सध्या महागाईनं जगभरातील अर्थव्यवस्थांना जेरीस आणले असून महागाईच्या संदर्भातील तज्ज्ञांची निरीक्षणे चर्चेत आहेत. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हचे माजी अध्यक्ष अॅलन ग्रीनस्पॅन यांनी महागाई संदर्भात केलेले वक्तव्य नुकतेच सीएनएनने उद्धृत केले असून सीएनएने कुठल्या कुठल्या गोष्टींमध्ये महागाईची प्रतिबिंबे उमटतात असा एक लेखच प्रकाशित केला आहे. ग्रीनस्पॅन यांनी चक्क पुरुषांच्या अंतर्वस्त्रांच्या विक्रीचा संबंध महागाईशी जोडला असून त्यांचे हे निरीक्षण सध्या चांगलेच चर्चेत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पुरुषांच्या अंतर्वस्त्राच्या खपाच्या आकड्यांचा संबंध महागाईशी असून तो एक अभ्यासाचा विषय असल्याचे ग्रीनस्पॅन यांनी एका मुलाखतीत सांगितले होते. ही संगती जरा विचित्रच वाटेल, पण अभ्यासक बाजारातील चढ उतारांचा अभ्यास करताना अशा विविध गोष्टींकडे कसे बघतात हा नक्कीच कुतुहलाचा विषय आहे.

एनपीआरचे पत्रकार रॉबर्ट क्रलविच यांना दिलेल्या एका मुलाखतीत ग्रीनस्पॅन म्हणाले होते, “पुरुषांची अंडरपँट हा सगळ्यात जास्त खासगी वस्त्राचा प्रकार आहे. कारण लॉकर रुममधले सहकारी सोडले, तर आणखी कुणाच्याही दृष्टीस पुरुषाची अंडरपँट येत नाही. अंडरपँट्सचा खप हा साधारणपणे स्थिर असतो. परंतु, ज्यावेळी अंडरपँट्सची विक्री घटते, त्यावेळी याचा अर्थ असा असतो की माणसांना आर्थिक फटका बसत असून ते जुन्या अंडरपँट्स टाकून नवीन घेण्यास उत्सुक नसतात.”

‘पुरुषांच्या अंडरपँट्सचा निर्देशांक’ ग्रीनस्पॅन यांच्या दाव्यात तथ्य असल्याचे दर्शवतो. अमेरिकेमध्ये २००७ ते २००९ या आर्थिक मंदीच्या काळात पुरुषांच्या अंडरपँट्सच्या विक्रीत चांगलीच घट झाली होती आणि २०१० मध्ये अर्थव्यवस्था रुळावर आल्यावर त्यात पुन्हा वाढ झाली. अभ्यासक नेहमीच अशा शुभ वा अशुभ संकेतांच्या शोधात असतात जे अर्थव्यवस्थेच्या तेजीची वा मंदीची लक्षणे सांगू शकतील. जसं की, समुद्रसपाटीपासून जनावरं डोंगर व टेकड्यांवर जायला लागली की त्सुनामी येण्याचे संकेत मिळतात. हाच नियम अर्थशास्त्रालाही लागू होतो असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

त्याचमुळे अल्पमुदतीच्या रोख्यांवरील व्याजदर दीर्घ मुदतीच्या रोख्यांवरील व्याजदरांपेक्षा जास्त होत असल्याकडे अर्थतज्ज्ञ याला मंदीची टांगती तलवार अशा दृष्टीने बघतात. १९७० पासून प्रत्येक आर्थिक मंदीच्या आधी व्याजदरांमध्ये हा कल दिसून आला आहे.

अर्थात, प्रत्येकवेळी असे रुक्ष व तांत्रिकच नाही, तर अंडरपँट्सप्रमाणे गमतीशीर मापकेही असतात, ज्याकडे अभ्यासकांचं लक्ष असतं. सीएनएननं अमेरिकेतील अशीच आणखीही काही उदाहरणं दिली आहेत.

गगनचुंबी इमारतींमध्ये वाढ

अँड्र्यू लॉरेन्स या रीअल इस्टेटमधील अॅनालिस्टनं १९९९ मध्ये स्काय स्क्रॅपर इंडेक्स तयार केला. लॉरेन्स यांचं म्हणणं होतं, ज्या ज्या वेळी गगनचुंबी इमारती बांधायची स्पर्धा होते त्या त्यावेळी अर्थव्यवस्थेचा फुगा फुटण्याकडे वाटचाल होत असते. ज्यावेळी सर्वात उंच इमारत असा नवा विक्रम प्रस्थापित केला जातो, त्यावेळी अर्थव्यवस्थेची मंदी तर अवतरायलाच लागते. एका मुलाखतीत लॉरेन्स यांनी सांगितले की, आम्ही १८०० सालापासून काय घडलं याचा मागोवा घेतलाय आणि जगभरातील सर्वात उंच इमारतीचं बांधकाम पूर्ण होणं व पाठोपाठ अर्थव्यवस्थेत मंदी येणं असं जुळून आल्याचं आम्हाला आढळलंय. दी एम्पायर इस्टेट ही १९३० मधली सर्वात उंच इमारत बांधून झाली आणि ग्रेट डिप्रेशन सुरू झालं. सीअर टॉवर्स व वर्ल्ड ट्रेड सेंटर्सचे ट्विन टॉवर्स १९७० साली बांधून झाले आणि धड वाढ नाही धड घट नाही अशा स्टॅगफ्लेशनमध्ये अर्थव्यवस्था अडकली. ऑक्टोबर २००९ मध्ये एम्मारनं दुबईतील बुर्ज खलिफाचं बाह्यांग पूर्ण केलं आणि दोनच महिन्यात दुबई सरकारवर जवळ जवळ दिवाळखोरीची वेळ आली, एका मुलाखतीत लॉरेन्स यांनी ही उदाहरणं दिली आहेत.

