लोकसभेचे सभापती ओम बिरला ६५ व्या कॉमनवेल्थ संसदीय संमेलनासाठी कॅनडात आहेत. तेथून ते मेक्सिकोला जाऊन स्वामी विवेकानंद आणि महाराष्ट्रातील वर्ध्यात जन्मलेले स्वातंत्र्यसैनिक व कृषीतज्ज्ञ पांडुरंग खानखोजे यांच्या पुतळ्यांचं अनावरण करणार आहेत. यानिमित्ताने खानखोजे यांचा मेक्सिकोशी नेमका काय संबंध? पांडुरंग खानखोजे यांचा मेक्सिकोत पुतळा उभारण्यामागील कारणं काय? या ठिकाणी त्यांनी केलेलं काम काय? अशा अनेक प्रश्नांचा हा आढावा…

पांडुरंग खानखोजे हे भारतीय स्वातंत्र्यासाठी आग्रह असलेल्या आणि परदेशातून काम करणाऱ्या गदर पार्टीचे सदस्य होते. परदेशातील भारतीय नागरिकांनी भारतीय स्वातंत्र्याच्या उद्देशाने गदर पार्टीच्या माध्यमातून ब्रिटिशांविरोधात अनेक लढे दिले होते. खानखोजे यांच्या याच कामातील सहभागामुळे त्यांनी मेक्सिकोत आश्रय घ्यावा लागला होता. पुढे जाऊन याच ठिकाणी त्यांनी मेक्सिकोतील भारतीयांसह मेक्सिकन कामगारांसोबत काम केलं. केवळ भारतीय स्वातंत्र्ययुद्धातच नाही, तर अगदी मेक्सिकोच्या हरित क्रांतीतही त्यांचा मोलाचा वाटा आहे.

evm machines scam loksatta news
मारकडवाडी ठरतेय राज्यातील राजकीय संघर्षाचे केंद्र
Rohit Patil
Rohit Patil : “अमृताहुनी गोड…”; विधानसभेत रोहित पाटलांचं…
Gashmeer Mahajani
“…तरच मूल होऊ द्या”, पालकत्वाविषयी स्पष्टच बोलला गश्मीर महाजनी; म्हणाला, “तुम्ही आई-वडील म्हणून कैद…”
There should be no political interference in municipal programs says MLA Sneha Dubey Pandit in vasai
आमदार स्नेहा दुबे पंडित यांचा बविआला पहिला धक्का; “कार्यक्रमात राजकीय हस्तक्षेप नको”, पालिका अधिकार्‍यांना ताकीद
Congress and farmers organizations in Rajura need new leadership like arun dhote and adv deepak chatap
राजुऱ्यात काँग्रेस, शेतकरी संघटनेला नव्या नेतृत्वाची गरज! अरुण धोटे, ॲड. दीपक चटप यांची नावे चर्चेत
Rahul Gandhi accuses PM of Adani case
अदानीप्रकरणी राहुल गांधी यांचा पंतप्रधानांवर आरोप
Maharashtra Economic Production Mumbai FinancialCommercial Capital  Economy
वित्तीय चष्म्यातून महाराष्ट्राचा कौल…
rahul gandhi dual citizenship
राहुल गांधींकडे ब्रिटनचे नागरिकत्व आहे का? दुहेरी नागरिकत्व म्हणजे काय? भारतात त्याविषयीचे नियम काय?

कोण आहेत पांडुरंग खानखोजे?

पांडुरंग खानखोजे यांचा जन्म १९ व्या शतकात महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यात झाला. विद्यार्थी दशेपासूनच खानखोजे फ्रेंच राज्यक्रांती आणि अमेरिकेच्या स्वातंत्र्यलढ्याचे खंदे समर्थक होते. पुढे त्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी क्रांतीच्या विविध पद्धती आणि सैन्य प्रशिक्षण घेण्यासाठी परदेशात जाण्याचा निर्णय घेतला. याच काळात पांडुरंग खानखोजे यांच्या सरकारविरोधातील हालचालींमुळे ब्रिटिशांनाही त्यांचा संशय यायला लागला.

