राखी चव्हाण

२०२३ सर्वाधिक उष्ण वर्ष म्हणून अधिकृतरीत्या घोषित झाल्यानंतर आता तरी ही तापमानवाढ कमी करण्याच्या दृष्टीने गांभीर्याने पावले उचलण्याची गरज आहे.

Astrological predictions 2025 for Uddhav Thackeray in Marathi
Uddhav Thackeray 2025 Astrological Predictions : ‘२०२५ पर्यंत सुवर्णकाळ…’ उद्धव ठाकरेंसाठी ज्योतिषांची मोठी भविष्यवाणी; म्हणाले, ‘शिवसेनेचे राज्य…’
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
Mumbai temperature increase
मुंबईचे तापमान वाढण्याची शक्यता
BJP Astrological Predictions 2024 Shani Impact on BJP Future in Marathi
BJP Astrological Predictions 2024: शनी भाजपासाठी अडचणींचा, निवडणुकांमध्ये होणार मोठा धमाका; वाचा ज्योतिषांची मोठी भविष्यवाणी
cop 29 climate change conference in baku capital of azerbaijan
विश्लेषण : ‘कॉप २९’ची एवढी चर्चा का?
world environment council lokrang
विळखा काजळमायेचा!
weather department, Cold weather
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा….१५ नोव्हेंबरनंतर मात्र….
maharashtra Government climate action cell plan to face climate change zws
राज्यातील हवामान कृती कक्ष कसा करणार हवामान बदलांचा सामना?

शंभर वर्षांपूर्वीच्या तुलनेत पृथ्वी आता सर्वाधिक उष्ण आहे, कारण मानवाकडून वातावरणात कार्बन डायऑक्साइडसारखा हरितगृह वायू विक्रमी प्रमाणात सोडला जात आहे. वर्षभरापूर्वी कुणालाही २०२३ हे सर्वाधिक उष्ण वर्ष असेल असे वाटले नव्हते. मात्र, वर्षांच्या पहिल्या काही महिन्यांत, फक्त काही दिवसांतच हवेच्या तापमानाचे सर्व विक्रम मोडीत काढले गेले. एलनिनो हे तापमानवाढीसाठी नैसर्गिक कारण असले तरीही मानवी हस्तक्षेपही त्यासाठी कारणीभूत आहे.

हेही वाचा >>>विश्लेषण : भारत आणि मालदीव वाद म्हणजे जुने संबंध अन् नवा तणाव

उष्णतेचा वाढता आलेख काय सांगतो?

मानवनिर्मित हवामान बदल आणि नैसर्गिक एलनिनोच्या प्रभावामुळे सरते २०२३ हे वर्ष अधिकृतपणे आजवरचे सर्वाधिक उष्ण वर्ष ठरले. २०२३ नंतरच्या सहा महिन्यात जगभरात तापमानाचे वेगवेगळे विक्रम प्रस्थापित झाले आहेत. जूनपासून पुढे यात विक्रमांची मालिकाच रचली गेली आहे. ऑगस्ट, सप्टेंबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर हे महिने सन १९०१ नंतरचे सर्वात उष्ण महिने म्हणून नोंदवले गेले आहेत. जून ते डिसेंबर या कालावधीतील सरासरी तापमानही इतिहासातील सर्वोच्च आहे. तर २०२३ हे वर्ष २०१६ नंतर इतिहासातील दुसरे सर्वात उष्ण वर्ष आहे.

तापमानवाढीत अलनिनोची भूमिका ?

गेल्या काही काळात तापमानातील वाढ ही प्रामुख्याने एलनिनोमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीशी संबंधित आहे. अलनिनो ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि या प्रक्रियेदरम्यान पूर्व प्रशांत महासागराच्या पृष्ठभागावरील गरम पाण्यामुळे वातावरणात अधिक उष्णता पसरते. या वेळी एलनिनोच्या सुरुवातीच्या टप्प्यातच हवेत असामान्य अशी तापमानवाढ दिसून आली. मात्र, त्या वेळी २०२३ हे वर्ष सर्वाधिक उष्ण ठरेल, असे कुणालाही वाटले नव्हते.

हेही वाचा >>>विश्लेषण : विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाने गोंधळात भर? ठाकरे गटाच्या आमदारांचे अस्तित्व धोक्यात?

डब्ल्यूएमओच्या अहवालात काय?

