गौरव मुठे

मुंबई शेअर बाजारात मंगळवारी सकाळी सत्रारंभी ४५० अंशांनी उसळलेला ‘सेन्सेक्स’, अकस्मात उलटय़ा दिशेने वळण घेत दिवसअखेरी हजारहून अधिक अंशांनी गडगडला.

Sensex down market crash nifty beginning of the week
सप्ताहारंभी ‘सेन्सेक्स’ ५५० अंश गडगडला; शेअर बाजाराला झोडपून काढण्याची कारणे काय?
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
RBI repo rate interest rate BSE Nifty share market stock market Sensex
बहुप्रतीक्षित व्याजदर कपातीनंतरही शेअर बाजारात ‘सेन्सेक्स’मध्ये २०० अंशांची घसरण कशामुळे?
BSE nifty Sensex falls share market stock market
‘सेन्सेक्स’ची सलग दुसरी घसरण; रिझर्व्ह बँकेचा व्याजदरासंबंधी निर्णयापूर्वी शेअर बाजार नकारात्मक कशामुळे?
stock market news in marathi
सेन्सेक्सची त्रिशतकी घसरण, निफ्टी २३,७०० खाली; शेअर बाजाराच्या आजच्या सावध विरामाची कारणे काय?
trade war Nifty news in marathi
मोठ्या आपटीतून सावरला, तरी ‘सेन्सेक्स’चे ३१९ अंशांचे नुकसान ; व्यापार युद्धाच्या धास्तीने जागतिक बाजारात मात्र मोठी पडझड
mumbai temprature today
Mumbai Temprature: मुंबईत तापमान सामान्य पातळीच्याही खाली, पण गारवा अल्पकाळासाठीच; वाचा काय आहे हवामान विभागाचा अंदाज!
PMP bus, Pune, PMP, pune PMP news
पुणे : पीएमपी बंद पडण्याच्या प्रमाणात घट

मंगळवारच्या सत्रात किती घसरण?

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक १,०५३.१० अंशांनी म्हणजेच १.४७ टक्क्यांनी घसरून ७०,३७०.५५ पातळीवर मंगळवारी स्थिरावला. त्याने सत्रारंभी ७२,०३९.२० या उच्चांकी पाताळीला स्पर्श केला होता. सकाळी व्यवहाराला सुरुवात होताच त्याने ४५० अंशांची झेप घेतली होती. मात्र उत्तरार्धात घसरण वाढल्याने त्याची १,८०० अशांची पडझड झाली. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये ३३३ अंशांची घसरण झाली आणि तो २१,२३८.८० पातळीवर बंद झाला. सेन्सेक्समधील आघाडीच्या ३० कंपन्यांपैकी २४ कंपन्यांचे समभाग घसरणीसह बंद झाले.

हेही वाचा >>>राम मंदिरामुळे अयोध्या ठरणार मोठी बाजारपेठ, वेगवेगळ्या कंपन्यांची जाहिरातींसाठी शर्यत; जाणून घ्या काय घडतंय?

कोणते घटक कारणीभूत?

जागतिक पातळीवरील संमिश्र संकेतांदरम्यान निर्देशांकात सर्वाधिक योगदान राखणाऱ्या एचडीएफसी बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि स्टेट बँकेतील समभागांमध्ये मोठी घसरण झाल्याने निर्देशांकात पडझड वाढली. कंपन्यांच्या तिमाहीत कामगिरीच्या चिंतेमुळे समभागांमध्ये मोठय़ा प्रमाणावर विक्रीचा दबाव आहे. निर्देशांकातील वजनदार कंपन्यांच्या समभागांमध्ये जोरदार समभाग विक्रीचा मारा झाल्याने प्रमुख निर्देशांक नकारात्मक पातळीवर बंद झाले. परिणामी सकारात्मक सुरुवात होऊनही अचानक बाजाराने नकारात्मक वळण घेतले. मुख्य निर्देशांकांच्या तुलनेत व्यापक बाजाराचे प्रतिनिधित्व करणारे मिड आणि स्मॉल कॅप, वित्त आणि बँकिंग निर्देशांकात सर्वाधिक घसरण झाली. सध्या सुरू असलेला तिमाही निकालांचा हंगाम बघता गुंतवणूकदारांनी भांडवली बाजारात ठरावीक कंपन्यांच्या समभागांमध्ये खरेदी केली, असे निरीक्षण जिओजित फायनान्शियल सव्‍‌र्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी नोंदवले.