स्वस्त दरात कर्जे मिळत असतील, आवश्यकतेपेक्षा जास्त गुंतवणूक केली जात असेल आणि घरांचे अथवा शेअर्सचे भाव वाढतच जाणार अशी अवास्तव अपेक्षा असेल तर हा काळ अर्थव्यवस्थेच्या वाढीच्या उच्च स्थानावर असल्याचे निदर्शक आहे. त्यामुळे अशी स्थिती असेल तर अर्थव्यवस्थेची घसरण होणार असं लॉरेन्ससारखे तज्ज्ञ सांगतात. सध्या उंचात उंच टॉवर बांधण्याचे अनेक प्रकल्प स्थगितावस्थेत आहेत. पण, जेफ बेझोस, इलॉन मस्क व रिचर्ड ब्रॅन्सन अंतराळात कोण आधी सफर करणार या स्पर्धेत आहेत.

लिपस्टिक इंडेक्स

लिओनॉर्ड लॉडर यांनी २००१ च्या अर्थव्यवस्थेच्या गर्तेत असाच लिपस्टिक इंडेक्स केला. त्यांचं असं म्हणणं होतं की अर्थव्यवस्थेची स्थिती व लिपस्टिकचा खप एकमेकांशी व्यस्त असतात. म्हणजे जेव्हा अर्थव्यवस्था खालावते तेव्हा लिपस्टिकचा खप वाढतो व जेव्हा अर्थव्यवस्था बाळसं धरते तेव्हा लिपस्टिकचा खप कमी होतो. त्यांचं असं म्हणणं होतं, जेव्हा अर्थव्यवस्था खालावत असते तेव्हा महिला महागड्या सौंदर्य प्रसाधनांवरील खर्च एकदम कमी करतात व लिपस्टिकसारख्या स्वस्त गोष्टी मोठ्या प्रमाणावर विकत घेतात. जेव्हा अर्थव्यवस्था सुधारते तेव्हा महिला पुन्हा महागड्या गोष्टी विकत घ्यायला लागतात. या दाव्याच्या पुष्टीसाठी त्यांनी लिपस्टिक इंडेक्सचं उदाहरण दिलं होतं.

२००१च्या मंदीच्या वेळी अमेरिकेतील लिपस्टिकचा खप ११ टक्क्यांनी वाढला तर ग्रेट डिप्रेशनच्या वेळी हा खप २५ टक्क्यांनी वाढल्याचे हा निर्देशांक सांगतो. आता करोनाच्या काळात लिपस्टिक इंडेक्सची जागा स्किनकेअरनं घेतली आहे हा ही एक गमतीचा भाग.

डेटिंग साईट्सचा अनुभव काय

आर्थिक आघाडीवर कुतरओढ त्यात एकाकी जीवन असेल तर काय होणार? या अंगानंही काहींनी अभ्यास केला असून अर्थव्यवस्थेची अधोगती होत असताना डेटिंग साईट्सची प्रगती होत असल्याचे दिसून आले आहे. २००९ च्या ग्रेट रिसेशनच्यावेळी मॅच या डेटिंग साईटनं विक्रमी महसूल नोंदवला होता. २०२० मध्ये करोना परम उंचीवर असतानाही या कंपनीच्या शेअरच्या भावात तब्बल १४१ टक्क्यांची वाढ झाली.

एका तज्ज्ञानं म्हटलंय, बेरोजगार असताना करणार काय, लोक कमी खर्चाच्या ऑनलाइन डेटिंगमध्ये जीव रमवतात. जर हा निर्देशांक खरोखर अर्थव्यवस्थेची दिशा दर्शवत असेल तर चिंता करावी अशीच स्थिती आहे. मॅचची स्पर्धक असलेल्या बंबलनं गेल्या तिमाहीमध्ये अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी नोंदवली असून अॅनालिस्टनी हा शेअर खरेदी करावा असा सल्ला दिला असून शेअरचा भाव २२ टक्क्यांनी वधारला होता.

हेही वाचा : विश्लेषण : केरळ सरकारची ई-टॅक्सी सेवा कशी आहे? महाराष्ट्रात हे शक्य होईल का?

युद्धस्य कथा रम्य असं म्हणतात, त्याच प्रमाणे अर्थव्यवस्था घसरत असताना, सर्वसामान्य नागरिक महिन्याच्या आर्थिक गणिताची जुळवाजुळव करताना मेताकुटीला आलेले असताना अशा आगळ्या वेगळ्या अभ्यासांकडे कुतुहलानं बघणं हा एक विरंगुळाच.