२८८ पैकी विधानसभेच्या ६२ जागा असलेला विदर्भ राज्याच्या सत्ताकारणात महत्त्वाची भूमिका बजावतो. त्यामुळे या भूप्रदेशावर राजकीय दृष्ट्या वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष या दोन्ही प्रमुख पक्षांमध्ये तुल्यबळ लढत अपेक्षित आहे. काँग्रेसचा बालेकिल्ला अशी ओळख असलेला विदर्भ २०१४ मध्ये भाजपचा बालेकिल्ला म्हणून नावारूपास आला. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा या भागातील राजकीय चित्र पालटले. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत या भागातील कौल कोणाच्या बाजूने असेल याबाबत अंदाज लावले जात आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

विदर्भात एकूण जागा किती?

शेतकरी आत्महत्यांचा भूप्रदेश अशी ओळख असलेला विदर्भ राजकीयदृष्ट्या सजग समजला जातो. दोन महसूल विभाग मिळून येथे एकूण ११ जिल्हे आहेत. पश्चिम विदर्भात बुलढाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ आणि अमरावती तर पूर्व विदर्भात नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांचा समावेश होतो. येथे लोकसभेच्या १० तर विधानसभेच्या ६२ जागा आहेत.

हेही वाचा >>>साडी नेसणार्‍या महिलांना ‘पेटिकोट कॅन्सर’चा धोका? हा प्रकार काय आहे? अभ्यास काय सांगतो?

विदर्भाची राजकीय पार्श्वभूमी काय? 

विदर्भ हा पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. पक्षाच्या अंतर्गत कलहामुळे या पक्षाची येथे पीछेहाट होत गेली. त्याचा फायदा घेत भाजपने या भागावर पकड मजबूत केली. २०१४ मध्ये भाजपने ६२ पैकी तब्बल ४४ जागा जिंकल्या होत्या. मात्र त्यानंतर राज्यात पक्ष सत्तेत आल्यावरही या भागात भाजपची पीछेहाट सुरू झाली. २०१९ मध्ये पक्षाला फक्त २९ जागा मिळाल्या, त्यानंतर २०२४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत १० पैकी दोनच जागा भाजप जिंकू शकला. यावरून पक्षाची सद्यःस्थिती कळू शकते. पक्ष नेतृत्वावरील संताप हे यामागचे कारण मानले जाते. दुसरीकडे २०१९ मध्ये काँग्रेसने १५ आणि राष्ट्रवादीने ६ अशा एकूण २१ जागांवर मुसंडी मारली होती. त्यानंतर सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीने १० पैकी ८ जागा जिंकून या भागावरील पकड पुन्हा मजबूत केली.

सध्या स्थिती काय?

विदर्भात भाजपकडे सध्या १५ जागा आहेत. एकनाथ शिंदे गटाच्या चार व एक जागा मित्रपक्षाची असे एकूण ६२ पैकी २० जागांचे संख्याबळ आहे. या निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखाली महायुती निवडणूक लढवत आहे. भाजपने ६२ पैकी एकूण ४७ उमेदवार उभे केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने सहा जागांवर तर एकनाथ शिंदे गटाने आठ जागांवर उमेदवार उभे केले आहेत. एक जागा मित्रपक्षासाठी सोडली आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी निवडणूक लढवत आहे. काँग्रेसकडे १५ व राष्ट्रवादीची एक अशा १६ जागा आहेत. या निवडणुकीत काँग्रेस ४३ जागांवर, राष्ट्रवादी शरद पवार गट १३ व शिवसेना ठाकरे गट ७ जागांवर निवडणूक लढवत आहेत.

हेही वाचा >>>विश्लेषण : भारताची अखेर तालिबानशी चर्चा! अफगाणिस्तान आपल्यासाठी का महत्त्वाचा?

लढतींचे चित्र काय? 

राज्यात पुन्हा सत्ता काबीज करण्यासाठी विदर्भात निर्भेळ यश मिळवणे आवश्यक आहे हे लक्षात आल्यावर भाजपने या विधानसभा निवडणुकीत पूर्ण ताकद झोकून दिली आहे. नागपूर जिल्ह्यात मध्य नागपूर, काटोल या दोन मतदारसंघांसह विदर्भातील आर्वी, आर्णी, उमरखेड, गडचिरोलीसह सात जागी नवे चेहरे दिले आहेत. ४७ पैकी ३५ ठिकाणी भाजपची काँग्रेससोबत थेट लढत आहे. ८ जागांवर हा पक्ष शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या विरोधात तर ४ ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाच्या विरोधात लढत आहे. सिंदखेडराजामध्ये महायुतीतील घटक पक्ष अनुक्रमे अजित पवार व शिवसेना शिंदे गट महाविकास आघाडीतील शरद पवार गटाचे राजेंद्र शिंगणे यांच्या विरोधात लढत आहेत. रामटेकमध्ये शिवसेना ठाकरे गटाविरुद्ध काँग्रेसने बंडखोरी केली आहे.

भाजप विरुद्ध काँग्रेस थेट लढत कुठे?

