निमा पाटील

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इस्रायलने गाझाची जमिनीवर सर्व बाजूंनी नाकेबंदी केल्यामुळे गाझावासीयांपर्यंत मदतसामग्री पोहोचवण्यासाठी अमेरिकेचे लष्कर तरंगते बंदर बांधण्यासाठी प्रयत्नशील आहे.

गाझातील युद्धाची सद्या:स्थिती काय आहे?

७ ऑक्टोबर २०२३ रोजी सुरू झालेले हमास आणि इस्रायलदरम्यानचे युद्ध या भागातील सर्वात संहारक युद्धांपैकी एक ठरले आहे. सुरुवातीला इस्रायलमधील १२०० जण मारले गेले आणि २५० जणांना हमासने ओलीस धरले. प्रत्युत्तरादाखल इस्रायलने सुरू केलेल्या कारवाईत, गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार ३० हजारांपेक्षा जास्त पॅलेस्टिनी ठार झाले आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या माहितीनुसार, गाझातील जवळपास सर्व २३ लाख रहिवासीअन्नपाण्यासाठी झगडत आहेत. तसेच पाच लाखांपेक्षा जास्त लोकांवर उपासमारीचे संकट कोसळले आहे. लहान मुलांचा मोठ्या प्रमाणात मृत्यू होत आहे. जिवंत राहण्यासाठी प्राण्यांचा चारा खाण्याची वेळ आली आहे.

हेही वाचा >>> साबरमती आश्रमाचा कायापालट होणार; १२०० कोटींच्या प्रकल्पात नेमके काय?

तरगंते बंदर का बांधले जात आहे?

गाझा पट्टीपर्यंत मदतसामग्री पाठवणे सध्या अतिकठीण झाले आहे. इस्रायली लष्कराने मदतसामग्रीसाठी असलेले रस्ते अडवल्यामुळे जमिनीमार्गे मदत पोहोचवणे अशक्यप्राय आहे. गेल्या आठवड्यात अमेरिकेने मदतवाटपाचा हवाई प्रयत्न केला. पण विमानातून फारच मर्यादित मदतसामग्री नेता येते आणि तीही सर्व गरजूंपर्यंत पोहोचेलच याची शाश्वती नाही. त्यामुळे तरंगत्या बंदराचाच पर्याय उरला.

बंदर उभारणी कधीपासून?

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी सागरी मार्गाने गाझाला मदतपुरवठा करण्याची योजना जाहीर करण्यापूर्वीच लष्कराचे सातवे ट्रान्सपोर्टेशन ब्रिगेड आणि इतर युनिट तरंगत्या बंदरासाठी आवश्यक साधनसामग्री एकत्र आणण्याच्या कामात गुंतले आहे. बायडेन यांच्या भाषणापूर्वीच लष्कराला यासंबंधी आदेश मिळाले.

हेही वाचा >>> आसामच्या माजुली ‘मुखवटा कले’ला जीआय मानांकन: का आहे महत्त्वाची ही पारंपरिक वारसा कला?

तरंगते बंदर उभारायला आव्हाने कोणती?

पेंटागॉनचे माध्यम सचिव मेजर जनरल पॅट रायडर यांनी माध्यमांना माहिती दिली की, तरंगते बंदर उभारण्याच्या कामी एक हजार अमेरिकी सैनिक सहभागी झाले असूनही काही आठवडे लागतील. काही अधिकाऱ्यांच्या मते त्यासाठी दोन महिने लागू शकतात. आवश्यक सामान व कर्मचाऱ्यांची वाहतूक आव्हानात्मक आहेच. मात्र, त्याबरोबर इस्रायल किती सहकार्य करतो यावरही बरेच अवलंबून आहे. इस्रायलने अद्याप सहकार्य करण्याचा शब्द दिलेला नाही.

तरंगत्या बंदराचे काम कसे सुरू आहे?

अमेरिकेतील संरक्षण अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हर्जिनियातील जॉइंट बेस लँगली-युस्टिस येथे स्थित असलेली सातव्या ट्रान्सपोर्टेशन ब्रिगेडने जॉइंट लॉजिस्टिक ओव्हर द शोअर उपकरणे आणि वॉटरक्राफ्ट यांची एकत्र जुळणी करायला सुरुवात केली आहे. हे एखाद्या मोठ्या लेगो यंत्रणेप्रमाणे आहे. पोलादाच्या ४० फूट (१२ मीटर) लांब तुकड्यांची एक मांडणी एकत्र बसवता येते. त्याद्वारे आधारस्तंभ आणि एक हंगामी पूल (कॉजवे) तयार केला जाऊ शकतो. हा कॉजवे साधारण १,८०० फूट (सुमारे ५०० मीटर) लांब असेल आणि दोन मार्गिकांचा असेल. येत्या काही दिवसांमध्ये अमेरिकी सैनिक एका मोठ्या लष्करी सीलिफ्ट कमांड जहाजावर उपकरणे चढवायला सुरुवात करतील. त्या उपकरणांमध्ये पोलादाचे तुकडे आणि लहान नावा असतील ज्या वाहतुकीला मदत करतील. उपकरणे चढवण्याचे काम पुढील आठवड्यापर्यंत तरी सुरू होण्याची शक्यता नाही. हे काम एकदा पूर्ण झाले की, जहाज अटलांटिक महासागरापासून दूर जाऊ लागेल. त्यावर सातव्या ट्रान्सपोर्टेशन ब्रिगेडचे सदस्य असतील. अमेरिकी सैन्याचे इतर लष्करी युनिटही या मोहिमेत सहभागी होतील.

या कामातील आव्हाने कोणती?

यात इस्रायलची भूमिका हा प्रश्न अनुत्तरित आहे. अमेरिकेने एकीकडे इस्रायलला भरघोस लष्करी सामग्रीची मदत केली आहे, त्याचवेळी दुसरीकडे गाझाला मदतपुरवठा करण्यासाठी इस्रायलला अनुकूल भूमिका घेण्याचे वारंवार आवाहन केले आहे. त्याचा आतापर्यंत तरी फारसा उपयोग झालेला नाही. सध्या तरी, बायडेन प्रशासनाच्या मते इस्रायली सरकार या तरंगत्या बंदराच्या सुरक्षेची काळजी घेईल आणि हमासकडून होणाऱ्या कोणत्याही संभाव्य हल्ल्यांपासून त्याचे संरक्षण करेल. त्याचवेळी अन्नासाठी काकुळतीने मदतसामग्रीची वाट पाहणारे स्थानिक पॅलेस्टिनी या बंदरावर एकदम गर्दी करणार नाहीत याचीही खबरदारी घ्यावी लागेल. बंदरावरील मदतसामग्री कोण उतरवून घेईल, हेही अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Nima.patil@expressindia.com