विनायक डिगे

राज्यामध्ये करोनाच्या रुग्णांमध्ये महिनाभरात लक्षणीय वाढ झाली आहे. डिसेंबरमध्ये राज्यात करोनाचे तब्बल ९०० पेक्षा जास्त रुग्ण आढळले. त्याचबरोबर जेएन.१ या ओमायक्रॉनच्या नव्या उपप्रकाराचे रुग्णही आढळू लागले आहेत. अवघ्या आठवडाभरात राज्यात जेएन.१चे २९ रुग्ण सापडले तर करोनाचे ९०० पेक्षा अधिक रुग्ण सापडले. वाढते करोना रुग्ण आणि जेएन.१ चा वाढता प्रादुर्भाव यामुळे पुन्हा एकदा धास्तीचे वातावरण पसरले आहे. नव्या प्रकाराच्या प्रसाराला लसीकरण आवर घालणार का, वर्धक मात्रा गरजेची आहे का, अशा मुद्द्यांचा आढावा

Video Story Of Ravindra Dhangekar And Devendra Fadnavis.
Ravindra Dhangekar: “निवडणूक हरत असल्याचे लक्षात येताच…” फडणवीसांच्या ‘ॲक्सिडेंटल आमदार’ टीकेला धंगेकरांचे प्रत्युत्तर; पाहा व्हिडिओ
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
loksatta satire article on uddhav thackeray chopper checking
उलटा चष्मा : तपासण्यांची उड्डाणे
Advice from health experts due to the increase in diseases as the cold weather increases Pune print news
थंडीचा कडाका वाढताच आजारांमध्ये वाढ! बदलत्या हवामानाचा परिणाम; आरोग्यतज्ज्ञांचा सल्ला जाणून घ्या…
Eknath Shinde, Eknath Shinde news, Jitendra Awhad latest news,
ठाण्यात मुख्यमंत्र्यांच्या नावाने करोडोंची वसुली, आमदार जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोप
sex ministry in russia
‘या’ देशात स्थापन होणार सेक्स मंत्रालय? डेटिंग अन् लग्नासाठीही सरकार पुरवणार आर्थिक साह्य? कारण काय?
ageing population increasing in india
वृध्दांच्या लोकसंख्येचा दर वाढता, काय आहेत आव्हानं?

राज्यातील लसीकरणाची स्थिती काय?

देशात १६ जानेवारी २०२१ पासून करोना लसीकरणाला सुरुवात झाली. प्रथम करोनाच्या साथीच्या काळात विविध सेवा-सुविधा पुरवणारे कर्मचारी, वैद्यकीय कर्मचारी यांना लस देण्यात आली. त्यानंतर ज्येष्ठ व सहव्याधी असलेल्या नागरिकांना प्राधान्य देण्यात आले. राज्यात दोन्ही मात्रा व वर्धक मात्रा अशा एकूण १७ काेटी ७९ लाख ८१ हजार ४०५ मात्रा देण्यात आल्या. त्यात १८ वर्षांवरील ८ लाख ४६ हजार ६५ हजार ८२२ नागरिकांनी करोनाची पहिली मात्रा घेतली. १५ ते १८ वयोगटातील ४१ लाख १९ हजार १६४ नागरिकांनी पहिली मात्रा घेतली तर १२ ते १४ वयोगटातील २८ लाख ९१ हजार २९९ जणांनी पहिली मात्रा घेतली आहे. १८ ते ५९ वयोगटातील ५१ लाख ९० हजार ६२४ नागरिकांनी वर्धक मात्रा घेतली. ६० वर्षांवरील आणि करोना योद्धा असलेल्या ४४ लाख ८४ हजार ९८ नागरिकांनी वर्धक मात्रा घेतली आहे. पहिली मात्रा घेतलेल्या नागरिकांच्या तुलनेत दुसरी मात्रा घेतलेल्या नागरिकांचे प्रमाण कमी आहे. वर्धक मात्रा घेतल्यांचे प्रमाण तर फारच कमी आहे. नागरिकांचा लसीकरणाकडील ओढा कमी झाल्याने अनेक मात्रा या वाया गेल्या. वर्ष २०२३ मध्ये करोना लस घेण्याकडे नागरिकांचा कल कमी झाल्याने सरकारनेही लशींचा साठा आवश्यक तेवढाच प्रमाणात ठेवण्यास सुरुवात केली.

लशीमध्ये होत असलेल्या संशोधनामुळे काही महिन्यांमध्ये नाकावाटे देण्यात येणारी इन्कोव्हॅक लसही बाजारात आली. ही लस १ नोव्हेंबर २०२३ पासून १८ वर्षांवरील नागरिकांना वर्धक मात्रा म्हणून देण्यास सुरुवात करण्यात आली. मात्र या लशीलाही नागरिकांकडून अल्प प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा… विश्लेषण : रेव्ह पार्ट्यांचे जाळे किती दाट?

