अनिश पाटील

वर्षसमाप्तीची चाहूल लागल्यानंतर नववर्षाचे स्वागत समारंभ सुरू होतात. मात्र या पार्ट्यांच्या आडून सर्रास रेव्ह पार्ट्यांचे आयोजन होते. या पार्ट्यांमध्ये देश-विदेशातील तरुण-तरुणींना आमंत्रित केले जाते. ठाण्यातील घोडबंदर येथे एक रेव्ह पार्टी आयोजित करण्यात आली होती. या पार्टीत पोलिसांनी छापा टाकून सुमारे १०० तरुणांना ताब्यात घेतले आहे. पार्टीत गांजा, चरस असे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. यानिमित्ताने या रेव्ह पार्ट्यांचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

Police arrest one for black marketing commercial gas Pune news
व्यावसायिक गॅसचा काळाबाजार उघड; पोलिसांकडून सिलिंडरच्या ७२ टाक्या जप्त, एकाला अटक
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
20 percent ethanol mixed petrol distribution now started at all pumps in state
राज्यातील पंपांवर आता २० टक्के इथेनॉलमिश्रित पेट्रोल, वाहनधारकांसह पंपचालकांची परीक्षा?
Pimpri Chinchwad Anti Terrorism Branch exposed gang of fake police verification certificates
बनावट पोलीस पडताळणी प्रमाणपत्र देणार्‍या टोळीचा पर्दाफश
hindustan coca cola beverages
ज्युबिलंट भारतीय समूहाची हिंदुस्तान कोका-कोला बीव्हरेजेसमध्ये ४० टक्के हिस्सेदारी
Demand to the judges to withdraw the ban on single use plastic in the court premises Mumbai print news
न्यायालयाच्या आवारातील एकेरी वापराच्या प्लास्टिकवरील बंदी मागे घ्या; वकील संघटनेची मुख्य न्यायमूर्तींकडे पत्रव्यवहाराद्वारे मागणी
ed to hand over assets worth 125 crores of mehul choksi to banks
पीएनबी गैरव्यवहार प्रकरणः मेहूल चोक्सीविरोधात ईडीची मोठी कारवाई, १२५ कोटींच्या मालमत्ता फसवणूक झालेल्या बँकांना सुपूर्त करण्याच्या प्रक्रियेला सुरूवात
brain rot disease loksatta news
विश्लेषण : ‘ब्रेन रॉट’ यंदाचा ऑक्सफर्ड शब्द मानकरी! पण ही अवस्था नक्की काय असते? हा चिंताजनक विकार का?

रेव्ह पार्ट्यांचे आयोजन कसे होते?

रेव्ह पार्ट्यांचे आयोजन करण्यासाठी समाज माध्यमे, त्यावरील गट, डार्क नेट यांचा वापर होतो. त्यामुळे पोलीसही समाज माध्यमांवरील संशयित संज्ञापनावर लक्ष ठेवून असतात. साधारण डिसेंबरच्या सुरुवातीपासून अशा संकेतस्थळांवर, समाज माध्यमांवरील खासगी ग्रुपमध्ये या संदर्भातील मजकूर प्रसिद्ध होतो. नववर्षाच्या पूर्वसंध्येला काही रिसॉर्टमध्येही अशा रेव्ह पार्ट्याचे आयोजन करण्यात येत असल्याचे यापूर्वीच्या कारवायांमध्ये दिसून आले आहे. बदलत्या काळानुसार रेव्ह पार्ट्यांच्या आयोजनात बदल झाले आहेत. सुरुवातीला मोठ्या शहरांतील डिस्को, पब व बंगल्यांत या पार्ट्या आयोजित करण्यात येत होत्या. मात्र पोलिसांच्या वाढत्या कारवायांमुळे छोट्या शहरांत या पार्ट्या आयोजित केल्या जातात. उच्चभ्रू वर्गातील तरुणाईला अशा छोट्या शहरांत बोलावण्यासाठी समाज माध्यमांचा वापर होतो. समाज माध्यम, संकेतस्थळांमुळे रेव्ह पार्ट्यांची माहिती देण्यात तस्करांचा प्रत्यक्ष सहभाग नसल्याने त्यांना अटक होण्याची भीती कमी असते. त्यामुळे तस्करही डार्क नेटचा मोठ्या प्रमाणात वापर करतात.

हेही वाचा… भीमा- कोरेगाव: १८१८ साली आजच्या दिवशी नेमके काय घडले होते? गॅझेटियर काय सांगते?

आयोजन कोण करते?

रेव्हा पार्ट्यांचे आयोजन तस्करांकडूनच केले जाते. हॉटेल्स, रिसॉर्ट, समारंभांचे आयोजक (इव्हेंट मॅनेजर) त्याचे नियोजन करतात. काही वेळेला तर मुंबई-गोव्यातील तस्कर एकत्रितपणे अशा पार्ट्यांचे आयोजन करत असल्याचेही दिसून आले आहे. त्यासाठी बहुतेक वेळा मुंबईतील तरुणाईला गोव्यात नेण्याची सर्व व्यवस्था मुंबईतूनच केली जाते. त्यासाठी स्थानिक नागरिकांना हाताशी घेतले जाते.

