पंजाबमध्ये गेल्या विधानसभा निवडणुकीचा अपवाद वगळता काँग्रेस विरुद्ध अकाली दल-भाजप आघाडी असाच दुरंगी सामना झाला आहे. मात्र गेल्या वेळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने आव्हान निर्माण केले होते. आता वीस फेब्रुवारीला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत बहुरंगी लढती अपेक्षित आहेत. पंजाबच्या राजकारणाचे हे बदलते चित्र आहे. सत्तारूढ काँग्रेस विरोधात आम आदमी पक्ष, अकाली दल-बहुजन समाज पक्ष यांची आघाडी तसेच भाजप-कॅप्टन अमरिंदर यांचा पक्ष तसेच सुखदेवसिंग धिंडसा यांचा गट एकत्र आले आहे. याखेरीज शेतकरी आंदोलनातून आलेल्या काही गटांनी उमेदवार उभे केले आहेत. वरवर असा पंचरंगी सामना असला तरी काँग्रेस-आप-अकाली दल अशीच प्रामुख्याने तिरंगी लढत अपेक्षित आहे. मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करत सर्वच पक्ष निवडणुकीला सामोरे गेले आहेत.

राज्यातील चित्र

BCCI Vice President Rajeev Shukla statement on Gautam Gambhir Rohit Sharma sports news
गंभीर, रोहितमध्ये मतभेद नाहीत!‘बीसीसीआय’चे उपाध्यक्ष राजीव शुक्लांचे वक्तव्य
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Former Shekap district secretary and Meenakshi Patil son Aswad Patil will join BJP print politics news
शेकापचे पाटील कुटुंबीय भाजपच्या वाटेवर
Kho-Kho World Cup Delhi, Kho-Kho ,
विश्लेषण : दिल्लीत चक्क खो-खो विश्वचषक? किती संघ सहभागी? स्पर्धेमुळे या मराठमोळ्या खेळाला संजीवनी मिळेल?
akola ZP
वंचितची प्रतिष्ठा पणाला लागणार; अकोला जिल्हा परिषद निवडणुकीचे वेध, राजकीय पतंगबाजी रंगणार
Bumrah may lose out on Test captaincy
कसोटी कर्णधारासाठी दीर्घकालीन पर्यायाची गरज; बुमराच्या क्षमतेवरून निवड समितीमध्येच संभ्रम
भाजपा आमदार सुरेश धस हे धनंजय मुंडेंना लक्ष्य का करत आहेत? (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : भाजपा आमदार सुरेश धस हे धनंजय मुंडेंना लक्ष्य का करत आहेत?
NCP Sharad Pawar Group Politics
NCP : ‘प्रदेशाध्यक्षांसह सर्वांचे राजीनामे घ्या’, शरद पवारांसमोरच कार्यकर्त्याची जयंत पाटलांच्या राजीनाम्याची मागणी, नेमकं काय घडलं?

राज्यात माळवा, माझा, दोआब असे तीन भाग मोडतात. त्यात माळवा प्रांतात राज्यातील ११७ पैकी ६९ जागा आहेत. हे आम आदमी पक्षाचे प्रभावक्षेत्र मानले जाते. अर्थात गेल्या निवडणुकीत काँग्रेसने येथून चाळीस जागा जिंकल्या होत्या. तर आपने गेल्या वेळी जिंकलेल्या २० पैकी १८ जागा या ठिकाणी जिंकल्या होत्या. त्यातील त्यांच्या पक्षाचे निम्मे आमदार पक्ष सोडून गेले. या पट्ट्यात १५ जिल्हे आहेत. प्रामुख्याने लुधियाना, पतियाळा, मोगा, भटिंडा हे भाग येतात. तर मोगा दोआब प्रांतात दलित मतदारांची संख्या मोठी आहे. काँग्रसने चरणजित सिंग चन्नी यांना पहिले दलित मुख्यमंत्री करत इतर पक्षांना शह दिला आहे.

प्रचारातील मुद्दे

शेतकऱ्यांची समस्या हा एक मोठा मुद्दा प्रचारात होता. कृषी कायद्याविरोधात दिल्लीत जे आंदोलन झाले त्यामध्ये पंजाबमधील शेतकरीच आघाडीवर होते. त्यामुळे राज्यात भाजपसाठी फारशी आशादायी स्थिती नाही. सर्वच पक्षांनी सवंग घोषणा करत सिंचनासाठी मोफत विजेचे आश्वासन दिले आहे. अमली पदार्थांचा व्यापार तसेच तरुणांमधील व्यसनाधीनतेचा मुद्दा यावेळीही आहे. करोनाकाळात लघुउद्योगांना देशभरच फटका बसला. पंजाबमध्ये औद्योगिक विजेचे दर अवास्तव असल्याने अनेक उद्योग बंद पडल्याची तक्रार आहे. काही उद्योग शेजारील हिमाचल प्रदेशात स्थलांतरित झाले आहेत. त्यामुळे काँग्रेसवर त्याबाबत रोष आहे. त्याचा फायदा या भागात आप किंवा अकाली दलाला होऊ शकतो.

