वाराणसीमधील ग्यानवापी मशिदीच्या प्रकरणात न्यायालयाने सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. यानंतर आता मथुरात श्री कृष्ण जन्मभूमी परिसरातील मशिदीचंही सर्वेक्षण करण्याची मागणी होत आहे. दिल्लीचा कुतुबमिनार विष्णू स्तंभ असल्याचा दावा करत नुकतेच काही हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलन केलं. ताजमहलबाबतही तो तेजोमहल, शिवमंदिर असल्याचा दावा होतो. मात्र, भारतात या इतक्या ठिकाणी वाद नाही. देशातील एकूण ५ राज्यांमधील १० मशिदींवरून मोठा वाद आहे. या १० मशिदींबाबत नेमका काय वाद आहे, त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि घडामोडी काय याचं खास विश्लेषण

१. ग्यानवापी मशीद, वाराणसी, उत्तर प्रदेश

१६९९ मध्ये मुगल सम्राट औरंगजेबाने काशीतील विश्वनाथ मंदिर उद्ध्वस्त करून तेथे मशीद बांधल्याचा दावा हिंदुत्ववाद्यांकडून केला जातो. १९९१ मध्ये पहिल्यांदा याबाबत कोर्टात याचिका दाखल झाली होती. तेव्हापासूनच वादाला सुरुवात झाली होती. भगवान विश्वेश्वर यांच्याकडून वाराणसीच्या न्यायालयात मशीद परिसरात पूजा करण्याची परवानगी मागणारी याचिका दाखल केली होती. या प्रकरणी अंजुमन इंतेजामिया मस्जिद कमिटीनं अलाहाबाद उच्च न्यायालयात धाव घेतली.

Liquor and fish stocks seized in Bhayander news
मतदारांना आमिषे दाखविण्यास सुरवात; भाईंदरमध्ये मद्य आणि मासळाची साठा जप्त
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Numerology
‘या’ तारखेला जन्मलेले लोक कमी वयात होतात श्रीमंत, कमावतात आयुष्यात भरपूर धन-संपत्ती
Rabi onion cultivation will increase by lakh hectares Mumbai
रब्बी कांदा लागवड लाख हेक्टरने वाढणार; जाणून घ्या, देशभरातील रब्बी लागवडीचा अंदाज
Baba Siddique murder case, Five people in police custody, Baba Siddique news, Baba Siddique latest news,
पाच जणांना १९ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी, बाबा सिद्दिकी हत्या प्रकरण
saif ali khan threat inter religion marriage
आंतरधर्मीय विवाहामुळे सैफ अली खानला मिळाल्या होत्या धमक्या; स्वतः खुलासा करत म्हणालेला, “आमच्या घराजवळ…”
woman police brutally beaten by brother in law in kalyan
कल्याणमध्ये महिला पोलिसाला दिराकडून बेदम मारहाण
Attempted murder of laborer due to argument over drinking
दारू पिताना झालेल्या वादातून मजुराचा खुनाचा प्रयत्न, भिडे पूल परिसरातील घटना

या प्रकरणी थेट २०१९मध्ये मशीद परिसराचा एएसआयकडून सर्वे करण्यात यावा अशी मागणी करणारी याचिका करण्यात आली. अंजुमन इंतेजामिया मस्जिद कमिटीनं याहीवेळी सर्वेला विरोध केला. त्यानंतर वाराणसीच्या कनिष्ठ न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली. यासंदर्भात एप्रिल २०२२ मध्ये अर्थात ८ एप्रिल रोजी न्यायालयानं सर्वे करण्याचे निर्देश दिले. मात्र, त्यासंदर्भात अंजुमन इंतेजामिया मस्जिद कमिटीनं आक्षेप घेतला असून त्याबाबतच्या प्रकरणाची सुनावणी वाराणसी कोर्टात पार पडली.