रेव्ह पार्ट्यांमध्ये कोणत्या अमली पदार्थांचा वापर होतो?

रेव्ह पार्ट्यांमध्ये कोकेन, एलएसडी पेपर, परदेशी गांजा, एमडीएमए, एक्स्टेसी या अमली पदार्थांचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. त्यांना पार्टी ड्रग्स असे म्हटले जाते. एलएसडी पेपर हा रेव्ह पार्टीमध्ये अधिक प्रमाणात वापरला जातो. एलएसडीचा लहानसा तुकडा जिभेखाली ठेवला जातो. त्याचा वापर करणाऱ्यांमध्ये तरुणांचे प्रमाण अधिक आहे. पब, डिस्कोमध्ये त्याला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. विशेष म्हणजे एलएसडीचा रक्तातील अंश केवळ दोन ते चार तासांपुरता मर्यादित राहतो. त्यामुळे तात्काळ नशा चढते व लवकर उतरते. पार्टीत अटक झाल्यास वैद्यकीय तपासणी होण्यास दोन तासांचा अवधी जातो. त्यामुळे रक्तात त्याचा अंश सापडत नाही. त्यामुळे कायदेशीर कचाट्यात न अडकण्यासाठी धनाढ्य या ड्रग्सचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. गेल्या काही वर्षात पकडण्यात आलेल्या रेव्ह पार्ट्यांमध्ये अनेकांच्या वैद्यकीय तपासणी अहवालात अमली पदार्थांचे सेवन झाल्याचे सिद्ध होऊ शकले नाही.

हेही वाचा… विश्लेषण : ‘एआय’द्वारे भविष्यात न्यायालयीन खटल्यांचा अंदाज लावणे शक्य आहे काय?

रेव्ह पार्ट्या कुठे आयोजित केल्या जातात?

देशभरात गोव्याव्यतिरिक्त हिमाचल प्रदेशमधील कुलू व्हॅली रेव्ह पार्ट्यांसाठी प्रसिद्ध आहे. अलिकडे बेंगळुरू हे रेव्ह हॉटस्पॉट म्हणूनही उदयास आले आहे. पुणे, मुंबईसह इतर मोठ्या शहरांमध्येही रेव्ह पार्ट्या पकडल्या गेल्या आहेत. दिल्ली, मुंबई, गोवा, पुणे व बंगळूरुसारख्या शहरांत होणाऱ्या पार्ट्या आता शहरांपासून दूर, समुद्र किनाऱ्यांवर आयोजित होतात. मुंबईशेजारी पालघर, ठाणे, रायगड जिल्ह्यातही रेव्ह पार्ट्या होत असल्याचे उघडकीस आले आहे. गोव्यात बोटींवर अशा पार्ट्यांचे आयोजन होते. या काळात अमली पदार्थांची मागणी अचानक वाढत असल्यामुळे वर्षभर स्थिर असणाऱ्या किमती डिसेंबर महिन्याच्या शेवटी १५ ते २५ टक्क्यांनी वाढतात. या काळात अमली पदार्थांना मोठी मागणी असते. तसेच या काळात बंदोबस्त आणि अमली पदार्थ विरोधी यंत्रणा अधिक सक्रिय झाल्यामुळे तस्करीत अधिक जोखीम असते. त्यामुळेही किमतीत वाढ होते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

तपास यंत्रणा काय करत आहेत?

डिसेंसबरच्या सुरुवातीपासून राज्यातील पोलीस सतर्क झाले होते. केंद्रीय यंत्रणांसह मुंबई पोलीसही संशयित हालचालींवर विशेष लक्ष ठेवून होते. मुंबई विमानतळावर तीन कारवायांमध्ये ३५ कोटी रुपयांचे कोकेन महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने (डीआरआय) जप्त केले. नववर्षाच्या पूर्वसंध्येला होणाऱ्या रेव्ह पार्ट्यांवर करडी नजर असलेल्या मुंबई पोलिसांनी या वर्षभरात सुमारे साडेचारशे कोटींचे अमली पदार्थ जप्त केले. त्यात सर्वाधिक म्हणजे चारशे कोटींहून अधिक किमतीचे मेफेड्रोन (एमडी) जप्त करण्यात आले आहे. याशिवाय मुंबई पोलिसांनी वर्षभरात सुमारे चार हजार ८०० कोटी रुपयांचे अमली पदार्थ नष्ट केले आहेत. अमली पदार्थ विरोधी पथकाने नुकताच काश्मिरी चरसचा कोट्यावधींचा साठा जप्त केला होता. ठाणे पोलिसांनीही रेव्ह पार्टीवर छापा टाकून सुमारे १०० जणांना ताब्यात घेतले. या प्रकरणात पोलिसांनी ८,०३,५६० किमतीचा ७० ग्रॅम चरस, एलएसडी ०.४१ ग्रॅम, एक्स्टेसी पिल्स २.१० ग्रॅम, गांजा २०० ग्रॅम, परवाना नसलेल्या बिअर/वाईन/व्हिस्की असा अमली पदार्थ व मद्यसाठा, डीजे मशिन, २९ मोटार सायकली जप्त केल्या आहेत.

Story img Loader