निवडणुकीतील डेराचे महत्त्व

निवडणुकीच्या काळात डेरा किंवा आश्रम वा मठ यांचे महत्त्व मोठे आहे. पंजाबमध्ये डेरा किंवा मठ नसलेले एखादे मोठे खेडे किंवा शहर अपवादानेच आढळेल, इतका मोठा प्रभाव आहे. कारण या डेरा अनुयायांची घाऊक मते राजकीय पक्षांना मिळतात. सर्वच पक्षांचे नेते ही मते मिळवण्यासाठी प्रयत्न करतात. पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी यांनी जालंधर जिल्ह्यातील एक डेरामध्ये मुक्काम केला होता त्यावरून हे महत्त्व अधोरेखित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राधा सोअमी सत्संग बिअसचे गुरिंदर सिंग धिल्लोन यांच्याशी दिल्लीत चर्चा केली. निवडणुकीवर प्रभाव टाकण्यासाठी डेरा महत्त्वपूर्ण ठरतो हे स्पष्ट आहे.

राजकीय स्थिती

कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या लोकप्रियतेच्या जोरावर गेल्या वेळी काँग्रेस सत्तेत आली. मात्र विधानसभा निवडणुकीला जेमतेम वर्षभराचा कालावधी शिल्लक असताना अमरिंदर यांचे काँग्रेस नेतृत्वाशी बिनसले. त्यांनी मुख्यमंत्रिपदाबरोबरच पक्षही सोडला. राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा पुढे करत त्यांनी पंजाब लोक काँग्रेसची स्थापना करत भाजपशी हातमिळवणी केली. मात्र अमरिंदर यांचे वय पाहता त्यांना फार मोठा प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा नाही. त्यांनी आघाडी केलेल्या भाजपचेही राज्यात ग्रामीण भागात संघटन नाही. शहरी भागात प्रामुख्याने हिंदू मतदार हा भाजपचा आधार. अगदी अकाली दलाशी युती असताना प्रामुख्याने शहरी भागातील २० ते २५ जागा भाजप लढवत होते. यंदा मात्र भाजप ६५ वर जागा लढवत आहे.

दुसरीकडे सत्ताधारी काँग्रेस गटबाजीने हैराण आहे. प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार घोषित केले नसल्याने त्यांची खदखद कायम आहे. त्यात बरोबर सत्ताविरोधी नाराजीचा काही प्रमाणात सामना त्यांना करावा लागत आहे. तरीही दलित मुख्यमंत्री म्हणून चन्नी यांच्या चेहऱ्यावर पक्ष निवडणुकीला सामोरा गेला आहे याचा काही प्रमाणात फायदा मिळण्याची चिन्हे आहेत.

आपबद्दल उत्सुकता

बहुसंख्य जनमत चाचण्यांनी आम आदमी पक्ष प्रथम क्रमांकावर राहील असे भाकीत वर्तवले आहे. अर्थात गेल्या दोन्ही निवडणुकीत जनमत चाचण्या साफ चुकल्या होत्या. गेल्या वेळी आप आघाडीवर राहील असा अंदाज होता. मात्र त्यांना केवळ २० जागा मिळाल्या होत्या. त्यात शिखांमधील काही कडव्या गटांशी हातमिळवणी केल्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता. गेल्या निवडणुकीच्या तोंडावर त्याचा फटका आपला बसला होता. त्यामुळे यावेळी आपने ती चूक दुरुस्त केली आहे. संगरुरचे पक्षाचे लोकसभेतील एकमेव सदस्य भगवंत मान यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून सर्वेक्षणातून आपने जाहीर केले. ‘एक संधी द्या’ ही त्यांची यंदाची घोषणा आहे. काँग्रेस तसेच अकाली दलाला संधी मिळाली. आता बदल करायला काय हरकत आहे, अशी धारणा मतदारांमध्ये काही प्रमाणात आहे. त्यामुळे दिल्लीनंतर पंजाबमध्ये आम आदमी पक्षाला संधी मिळणार का, याची उत्सुकता आहे.

तर देशातील सर्वात जुना प्रादेशिक पक्ष असलेला अकाली दल संघर्ष करत आहे. प्रामुख्याने जाट शीख समुदायाचा आधार असलेल्या पक्षाला शंभर वर्षे पूर्ण झाली आहेत. भाजपला सोडचिठ्ठी देत यंदा त्यांनी बहुजन समाज पक्षाशी हातमिळवणी केली आहे. त्यामुळे दलित मते मिळतील अशी त्यांना अपेक्षा आहे. पंजाबमध्ये १९६७ व ६९ या दोन निवडणुकांचा अपवाद वगळता कधीही त्रिशंकू स्थिती निर्माण झालेली नाही. काँग्रेसकडून चन्नी, आपकडून भगवंत मान तर अकाली दलाचे सुखबीर बादल भाजप आघाडीकडून अमरिंदर हे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार आहेत. बहुरंगी लढतींमध्ये यातील मुख्यमंत्रिपदाचा चेहरा निकालाच्या दिवशी दहा मार्चला ठरेल.

Story img Loader