सुमित पाकलवार

सध्या राज्यभरात विविध जिल्ह्यांत पोलीस भरती सुरु आहे. यात गडचिरोली जिल्ह्यातील भरती चर्चेत असून नक्षलग्रस्त दुर्गम भागातील तरुणांचा वाढलेला सहभाग यास कारणीभूत आहे. पूर्वी नक्षल्यांचा भीतीने दुर्गम भागातील नागरिक आपल्या मुलाला किंवा मुलीला पोलीस भारतीत पाठविण्यास धजावत नव्हते. परंतु पोलिसांनी नक्षल्यांची भीती सामान्यांच्या मनातून घालविण्यासाठी सातत्याने केलेल्या प्रयत्नांमुळे आज नक्षलग्रस्त भागातील तरुणांमध्ये ‘खाकी’चे आकर्षण वाढले आहे. याविषयी…

maharashtra govt introduces new guidelines for school picnic
शैक्षणिक सहलींसाठी शिक्षणाधिकाऱ्यांकडून दक्षतेची सूचना
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
How to get rid of mobile addiction from kids parents did this trick viral video
मुलाने चक्क मोबाइल सोडला आणि अभ्यासाला बसला! पालकांनी केलेला ‘हा’ प्रयोग पाहून तुम्हीही व्हाल चकित, पाहा VIDEO
education board warning against schools for obstructing students while filling exam application zws
परीक्षा अर्ज भरताना अडवणूक केल्यास शाळांवर कारवाई;  शिक्षण मंडळाचा इशारा
unemployed youth cheated under mukhyamantri yuva karya prashikshan yojana
भंडारा : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील शेकडो बेरोजगारांची फसवणूक!
Cyber ​​thieves rob senior citizen who advertised for remarriage Pune news
Pune Cyber Crime: पुनर्विवाहासाठी जाहिरात देणाऱ्या ज्येष्ठाला सायबर चोरट्यांचा गंडा
academic degree on experience
विश्लेषण : अनुभवाच्या आधारे पदवी कशी मिळणार?
Ministry of Statistics report reveals 25 6 percent youth deprived of education employment and skills
आजचे तरुण ‘बिन’कामाचे आणि ‘ढ’?

पोलीस भरतीबद्दल दहशत का होती?

राज्यात इतरत्र पोलीस भरती सामान्य पद्धतीने होत असेल, पण गडचिरोली जिल्हा त्यास अपवाद असायचा. या ठिकाणी गेल्या पाच दशकांपासून असलेली नक्षलवाद्यांची दहशत यासाठी कारणीभूत आहे. या दहशतीमुळे एकेकाळी दुर्गम भागातील आदिवासी तरुण, तरुणी पोलीस भरतीत सहभागी होण्यास तयार नसायचे. गावातील कुणीही पोलीस भरतीसाठी गडचिरोलीला गेल्यास त्याला गावात परत जाणे कठीण होते. नक्षलावाद्यांना ही बाब लक्षात येताच ते त्याच्या कुटुंबाला त्रास द्यायचे. काहींची तर हत्यादेखील केली गेली. यामुळे पोलीस भरतीत यश न आल्यास दुर्गम भागातील तरुणांना शहरात मोलमजुरी करून राहावे लागायचे. परंतु आता परिस्थिती बदलली असून नक्षल्यांची दहशत झुगारून आदिवासी तरुण मोठ्या संख्येने पोलिसात भरती होत आहेत.

हेही वाचा >>> २ हजार नोकर्‍यांसाठी २५ हजार अर्ज, मुंबईत चेंगराचेंगरी सदृश्य परिस्थिती; भारतात बेरोजगारी वाढत आहे का?

पोलिसांची कार्यप्रणाली कशी कारणीभूत?

गडचिरोलीत पोलीस भरतीत दुर्गम भागातील तरुणांचा टक्का वाढण्यास पोलिसांनी सातत्याने केलेले प्रयत्न आणि वेळोवेळी बदललेली कार्यप्रणाली कारणीभूत आहे. पूर्वी नक्षल्यांचा भीतीने भरतीत दुर्गम भागातील टक्का कमी होता. त्यामुळे भरती सर्वांसाठी खुली होती. परंतु २०१८ पासून गडचिरोली जिल्ह्यातील उमेदवारांनाच संधी उपलब्ध करून देण्यात आली. दरम्यानच्या काळात पोलिसांनी नक्षलवादाविरोधात केलेली आक्रमक कारवाई आणि दादालोरा खिडकीसारख्या उपक्रमातून दुर्गम भागातील नागरिकांमध्ये विश्वास निर्मिती केली. त्यामुळे या भागातील तरुणांची भरतीत संख्या वाढत आहे. यंदा सुरू असलेल्या भरतीत ९९२ जागांसाठी तब्बल २८ हजर अर्ज आले होते. भरती प्रक्रियेत पारदर्शकता ठेवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. उमेदवारांची मैदानी चाचणी घेताना बायोमेट्रिक नोंद घेण्यात आली. लेखी परीक्षेवेळी मैदानी चाचणीची बायोमेट्रिक हजेरी पडताळण्यात येणार आहे. शिवाय १६०० मीटर धावणे, १०० मीटर धावणे चाचणीसाठी बेस्ट टेक्नॉलॉजी (आरएफआयडी) बेस्ड टेक्नॉलॉजी, छाती व उंची मोजणीसाठी फिजिकल स्टँडर्ड टेस्ट (पीएसटी) तर गोळा फेक चाचणीसाठी प्रिझम टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला. इतकेच नव्हे तर चाचणीच्या शेवटच्या दिवशी भामरागड तालुक्यातील एका तरुणीला पावसामुळे पोहोचण्यास उशीर झाला होता. ही बाब पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांना कळताच त्यांनी तिला संधी दिली. यासारख्या प्रयत्नामुळे देखील नक्षलग्रस्त भागातील तरुण पोलीस भरतीत सहभागी होत असल्याचे चित्र आहे.

