ब्लर्ब -छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ १९८९ पासून शिवसेना जिंकत आहे अपवाद १९९८ चा. मात्र २०१९ मध्ये एमआयएमने शिवसेनेला, नंतर २०२४ मध्ये शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्या संदीपान भुमरे यांनी ठाकरे गटाला धक्का दिला.  मराठा आंदोलनाचा फटका लोकसभा मराठवाड्यात महायुतीला बसत असताना, छत्रपती संभाजीनगरची जागा मात्र महाविकास आघाडीला जिंकता आली नाही याचे शल्य उद्धव ठाकरे यांना आहे.

पक्षातील फुटीनंतर शिवसेना पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे. महाराष्ट्रात यंदा सहा पक्षांमध्ये दोन आघाड्यांमध्ये चुरस आहे. त्यात महाविकास आघाडीतून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष ९२ जागा लढवत असून, काँग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांचा पक्ष हे प्रमुख घटक आहेत. राज्यातील प्रचारसभांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच गृहमंत्री अमित शहा यांना लक्ष्य करणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी  मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर येथील सभेत भावनिक आवाहन केले. मराठवाड्याचे केंद्र असलेल्या या मतदारसंघात लोकसभा निवडणुकीतील पराभवाचे शल्य उद्धव यांच्या भाषणातून दिसून आले.

अरविंद केजरीवाल आणि 'आप'ला रोखण्यासाठी भाजपाची मतदारांना कोणती आश्वासनं? (फोटो सौजन्य पीटीआय)
अरविंद केजरीवाल आणि ‘आप’ला रोखण्यासाठी भाजपाची मतदारांना कोणती आश्वासनं?
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
uddhav Thackeray Devendra fadnavis
“पुढील मकर संक्रांतीपर्यंत ठाकरे-फडणवीस एकत्र”, आमदार रवी राणांचा दावा
Image Of MVA
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी ठाकरे गटाच्या स्वबळाच्या भूमिकेमागे नेमकी कारणं काय?
Image Of MVA Leaders
MVA : “महाविकास आघाडी उद्ध्वस्त होतेय, जनतेने त्यांना हाकलून दिले”, ठाकरे गटाचा स्वबळाचा नारा; अजित पवार गटाचा टोला
Supriya Sule
Supriya Sule : महापालिका निवडणुकीबाबतच्या ठाकरे गटाच्या भूमिकेवर सुप्रिया सुळेंचं रोखठोक मत; म्हणाल्या, “या निवडणुका…”
Vijay Wadettiwar On Thackeray group
Vijay Wadettiwar : “आम्ही उद्धव ठाकरेंना विनंती करू, अन्यथा…”, ठाकरे गटाच्या स्वबळाच्या घोषणेवर विजय वडेट्टीवारांचं मोठं विधान
Sanjay Raut On Municipal Corporation election
Sanjay Raut : मुंबई महापालिकेची निवडणूक ठाकरे गट स्वबळावर लढणार? संजय राऊतांचं मोठं भाष्य; म्हणाले, “दिल्लीत जे घडलं तेच…”

हेही वाचा >>> विश्लेषण: सोयाबीनच्या हमीभावावरून शेतकऱ्यांची नाराजी का? ७० हून अधिक मतदारसंघांमध्ये ठरणार निर्णायक मुद्दा?

प्रभावक्षेत्रातच धक्का…

लोकसभेवेळी सभेला मैदान भरले होते तरीही पराभव झाला होता अशी सुरुवात उद्धव ठाकरे यांनी छत्रपती संभाजीनगर येथील सभेत केली.  आपल्या सरकारची कामगिरी चांगली नव्हती म्हणून पराभव झाला का? माझे नेतृत्व मान्य नाही का? मला मोदी-शहा घरी बसवू शकत नाहीत. ज्या दिवशी तुम्ही सांगाल आता बास झाले त्यावेळी मी क्षणार्धात घरी बसेन असे सांगत जनसमुदायाला भावनिक साद घातली. जोपर्यंत तुम्ही सांगताय लढा, तोपर्यंत लढणार. आज माझ्या हातात काही नाही. मात्र तुम्हाला देऊ इच्छित आहे. मात्र तुम्ही ते देण्याची ताकद निर्माण करत नाही तोपर्यंत या सभेला अर्थ नाही असे नमूद करत पक्षाच्या बालेकिल्ल्यात कार्यकर्त्यांच्या मनात आत्मविश्वास जागविण्याचा प्रयत्न केला. गेल्या विधानसभा निवडणुकीत मराठवाड्यातील ४६ जागांपैकी २० जागा शिवसेनेने लढविल्या. त्यापैकी १२ जागा व १८.२ टक्के मते पक्षाला मिळाली. त्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सहा म्हणजे निम्म्या जागा मिळाल्या. त्यात एक वगळता अन्य आमदार शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षात गेले.  लोकसभेतील छत्रपती संभाजीनगर मतदारसंघातील पराभवाचा भाषणात उल्लेख करत हे पटले नसल्याचे सांगत, मग कोणासाठी लढायचे असा सवाल केला. हा महाराष्ट्र कोणाचा, याचे उत्तरही या निवडणुकीतून मिळेल असे उद्धव यांनी नमूद केले. थोडक्यात, छत्रपती संभाजीनगर जिल्हा तसेच मराठवाड्यात पक्षाला यश मिळवावे लागेल. त्यासाठी या विभागाचे केंद्र असलेल्या ठिकाणीच त्यांनी वारंवार जनसमुदायाशी संवाद साधत जोडून घेण्याचा प्रयत्न केला. त्या अर्थाने सभेतील हे भाषण थोडे वेगळे होते.

