सुमित पाकलवार

गडचिरोलीत नक्षल्यांना केवळ बंदुकीतून नव्हे तर संवादातून आणि प्रभावी योजनेतून प्रत्युत्तर देण्याचे काम पोलीस विभागाने सुरू केले असले तरी त्याचा अपेक्षित परिणाम अद्याप पूर्णपणे साधला गेलेला नाही. काही काळ नक्षलवादी शांत होतात व पुन्हा संधी मिळताच जिल्ह्यात हैदोस घालू लागतात. आताही गडचिरोलीत असेच घडत आहे. 

nana patole loksatta news
Nana Patole : “बीड, परभणीच्या घटना सरकार प्रायोजित”, नाना पटोलेंनी सांगितले घटनांमागील…
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Police beaten in Nigdi Three arrested
पुणे : निगडीत पोलिसांना मारहाण; तिघे अटकेत
TCS , quarterly results , Infosys, Wipro,
ससा कासवाची गोष्ट : ‘टीसीएस’ला फळले… इन्फोसिस, विप्रोच्या तिमाही निकालांचे काय ?
nitin gadkari
Nitin Gadkari : करोना, दंगली, लढायांपेक्षा अधिक मृत्यू अपघातांमुळे… खुद्द गडकरींनीच…
drugs parli connection loksatta news
“गुजरातमध्ये सापडलेल्या ड्रग्जचे परळी कनेक्शन”, आमदार सुरेश धस यांचा धाराशिवमध्ये गौप्यस्फोट
Suresh Dhas On Santosh Deshmukh Case
Suresh Dhas : ‘पुण्यात ७ दुकानं, १५ कोटींचा संपूर्ण मजला…’, आमदार सुरेश धसांचा ‘आका’कडील संपत्तीबाबत मोठा दावा
Municipal administration to clean 23 ponds in Thane
ठाण्यातील २३ तलावाची होणार सफाई; पाण्यावरील तरंगता कचरा केला जाणार साफ

गडचिरोलीत पुन्हा दहशत का वाढली?

पोलीस यंत्रणेच्या प्रभावी कामगिरीमुळे मागील काही वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यात नक्षल्यांचा प्रभाव कमी झाल्याचे चित्र आहे. परंतु यंदाही ‘पीएलजीए सप्ताह’ (‘पीपल्स लिबरेशन गुरिला आर्मी’च्या मृत नक्षलींसाठी २ ते ८ डिसेंबपर्यंत) पाळण्याचे आवाहन नक्षलींनी केले आणि त्यापूर्वी नक्षलवाद्यांनी ठरावीक दिवसांच्या अंतराने ‘पोलिसांचे खबरी ठरवून’ तिघा सामान्य नागरिकांची हत्या केली. या हत्यासत्राने गडचिरोलीत पुन्हा दहशत वाढली आहे. यामुळे काही काळ शांत असलेले नक्षलवादी पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. छत्तीसगढ सीमेवरील तोडगट्टा येथे सुरू असलेले लोहखाणविरोधी आंदोलन प्रशासनाने उधळून लावल्यामुळे नक्षल अधिक आक्रमक झाल्याची चर्चा आहे.

हेही वाचा >>>Birthplace of Krishna in Mathura: मथुरेतील कृष्ण जन्मस्थान: इतिहास नेमके काय सांगतो?

खाणविरोधी आंदोलन उधळल्याचा परिणाम?

नक्षल्यांनी लागोपाठ सामान्य नागरिकांची हत्या करून ते पोलीस खबरी असल्याचे पत्रकातून म्हटले आहे. मात्र, छत्तीसगढ सीमेवरील तोडगट्टा येथे २५० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले खाणविरोधी आंदोलन प्रशासनाने उधळून लावल्याने नक्षलवादी अधिक आक्रमक झाल्याची चर्चा आहे. सुरुवातीपासूनच नक्षल्यांचा खाणीला विरोध आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना धमकावून ते आंदोलनासाठी प्रोत्साहित करीत आहेत, असे पोलीस विभाग वेळोवेळी सांगत असतो. प्रशासनाच्या आश्वासनानंतरदेखील नागरिक आंदोलनावर ठाम होते. त्यामुळे संघर्षांची स्थिती निर्माण झाली होती.

