जगभरात लेखक, पत्रकार, संपादकांची फसवणूक झाल्याची अनेक प्रकरणं उघड झाली आहेत. भारतातील काही पत्रकारांचीही अशीच फसवणूक झाल्या घटनाही घडल्यात. मात्र, अमेरिकेची तपास संस्था एफबीआयला (FBI) आंतरराष्ट्रीय पातळीवर फसवणुकीचं रॅकेट चालवणाऱ्या एका २९ वर्षीय आरोपीला अटक करण्यात यश आलं आहे. यामुळे या संपूर्ण फसवणुकीच्या प्रकारांची ‘मोडस ओपरेंडी’ उघड झालीय. चला तर समजून घेऊयात काय आहे हे प्रकरण आणि त्यातील घडामोडी.

या प्रकरणातील आरोपीचं नाव फिलिप्पो बर्नार्डिनो (Filippo Bernardini) असून त्याला न्यू यार्कमधील जॉन एफ केनडी विमानतळावर अटक करण्यात आलं. त्याने स्वतःला प्रकाशक, हस्तक असल्याचं भासवत शेकडो लेखक, पत्रकार, संपादकांना गंडा घातलाय. यात अगदी जागतिक पातळीवरील पुलित्झर पुरस्कार विजेत्या व्यक्तींचाही समावेश आहे.

Sudhir Mungantiwar, Sudhir Mungantiwar Nagpur,
काँग्रेसची सध्याची अवस्था ‘चाची ४२०’ प्रमाणे, मुनगंटीवार यांची टीका
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
rape college student in Odisha
Rape On Girl : महाविद्यालयीन तरुणीवर बलात्कार, कॅफेतला व्हिडीओ दाखवून ब्लॅकमेलिंग, सहा नराधम अटकेत
aishwarya narkar slams netizen who writes bad comments
“आई आणि बायकोवरून…”, आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्याला ऐश्वर्या नारकरांनी सुनावलं; म्हणाल्या, “महिलांचा…”
life insurance fraud pune marathi news
पुणे: आयुर्विमा पॉलिसीच्या नावाखाली तरुणीची १३ लाखांची फसवणूक
Haryana for atm robbery pune
पुणे: एटीएम फोडून रोकड चोरणारी हरयाणातील टोळी गजाआड, स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरूर पोलिसांची कामगिरी
Solapur district bank scam
सोलापूर जिल्हा बँक घोटाळ्याची ३२ तत्कालीन संचालकांवर जबाबदारी, ११०३ कोटी रुपये गैरव्यवहार प्रकरण, ऐन निवडणुकीत निर्णयाने खळबळ
Muslim father card printed for hindu people at daughter wedding faces of hindu lord in amethi goes viral
PHOTO: मुस्लिम बापाकडून लेकीच्या लग्नात हिंदूंसाठी खास निमंत्रण; पत्रिकेवरील एका गोष्टीनं वेधलं लक्ष; सर्वत्र कौतुकाचा वर्षाव

या फसवणुकीला बळी पडून अनेक प्रसिद्ध लेखकांनी आपली अप्रकाशित पुस्तकं देखील या फसवणूक करणाऱ्यांना पाठवली. यात पुलित्झर पुरस्कार विजेत्या लेखकांचाही समावेश आहे.

प्रसिद्ध लेखक आणि संपादक या फसवणुकीच्या जाळ्यात कसे सापडले?

ज्या प्रसिद्ध लेखक, पत्रकार आणि संपादकांची फसवणूक झाली त्यांना प्रकाशक असल्याचं भासवत इमेल करण्यात आले. याच मेलच्या माध्यमांतून फसवणूक झाली. इटालियन नागरिक असलेला आरोपी बर्नार्डिनी ब्रिटनची प्रकाशन संस्था सीमोन अँड सूस्टरमध्ये काम करत होता. तो पुस्तकांच्या घोषणा आणि प्रकाशनावर लक्ष ठेवून असायचा.

याशिवाय प्रकाशन व्यवसायात स्वतःच्या ओळखीपाळखींचा उपयोग करून आरोपी आपला संभाव्य सावज निवडायचा. तो लेखक, संपादकांना प्रभावित करण्यासाठी प्रकाशन व्यवसायातील खऱ्याखुऱ्या माणसांच्या नावाने इमेल तयार करून पाठवायचा.

यासाठी तो अशा प्रसिद्ध लोकांच्या ईमेलमध्ये अगदी छोटे बदल करून वापरायचा. उदाहरणार्थ t च्या जागेवर f चा वापर किंवा q च्या जागेवर g आणि m च्या जागेवर r किंवा n चा वापर केला जात होता. यामुळे या फसवणुकीला बळी पडलेल्या व्यक्तींना ईमेलमधील हे सुक्ष्म बदल टिपता आले नाही आणि ते फसवणुकीचे बळी ठरले. आरोपीने या कामासाठी प्रकाशन संस्था किंवा त्यातील उच्चपदस्थ व्यक्ती यांच्या नावाच्या १६० बनावट इंटरनेट डोमेनची नोंदणी केली.

कोणत्या प्रसिद्ध व्यक्तींची फसवणूक झाली?

फसवणूक झालेल्या व्यक्तींमध्ये जगभरातील अनेक दिग्गजांचा समावेश आहे. यातील मोठी नावं म्हणजे मार्गारेट अटवूड (Margaret Atwood), सॅली रूनी (Sally Rooney), किली राईड (Kiley Reid as) आणि इतर अनेकांचा समावेश आहे.

हेही वाचा : लोकसत्ता विश्लेषण : नोव्हाक जोकोविचचे ‘कोर्ट’मार्शल!

पुस्तकांचे कच्चे मसुदे चोरीचा नेमका उद्देश काय?

बनावट पुस्तकं (Pirated books) आणि चित्रपटांचा डार्क वेबवर वेगळा बाजार आहे. सायबर गुन्हेगार नियमितपणे असं चोरीचं साहित्य, पटकथा, चित्रपट वेगवेगळ्या डार्क वेब साईटवर टाकून विकतात आणि नफा कमावतात.