Stonehenge stone came from Scotland not Wales ब्रिटनमधील प्रागैतिहासिक शिलाव्यूह म्हणजे स्टोनहेंज. इ. स. पूर्व २००० काळातील ही रचना असावी असा पुरातत्त्व तज्ज्ञांचा अंदाज आहे. या पाषाण वास्तूमधील बहुतेक दगड हे सुमारे २०० किलोमीटर दूर असलेल्या वेल्समधून आणण्यात आले, असा गेल्या १०० वर्षांपासून तज्ज्ञांचा समज होता. मात्र हा समज नव्या तज्ज्ञांनी खोडून काढला असून स्टोनहेंजमधील काही शिळा (मेगालिथ) या वेल्समधून नव्हे, तर स्कॉटलंडमधून तेही जवळपास ७५० किलोमीटर अंतरावरून आणण्यात आल्याचा दावा या तज्ज्ञांनी केला आहे. या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे. स्टोनहेंज आणि मेगालिथ म्हणजे काय, त्याचा स्कॉटलंडशी संबंध काय याचा आढावा…

स्टोनहेंज म्हणजे काय? ते कोठे आहे?

इंग्लंडच्या विल्टशर परगण्यात सॅलिसबरीच्या उत्तरेस १३ किलोमीटरवरवर नवाश्मयुगीन काळातील एक पाषाण शिल्परचना आहे. तीन स्तबकांशी उभारण्यात आलेली ही वास्तू म्हणजे पुरातन मंदिर किंवा स्मारक असावे, असा अंदाज आहे. आकाराने अजस्त्र आणि वजनाने अवजड असलेल्या शिळा येथे विशिष्ट रचना करून ठेवलेल्या आहेत. स्टोनहेंज हे चार हजार वर्षांपूर्वीचे म्हणजेच इ. स. पूर्व २००० मधील असावे, असा अंदाज असून त्याची बांधणी टप्प्याटप्प्याने झाली असावी, असा तज्ज्ञांचा दावा आहे. या वास्तूमध्ये दोन प्रकारच्या शिळा आहेत. सर्वात मोठे दगड २५ टन वजनाचे आहेत. त्यांची उची आठ ते १३ मीटर असून व्यास १० मीटर आहे. त्याहून लहान असलेल्या दगडांना ब्लूस्टोन म्हणतात, ते २ ते ५ टन वजनाचे आहेत. हे दगड ओलसर झाले की त्यांना नीळसर रंगाची छटा येते. या पाषाण रचनेच्या स्तंभांवर तुळया बसविलेल्या आहेत. याच्या आत घोड्याच्या नालेच्या आकाराची दगडी रचना व त्याच्या मध्यभागी असलेले स्थंडिल-स्तंभ हे या स्मारकाचे सर्वांत प्रगत रूप आहे. आतील भागांत ब्लूस्टोन प्रकारातील लहान दगडांची दुतर्फा रांग असलेला मोठा मार्ग तयार झाला आहे.

Special trains for Konkan and Goa on year end and long weekend
कोकण, गोव्यासाठी विशेष रेल्वेगाड्या
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
land acquisition for ring road
रिंग रोडसाठी २०० हेक्टर भूसंपादन बाकी; ५०० कोटींच्या निधीची रस्ते विकास महामंडळाकडे मागणी
When and where will flood-affected Ektanagari residents be relocated
पूरग्रस्त एकतानगरीचे होणार स्थलांतर नक्की कधी आणि कुठे?
Cow milk subsidy of Rs 57 crores to farmers in Satara news
साताऱ्यातील शेतकऱ्यांना ५७ कोटींचे गायीच्या दुधाचे अनुदान
Devendra Fadnavis Nagpur visit cancelled
प्रथम १२, नंतर १३ आणि आता १५, फडणवीसांच्या नागपूर दौऱ्याचा मुहूर्त का लांबला ?
Kandalwan damage new jetty, Virar Marambalpada,
नवीन जेट्टीच्या रस्त्यासाठी तिवरांची कत्तल? विरारच्या मारंबळपाडा परिसरातील प्रकार; पर्यावरणप्रेमींकडून संताप
Two speeding bikes collide head-on two killed
अमरावती : भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक; दोन ठार

हेही वाचा >>> New Zealand Cricketers: न्यूझीलंडच्या क्रिकेटपटूंचं ब्रेनड्रेन; देशाऐवजी फ्रीलान्स खेळायला प्राधान्य

स्कॉटलंडशी संबंध काय?