२. शाही ईदगाह मशीद, मथुरा, उत्तर प्रदेश

शाही ईदगाह मशीद मथुरा शहरात श्रीकृष्ण जन्मभूमी मंदिर परिसराच्या जवळ आहे. औरंगजेबाने श्रीकृष्ण जन्मभूमीवरील प्राचीन केशवनाथ मंदिर उद्ध्वस्त करून १६६९-७० मध्ये शाही ईदगाह मशीद बांधल्याचा दावा केला जातो. १९३५ मध्ये इलाहाबाद उच्च न्यायालयाने १३.३७ एकर वादग्रस्त जमीन वाराणसीचे राजा कृष्णदास यांनी दिली होती. १९५१ मध्ये श्री कृष्ण जन्मभूमी ट्रस्टने जमिनीचं अधिग्रहन केलं होतं. हे ट्रस्ट १९५८ मध्ये श्रीकृष्ण जन्मस्थान सेवा संघ आणि १९७७ मध्ये श्रीकृष्ण जन्मस्थान सेवा संस्थान या नावाने नोंदणी झालेलं आहे.

१९६८ मध्ये श्री कृष्ण जन्मस्थान सेवा संघ आणि शाही ईदगाह कमिटीमध्ये सामंजस्य झालं आणि १३.३७ एकर जमिनीची मालकी ट्रस्टला, तर ईदगाह मशिदीचं व्यवस्थापन ईदगाह कमेटीला देण्यात आलं. या प्रकरणात देखील ईदगाह मशिदीचं सर्वेक्षण आणि व्हिडीओग्राफी करण्याची मागणी केली जात आहे.

३. ताजमहल, आग्रा, उत्तर प्रदेश

आग्रा येथील ताजमहलची निर्मिती मुगल बादशाह शाहजहांने १६३२ मध्ये सुरू केली होती. हे काम १६५३ मध्ये पूर्ण झालं. मात्र, ताजमहल म्हणजे शिवमंदिर आहे आणि त्याचं नाव तेजोमहल असल्याचा दावा हिंदू संघटनांनी केलाय. तसेच ताजमहलचे बंद असलेल्या २२ खोल्या उघडण्याची आणि पुरातत्व विभागाचं सर्वेक्षण करण्याची मागणी केली जात आहे. मात्र, न्यायालयाने ही मागणी फेटाळली आहे.

४. कमल मौला मशीद, धार, मध्य प्रदेश

मध्य प्रदेशची राजधानी भोपाळपासून २५० किलोमीटर दूर धार जिल्ह्यातील कमल मौला मशीद देखील नेहमीच वादात राहिली आहे. हिंदुत्ववादी या मशिदीला सरस्वतीचं जुन भोजशाला मंदिर असल्याचं सांगतात. १९९७ पासून हिंदुंना या ठिकाणी केवळ दर्शनासाठी परवानगी आहे. सध्या त्या मशिदीची देखरेख भारतीय पुरातत्व खातं करत आहे. ASI ने हिंदुंना मंगळवारी आणि वसंत पंचमीला पुजा करण्यास आणि मुस्लिमांना दर शुक्रवारी नमाज पठण्यास परवानगी दिली.

५. कुव्वत-उल-इस्लाम मशीद, दिल्ली

दिल्लीतील कुव्वत-उल-इस्लाम मशीद प्रसिद्ध कुतुब मीनार परिसरात आहे. या मशिदीची निर्मिती कुतुबुद्दीन ऐबकने केली होती. हिंदुत्ववाद्यांनी कुतुबुद्दीनवर २७ हिंदू आणि जैन मंदिरं उद्ध्वस्त करून ही मशीद बांधल्याचा आरोप केलाय. राम मंदिर-बाबरी मस्जिद वादाच्या वेळी अयोध्येतील खोदकामात सहभागी प्रसिद्ध आर्कियोलॉजिस्ट केके मुहम्मद यांनी दावा केला होता की, कुतुबमिनारजवळील कुव्वत-उल-इस्लाम मस्जिद बांधकामासाठी २७ हिंदू आणि जैन मंदिरांना तोडण्यात आलं होतं. मस्जिदीच्या पूर्वीकडील गेटवरील एका शिलालेखातही याचा उल्लेख आहे असंही केके मुहम्मद यांनी म्हटलंय. या प्रकरणात फेब्रुवारी २०२२ मध्ये साकेत जिल्हा न्यायालयाने केंद्र सरकारला नोटीस दिली होती.

