– विद्याधर कुलकर्णी

पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये मानाची पाच मंडळे लक्ष्मी रस्त्याने बेलबाग चौकातून मार्गस्थ झाल्यानंतरच शहरातील अन्य मंडळांचे गणपती विसर्जनासाठी मार्गक्रमण करतात. ही प्रथा सार्वजनिक गणेशोत्सवाचे प्रवर्तक लोकमान्य टिळक यांनी १८९३मध्ये सुरू केली. गेली १३० वर्षे म्हणजे १३ दशके ही प्रथा अव्याहतपणे सुरू आहे. लोकमान्यांनी मोठ्या दूरदृष्टीने मानाचा निर्णय घेतला होता. मात्र, प्रथा म्हणजे कायदा नाही या मुद्द्यावर आक्षेप घेण्यात आला आहे. त्यामुळे मान की कायद्यापुढे सारे समान हा कळीचा मुद्दा उपस्थित झाला आहे. गणेशोत्सव बुधवारपासून (३१ ऑगस्ट) सुरू झाला. त्यातच पुण्यातील गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीच्या वेळी उफाळून येणारा भेदभावाचा आणि पोलिसी निर्णयातील विषमतेचा मुद्दा थेट उच्च न्यायालयात पोहोचला आहे.

ayurvedic experts to hold seminar on garbhavigyan event at iit bombay
आयआयटी प्रांगणात ‘गर्भविज्ञान’ धडे; उपक्रमाला विद्यार्थ्यांकडून विरोध
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Farmers in Washim district are cultivating chia crop along with traditional crops
वाशीम जिल्ह्यात पीक लागवडीच्या नव्या वाटा; ‘या’ पिकाला मिळतोय चांगला भाव
Beed Sarpanch Murder Case Prime Accused Valmik Karad Cast
अग्रलेख : कूच बिहार!
Artificial Intelligence, Sugarcane Farming, Lokshiwar ,
लोकशिवार : ऊस शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता
portfolio, investment , Alphaportfolio Concept ,
चला अल्फापोर्टफोलिओ तयार करूया
NG Acharya Udyan, Butterfly Festival, Mumbai,
मुंबई : एन. जी. आचार्य उद्यानात फुलपाखरू महोत्सवाला सुरुवात
Need to reconsider the guaranteed price policy
हमी भाव धोरणाच्या पुनर्विचाराची गरज

काय आहेत विसर्जन मिरवणुकीची वैशिष्ट्ये?

पुण्याच्या वैभवशाली गणेशोत्सवाची ख्याती केवळ महाराष्ट्रात किंवा देशातच नाही तर जगभरात आहे. परदेशातून अनेक भाविक केवळ गणेशोत्सवामध्येच मानाच्या गणपतींसह महत्त्वाच्या गणपतींचे दर्शन घेण्यासाठी पुण्यात येतात. वीस तासांहून अधिक काळ चालणारी गणेश विसर्जन मिरवणूकही देखणी आणि डोळ्यांचे पारणे फेडणारी असते. छत्र-चामर, अब्दागिरी, पारंपरिक पेहरावातील अश्वारूढ युवक-युवतींची पथके, सर्वांना आकर्षित करणारा ढोल-ताशा पथकांचा तालाचा खेळ ही पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीची आगळीवेगळी वैशिष्ट्ये आहेत. त्यामुळे पुण्याची विसर्जन मिरवणूक हा सर्वांच्याच औत्सुक्याचा विषय असतो.

काय आहे मिरवणुकीचा मान ?

विसर्जन मिरवणुकीच्या वेळी लक्ष्मी रस्त्यावरून प्रथम मानाची पाच गणपती मंडळे गेल्यानंतरच अन्य गणेश मंडळे मार्गस्थ होतात, असा वर्षानुवर्षांचा प्रघात आहे. पुण्यनगरीचे ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंडळ आणि ग्रामदेवता श्री तांबडी जाेगेश्वरी मंडळ ही दोन मंडळे मार्गस्थ झाल्यानंतर श्री गुरुजी तालीम मंडळ आणि तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट या मंडळांचे गणपती मार्गस्थ होतात. केसरीवाडा गणेशोत्सव हा मानाचा पाचवा गणपती मार्गस्थ झाल्यानंतर अन्य मंडळांचे गणपती मिरवणुकीमध्ये सहभागी होतात.

