संदीप कदम

गेले काही हंगाम स्थानिक क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करणारा मुंबईचा मधल्या फळीतील फलंदाज सर्फराज खानला दुसऱ्या कसोटी सामन्याकरिता भारतीय संघात स्थान मिळाले. अनेक वेळा चांगली कामगिरी करूनही निवड समितीकडून सर्फराजकडे दुर्लक्ष केले जात होते. मात्र, त्याला यावेळी संधी मिळाली. त्याचा संघात समावेश झाला असला, तरीही त्याला अंतिम अकरामध्ये स्थान मिळेल का, त्याला कोणाचे आव्हान असेल. याचा हा आढावा.

Indian captain Rohit Sharma attends Mumbai Ranji cricket team practice session sports news
रोहितची सरावास हजेरी; मुंबई रणजी संघाच्या वानखेडेवरील सत्रात रहाणेसह फलंदाजी
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
akola ZP
वंचितची प्रतिष्ठा पणाला लागणार; अकोला जिल्हा परिषद निवडणुकीचे वेध, राजकीय पतंगबाजी रंगणार
Rohit Sharma Practice With Mumbai Ranji Trophy Team at Wankhede Stadium
Rohit Sharma: रोहित शर्मा रणजी ट्रॉफीमध्ये पुनरागमन करण्याच्या तयारीत, हिटमॅनने घेतला मोठा निर्णय; मुंबई संघासह…
Senior advocate Iqbal Chagla passes away
अन्वयार्थ : गोड बोलण्यापेक्षा, न्यायाचे बोला!
Rohit Sharma and Virat Kohli included in India squad for Champions Trophy ODIs
रोहित, विराटच्या समावेशाची शक्यता; चॅम्पियन्स करंडकासाठी राहुल, शमी, जडेजाबाबत संदिग्धता
Former India captain Sunil Gavaskar opinion on the selection of Rohit Sharma Virat Kohli sport news
रोहित, विराटचे भवितव्य निवड समितीच्या हाती; भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांचे मत
Loksatta anvyarth Gautam Gambhir India lose in Test series
अन्वयार्थ: खरेच ‘गंभीर’ आहोत?

प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्फराजची आजवरची कामगिरी कशी?

सर्फराजने काही दिवसांआधीच इंग्लंड लायन्सविरुद्ध शतकी खेळी केली होती. इंग्लंड लायन्सविरुद्धच्या चार दिवसीय सामन्यात सर्फराजने भारत-अ संघाकडून खेळताना ९५ व १६० चेंडूंत १६१ धावांची खेळी केली. तसेच, प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याच्या नावे १४ शतके आहेत. मुंबईकडून खेळताना त्याने २२ सामन्यांत २५६२ धावा केल्या आहेत व नाबाद ३०१ ही त्याच्या कारकीर्दीतील सर्वोत्तम कामगिरी आहे. ही खेळी त्याने उत्तर प्रदेशविरुद्ध वानखेडे स्टेडियमवर केली. यादरम्यान त्याने १० शतके व ६ अर्धशतके झळकवली. रणजी करंडकाचा २०१९-२०चा हंगाम हा त्याच्यासाठी संस्मरणीय राहिला. त्याने या हंगामात १५४.६६च्या सरासरीने ९२८ धावा केल्या. तर, २०२१-२२ च्या हंगामात त्याने ९८२ धावा करीत चमक दाखवली. मग, २०२२-२३ च्या हंगामात त्याने ५५६ धावा केल्या. त्यापूर्वी, काही काळ तो उत्तर प्रदेश संघाकडून खेळला. त्याने संघासाठी ४४० धावा केल्या. मात्र, नंतर तो पुन्हा मुंबईकडे परतला. भारताच्या ‘अ’ संघाकडून त्याने १० सामन्यांत ५२७ धावा, पश्चिम विभागाकडून तीन सामन्यांत २१५ धावा तर, शेष भारताकडून दोन सामन्यांत १६८ धावा केल्या आहेत. तसेच, भारताकडून तो १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेतही सहभागी झाला होता.

हेही वाचा >>> आयाराम, गयाराम शब्दाची व्युत्पत्ती कधी झाली? हरियाणाच्या राजकारणाशी संबंध काय? जाणून घ्या…

सर्फराजला अंतिम अकरामध्ये कितपत संधी?