खानखोजे यांनी भारत सोडण्याआधी स्वातंत्र्यसैनिक बाळ गंगाधर टिळक यांची भेट घेतली. या भेटीत टिळकांनी खानखोजे यांना पाश्चिमात्य साम्राज्यवादी शक्तींच्या विरोधातील जपानमध्ये जाण्याचा सल्ला दिला. यानंतर पांडुरंग खानखोजे यांनी जपान आणि चीनमधील राष्ट्रवादी लोकांसोबत काही काळ घालवला आणि ते अमेरिकेत गेले. तेथे त्यांनी एका कृषी महाविद्यालयात प्रवेश घेतला. मात्र, एकाच वर्षानंतर त्यांनी भारत सोडण्याचा आपला हेतू पूर्ण करत कॅलिफोर्नियाच्या मिलिटरी अकॅडमीत प्रवेश घेतला.

पांडुरंग खानखोजे यांचा भारतीय स्वातंत्र्यलढ्याशी नेमका संबंध काय?

पांडुरंग खानखोजे भारतीय स्वातंत्र्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या गदर पार्टीचे संस्थापक सदस्य आहेत. परदेशात असलेल्या भारतीयांनी १९१४ मध्ये गदर पार्टीची स्थापना केली होती. या संघटनेत बहुंताश लोक परदेशात असलेले पंजाबी नागरिक होते. ब्रिटिशांविरोधात लढा देण्यासाठी ते सर्व एकत्र आले होते.

अमेरिकेत असताना खानखोजे स्टॅनफोर्ड विद्यापीठात प्राध्यापक असलेले भारतीय विचारवंत लाल हरदयाल यांनाही भेटले. हरदयाल भारतीय स्वातंत्र्यासाठी एक प्रचार मोहीम सुरू केली होती. यानुसार, ते अमेरिकेत भारतीय भाषांमधून वर्तमानपत्र छापायचे. त्यात देशभक्तीवरील लेख आणि गाणी प्रकाशित केले जायचे. याच वैचारिक मंथनातून पुढे गदर पार्टीची स्थापना झाली, असं खानखोजे यांची मुलगी सावित्री सावनी यांनी आत्मचरित्रात लिहिलं.

पांडुरंग खानखोजे मेक्सिकोत कसे आले?

अमेरिकेत मिलिटरी अकॅडमीत खानखोजे यांची भेट अनेक मेक्सिकन लोकांशी झाली. मेक्सिकोत १९१० मध्ये क्रांती झाली होती आणि तेथील हुकुमशाही राजवट उलथवून टाकण्यात आली होती. मेक्सिकोच्या क्रांतीतून खानखोजे यांना प्रेरणा मिळाली. भारतीय स्वातंत्र्यासाठी खानखोजे यांनी अमेरिकेतील शेतांवर काम करणाऱ्या भारतीय कामगारांच्याही भेटी घेतल्या. तेथेही त्यांना मेक्सिकन कामगार भेटले. यानंतर खानखोजे यांनी याच भारतीय कामगारांच्या मदतीने भारतात ब्रिटिशांविरोधात लष्करी कारवाईचं नियोजन केलं. मात्र, पहिल्या महायुद्धामुळे त्यांना ही मोहीम थांबवावी लागली.

यानंतर खानखोजे पॅरिसमधील भिकाजी कामा यांना भेटले आणि नंतर ते भारतीय स्वातंत्र्याला पाठिंबा मिळवण्यासाठी रशियात व्लादिमीर लेनिन यांना भेटले. यावेळी खानखोजे यांना युरोपमधून भारतात पाठवण्यासाठी स्थानिक प्रशासनाकडून हालचाली सुरू झाल्या. त्यामुळे त्यांनी मेक्सिकोत आश्रय घेतला.

हेही वाचा : विश्लेषण : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ताफ्यात समाविष्ट होणाऱ्या भारतीय प्रजातीच्या ‘मुधोळ हाऊंड’ कुत्र्याचे वैशिष्ट्य काय?

मेक्सिकन क्रांतीकाऱ्यांशी मैत्री असल्याने पुढे खानखोजे यांची चिपिंगो येथील नॅशनल स्कुल ऑफ अॅग्रीकल्चर येथे प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाली. याच ठिकाणी खानखोजेंनी मका, गहु, दाळी आणि रबर यावर संशोधन केलं. याच संशोधनातून त्यांनी रशियात दुष्काळी परिस्थितही तग धरू शकेल असे वाण शोधले. पुढे याच प्रयत्नातून मेक्सिकोत हरित क्रांती झाली.

विशेष म्हणजे नंतरच्या काळात खानखोजे यांचे हेच गव्हाचे वाण अमेरिकेचे कृषीतज्ज्ञ नॉर्मन बारलॉग यांनी भारतात पंजाबमध्ये आणले. नॉर्मन बारलॉग यांनाच भारतीय हरित क्रांतीचे जनक म्हटलं जातं.

Story img Loader