एचएमपीव्ही म्हणजे काय?

एचएमपीव्ही हा आधीही भारतासह जगभरात आढळून आला आहे. हा श्वसन मार्गाच्या वरील भागात होणारा संसर्ग आहे. याची लक्षणे श्वसनविकार आणि फ्ल्यूसारखी असतात. तीव्रता वाढल्यास श्वसन मार्गाच्या खालच्या भागात पसरतो आणि त्यातून गुंतागुंत निर्माण होते. गोवर आणि गालगुंड होण्यास कारणीभूत ठरणाऱ्या विषाणूंच्या जातकुळीतील हा विषाणू आहे. विशेषत: लहान मुलांमध्ये संसर्गाचा धोका अधिक असतो. या विषाणूचा संसर्ग प्रामुख्याने हिवाळ्यात वाढतो. अनेक जणांना ते पाच वर्षांचे होईपर्यंत या विषाणूचा संसर्ग झालेला असतो आणि त्यानंतर पुन्हा संसर्ग झाल्यास त्याची तीव्रता कमी असते.

संसर्ग कसा होतो?

एचएमपीव्हीचा विषाणू हा त्याच्या प्रत्यक्ष संपर्कात आलेल्या व्यक्तींना होतो. त्यात विषाणू असलेल्या गोष्टींना स्पर्श करण्यामुळे त्याचा प्रसार प्रामुख्याने होतो, तसेच संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या खोकण्यातून वा शिंकण्यातून संसर्ग किंवा शारीरिक संपर्कातूनही हा विषाणू पसरतो.

rabit fever
माणसांमध्ये वेगाने पसरतोय ‘रॅबिट फिव्हर’; काय आहे हा विचित्र आजार? त्याची लक्षणे काय?
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Mumbai targeted by cyber thugs after gang war terrorist attacks print exp
गँगवॉर, दहशतवादी हल्ल्यांनंतर मुंबई सायबरठगांचे टार्गेट… गतवर्षी १२०० कोटींची सायबर फसवणूक! केवळ १० टक्के रिकव्हरी! 
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
HMPV Found In Mumbai
Mumbai : मुंबईत आढळला HMPV चा पहिला रुग्ण, सहा महिन्यांच्या बाळाला विषाणूची लागण
dhananjay Munde
मुंडेंच्या राजीनाम्यासाठी भाजपचा दबाव; मित्रपक्षाच्या नेत्यांची आक्रमक भूमिका
saudi arabia snowfall
सौदी अरेबियाच्या रखरखीत वाळवंटात झाली चक्क बर्फवृष्टी; कारण काय?
_UK grooming scandal
हजारो मुलींच्या लैंगिक शोषण प्रकरणावरुन एलॉन मस्कने ब्रिटनच्या पंतप्रधानांना का केलं लक्ष्य?

हेही वाचा >>>माणसांमध्ये वेगाने पसरतोय ‘रॅबिट फिव्हर’; काय आहे हा विचित्र आजार? त्याची लक्षणे काय?

चीनमधील स्थिती काय?

चीनमध्ये या आजाराचा उद्रेक झाला असला तरी तेथील सरकारने दरवर्षीप्रमाणेच हिवाळ्यामुळे या संसर्गात वाढ झालेली असून, स्थिती गंभीर नाही, असे म्हटले आहे. देशभरात प्रवास करणे सुरक्षित आहे, असेही चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.

लक्षणे अन् उपचार कोणते?

लक्षणे ही हिवाळ्यात होणाऱ्या सर्दी, खोकल्यासारखी असतात. त्यात खोकला, ताप, सर्दी, घशाला सूज, छातीत घरघर, अंगावर पुरळ उठणे आणि श्वास घेण्यास त्रास होणे या प्रमुख लक्षणांचा समावेश आहे. लहान मुलांमध्ये प्रतिकारशक्ती पूर्णपणे विकसित झालेली नसते. त्यामुळे त्यांच्यात या आजाराचे प्रमाण जास्त दिसून येते. ६५ वर्षांवरील व्यक्तींमध्ये प्रतिकारशक्ती कमकुवत होत असल्याने त्यांच्यात हा संसर्ग अधिक दिसतो. रुग्णांना विषाणूप्रतिबंधक औषधे दिली जातात. एखाद्या रुग्णाची स्थिती गंभीर असेल तर त्याला कृत्रिम ऑक्सिजन, सलाइन आणि कोर्टिकोस्टेरॉइड्स दिली जातात. या आजाराचा संसर्ग काही दिवस ते एक आठवडा राहतो.

हेही वाचा >>>हजारो मुलींच्या लैंगिक शोषण प्रकरणावरुन एलॉन मस्कने ब्रिटनच्या पंतप्रधानांना का केलं लक्ष्य?

निदान कसे होते?

एचएमपीव्हीची लक्षणे इतर श्वसनविकार आणि फ्ल्यूसारखी असल्याने लक्षणांवरून त्याचे निदान करता येत नाही. आरटी-पीसीआर चाचणी करावी लागते. अँटिजने चाचणीच्या माध्यमातूनही तातडीने निदान होते. भारतीय वैद्याकीय संशोधन परिषद आणि एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रम यांच्याकडून श्वसनविकाराला कारणीभूत ठरणाऱ्या विषाणूंचे सर्वेक्षण केले जाते. त्यात एचएमपीव्हीचाही समावेश आहे.

काळजी काय घ्यावी?

खोकताना, शिंकताना तोंड आणि नाक रुमाल किंवा टिश्यू पेपरने झाकावे. साबण, पाणी वा सॅनिटायझरने हात वारंवार साफ ठेवावेत. ताप, खोकला आणि शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणांपासून दूर राहावे. भरपूर पाणी प्यावे आणि पौष्टिक आहार घ्यावा. संक्रमण कमी करण्यासाठी सर्व ठिकाणी पुरेसे वायुविजन हवे. याचबरोबर संसर्गबाधित व्यक्तीशी वा तिने वापरलेल्या वस्तूंशी संपर्क टाळावा. आजारी लोकांशी जवळचा संपर्क ठेवू नका, आपले डोळे, नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करू नका. सार्वजनिक ठिकाणी थुंकणे टाळा आणि डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेऊ नका, अशा सूचना आरोग्य विभागाने केल्या आहेत.

राज्यात धोका किती?

एचएमपीव्हीचा धोका वाढल्याने राज्याच्या आरोग्य विभागाने श्वसन संसर्गाच्या आकडेवारीचे विश्लेषण केले आहे. राज्यात २०२३ च्या तुलनेत डिसेंबर २०२४ मध्ये श्वसन संसर्गात कोणतीही वाढ झालेली दिसून आली नाही. एचएमपीव्हीबाबत आवश्यक दक्षता घेण्यात येत असून भीतीचे वातावरण निर्माण करण्याची गरज नाही, असे आरोग्य विभागाने म्हटले आहे. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील सर्वेक्षण अधिक गतिमान करून सर्दी-खोकला रुग्णांचे नियमित सर्वेक्षण अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Story img Loader