अमोल परांजपे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

इस्रायलने गाझावर हल्ला केल्यानंतर येमेनच्या हूथी बंडखोरांनी लाल समुद्रात जहाजांवर हल्ले वाढविले आहेत. परिणामी अनेक कंपन्यांनी सुएझ कालव्याचा मार्ग टाळण्यास सुरुवात केली असल्याने वाहतूक खर्च तसेच कालावधी वाढत आहे. याचा फटका जागतिक व्यापाराला बसत असून नजीकच्या काळात महागाई भडकण्याची भीती आहे.

लाल समुद्राचे महत्त्व काय?

आशिया आणि युरोप खंडांना जोडणारा सुएझ कालवा आणि बाब-एल-मंडेबची एडनच्या आखाताकडे जाणारी सामुद्रधुनी यांमधील सागरी प्रदेश म्हणजे लाल समुद्र. जगातील सुमारे १० टक्के व्यापार याच मार्गावरून होतो. सुएझ कालव्यामुळे हा जगातील सर्वाधिक व्यग्र जलमार्ग मानला जातो. कच्चे तेल, वायू यांसारख्या वस्तू युरोपला या मार्गाने पोहोचविल्या जातात. त्याचप्रमाणे युरोपातून आशियामध्ये मालाची निर्यात करण्यासाठीही लाल समुद्र हा जवळचा व कमी खर्चीक मार्ग आहे.

हेही वाचा >>>करोनाचा नवा जेएन-१ उपप्रकार काय आहे? जाणून घ्या सविस्तर

हूथी बंडखोर कोण आहेत?

इराणने आखातामध्ये तयार केलेल्या ‘विद्रोहाच्या अक्षा’चा (अ‍ॅक्सिस ऑफ रेझिस्टन्स) सदस्य असलेली हूथी ही येमेनी अतिरेकी संघटना आहे. त्यांना इराणकडून शस्त्रास्त्रे, दारूगोळय़ासह ड्रोनसारख्या आधुनिक युद्धसाहित्याचा पुरवठा होतो. याच्या जोरावर राजधानीच्या सना शहरासह बहुतांश उत्तर येमेन २०१४ पासून हूथींच्या नियंत्रणाखाली आहे. सौदी अरेबिया व अमेरिकेच्या विरोधातील ही संघटना अर्थातच इस्रायलचाही तिरस्कार करते. ‘अक्षा’चा भाग असलेल्या हमासविरोधात इस्रायलचे युद्ध सुरू असल्यामुळे हूथी अधिक आक्रमक झाले. त्यामुळेच गेल्या काही आठवडय़ांत लाल समुद्रातील अमेरिका, युरोपची जहाजे लक्ष्य केली जात आहेत. यासाठी ड्रोन किंवा जहाजविरोधी क्षेपणास्त्रांचा वापर केला जात आहे. जहाजाच्या कप्तानांना रेडिओद्वारे मार्ग बदलण्यासाठी धमकावले जात आहे. परिणामी अनेक मोठय़ा मालवाहू कंपन्यांनी लाल समुद्राचा मार्ग टाळण्याचा निर्णय घेतला आहे.

कंपन्यांपुढे पर्यायी मार्ग काय?

जगातील सर्वात मोठी शिपिंग कंपनी, ‘मायर्क्‍स’ने पुढील सूचना मिळेपर्यंत लाल समुद्राच्या दक्षिणेकडील चेक पॉइंटपासून जहाजे पुढे नेऊ नयेत, असे आदेश दिले आहेत. जर्मनीच्या हॅपल-लॉइड कंपनीनेही लाल समुद्रातून सर्व कंटेनरची वाहतूक थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. अन्य लहानमोठय़ा कंपन्यांनीही धोका टळेपर्यंत या मार्गावरील वाहतूक थांबविण्याचे निश्चित केले आहे. सुएझ कालवा बांधला जाण्यापूर्वी युरोप आणि आशियातील सागरी वाहतूक दक्षिण आफ्रिकेच्या ‘केप ऑफ गुड होप’ला वळसा घालून होत असे. आताही जहाजांना पुन्हा हा जुना सागरी मार्ग वापरावा लागेल. हा मार्ग दूरचा असल्यामुळे जहाजांच्या इंधनाचा खर्च काही पटींनी वाढण्याची भीती आहे. शिवाय वाहतुकीचा कालावधी १८ ते ३१ दिवसांनी वाढू शकतो.

हेही वाचा >>>विश्लेषण : ईडीकडून केजरीवालांना पुन्हा समन्स, त्यांनी येण्यास परत नकार दिला तर?

जागतिक व्यापारावर परिणाम काय?

करोना महासाथ आणि रशिया-युक्रेन युद्धाचा तेल-दरांवर परिणाम झाला होता. अलीकडेच बाजार काहीसा सावरत असताना इस्रायल-हमास युद्ध भडकले. त्यातच हूथी हल्ल्यामुळे सुएझ कालव्यातील वाहतुकीवर परिणाम झाल्यास तेलाचे दर पुन्हा भडकण्याचा धोका आहे. जगाची अर्थव्यवस्था प्रामुख्याने कच्च्या तेलाच्या दरांवर अवलंबून असल्याने त्याचा थेट फटका अर्थकारणाला बसू शकतो. इंधनाप्रमाणेच खाद्यतेल, अन्नधान्य यांच्या आयात-निर्यातीचा खर्चही प्रमाणाबाहेर वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. अन्य एक महत्त्वाचा घटक म्हणजे मालवाहतूक करणाऱ्या जहाजांचा विमा.. लाल समुद्रातून वाहतूक अधिक जोखमीची झाल्यामुळे कंपन्यांचा विमा खर्च जवळपास दुप्पट झाला आहे. इस्रायली जहाज कंपन्यांना तर २५० टक्क्यांपर्यंत अधिक रक्कम मोजावी लागत आहे. याचा सर्व भार पर्यायाने सर्वसामान्य ग्राहकांवर येऊ शकतो. 

लाल समुद्रातील व्यापार ठप्प होणार?

हूथी बंडखोरांमुळे लाल समुद्रातील वाहतूक पूर्णत: बंद होण्याची सध्या तरी शक्यता नाही. कारण जहाजांना वेढा घालू शकतील अशा युद्धनौका किंवा नौदल हूथींकडे नाही. केवळ जमिनीवरून क्षेपणास्त्र डागणे अथवा ड्रोनद्वारे बॉम्बफेक अशा मर्यादित स्वरूपातच हे हल्ले होत आहेत. दुसरीकडे हूथींचा बंदोबस्त करण्यासाठी अमेरिका, फ्रान्स व अन्य युरोपीय देशांच्या युद्धनौकांनी लाल समुद्रात गस्त वाढविली आहे. हल्ले थांबविण्यासाठी अधिक व्यापक उपाययोजना करण्यासाठी अमेरिकेने नेदरलँड्स, डेन्मार्क आदी राष्ट्रांशी चर्चा सुरू केली असून त्यांनीही सहकार्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे हल्ल्यांचा बंदोबस्त होण्याची आशा आहे. मात्र सध्या तरी धास्तावलेल्या जहाज कंपन्या सुएझ कालव्याचा मार्ग टाळत आहेत. त्यामुळे अल्पावधीसाठी महागाई भडकण्याची टांगती तलवार कायम आहेच.