विदर्भात ६२ मतदारसंघांपैकी ३५ मतदारसंघात काँग्रेस विरुद्ध भाजप अशी थेट लढत आहे. यवतमाळ जिल्ह्यात यवतमाळ, राळेगाव, वणी, आर्णी, उमरखेड, नागपूर जिल्ह्यात कामठी, हिंगणा, उमरेड, सावनेर या ग्रामीण मतदारसंघात तर शहरात दक्षिण पश्चिम, पश्चिम, उत्तर नागपूर या मतदारसंघात थेट लढत आहे. बुलढाणा जिल्ह्यात मलकापूर, चिखली, खामगाव, जळगाव जामोद, अकोला जिल्ह्यात आकोट, अकोला पश्चिम, अमरावती जिल्ह्यात धामणगाव रेल्वे, तिवसा, मेळघाट, अचलपूर, वर्धा जिल्ह्यात वर्धा, देवळी, आर्वी, भंडारा जिल्ह्यात साकोली, गोंदिया जिल्ह्यात आमगाव, गडचिरोली जिल्ह्यात आरमोरी, गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यात चंद्रपूर, बल्लारपूर, चिमूर, वरोरा आदींचा त्यात समावेश आहे.

लोकसभा निवडणुकीतील चित्र कसे होते?

सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला विदर्भात १० पैकी २ जागा मिळाल्या होत्या. काँग्रेसच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीने ७ जागा जिंकल्या होत्या. एक जागा शिवसेना शिंदे गटाने जिंकली होती. ६२ पैकी ४३ विधानसभा मतदारसंघात महायुतीने आघाडी घेतली होती. त्यामुळे या निवडणुकीत भाजपसमोर महाविकास आघाडीचे आव्हान मोडून काढण्याचे तर महाविकास आघाडीसमोर लोकसभेतील यश टिकवून ठेवण्याचे आव्हान आहे. 

महत्त्वाचे उमेदवार कोण?

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (कामठी), राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (दक्षिण पश्चिम नागपूर), सांस्कृतिक व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (बल्लारपूर), राष्ट्रवादीचे मंत्री धर्मरावबाबा आत्राम (अहेरी), काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (साकोली), काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर (तिवसा), विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (चिमूर), एकनाथ शिंदे गटाचे मंत्री संजय राठोड (दिग्रस) हे विदर्भातील प्रमुख उमेदवार रिंगणात आहेत.

एकाच घरातील उमेदवार कोणते?

विदर्भात अहेरी मतदारसंघात राष्ट्रवादीकडून (अजित पवार) मंत्री धर्मरावबाबा आत्राम तर शरद पवार गटाकडून भाग्यश्री आत्राम म्हणजे वडील विरुद्ध मुलगी अशी लढत होत आहे. सावनेर मतदारसंघात भाजपचे आशीष देशमुख यांच्या विरुद्ध त्यांचे बंधू अमोल देशमुख रिंगणात आहेत. काटोलमध्ये माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख रिंगणात आहेत. लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या भाजप नेत्या नवनीत राणा यांचे पती रवी राणा बडनेरामधून रिंगणात आहेत, त्यांच्या विरोधात भाजप नेते तुषार भारतीय यांनी बंडखोरी केली आहे. नागपूर जिल्ह्यात सावनेर मतदारसंघात काँग्रेस नेते सुनील केदार प्रथमच रिंगणाबाहेर आहेत. तेथे त्यांच्या पत्नी अनुजा रिंगणात आहेत. 

पक्ष फोडाफोडीचा परिणाम किती?

राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यावर भाजपने प्रथम शिवसेना फोडली व दीड वर्षांपूर्वी राष्ट्रवादी फोडली. या दोन्ही पक्षांचा विशेष प्रभाव विदर्भात मोजक्याच मतदारसंघांपुरता होता. त्यामुळे या निवडणुकीत या फोडाफोडीचा विशेष परिणाम राजकीय समीकरणांवर दिसून येण्याची शक्यता कमी आहे. शिवसेनेचा प्रभाव पश्चिम विदर्भ आणि पूर्व विदर्भातील रामटेक जिल्ह्यात होता. तर राष्ट्रवादी काँग्रेस काटोल, पुसद, सिंदखेडराजा आणि अहेरीसह पाच मतदारसंघापुरतीच मर्यादित होती. पक्षफुटीच्या वेळी एकनाथ शिंदेसोबत गेलेल्यांना शिवसेनेने पुन्हा उमेदवारी दिली. त्यांची लढत आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेशी होत आहे. हीच स्थिती राष्ट्रवादीची आहे. अहेरीतील एकसंघ राष्ट्रवादीचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या विरोधात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने त्यांची मुलगी रिणांगणात उतरवली आहे. सुरुवातीला अजित पवार यांच्यासोबत गेलेले सिंदखेडचे आमदार राजेंद्र शिंगणे आता पुन्हा शरद पवार गटाकडून निवडणूक लढवत आहेत. विशेष म्हणजे शिवसेनेचा कट्टर मतदार उद्धव ठाकरेंसोबत तर राष्ट्रवादीचा मतदार हा शरद पवार यांच्यासोबत असल्याचे लोकसभा निवडणुकीतून दिसून आले. 