यता आहे. यासाठी रशिया अधिक सैन्य तैनात करत आहे असे मानण्यास वाव आहे.
nima.patil@expressindia.com

Story img Loader