सार्वजनिक गणेशोत्सवाला पुण्यात सुरुवात झाल्यानंतर विसर्जन मिरवणुकीत प्रथम कोण, असा वाद निर्माण झाला होता. तेव्हा लोकमान्य टिळकांनी सर्वांबरोबर चर्चा करून मानाच्या पाच मंडळांची नावे नक्की केली. ही प्रथा १३० वर्षे अबाधित आहे. परंतु, प्रथा म्हणजे कायदा नाही, अशी भूमिका घेऊन अन्य गणपती मंडळांना विसर्जनासाठी लक्ष्मी रस्ता वापरण्यावर असणारी बंधने म्हणजे बेकायदेशीर आणि संविधानातील कलम १९ अ नुसार असलेल्या संचार स्वातंत्र्याचे उल्लंघन आहे, असा आक्षेप बढाई समाज ट्रस्टने घेतला आहे. या ट्रस्टतर्फे सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जातो. ट्रस्टचे अध्यक्ष शैलेश बढाई यांनी ॲड. असीम सरोदे यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

काय आहेत आक्षेप?

पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकांमध्ये शहरातील मानाच्या गणपती मंडळांनाच प्रशासन प्राधान्य देते. अनेकदा दरवर्षी विनंती करूनही पोलीस ऐकून घेत नाहीत. मानाच्या पाच गणपती मंडळांच्या कार्यकर्त्यांकडून शहरातील अन्य मंडळांना तुच्छतेची वागणूक देण्यात येते. मानाचे गणपती मिरवणूक पूर्ण करायला खूप वेळ लावतात. मागून येणाऱ्या गणपती मंडळांवर पोलीस गुन्हे दाखल करतात, अशा तक्रारी याचिकेतून मांडण्यात आल्या आहेत. या आक्षेपाला अनेक गणपती मंडळांचा पाठिंबा असल्याचा दावा शैलेश बढाई यांनी केला आहे.

याचिकेतील महत्त्वाचे मुद्दे…

पुण्याचे पोलीस आयुक्त यांच्यासह श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, तांबडी जोगेश्वरी गणपती, गुरुजी तालीम गणपती, तुळशीबाग गणपती, केसरीवाडा गणपती या मानाच्या पाच गणपती मंडळांना याचिकेतून प्रतिवादी करण्यात आले आहे. मानाच्या या पाच गणपती मंडळांना लक्ष्मी रस्त्यावरून निघणाऱ्या विसर्जन मिरवणुकीच्या वेळी प्राधान्य दिले जाते. कायद्याच्या कोणत्या तरतुदीनुसार या पाच मंडळांना हा प्रथम मिरवणूक काढण्याचा अधिकार आहे, अशी विचारणा माजी नगरसेवक आणि खडकमाळ आळी गणेशोत्सवाचे प्रमुख संजय बालगुडे यांनी माहिती अधिकार कायद्यानुसार पोलीस आयुक्त कार्यालयाकडे केली होती. याबाबत कोणताही लेखी कायदा किंवा नियम नसल्याचे कळविण्यात आले असल्याचा उल्लेख याचिकेत करण्यात आलेला आहे.

याचिकेत मागण्या कोणत्या ?

मानाच्या गणपतींच्या आधी ज्या मंडळांना लक्ष्मी रस्त्यावरून मिरवणूक काढायची असेल त्यांना पोलीस आयुक्तांनी परवानगी द्यावी. एवढेच नव्हे तर, या मंडळांना मार्गस्थ होण्यासाठीची सोय उपलब्ध करून द्यावी. मानाच्या गणपती मंडळांनी किती वेळात विसर्जन मिरवणूक पूर्ण करावी याबाबत स्पष्ट वेळेची मर्यादा घालून द्यावी. भेदभाव आणि विषमता निर्माण करणाऱ्या आणि जोपासणाऱ्या रूढी-परंपरा रद्द करण्यात येत असल्याचे आदेश उच्च न्यायालयाने पारित करावेत. एवढेच नाही तर, भविष्यात कोणत्याच विसर्जन मिरवणुकांमध्ये कधीही विषमता असू नये. सर्व मंडळांनी ध्वनिप्रदूषण नियम आणि आवाजाच्या मर्यादांचे काटेकोर पालन करावे, अशा मागण्या याचिकेत करण्यात आल्या आहेत.

हेही वाचा : गणेशोत्सवासाठी मुंबई पोलीस सज्ज; कर्मचाऱ्यांच्या सुट्टय़ा रद्द; गर्दीच्या ठिकाणी ड्रोनचा वापर

शेवटचे मानाचे गणपती कोणते?

बरीच वर्षे विसर्जन मिरवणुकीत शेवटी विसर्जन होण्याचा मान श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती आणि अखिल मंडई मंडळ यांचा असे. या मंडळांचे मिरवणुकीतील देखणे रथ पाहण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी होते. जसजशी मिरवणूक संपण्याची वेळ लांबत जाऊ लागली, तसे या तिन्ही मंडळांनी आपला हा शेवटी विसर्जित होण्याचा मान नाकारून मिरवणुकीच्या मध्यातच मिरवणुकीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आणि ही प्रथा बंद पडली.

Story img Loader