‘धर्मवीर’ चित्रपटाच्या श्रृखंलेतील ‘धर्मवीर-२’ चे प्रदर्शन राज्यभर कोसळत असलेल्या पावसामुळे लांबणीवर टाकण्यात आल्याचे नुकतेच या चित्रपटाचे निर्माते मंगेश देसाई यांनी जाहीर केले. शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या आयुष्यावर बेतलेल्या या चित्रपटाला शिवसैनिकांनी दोन वर्षांपूर्वी भरभरून प्रतिसाद दिला होता. संपूर्ण महाराष्ट्रात ‘ठाण्याचे बाळासाहेब’ अशी खणखणीत ओळख निर्माण करणारे आनंद चिंतामणी दिघे यांचा अकाली मृत्यू आणि त्यानंतर ठाण्यात उसळलेला जनक्षोभाचा चित्तथरारक घटनाक्रम त्यांच्या लोकप्रियतेची साक्ष पटवून देणारा ठरला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील ऐतिहासिक बंडापूर्वी प्रदर्शित झालेला हा चित्रपट मोठ्या राजकीय घडामोडींची पायाभरणी करणारा ठरल्याने ‘धर्मवीर-२’च्या निमित्ताने होणारी वातावरणनिर्मितीही सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. असे असताना ९ ॲागस्ट रोजी राज्यभर प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपट प्रदर्शनाची नवी तारीख थेट २७ सप्टेंबर अशी ठरविण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. राज्यात होऊ घातलेल्या आगामी विधानसभा निवडणुका आणि ‘धर्मवीर-२’चे लांबलेले प्रदर्शन याचा एकमेकांशी संबंध आहे का, अशी चर्चाही यानिमीत्ताने सुरू झाली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा