इंग्लंडने ऐतिहासिक कामगिरी करत पाकिस्तानला अंतिम फेरीत पराभूत केलं आणि टी-२० विश्वचषक २०२२ जिंकून वनडे पाठोपाठ टी-२० क्रिकेटमध्येही आपलं वर्चस्व सिद्ध केले. यानंतर आनंद साजरा करताना मंचावर शॅम्पेन बाटल्या उघडण्याआधी मुस्लीमधर्मीय आदिल रशीद आणि मोईन अली मंचावरून खाली उतरले. त्याच्या या कृतीनंतर मुस्लीम धर्मात दारू वर्ज्य असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर इस्लाममध्ये दारू का ‘हराम’ आहे? कुराणमध्ये काय म्हटलं आहे? आणि मोईन आणि रशीद मंचावरून खाली का उतरले? याचा हा आढावा…

इंग्लंडच्या विजयानंतर जल्लोष करताना मंचावर नेमकं काय घडलं?

विश्वचषक विजयानंतर जल्लोष करताना कर्णधार जोस बटलरच्या हातातील शॅम्पेनची बाटली उघडण्याआधी बटलरने सर्वांना थांबवले आणि आदिल रशीद आणि मोईन अलीला शॅम्पेन समारंभापूर्वी बाजूला होण्यासाठी वेळ दिला.बटलरने आपल्या सहकाऱ्यांच्या इच्छेचा आदर करत प्रथम संपूर्ण संघासोबत एक फोटो क्लिक करण्याचा निर्णय घेतला. आणि नंतर त्यांना शॅम्पेन समारंभाची आठवण करून दिली. टीमचे इतर सदस्य शॅम्पेनच्या बाटल्या उघडून आनंद साजरा करत असताना रशीद आणि मोईन निघून बाजूला निघून गेले.

Shahid Afriadi breaks silence on relationship rumours with Sonali Bendre
सोनाली बेंद्रेबरोबरच्या अफेअरबद्दल विचारताच पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी म्हणाला, “आता आम्ही…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
challenges in front of Syria
सीरियातील आव्हाने संपणार कशी?
Zeenat Aman
‘डॉन’ नाही, तर ‘या’ चित्रपटात दिसणार होतं ‘खइके पान बनारस वाला’ गाणं पण…, झीनत अमान यांनी सांगितलेला किस्सा चर्चेत
sambhal and jaunpur mosque row
Mosque Row in UP: मशिदीच्या जागेवर हिंदूंचे दावे; २०२७ त्या उत्तर प्रदेश विधासनभा निवडणुकांची तयारी?
kareena kapoor lal singh chadhha aamir khan
‘लाल सिंग चड्ढा’च्या अपयशाने निराश झाला होता आमिर खान, करीना कपूर खानने केला खुलासा; म्हणाली…
Shashank Arora
“आम्ही वाळवंटात भारत-पाकिस्तानच्या बॉर्डरजवळ…”, इरफान खान यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव सांगत अभिनेता म्हणाला, “मला पतंग…”
Syria, Abu Mohammad Al Jolani, dictatorship Syria,
विश्लेषण : जिहादीचा बनला प्रशासक… कोण आहे सीरियाचा नवा शासक अबू मोहम्मद अल जोलानी?

कुराण काय सांगतं?

कुराणमध्ये (४:४३) म्हटलं आहे, “श्रद्धेचा अंगिकार केलेल्या लोकांनो, नशेच्या अवस्थेत प्रार्थना करू नका. (नमाजमध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न करू नका). तुम्ही काय म्हणत आहात हे तुम्हाला कळत नाही, तोपर्यंत प्रार्थना करू नका.”

“चांगले-वाईट हे व्यक्तिसापेक्ष”

मुस्लीम धर्मात दारूवर नेमके काय निर्बंध आहेत यावर बोलताना मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शमसुद्दीन तांबोळी म्हणाले, “इस्लामपूर्व काळात जुगार, सावकारशाही, गुलामगिरी, नशा, अंधश्रद्धा, नरबळी, लुटमार, आणि महिलांचे शोषण मोठ्या प्रमाणात होते. या परिस्थितीत सामान्य माणसाचे आयुष्य होरपळून निघत असे. या काळातील या सामाजिक परिस्थितीमुळे मोहंमद अस्वस्थ होते. त्यांनी अनेक प्रकारचे सामाजिक कार्य केले. हे कार्य करण्यासाठी आणि अन्याय निवारणासाठी त्यांनी ” हिल्फ-अल-फझूल ” या नावाची सामाजिक संघटना स्थापन केली होती.”

“ही संघटना अराजकीय स्वरुपाची आणि सामुदायिक पध्दतीने न्याय प्रस्थापित करण्यासाठी होती. नंतर वयाच्या पंचविसाव्या वर्षी त्यांनी ४० वर्षे वय असणाऱ्या खदिजा यांच्याशी विवाह केला. मोहम्मद या विषयावर चिंतन करण्यासाठी ‘हीरा’ नावाच्या गुहेत जात असत. प्रेषित्व येण्यापूर्वीच त्यांना लोकांनी ‘अल-अमीन’ (सर्वात जास्त विश्वास पात्र) ही पदवी दिली होती,” अशी माहिती शमसुद्दीन तांबोळी यांनी दिली.

मोहम्मद यांच्या सामाजिक जाणिवा फार संवेदनशील होत्या आणि ते असामान्य बुद्धिमत्ता लाभलेले होते. ते नंतर इस्लामचे संस्थापक झाले. इस्लामचा पैगाम (संदेश) देणारे म्हणजे पैगंबर (संदेशवाहक). सामाजिक परिस्थिती आणि समस्या उद्भवेल तेव्हा त्यांना पैगाम येत असे. तो काळ दैवी शक्ती, चमत्कार अशा गोष्टींवर विश्वास ठेवणारा असल्याने “अल्लाहचा पैगाम” वही (देववाणी) होत होती, असंही तांबोळी यांनी नमूद केलं.