हेही वाचा >>> Tandoori Chicken: तंदुरी चिकन कसं ठरलं जगातलं सर्वोत्तम ग्रिल्ड चिकन?

मराठवाडा, कोकणावर लक्ष

मुंबई-कोकणात ७५ जागा आहेत. त्यातील २९ जागा गेल्या वेळी शिवसेनेने जिंकल्या होत्या. पूर्व विदर्भात खातेही उघडता आले नव्हते तर पश्चिम विदर्भात चार ठिकाणी यश मिळाले होते. यंदा पूर्व विदर्भात म्हणजेच नागपूर विभागातील ३२ जागांपैकी महाविकास आघाडीतून शिवसेनेच्या वाट्याला कमी जागा आल्या असून, पश्चिम विदर्भात म्हणजे अमरावती विभागात पक्षाला चांगले यश मिळेल अशी अपेक्षा आहे. महाविकास आघाडीत जर निर्णायक भूमिका बजावायची असेल तर, चांगल्या जागा जिंकाव्या लागतील. त्यासाठी कोकण, मराठवाड्यावर त्यांचे लक्ष आहे. छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ १९८९ पासून शिवसेना जिंकत आहे अपवाद १९९८ चा. त्यावेळी काँग्रेसच्या रामकृष्ण पाटील यांनी यश मिळवले. मात्र २०१९ मध्ये एमआयएमने शिवसेनेला, नंतर २०२४ मध्ये शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्या संदीपान भुमरे यांनी ठाकरे गटाला धक्का दिला.  मराठा आंदोलनाचा फटका लोकसभा मराठवाड्यात महायुतीला बसत असताना, छत्रपती संभाजीनगरची जागा मात्र महाविकास आघाडीला जिंकता आली नाही याचे शल्य उद्धव ठाकरे यांना आहे. या विभागात ही एकमेव जागा महायुतीला मिळाली. १९८० च्या दशकात मुंबई-ठाण्याबाहेर मराठवाड्यात प्रथम शिवसेनेचा विस्तार झाला. १९८८ मध्ये छत्रपती संभाजीनगर महापालिकेची निवडणूक त्यांनी जिंकली. यात हिंदुत्वाच्या विचारांचा मोठा वाटा होता.

नेतृत्वाची पुन्हा कसोटी

गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीत भाजपला १०५ तर शिवसेनेला ५६ जागा मिळाल्या. मात्र २०१४ मध्ये भाजप, शिवसेना, काँग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेस हे चारही पक्ष स्वतंत्र लढले. शिवसेनेला भाजपखालोखाल दुसऱ्या क्रमांकाच्या ६३ जागा मिळाल्या होत्या. त्यावेळी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वगुणांचे कौतुक झाले होते. देशभर भाजपचा प्रभाव असतानाही शिवसेनेने राज्यात ताकद दाखवून दिली होती. मात्र आता शिवसेनेतील फुटीनंतर परिस्थिती बदलली आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर पक्षाची कोंडी करण्याचा प्रयत्न होतेय. त्यातच पक्षाच्या ताब्यात असणाऱ्या महत्त्वाच्या अशा मुंबई महापालिकेत प्रशासकीय राज आहे. या साऱ्यातून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाची पुन्हा कसोटी आहे. मराठी माणूस या मुद्द्यावर अद्यापही काही प्रमाणात सहानुभूती उद्धव यांच्या पाठीशी आहे हे मान्य केले तरी, मुंबईतील लोकसंख्येची रचना गेल्या दशकात बदलली आहे. अशा वेळी उद्धव यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये घातलेली भावनिक साद मतदारांना कितपत भावते, ते पहावे लागेल.

hrishikesh.deshpande@expressindia.com

Story img Loader