६. बीजा मंडल मशीद, विदिशा, मध्य प्रदेश

मध्य प्रदेशच्या विदिशा शहरातील बीजा मंडल मशिदीबाबतही वाद आहे. या वास्तूची निर्मिती चर्चिका देवी या हिंदू मंदिराला पाडून केल्याचा आरोप केला जातो. या ठिकाणी एका खांबावरील शिलालेखात मूळ मंदिर देवी विजयाला अर्पण असल्याचं म्हटल्याचा दावाही केला जातो. १६५८-१७०७ दरम्यान औरंगजेबाने या मंदिरावर हल्ला करून मंदिरातील सर्व मूर्ती गाडल्या. तसेच हे ठिकाण मशिदीत रुपांतरीत केलं, असाही आरोप आहे.

७. जामा मशीद, अहमदाबाद, गुजरात

गुजरातमधील अहमदाबाद येथे असलेली जामा मशीद देखील वादग्रस्त आहे. ही मशीद भद्रकालीचं मंदिर पाडून बनवल्याचा आरोप आहे. तसेच अहमदाबादचं जुनं नाव भद्रा होतं असाही दावा केला जातो. अहमदाबादमधील जामा मशीद अहमद शाहने (पहिला) १४२४ मध्ये बनवली होती. मात्र, ही वास्तू आधी मंदिर होती हा दावा करणाऱ्यांच्या मते, “या मशिदीचे बहुतेक खांब हिंदू मंदिरांप्रमाणे आहेत. या खांबांवर कमळाची फुलं, हत्ती, कुंडली मारलेले नाग, नर्तकी, घंटा इत्यादीची नक्षी आहे.”

८. अटाला मशीद, जौनपूर, उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेशमधील जौनपूर जिल्ह्यातील अटाला मशिदीविषयी देखील वाद आहे. ही मशीद १४०८ मध्ये इब्राहिम शरीकीने बांधली होती. मात्र, इब्राहिमने जौनपूरमधील अटाला देवीचं मंदिर पाडून ही मशीद बांधल्याचा आरोप केला जातो.

९. अदीना मशीद, मालदा, पश्चिम बंगाल

पश्चिम बंगालमधील मालदा जिल्ह्यातील पांडुआमध्ये अदीना मशीद आहे. या मशिदीची निर्मिती १३५८-९० मध्ये सिकंदर शाहने केली होती. सिकंदरने भगवान शिवाचं प्राचीन आदिनाथ मंदिर उद्ध्वस्त करून त्या जागेवर अदीना मशीद उभी केल्याचा आरोप आहे. या ठिकाणी मंदिर असल्याचा दाव करणारे म्हणतात, “अदीना मशिदीच्या अनेक भागात हिंदू मंदिरांप्रमाणे नक्षीकाम आढळते.”

हेही वाचा : विश्लेषण : ताजमहलच्या २२ खोल्यांचे रहस्य काय आहे?

१०. जामी मशीद, पाटण, गुजरात

गुजरातच्या पाटण जिल्ह्यातील जामी मशीदही वादग्रस्त आहे. ही मशीद रुद्र महालय मंदिर पाडून बांधण्यात आल्याचा आरोप आहे. काही इतिहासकारांच्या मते, “रुद्र महालय मंदिर १२ व्या शतकात गुजरातचे राजे सिद्धराज जयसिंह यांनी बांधलं होतं. १४१०-१४४४ दरम्यान अलाउद्दीन खिलजीने हा मंदिर परिसर उद्ध्वस्त केला होता. नंतर अहमद शाहने (पहिला) मंदिराचे काही भागांना जामी मशिदीत बदललं.”