शमसुद्दीन तांबोळी पुढे म्हणतात, “समाजाला योग्य मार्ग दाखवण्यासाठी आणि त्यांचे कल्याण करण्यासाठी अशा ‘वही’ वेळोवेळी येत होत्या. अनेक समस्यांपैकी नशा करणे ही एक गंभीर समस्या होती. त्यामुळे ‘नशा करणे हे हराम असल्याची’ वही आली. याच प्रमाणे ‘व्याज घेऊ नये’ वगैरे वह्या येत होत्या. सामान्य लोकांना नशेपासून दूर ठेवण्यासाठी आणि शुद्ध आचरण रहावे यासाठी या ‘वही’ उपयोगाच्या ठरल्या.”

“मुसलमान म्हणजे इस्लामवर श्रध्दा ठेवणारे अनुयायी. धर्माच्या आवरणाखाली सामाजिक सुधारणा घडवून आणणे शक्य होते. आजही धार्मिक माणूस आपली सज्जनता, धार्मिकता जपण्यासाठी नशा करत नाही. काही नशा करणारे आणि व्यसनाधीन झालेल्यांना अनेकवेळा ते नशामुक्त व्हावेत म्हणून तबलीग जमातीच्या इस्तेमामध्ये पाठवतात. यात अनेक व्यसनाधीन व्यसनमुक्त होतात. कट्टर मुस्लीम तसा व्यसनाधीन नसतो,” असं निरिक्षण तांबोळी यांनी मांडलं.

यावेळी त्यांनी पुण्यातील मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रातील निरिक्षणही नोंदवलं. तेथे अनेक मुस्लीम तरुण उपचारासाठी दाखल झाले होते. यात महिलांचाही सहभाग होता, असं ते सांगतात.

हेही वाचा : विश्लेषण : मद्यप्राशनाची सवय सर्वात धोकादायक का आहे? जाणून घ्या

तांबोळी पुढे म्हणाले, “अनेक मुस्लीम राष्ट्रात पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी किंवा त्यांची सोय व्हावी म्हणून विविध प्रकारचे मद्य उपलब्ध असते. बॅरिस्टर जीना तर विदेशी मद्याचे चाहते होते. हाच प्रकार भारतात राज्यकर्ते असलेल्या बादशहाच्या बाबतीत दिसून येतो. ते मद्यपान करीत असत. आज अफगाणिस्तान हा जगातील सर्वात कट्टर मुस्लीम देश समजला जातो. आता या देशाची ओळख तालीबान अशी आहे. तालीब म्हणजे विद्यार्थी. तालीबान म्हणजे इस्लामचे विद्यार्थी आणि खरे अनुयायी. परंतु हा देश ‘आफू’ पिकवणे आणि विक्री करण्यात जगात प्रथम क्रमांकावर आहे.”

“प्रत्येक धर्मात वाईटास शिक्षा आणि चांगले वागणाऱ्यांना पारितोषिक ठेवले आहे. मुस्लीम धर्मात चांगले वागणाऱ्यांना प्रलोभन म्हणून मृत्यूनंतर जन्नतमध्ये उत्तम दर्जाची दारू मिळेल असे सांगितले आहे,” असंही ते नमूद करतात.

दारुविषयी धर्म काय सांगतो आणि विज्ञान काय सांगतं यावरही शमसुद्दीन तांबोळी यांनी भाष्य केलं. तसेच वैज्ञानिक आणि तर्कसंगत विचार करण्यावर भर दिला. ते म्हणाले, “हे खरे आहे की, ‘दारू पिणे हे हराम आहे, धर्मविरोधी आहे’, अशी इस्लामची शिकवण आहे. अशी श्रद्धा असल्यामुळे लोक दारूपासून दूर राहतात. समाजावर धार्मिक विचारांचा प्रभाव असतो म्हणून त्याचा फायदा होतो. परंतु दारू पिणे हे आरोग्यासाठी अपायकारक आहे. त्यामुळे माणूस अविवेकी वर्तन करु शकतो. कुटुंबावर परिणाम होऊ शकतो, असा विचार करणे अधिक वैज्ञानिक आणि तर्कसंगत आहे.”

हेही वाचा : विश्लेषण : मुस्लीम समाजात मुलगी १५ वर्षांची असताना लग्न करता येतं? सर्वोच्च न्यायालयातील नेमकं प्रकरण काय?

“जवळपास सर्व धर्मांनी वाईट वर्तनात ज्या ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्यात दारू पिणे हेही वाईट मानले आहे. तशी शिकवण आहे. त्यामुळे समाजात सज्जनपणा वाढणे, माणूस सदाचारी होणे आणि गुन्हेगारी वर्तनास प्रतिबंध होणे हे दृश्य स्वरूपातील फायदेच आहेत. म्हणून इस्लामने ‘हराम’ ठरवले म्हणून जर कोणी दारूपासून दूर राहत असतील तर तेही स्वागतार्हच आहे. परंतु बुध्दी, तर्क आणि विवेकावर आधारित दारूपासून मुक्त राहण्याचा निर्णय अधिक स्वागतार्ह म्हणता येईल. शेवटी असे म्हणता येईल की, दारू कोणी, कधी आणि किती प्यावी किंवा पिऊ नये हा धार्मिक विचार कमी आणि व्यक्तिस्वातंत्र्याचा भाग जास्त आहे. कोणत्याही गोष्टींचा अतिरेक हे दुष्परिणाम करणारे ठरते,” असं शमसुद्दीन तांबोळी यांनी सांगितलं.

Story img Loader