हेही वाचा >>>विश्लेषण : राहुल गांधींना प्रवेश करण्यास मनाई करण्यात आलेल्या ‘बाटाद्राव थान’चे राजकीय महत्त्व काय?

आघाडीच्या समभागांचे योगदान किती?

गेल्या आठवडय़ात निराशाजनक निकाल दिल्यानंतर एचडीएफसी बँकेचा शेअर १४ टक्क्यांनी कोसळला. त्याच्यासह निर्देशांकात सर्वाधिक योगदान राखणाऱ्या  रिलायन्स इंडस्ट्रीज, स्टेट बँक, कोल इंडिया, अ‍ॅक्सिस बँक, इंडसइंड बँक, टाटा मोटर्स यांसारख्या कंपन्यांच्या समभागात प्रत्येकी २ ते ४ टक्क्यांची घसरण झाली. परिणामी एका दिवसात गुंतवणूकदारांचे जवळपास ९ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. बँक समभागातील विक्रीमुळे ‘बँक निफ्टी निर्देशांका’मध्ये २ टक्क्यांपेक्षा जास्त घसरण झाली, तर सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा समावेश असलेला ‘निफ्टी पीएसयू बँक निर्देशांक’ ४.५ टक्क्यांनी घसरला. आयसीआयसीआय बँक वगळता, बँक निफ्टीचे सर्व घटक जवळपास सहा टक्क्यांच्या घसरणीसह व्यवहार करत होते.

युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम?

लाल समुद्रातील तणाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. ज्यामुळे जगभरातील गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. गाझामध्ये इस्रायलचे २४ सैनिक ठार झाले असून गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये युद्ध सुरू झाल्यापासून एका दिवसातील हा सर्वात मोठा मृतांचा आकडा आहे. तेथे तणाव वाढत गेल्यास त्याचे परिणाम भांडवली बाजारावर उमटण्याची शक्यता आहे. 

हेही वाचा >>>झी आणि सोनीचं विलीनीकरण का फिस्कटले?

परदेशी गुंतवणूकदार किती कारणीभूत?

बाजारात अलीकडच्या तीव्र तेजीनंतर, समभागांचे महागलेले मूल्यांकन आणि त्या तुलनेत कंपन्यांच्या सरलेल्या डिसेंबरमधील तिमाही कामगिरी समाधानकारक नसल्याने परदेशी गुंतवणूकदारांनी समभाग विक्रीचा मारा सुरूच ठेवला आहे. बाजारमंचाच्या आकडेवारीनुसार, परदेशी संस्थात्मक गुंतवणूदारांनी (एफआयआय) जानेवारीमध्ये आतापर्यंत २३,००० कोटी रुपयांहून अधिक मूल्याची समभाग विक्री केली आहे. परिणामी बाजारात घसरणकळा सुरू झाली. शनिवारच्या सत्रातदेखील परदेशी गुंतवणूकदारांनी ५४५.५८ कोटी रुपये मूल्याच्या समभागांची विक्री केली.

सेबीच्या ‘ओनरशिप’ नियमाचा फटका?

परदेशी गुंतवणूकदारांनी देशांतर्गत भांडवली बाजारात केलेल्या गुंतवणुकीची आणि निधीची मालकी कोणाची हे सांगण्यासाठी ‘सेबी’ने १ फेब्रुवारीपर्यंतची मुदत देऊ केली आहे. गेल्या वर्षी हिंडेनबर्ग अहवालातील आरोपांपाठोपाठ, अदानी समूहाच्या प्रवर्तक कुटुंबीय व त्यांच्या भागीदारांशी संलग्न परदेशी संस्थांद्वारे स्वत:च्या कंपन्यांच्या समभागांचे भाव फुगवण्यासाठी कोटय़वधी डॉलरची गुंतवणूक केल्याचा आरोप ‘ओसीसीआरपी’ या शोध पत्रकारांच्या जागतिक संघटनेने केला होता. त्या पार्श्वभूमीवर, परदेशी गुंतवणूकदार ‘सेबी’च्या रडारवर आले आणि त्यांच्या निधी प्रवाहाच्या मालकीचा छडा लावणारा आदेश निघाला. या विरोधात परदेशी गुंतवणूकदारांनी मुदतवाढीची मागणी केली आहे. तसे न झाल्यास येत्या सहा महिन्यांमध्ये त्यांच्याकडून १.५ लाख कोटी ते २ लाख कोटी रुपये मूल्याच्या समभागांची विक्री शक्य आहे.

Story img Loader