स्टोनहेंजमधील काही दगड वेल्समधून आणण्यात आले, असा दावा शंभर वर्षांपूर्वी तत्कालीन पुरातत्त्व संशोधकांनी केला होता. स्टोनहेंज जिथे स्थित आहे, त्या स्थानापासून वेल्सचे अंतर सुमारे २०० किलोमीटर आहे. मात्र बोटींच्या सहाय्याने जलमार्गाने हे अवाढव्य दगड आणण्यात आले असावेत, असा अंदाज या तज्ज्ञांनी व्यक्त केला. शंभर वर्षांपूर्वीच्या तज्ज्ञांच्या या दाव्याला आताच्या संशोधकांनी छेद दिला आहे. स्टोनहेंजच्या मध्यवर्ती मेगालिथपैकी एकाचाही वेल्सशी संबंध येत नाही, तर ते प्रत्यक्षात स्कॉटिश आहे, असा दावा संशोधकांनी केला आहे. स्टोनहेंजमधील सर्वात मोठे ब्लूस्टोन स्कॉटलंडच्या अगदी ईशान्य भागातून नेण्यात आले आहे. स्टोनहेंज स्थित सॅलिस्बरी मैदानापासून हे अंतर सुमारे ७५० किलोमीटर असले तरी या शिळाही जलमार्गाने येथे आणण्यात आल्या आहेत, असा दावा तज्ज्ञांनी केला आहे. ‘वेदी दगड’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेगालिथची वाहतूक प्रागैतिहासिक काळातील लोकांकडून आजच्या काळातील इनव्हरनेसपर्यंत आणि संभाव्यत: ऑर्कने बेटांवरून झाली असावी, असे युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनचे मानद वरिष्ठ संशोधन सहकारी आणि या अभ्यासामागील तज्ज्ञांपैकी एक असलेले रॉब इक्सर यांनी सांगितले. स्टोनहेंजचे बाह्य वर्तुळ बनवणारे ट्रायलिथॉन दगड केवळ २५ किलोमीटर अंतरावरून आणले आहेत, मात्र आतील भागांतील ब्लुस्टोन स्कॉटलंडमधून आणल्याचा दावा संशोधकांनी केला आहे.

स्काॅटलंडमधून हे दगड कसे आले?

स्कॉटलंड हे ब्रिटनच्या अगदी उत्तरेला आहे. सॅलिस्बरी मैदान, जिथे स्टोनहेंज आहे, त्या ठिकाणापासून स्कॉटलंडमधील ऑर्कने बेटाचे अंतर सुमारे ७५० किलोमीटर आहे. प्रागैतिहासिक काळात एवढ्या अंतरावरून हे अवाढव्य दगड कशा प्रकारे आणले असावेत याबाबत संशोधकांमध्ये दोन मतप्रवाह आहेत. स्कॉटलंडमधून बाेटीच्या सहाय्याने जलमार्गाने या विशाल शिळा सॅलिस्बरी मैदानात आणल्या असाव्या, असे काही संशोधकांनी वाटते, तर मानवी शक्ती किंवा प्राण्यांच्या सहाय्याने या शिळा वाहून आणल्या असाव्यात, असाही मतप्रवाह आहे. “ईशान्य स्कॉटलंड ते सॅलिस्बरी मैदानापर्यंतच्या मार्गात मोठे भौगोलिक अडथळे आहेत. त्यामुळे या शिळा वाहून आणणे अशक्य आहे. सागरी वाहतूक हाच व्यवहार्य पर्याय आहे,’’ असे कर्टिन विद्यापीठाचे प्रमुख पुरातत्त्व संशोधक अँथनी क्लार्क यांनी सांगितले. मात्र पुरातत्त्व शास्त्रज्ञ आणि लेखक माईक पिट्स यांनी मात्र हे दगड भूमार्गे ओढले जाण्याची शक्यताच वर्तवली आहे. समुद्रात बोटीवर जर दगड ठेवलात, तर तो गमावण्याचा धोका अधिक आहे. त्यामुळे जमिनीवरील प्रवास सुलभ आहे. कदाचित त्यास अनेक वर्षे लागली असतील. मात्र याचा मार्गाचा वापर केला असावा. आज हे अशक्य वाटेल. मात्र नवपाषाण तंत्रज्ञानाच्या आवाक्यात ते शक्य होते. मानवी शक्ती आणि प्राण्यांचा वापर करून हे दगड वाहून आणले असण्याची शक्यता पिट्स यांनी व्यक्त केली.

हेही वाचा >>> युक्रेनच्या आक्रमणाला ब्रिटिश रणगाड्यांची कुमक; रशियात तणाव

पुरातत्त्व तज्ज्ञांनी याबाबत संशोधन कसे केले?

स्टोनहेंजमधील मेगालिथ हे नेमके कोठून आले याबाबत संशोधन करणाऱ्या या गटात ऑस्ट्रेलियातील कर्टिन विद्यापीठ, ॲडलेड विद्यापीठ, ॲबेरिस्टविथ विद्यापीठ, युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडन यांमधील पुरातत्त्व संशोधकांचा समावेश आहे. स्टोनहेंजमधील मेगालिथ वेल्श नसल्याचा दावा या संशोधकांनी केला. या वालुकामय शिळांचे विज्ञानाच्या सहाय्याने आयुर्मान तपासले. ज्यास ‘एज फिंगरप्रिंट’ असे म्हणतात. हे एज फिंगरप्रिंट ब्रिटनमधील आजूबाजूच्या खडकांशी जुळवण्यात येत आहे. मात्र ही एज फिंगरप्रिंट स्कॉटलंडमधील ऑर्केडियन खोऱ्यातील शिळांशी जुळली असून हे आमच्यासाठी पूर्णपणे अनपेक्षित होते, असे रॉब इक्सर यांनी सांगितले. नेमकी जागा ओळखण्यासाठी पुढील काम करावे लागेल. त्यासाठी ऑर्कनेमध्ये अधिक अभ्यास करण्यात येणार आहे, असे ते म्हणाले.

sandeep.nalawade@expressindia.com

Story img Loader