सर्फराजला भारतीय संघात स्थान मिळाले असले, तरीही त्याला अंतिम अकरामध्ये स्थान मिळते का हे पाहणे उत्सुकतेचे असेल. वॉशिंग्टन सुंदरचाही संघात समावेश करण्यात आला आहे. जडेजाच्या जागी त्याला स्थान मिळण्याची दाट शक्यता आहे. मात्र, केएल राहुलच्या जागी संघात कोणाला संधी मिळेल हे पाहावे लागेल. सर्फराज स्थान मिळवण्यासाठी उत्सुक असेल, मात्र विशाखापट्टणम येथे होणाऱ्या कसोटीत रजत पाटीदारला संधी मिळण्याची शक्यता अधिक दिसत आहे. तो आधीपासूनच भारताच्या १५ सदस्यीय संघाचा भाग आहे. संघ व्यवस्थापनाने विचार केल्यास सर्फराजला खराब लयीत असलेल्या श्रेयस अय्यर किंवा शुभमन गिलच्या जागी संधी मिळू शकते. इंग्लंड लायन्सविरुद्ध नुकतीच केलेली चांगली कामगिरी सर्फराजच्या पथ्यावर पडू शकते. पाटीदारने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ५५ सामन्यांत चार हजार धावा केल्या. तसेच, त्याने भारताकडून एकदिवसीय क्रिकेट सामना खेळला आहे.

यापूर्वीही चांगली कामगिरी करूनही सर्फराज दुर्लक्षित का होता?

सर्फराजने मुंबईकडून चांगल्या खेळी केल्या असल्या, तरीही आपल्या तंदुरुस्तीमुळे सर्फराज नेहमीच चर्चेत राहिला. त्याचे वजन अधिक असल्याने त्याला संघात स्थान मिळत नसल्याची चर्चा सुरू होती. मात्र, खेळ वगळताही त्याचा संघात समावेश न होण्याची अनेक कारणे असल्याचे ‘बीसीसीआय’च्या सूत्रांनी एकदा सांगितले होते. २०१९-२० व २०२१-२२च्या हंगामात सातत्याने ९००हून अधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला संघात स्थान न मिळाल्याने अनेकांनी निराशा व्यक्त केली होती. मात्र, त्याची तंदुरुस्ती आंतरराष्ट्रीय दर्जाची नसल्याचेही बोलले गेले. यापूर्वी जेव्हा सर्फराजला संधी मिळाली नाही, तेव्हा भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर हे सर्फराजच्या बाजूने उभे ठाकले होते. निवड समिती खेळाचा विचार सोडून खेळाडूच्या आकारानुसार त्याची निवड करत आहे. तुम्हाला बारीक खेळाडू हवे असल्यास फॅशन शो मध्ये जाऊन मॉडेलची निवड करावी व त्यांच्या हातात बॅट व चेंडू द्यावे, असे म्हणत गावस्कर यांनी निवड समितीला धारेवर धरले होते.

हेही वाचा >>> भारतीयांनी मालदीवकडे फिरवली पाठ; भविष्यात भारतीय पर्यटक मालदीवला भेट देणार का?

सर्फराजला स्थान मिळाल्यानंतर वडील नौशाद यांची प्रतिक्रिया काय होती?

सर्फराजला भारतीय संघात संधी मिळाली, तर त्याचा धाकटा भाऊ मुशीर खान हा १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत संघासाठी निर्णायक भूमिका पार पाडत आहे. या दोन्ही खेळाडूंच्या जडणघडणीत त्यांचे वडील नौशाद खान यांची भूमिका नेहमीच महत्त्वाची राहिली आहे. सर्फराजची संघात निवड झाल्यानंतर त्यांनी एका ध्वनिचित्रफितीद्वारे आपला आनंद व्यक्त केला. ते म्हणाले,‘‘सर्फराजला प्रथमच भारताच्या कसोटी संघात स्थान मिळाले आहे. मुंबई क्रिकेट संघटनेचे (एमसीए) याकरिता विशेष आभार मानतो. मुंबईमध्येच तो खेळाडू म्हणून नावारूपास आला. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (एनसीए) खेळाडू म्हणून घडण्यास त्याला मदत झाली. त्याच्यावर विश्वास दाखवल्याबद्दल मी ‘बीसीसीआय’ व निवड समितीचे आभार मानू इच्छितो. देशासाठी तो चांगली कामगिरी करून विजयात योगदान देईल, याचा मला विश्वास आहे.’’

Story img Loader