हेही वाचा >>> “दिल्लीतील प्रति केदारनाथ मंदिर म्हणजे हिंदू परंपरेचा अपमान”, विरोध होण्याचं नेमकं कारण काय?

साईनाथ नरोटेच्या हत्येने रोष?

नक्षलवाद्यांनी १० मार्च २०२३ रोजी भामरागड तालुक्यातील मर्दहूर गावातील रहिवासी साईनाथ नरोटे या आदिवासी तरुणाची निर्घृण हत्या केली होती. साईनाथ हा काही वर्षांपासून गडचिरोली येथे पोलीस भरतीसह स्पर्धा परीक्षेची तयारी करीत होता. त्यामुळे खबरी ठरवून होळीच्या दिवशी नक्षल्यांनी त्याला ठार केले. मात्र यामुळे दुर्गम भागातील नागरिकांमध्ये दहशत वाढेल, हा नक्षल्यांचा कयास खोटा ठरला. उलट आदिवासी समाजात नक्षल्यांच्या या कृतीविरोधात रोष निर्माण झाला होता. त्यामुळे यासंदर्भात नक्षल्यांचा प्रवक्ता श्रीनिवास याने एक पत्रक जारी करून साईनाथ हा मागील काही वर्षापासून उच्च शिक्षणाच्या नावाखाली भामरागड व गडचिरोलीत राहत होता. मात्र, प्रत्यक्षात तो पोलिसांना मदत करीत होता. पोलिसांच्या मदतीनेच तो पोलीस भरतीत सहभागी झाला, म्हणून त्याची हत्या केली, असे स्पष्ट केले होते. परंतु नागरिकांमधील रोष कमी झाला नाही. परिणामी गावातून नक्षल्यांना मिळणारे समर्थन कमी झाले. त्या भागातील तरुण मोठ्या संख्येने पोलीस भारतीत सहभागी होत आहेत.

नक्षल्यांची दहशत झुगारून…

गेल्यास पाच दशकापासून गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागातील दोन पिढ्यांनी नक्षलवादी आणि प्रशासनाचा संघर्ष बघितला. यात नक्षल्यांनी शेकडो आदिवासी तरुणांची खबऱ्या ठरवून हत्या केली. काहींना बळजबरी चळवळीत सहभागी करून घेतले. पोलीस भरती देण्यास मज्जाव करण्यात आला. यामुळे आदिवासी समाजातील शिक्षित तरुणांमध्ये मोठी घुसमट दिसून येत होती. घरी गरिबी त्यात जिल्ह्यात उद्योगधंदे नसल्याने रोजगारासाठी पोलीस भरती एकमेव पर्याय. अशा स्थितीत पोलिसांनी दिलेली आश्वासक साथ, यामुळे आदिवासी तरुणांमध्ये विश्वास वाढून ते उत्साहाने पोलीस भरतीत सहभागी होत आहेत. एवढेच नव्हे तर भरती दिल्यानंतर ते गावातसुद्धा जात आहेत. यंदा तर ही संख्या लक्षणीय होती. भरतीपूर्वी पोलिसांनी यंदा २८ नक्षलपीडित नागरिकांनादेखील संधी दिली. यामुळे शिक्षित आदिवासी तरुण नक्षल्यांच्या दशतीला न घाबरता मोठ्या संख्येने पोलीस भरतीत सहभागी होत असल्याचे चित्र आहे.

आत्मसमर्पण आणि नक्षलगावबंदी किती प्रभावी?

पोलिसांच्या आक्रमक नक्षलविरोधी अभियानामुळे जिल्ह्यातील एटापल्ली, भामरागड, अहेरी, कोरची, धानोरा आणि सिरोंचासारख्या अतिसंवेदनशील भागात नक्षल्यांचा प्रभाव कमी झाला. त्यात चकमकीत मोठे नेते ठार झाले. मिलिंद तेलतुंबडे, नर्मदा, जोगन्ना यासारखे लोकांमध्ये अधिक संपर्क असलेले नक्षलनेते ठार झाले. तर अनेकांनी आत्मसमर्पण केले. नुकतेच जहाल नक्षल नेता गिरीधर यानेदेखील सपत्नीक आत्मसमर्पण केले. सोबतच भामरागड, एटापल्ली तालुक्यातील वीसहून अधिक गावांनी ठराव घेत नक्षल्यांना गावबंदी केली. यामुळे अतिसंवेदनशील भागात नक्षल्यांचा वावर कमी झाला. एके काळी ज्या गावातून सर्वाधिक तरुण नक्षलचळवळीत भरती व्हायचे त्या गावातून आता पोलीस भरतीत सहभागी होणाऱ्यांची संख्या वाढली. सुरक्षेच्या कारणास्तव काही गावांचा उल्लेख करणे शक्य नाही. पण भविष्यात नक्षलग्रस्त भागातून पोलीस भरतीत सहभागी होणाऱ्यांची संख्या याहून अधिक असेल याचा विश्वास प्रशासनाला आहे.

Story img Loader