डब्ल्यूएमओ म्हणजेच जागतिक हवामान संघटनेने (वल्र्ड मेट्रॉलॉजिकल ऑर्गनायझेशन) ‘कॉप २८’ च्या पहिल्याच दिवशी यासंदर्भातला अहवाल प्रकाशित केला. यात त्यांनी बंगालच्या उपसागरातील मोखा चक्रीवादळ २०२३ मधील जागतिक स्तरावरील सर्वात तीव्र चक्रीवादळांपैकी एक असल्याचे सांगितले. तर युएन म्हणजे संयुक्त राष्ट्रांनी ३० नोव्हेंबरला प्रकाशित केलेल्या अहवालात जागतिक तापमानवाढीला आळा घालण्यासाठी तसेच त्या पार्श्वभूमीवर होणारा विनाश रोखण्यासाठी तातडीची कारवाई करण्याची गरज असल्याचे आवाहन केले.

डब्ल्यूएमओच्या प्रमुखांचे म्हणणे काय?

संयुक्त राष्ट्राच्या जागतिक हवामान संघटनेने २०२३ मध्ये हवामानातील अनेक विक्रम मोडू शकतात, असा इशारा दिला. अतिशय वाईट हवामानामुळे केवळ विनाश आणि निराशाच आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. याबाबत डब्ल्यूएमओ म्हणजेच जागतिक हवामान संघटनेचे प्रमुख पेटेरी तालास यांनी केलेली टिप्पणी विचार करायला भाग पाडणारी आहे. २०२३ या वर्षांने उष्णतेचे तोडलेले सर्व रेकॉर्ड आपल्याला बधिर करायला लावणारे आहे.

तापमानवाढीचे परिणाम काय आहेत?

कार्बन डायऑक्साइड, मिथेन आणि नायट्रस ऑक्साइड या तीन हरितगृह वायूचे प्रमाण झपाटय़ाने वाढत आहे. त्याचप्रमाणे समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान आणि समुद्राच्या पातळीत आजवरची दुप्पट वाढ नोंदवली गेली आहे. अंटाक्र्टिक समुद्रातील बर्फाचे आच्छादन घटल्याचेही  या अहवालात नमूद करण्यात आले आहे. कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण ५० टक्क्यांनी वाढले आहे. कॅनडा आणि अमेरिकेतील उष्णतेची लाट व वणव्याच्या घटना तसेच पूर्व आफ्रिकेतील दुष्काळ आणि नंतरची पूरस्थिती हे तापमानवाढीचेच परिणाम आहेत, असे हा अहवाल स्पष्ट करतो.

हेही वाचा >>>विश्लेषण : रोहित, विराटचा विचार ट्वेन्टी-२० संघासाठी? नवीन नेतृत्वावर अविश्वास म्हणून एक पाऊल मागे?

२०२३ ही शेवटाची सुरुवात?

अलीकडच्या वर्षांत तापमानवाढीचा वेग पूर्वीच्या अपेक्षेपेक्षा वेगाने बदलत असल्याचा गंभीर इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे. २०२३ सर्वाधिक उष्ण वर्ष म्हणून अधिकृतरीत्या घोषित झाल्यानंतर आता तरी ही तापमानवाढ कमी करण्याच्या दृष्टीने गांभीर्याने पावले उचलण्याची गरज आहे. अन्यथा शेती व अन्य उत्पादनांच्या समस्या येऊ शकतात. अमेरिकेसारख्या पाश्चात्त्य देशात पाण्याच्या उपलब्धतेबाबत आणखी गंभीर समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे गेल्या ५० वर्षांत २०२३ ही शेवटची सुरुवात म्हणून चिन्हांकित केली जाऊ शकते.

२०२४ मध्ये स्थिती कशी असेल?

एलनिनोची २०२३ मधील स्थिती फेब्रुवारी २०२४ पर्यंत कायम राहील. एवढेच नाही तर २०२३ पेक्षाही ते अधिक उष्ण असू शकेल, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. जानेवारी २०२४ चा पूर्वार्ध संपत आला तरीही यंदा अनेक ठिकाणी हिवाळा असा जाणवलेलाच नाही. त्यामुळे यापुढील काळात थंडीची लाट येण्याची शक्यताही कमी आहे. एलनिनोमुळे जोरदार उष्ण वारे वाहत आहेत आणि ही स्थिती फेब्रुवारीपर्यंत कायम असणार आहे. २०२४ च्या फेब्रुवारी आणि मार्चमध्ये तापमान सामान्यपेक्षा जास्त असण्याची शक्यतासुद्धा जागतिक हवामान संघटनेने व्यक्त केली आहे.