घेतलेल्या लशीचा प्रभाव असेल का?

कोणत्याही आजराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लस दिल्यानंतर मनुष्याच्या शरीरामध्ये दोन प्रकारची प्रतिपिंडे तयार होतात. यामध्ये पेशींमार्फत शरीरामध्ये प्रसारित होणारी प्रतिपिंडे आणि पेशींच्या स्मृतीमध्ये साठवण होणारी प्रतिपिंडे यांचा समावेश असतो. स्मृतीमध्ये असलेली प्रतिपिंडे वर्षानुवर्षे पेशींमध्ये राहतात. शरीरात एखाद्या आजाराच्या विषाणूंनी शिरकाव केल्यानंतर स्मृतीमधील प्रतिपिंडे जागृत होऊन रोगप्रतिकारशक्ती वाढवून संबंधित विषाणूंवर हल्ला चढवून तो नष्ट करतात. शरीरात प्रसारित होणारी प्रतिपिंडे ही काही ठरावीक काळापर्यंतच अस्तित्वात असतात. ही प्रतिपिंडे शरीरात असेपर्यंत संबंधित आजाराच्या विषाणूचा फारच कमी प्रभाव दिसून येतो. सध्या करोनाची लस घेऊन साधारणपणे एक ते दीड वर्षांचा कालावधी उलटला आहे. त्यामुळे शरीरात प्रसारित असणाऱ्या प्रतिपिंडाचा प्रभाव कमी झाल्याची शक्यता वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांकडून वर्तविण्यात येत आहे.

लस आवश्यक आहे का?

नागरिकांनी करोना लशीच्या दोन्ही मात्रा घेतल्या नाहीत किंवा वर्धक मात्रा घेतली नाही, अशा नागरिकांनी लसीच्या मात्रा तातडीने घ्याव्यात असा सल्ला डाॅक्टरांकडून देण्यात येत आहे. त्यातही ६० वर्षांवरील व सहव्याधी असलेल्या नागरिकांनी वर्धक मात्रा तातडीने घेण्याचा सल्लाही देण्यात येत आहे. विषाणूच्या नव्या प्रकाराला रोखण्यासाठीही लसीकरण आवश्यक असल्याचे मत डॉक्टरांनी व्यक्त केले आहे.

हेही वाचा… भीमा- कोरेगाव: १८१८ साली आजच्या दिवशी नेमके काय घडले होते? गॅझेटियर काय सांगते?

मृत्यूचे प्रमाण का वाढते आहे?

शरीरातील प्रतिपिंडाचा प्रभाव कमी झाल्याने तसेच करोनाच्या विषाणूंमध्ये परिवर्तन होऊन उदयास आलेल्या नवा उपप्रकारामुळे करोनाचे रुग्ण वाढण्याबरोबरच मृत्यूंची प्रकरणेही वाढत आहेत. त्यामुळे नवा उपप्रकार हा अन्य उपप्रकारांच्या तुलनेत अधिक प्रभावशाली असण्याची शक्यता आहे. तसेच सध्या असलेल्या थंडीचा कालावधी हा विषाणूंच्या वाढीसाठी पोषक असतो. त्यामुळे सध्या करोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत असल्याचे मत तज्ज्ञांकडून वर्तविण्यात येत आहे. करोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेता ज्या रुग्णांनी लसीच्या दोन्ही मात्रा घेतल्या नाहीत, वर्धक मात्रा घेतली नाही, अशा रुग्णांनी तातडीने लसीच्या मात्रा घेण्याच्या सल्ला डॉक्टरांकडून देण्यात येत आहे.

इन्कोव्हॅक लस घेण्यास अल्प प्रतिसाद का?

सुईद्वारे करोना लस देण्यात येत असल्याने अनेक नागरिक लस घेण्यास टाळाटाळ करतात. त्यामुळे बाजारात आलेली इन्कोव्हॅक ही नाकाद्वारे घेता येणारी लस १ नोव्हेंबर २०२३ पासून १८ वर्षांवरील नागरिकांना वर्धक मात्रा म्हणून घेण्यास मान्यता देण्यात आली. मात्र मागील दोन महिन्यांमध्ये या लसीला फारच अल्प प्रतिसाद मिळाला आहे. मागील दोन महिन्यांमध्ये मुंबईमध्ये १२३ नागरिकांनी इन्कोव्हॅक ही लस घेतली आहे. त्यातही ६० वर्षांवरील १०६ नागरिकांनी ही लस घेतली आहे. तर आरोग्य कर्मचारी १०, आघाडीवर काम करणारे १ आणि १८ ते ५९ वयोगटातील अवघ्या ६ जणांनी ही लस घेतली आहे.