वाढ किती? कोणी मोजली?

भारतामध्ये जानेवारी ते जून या सहामाहीत झालेल्या विविध प्रकारच्या डिजिटल व्यवहारांचा अहवाल पेमेंट सेवा क्षेत्रातील ‘वर्ल्डलाइन’ या संस्थेने नुकताच जाहीर केला आहे. देशातील डिजिटल व्यवहार वेगाने वाढत आहेत. याचवेळी त्यासाठीच्या पायाभूत सुविधाही वेगाने वाढत आहेत. ‘पॉइंट ऑफ सेल’ यंत्रांची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पहिल्या सहामाहीत १७ टक्क्यांनी वाढून ८९.६ लाखांवर पोहोचली आहे. याचबरोबर क्यूआर कोडचे प्रमाणही ३९ टक्क्यांनी वाढले आहे. ही संख्या गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात २४.४२ कोटी होती आणि यंदा जानेवारी महिन्यात ती ३४ कोटींवर पोहोचली आहे. देशभरात डिजिटल व्यवहार वाढण्यास हे प्रमुख कारण ठरले आहे.

यूपीआयचे प्राबल्य?

यंदा पहिल्या सहामाहीत सर्वच क्षेत्रात यूपीआयचा वापर वाढल्याचे या अहवालातून दिसते… एरवीही क्रेडिट/ डेबिट कार्ड अथवा बँक-ट्रान्सफरपेक्षा ‘यूपीआय’कडे भारतीयांचा कल रस्तोरस्ती दिसतोच. किराणा मालाच्या दुकानापासून रेस्टॉरन्ट, सेवा केंद्रे आणि सरकारी सेवांपासून ते फेरीवाल्यांपर्यंत यूपीआयचा वापर प्रामुख्याने होऊ लागला आहे. एकूण यूपीआय व्यवहारांमध्ये या व्यवहारांचे प्रमाण ६८ टक्के आहे. भारतीय डिजिटल व्यवहार पद्धतीत यूपीआय ही सर्वांत आघाडीची प्रणाली आहे. या प्रणालीमार्फत गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात ८.०३ अब्ज व्यवहार झाले होते. यात वाढ होऊन हे व्यवहार यंदा जानेवारी महिन्यात १३.९ अब्ज डॉलर व्यवहार झाले. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पहिल्या सहामाहीत यूपीआय व्यवहारांमध्ये ५२ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे.

Devendra Fadnavis claims that Ladaki Bahin Yojana will benefit everyone without discrimination
धर्मभेद न करता लाडकी बहीण योजनेचा सर्वांना लाभ; देवेंद्र फडणवीस यांचा दावा
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Shrimant Dagdusheth Halwai Ganpati temple
श्रीमंत दगडूशेठ गणपतीला ५२१ पदार्थांचा महानैवेद्य आणि १ लाख २५ हजार दिव्यांची आरास, त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त आकर्षक सजावट
How is census of population conducted
जनगणना कशी होते? प्रगणकांना कोणते अनुभव येतात?
loksatta editorial no interest rate cut by rbi retail inflation surges in october
अग्रलेख : म्हाताऱ्या शब्दांचा आरसा…
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : नीतिशास्त्र, सचोटी  आणि नैसर्गिक क्षमता
ageing population increasing in india
वृध्दांच्या लोकसंख्येचा दर वाढता, काय आहेत आव्हानं?

हेही वाचा >>>मुनव्वर फारुकी लॉरेन्स बिष्णोईच्या हिटलिस्टवर का आहे?

छोटे व्यवहार वाढले ?

यूपीआय व्यवहार केवळ छोट्या व्यवहारांसाठी वापरले जात नसून, त्यांचा वापर मोठ्या व्यवहारांसाठीही होत आहे. असे असताना यूपीआयच्या माध्यमातून होणाऱ्या सरासरी व्यवहारांचे मूल्य कमी झाले आहे. गेल्या वर्षी पहिल्या सहामाहीत यूपीआयच्या सरासरी व्यवहाराचे मूल्य १ हजार ६०३ रुपये होते. ते यंदा पहिल्या सहामाहीत १ हजार ४७८ रुपयांवर आले आहे. याचवेळी ग्राहकांकडून व्यापाऱ्याशी होणाऱ्या व्यवहारांचे सरासरी मूल्यही घटले आहे. गेल्या वर्षी पहिल्या सहामाहीत हे मूल्य ६६७ रुपये होते आणि यंदा पहिल्या सहामाहीत ते ६४३ रुपयांवर आले आहे. यामुळे छोट्या व्यवहारांसाठी यूपीआयचा वापर वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा >>>Tapeworm Pills : लठ्ठपणा कमी करण्यासाठी टेपवर्मचा वापर? त्याचा शरीरावर किती घातक परिणाम?

क्रेडिट कार्ड’चा विषय वेगळा?

डिजिटल व्यवहार वाढत असताना डेबिट कार्डद्वारे होणारे व्यवहार घटले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पहिल्या सहामाहीत डेबिट कार्ड व्यवहारांमध्ये ३३ टक्के घट झाली आहे. याचवेळी क्रे़डिट कार्डच्या माध्यमातून व्यवहार वाढू लागले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा क्रेडिट कार्ड व्यवहार ३२ टक्क्यांनी वाढले आहेत. याचवेळी या व्यवहारांचे मूल्य ७.७४ लाख कोटी रुपयांवरून वाढून १०.६२ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. क्रेडिट कार्डचे व्यवहार आणि त्यांचे मूल्य वाढत असताना डेबिट कार्डचे व्यवहार आणि त्यांचे मूल्य मात्र दिवसेंदिवस कमी होताना दिसून येत आहे. थोडक्यात, आपल्या बँकखात्यातील रक्कम ज्यातून तातडीने कमी होणार आहे, अशा डिजिटल व्यवहारासाठी डेबिट कार्डाच्या वापराऐवजी ‘स्कॅनर मारणे’ सुटसुटीत, असा विचार अधिक भारतीय करू लागले आहेत!

मोबाइलचा किती फायदा?

यूपीआयमुळे मोबाइलद्वारे व्यवहार वाढू लागले आहेत. विविध मोबाइल उपयोजनांच्या (अॅप्स) माध्यमातून होणाऱ्या व्यवहारांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत ४६ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. यंदा पहिल्या सहामाहीत मोबाइलच्या माध्यमातून ७६.०४ अब्ज व्यवहार झाले. याचवेळी मोबाइलमार्फत झालेल्या व्यवहारांचे मूल्य यंदा (जाने. ते जून २४ पर्यंत) ३६ टक्क्यांनी वाढले आहे. यंदा पहिल्या सहामाहीत १७९.४१ लाख कोटी रुपयांचे व्यवहार झाले. यातून स्मार्टफोन हे व्यवहार करण्यासाठी मुख्य साधन बनू लागल्याचे समोर आले आहे. डिजिटल व्यवहारांमध्ये मोबाइल उपयोजने मध्यवर्ती भूमिका बजावत आहेत. यामुळे आगामी काळात मोबाइलचा वापर वाढत जाऊन पर्यायाने डिजिटल व्यवहारही वाढणार आहेत.