सामान्य आदिवासी नागरिक निशाण्यावर?

गेल्या पाच दशकांपासून जिल्ह्यात नक्षल चळवळ सक्रिय आहे. आजवर, या जिल्ह्यातील ५५४ सामान्य नागरिकांची हत्या नक्षल्यांनी केली, त्याआधी बहुतेक बळींवर परस्पर विविध आरोप नक्षल्यांनी केले होते. या बळींमधील बहुतांश आदिवासी आहेत.

नुकत्याच केलेल्या हत्यांमध्ये तीन आदिवासी तरुणांचा समावेश आहे. नक्षल्यांचा वावर प्रामुख्याने दुर्गम आणि घनदाट जंगल परिसरात असतो. त्यामुळे त्यांचा त्या भागातील नागरिकांशी संपर्क येतो. बऱ्याचदा चकमकीनंतर नक्षलवादी संशयित पोलीस खबरी ठरवून सामान्य नागरिकांची हत्या करतात. मात्र, अनेक प्रकरणांमध्ये हत्या झालेले नागरिक खबरी नसल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा >>>विश्लेषण : स्टार्क, रचिन की अन्य कोणी… ‘आयपीएल’ लिलावात कोण ठरणार सर्वांत महागडा खेळाडू? कोणत्या संघाकडे किती रक्कम शिल्लक?

पण नक्षल चळवळ कमकुवत झालीच ना?

होय.. एके काळी जिल्ह्यातील सिरोंचा ते कोरची तालुक्यापर्यंत पसरलेले नक्षलवादी सद्य:स्थितीत काही तालुक्यांत मर्यादित झाले आहेत. पोलिसांचे प्रभावी नक्षलविरोधी अभियान, सीमाभागात पूल व रस्त्यांचे  वाढलेले जाळे हे त्यामागचे प्रमुख कारण असल्याचा पोलिसांचा दावा आहे. मधल्या काळात काही चकमकींत नक्षल्यांचे प्रमुख नेते मारले गेले. तर काहींनी आत्मसमर्पण केले. नेतृत्वअभावी चळवळ खिळखिळी झाल्याचा दावा पोलीस विभागाकडून केला जातो. त्यामुळे सध्या जिल्ह्यात केवळ ९० च्या आसपास नक्षलवादी शिल्लक असल्याचे पोलीस विभागाचे म्हणणे आहे. मागील तीन वर्षांत कमी झालेल्या कारवाया बघता ही चळवळ कमकुवत झाल्याचे पोलीस  सांगतात. परंतु, तरीही नक्षली कारवाया काही थांबलेल्या नाहीत. 

प्रशासनाने भूमिका बदलल्याचे परिणाम काय?

जिल्ह्याच्या शेवटच्या टोकापर्यंत दळणवळणाची साधने पोहोचली पाहिजेत यासाठी शासन मागील अनेक वर्षांपासून प्रयत्न करीत आहे. त्यांच्यासमोर नक्षलवाद्यांचे सर्वात मोठे आव्हान होते. पोलीस बळाचा वापर करून दुर्गम भागात पोहोचण्याचा प्रयत्न झाला. यादरम्यान अनेकदा चकमकी उडाल्या. यात आजपर्यंत ३१२ नक्षलवादी ठार तर २१२ पोलीस शहीद झाले.

दरम्यान, नक्षल्यांना केवळ बंदुकीतून नव्हे तर संवादातून आणि प्रभावी योजनेतून प्रतिउत्तर देण्याचे काम पोलीस विभागाने सुरू केले. दादालालोरा खिडकीसारख्या उपक्रमातून जवळपास पाच लाख नागरिकांपर्यंत विविध योजना पोहोचविण्यात पोलीस विभाग यशस्वी झाला आहे. हजारो तरुणांना प्रशिक्षणासह रोजगारदेखील प्राप्त झाला. पूर्वी पोलिसांना बघून घाबरणारा आदिवासी आज त्यांच्याकडे समस्या घेऊन येऊ लागला आहे. प्रभावी आत्मसमर्पण योजनेमुळे शेकडो नक्षलवादी मुख्य प्रवाहात सामील होत आहेत. त्यामुळे नक्षल्यांना गावागावांतून मिळणारे पाठबळ कमी झाल्याचे चित्र आहे.

Story img Loader