डॉ. अक्षय देवरस (संशोधन शास्त्रज्ञ, नॅशनल सेंटर फॉर अॅटमॉस्फेरिक सायन्स अँड डिपार्टमेंट ऑफ मिटिरिऑलॉजी, रीडिंग युनिव्हर्सिटी, लंडन)
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
हवामानाचे अंदाज चुकल्यास शेती आणि त्यावर अवलंबून असणाऱ्या लोकांना त्याचा फटका बसतो. हे कमी करण्यासाठी हवामानाचा अचूक अंदाज लावणे आणि तो वेळीच लोकांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. त्यासाठीचा एक उपाय म्हणजे स्वयंघोषित हवामान-तज्ज्ञांना आवर घालणे..
हवामान अंदाज कसा देतात?
हवामानात वेगवेगळे घटक असतात जे सातत्याने विकसित होत असतात. वातावरणीय विज्ञान या विषयात बरीच जटिल समीकरणे आहेत, काही देशांतील ‘सुपर कम्प्युटर्स’ दररोज ही समीकरणे सोडवून हवामानाबद्दलची माहिती देतात. याचबरोबर डॉप्लर रडार आणि उपग्रहाचा उपयोग करून पुढील काही मिनिटे ते तास कशी स्थिती राहू शकते हा अंदाजदेखील बांधण्यात येतो.
हेही वाचा >>>विश्लेषण : ‘३५० पार’साठी भाजपला यंदा दक्षिणेचा हात? एक राज्य वगळता अन्यत्र लाभच?
अचूक अंदाजासाठी काय हवे?
हवामानाचा अचूक अंदाज देणे कठीण आणि आव्हानात्मक आहे. या क्षेत्रात काम करण्यासाठी प्रशिक्षण आणि अभ्यास आवश्यक आहे. हा अंदाज देण्यासाठी हवामानातले घटक कसे बदलतील याचा अंदाज बांधावा लागतो. याचबरोबर हवामान आणि भौतिकशास्त्र यांसारख्या विषयाचे मूलभूत आणि सखोल ज्ञान हवे. या विश्लेषणात थोडीही चूक झाली किंवा मुळात ‘सुपरकम्प्युटर्स’कडून आलेल्या माहितीत काही भिन्नता दिसली तर अंदाज चुकतो. म्हणूनच अंदाज बरोबर येण्यासाठी योग्य आणि प्रमाणित प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. त्यासाठी खूप मोठा कालावधी लागतो.
संकेतस्थळे आणि स्वयंघोषित अभ्यासकांचा सुळसुळाट का?
गेल्या १०-१५ वर्षांच्या तुलनेत हल्ली हवामानाचा अंदाज देणारी अनेक संकेतस्थळे आणि भ्रमणध्वनी उपयोजना (मोबाइल अॅप) नि:शुल्क उपलब्ध आहेत. तेथे पाऊस आणि तापमानासारख्या स्थितीचा अंदाज वर्तवलेला दिसतो. गेल्या पाच-सहा वर्षांपासून भारतात अनेक लोक हवामानाचा अंदाज वर्तवत आहेत. त्यासाठी ते यूटय़ूब, ट्विटर (एक्स), व्हॉट्सअॅप यासारख्या समाजमाध्यमांचा उपयोग करतात. यातील ९० टक्के मंडळी ही यासंदर्भातले प्रशिक्षण घेतलेली, अभ्यास केलेली तसेच प्रमाणित नसतात. यात प्रामुख्याने वकील, बँक, शेतकरी, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधीसुद्धा आहेत. यांतील अनेकांचा भौतिकशास्त्राशी फारसा संबंध आलेला नसतो. काही लोक आवड म्हणून तर काही पैसा आणि प्रसिद्धीसाठी हवामानाच्या क्षेत्रात शिरकाव करत आहेत. हवामान खात्याकडून येणाऱ्या अंदाजापूर्वीच हे अंदाज शेतकऱ्यांच्या हाती लागतात. ते देण्याची पद्धती आकर्षक असल्यामुळे शेतकरी त्यावर विश्वास ठेवतात. मात्र, हे अंदाज अर्धवट आणि बरेचदा चुकीचे असल्यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण होते. यामुळे शेतकऱ्यांचे पुढचे गणित बिघडते आणि त्यांना नुकसानीला सामोरे जावे लागते.
नुकसानीची जबाबदारी कोणाची?
जून २०२३ मध्ये महाराष्ट्रात एक वाईट परिस्थिती दिसून आली. काही स्वयंघोषित तज्ज्ञांनी मे महिन्याच्या अखेरपासूनच सांगायला सुरुवात केली की राज्यात चांगला पाऊस पडेल आणि जूनच्या सुरुवातीलाच मान्सूनचे आगमन होईल. प्रत्यक्षात याच्या विपरीत घडले. या चुकीच्या अंदाजावर विश्वास ठेवून अनेक शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या आणि अंदाज खोटा ठरल्याने कोटय़वधींचे नुकसान झाले. अशा वेळी सर्वाधिक नुकसान शेतकऱ्यांचे होते. कारण ही स्वयंघोषित तज्ज्ञ मंडळी हवामानात अचानक बदल झाला किंवा कोणता तरी घटक पावसामुळे अनुकूल नव्हता अशी कारणे सांगून हात झटकून मोकळी होतात. प्रत्यक्षात ज्या संकेतस्थळ आणि अॅपचा वापर ते करतात, त्यात पावसाची स्थिती बदलते कारण हवामान हे वेगाने विकसित होते. हवामानाचे अंदाज देणाऱ्या व्यक्तीने त्यावर डोळा ठेवून अनिश्चिततेचा विचार करूनच संतुलित अंदाज देणे अपेक्षित असते. मात्र, ही मंडळी काही विचार न करता अॅप्सच्या उपयोग करून अंदाज देतात आणि हवामानाचे मूलभूत ज्ञान नसल्यामुळे आपला अंदाज का चुकला, याचे आत्मचिंतन त्यांना करता येत नाही.
हेही वाचा >>>बर्फाळ प्रदेशातल्या आईसलँडमध्ये ज्वालामुखीचा भीषण उद्रेक कसा झाला? ज्वालामुखीची निर्मिती कशी होते? जाणून घ्या…
यावर उपाय काय?
एखाद्याला विमान वाहतूक व्यवस्थापन किंवा वैद्यकीय क्षेत्रात जास्त आवड असेल तर तो काही थेट ‘कॉकपिट’मध्ये बसून विमान उडवत नाही किंवा ‘ऑपरेशन थिएटर’मध्ये जाऊन रुग्णावर शस्त्रक्रिया करत नाही. त्यासाठी कितीतरी काळ कठोर प्रशिक्षण घ्यावे लागते. भारताचा भौगोलिक विस्तार आणि लोकसंख्या लक्षात घेत मोठय़ा प्रमाणात हवामानाचे अंदाज देणाऱ्या शास्त्रज्ञांची गरज आहे. त्यासाठी योग्य शिक्षण आणि प्रशिक्षण आवश्यक आहे. प्रमाणित नसलेल्या अंदाजावर नियंत्रण आणणे आता आवश्यक झाले आहे. त्यासाठी सरकारी पातळीवरून हस्तक्षेप व्हायला हवा. व्यवसायामध्ये जसे परवाने लागतात, त्याच पातळीवर हवामानाचे अंदाज देण्यासाठीसुद्धा त्या पातळीवर नियम घालून परवाने आवश्यक केले पाहिजेत.