‘एन्व्हिडिआ’ कंपनी काय करते?
एन्व्हिडिआ ही १९९३ साली जेन्सन ह्युआंग या तैवानी वंशाच्या अमेरिकी अभियंत्यासह त्याच्या दोन मित्रांनी स्थापन केलेली कंपनी सुरुवातीला व्हिडीओ गेमचा दृश्यात्मक प्रभाव वाढवणाऱ्या ग्राफिक्सना बळकटी देणारे सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर विकसित करत असे. त्या काळातील अनेक उच्च दर्जाच्या संगणकीय आणि व्हिडीओ गेमना एन्व्हिडिआच्या ग्राफिक्स मेमरी कार्ड किंवा अन्य हार्डवेअरचे पाठबळ असे. कालांतराने या कंपनीने जीपीयू अर्थात ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट्सची निर्मिती करण्यास सुरुवात केली. त्याद्वारे संगणकाची दृकचित्र प्रक्रिया क्षमता वाढवण्यात येते. या ‘जीपीयू’चा वापर पुढे व्हच्र्युअल रिअॅलिटी तंत्रज्ञानासाठी वाढू लागला. त्यापाठोपाठ आलेल्या कृत्रिम प्रज्ञा तंत्रज्ञानाकरिता ‘प्रोसेसिंग चिप’ तयार करण्याचे कामही एन्व्हिडिआने सुरू केले. यातूनच गेल्या काही वर्षांतच या कंपनीची कैक पटींनी प्रगती झाली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा