तब्बल पाच वेळ जगज्जेता ठरलेल्या मॅग्नस कार्लसनचा १९ वर्षीय अमेरिकन बुद्धिबळपटू हॅन्स निमनने पराभव केल्यानंतर त्याने पाच लाख डॉलर बक्षीस असलेल्या सिंकफिल्ड स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला. त्याच्या या निर्णयामुळे बुद्धिबळ जगतात एकच खळबळ उडाली आहे. माघार घेण्याचे नेमके कारण सांगण्यास कार्लसनने नकार दिला आहे.

विशेष म्हणजे माघार घेतल्यानंतर त्याने जोस मोरिन्हो यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये जोस मी बोललो तर अडचणीत सापडेन, असे म्हणताना दिसत आहेत. कार्लसनने सोशल मीडियावर अपलोड केलेल्या या व्हिडीओनंतर बुद्धिबळ खेळात केले जाणारे चिटिंग (फसवणूक) पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. याच निमित्ताने बुद्धिबळ खेळात कशा प्रकारे चिटिंग केले जाऊ शकते, यावर प्रकाश टाकुया.

Maheep Kapoor gatecrashed Sanjay Kapoor party
‘वन नाईट स्टँड’साठी मद्यधुंद अवस्थेत पार्टीत शिरली, नशेतच त्याच्या कुटुंबाला…; कपूर कुटुंबाच्या सूनेने सांगितली लव्ह स्टोरी
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
Arunkumar Singh employee, Ashish Mittal,
अरुणकुमार सिंगच्या कर्मचाऱ्याकडून आशिष मित्तलला पैसे, कल्याणीनगर अपघात प्रकरण
ca ambar dalal
अंबर दलाल प्रकरणात २२ कोटींच्या मालमत्तेवर टाच, ११०० कोटींचा गैरव्यवहार
Dhankawadi gambling den, Raid on gambling den,
पुणे : धनकवडीत जुगार अड्ड्यावर छापा; दहाजणांविरुद्ध गुन्हा
Cheating with the lure of a young woman in Ganjajmun Nagpur news
गंजाजमुनात मौजमजा करायला आला अन् सुंदर तरुणीच्या आमिषाने फसला
Fraud for 50 thousand rupees by claiming to cure cancer in thane
कर्करोगावरील उपचाराच्या नावाने फसवणूक
Rupali Ganguly
Video: “खोटं बोलून करिअर…”, ‘अनुपमा’ फेम रुपाली गांगुलीवर सावत्र मुलीचे आरोप; ईशा वर्माचा वडिलांवरही संताप

हेही वाचा >>> विश्लेषण : कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्या, पण महागाईचं काय? भारतातील महागाई खरंच कमी होणार का? वाचा नेमकं काय घडतंय!

कार्लसनने सिंकफिल्ड कप स्पर्धेतून माघार घेतल्यानंतर हॅन्स निमनवर आरोप केले जात आहेत. त्याने कार्लसनविरोधात खेळताना चिंटिग केले आहे, असे म्हटले जात आहे. या आरोपानंतर १९ वर्षीय निमन याने एक स्फोटक मुलाखत दिली आहे. मी निर्दोष असल्याचे त्याने म्हटले आहे. तसेच माझे निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी मी नग्न होऊन खेळण्यासही तयार आहे, असे निमनने म्हटले आहे. विशेष म्हणजे त्याने या मुलाखतीत १२ आणि १६ वर्षाचा असताना मी चिटिंग केले होते, असे मान्य केले आहे.

हेही वाचा >>> विश्लेषण: ‘जगाचा अंत घडवू शकणारी हिमनदी’ म्हणजे काय? मुंबईसह समुद्रकिनारी असलेल्या शहरांना का धोका आहे?

बुद्धिबळ खेळाला अन्य खेळांप्रमाणेच चिटिंग काही नवे नाही. जेव्हा एकमेकांसमोर बसून बुद्धिबळ खेळले जायचे, तेव्हापासूनच या खेळात गैर मार्गाने विजय मिळवण्याचा प्रयत्न झाल्याची अनेक उदाहरणं आहेत. जेव्हा एकमेकांच्या समोर बसून बुद्धिबळ हा खेळ खेळला जायचा तेव्हा बुद्धिबळपटू प्रशिक्षक, कुटुंबातील सदस्य किंवा अन्य व्यक्ती यांच्याकडून मदत घ्यायचे. यामध्ये संकेत तसेच इशारे करून बुद्धिबळपटूला पुढील चाल सांगितली जायची. इटलीमधील मिलान शहराजवळील उत्तरेकडील बुक्किनास्को शहराच्या माजी महापौर लॉरिस सेरेडा यांनी केलेल्या चिंटिगची इतिहासात नोंद आहे. त्यांनी गडद रंगाच्या चष्म्यावर एक छुपा कॅमेरा बसवला होता. या कॅमेऱ्याच्या माध्यमातून विरोधकाच्या चालीचे छायाचित्र शक्तिशाली बुद्धिबळ सॉफ्टवेअरला पाठवले जाई.

हेही वाचा >>> विश्लेषण: नरेंद्र मोदींच्या महत्वाकांक्षी ‘सेंट्रल व्हिस्टा’ प्रकल्पाला विरोध का झाला? विरोधी पक्षांना नेमका काय आक्षेप होता?

समोरासमोरील बुद्धिबळ स्पर्धेत बुद्धिबळपटू चिंटिंग करण्यासाठी बाथरुम ब्रेकचाही उपयोग करत असत. बाथरूम ब्रेक घेण्यास कोणतीही मर्यादा नसते. याच कारणामुळे बाथरुम ब्रेकदरम्यान बुद्धिबळपटू चिटिंग करत असत.

एकमेकांच्या सहमतीने विजय-पराभव ठरवणे किंवा बरोबरी साधून (ड्रॉ) चिटिंग केली जाते. यामध्ये एकमेकांच्या हितासाठी दोन्ही बाजूचे खेळाडू सामना मुद्दामहून रद्द करतात किंवा पराभव-विजय ठरवला जातो. शीतयुद्धाच्या काळात याची काही उदाहरणं समोर आली होती. सोव्हिएत खेळाडूंनी गैर सोव्हिएत बुद्धिबळपटूंविरोधात लढण्यासाठी संगनमत केले, असा आरोप तेव्हा करण्यात आला होता. १९६३ साली सोव्हिएतमधील आघाडीच्या तीन बुद्धिबळपटूंनी एकमेकांविरोधातील सर्वच सामन्यांत बरोबरी साधली होती.

हेही वाचा >>> विश्लेषण : ‘द कपिल शर्मा शो’मधून कलाकार बाहेर का पडत आहेत? ऑन स्टेज कॉमेडी ते ऑफ स्टेज कॉन्ट्रोव्हर्सी, जाणून घ्याबुद्धिबळहेही वाचा >>> विश्लेषण : ‘द कपिल शर्मा शो’मधून कलाकार बाहेर का पडत आहेत? ऑन स्टेज कॉमेडी ते ऑफ स्टेज कॉन्ट्रोव्हर्सी, जाणून घ्या

सध्या बुद्धिबळळातील अनेक स्पर्धा ऑनलाईन पद्धतीने खेळवल्या जातात. त्यामुळे ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धेतही अनेक पद्धतीने चिटिंग केली जाते. यामध्ये वेगवेगळे सॉफ्टवेअर प्रोग्राम, चेस इंजिन्स यांची मदत गेतली जाते. वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांची मदत घेऊनही बुद्धिबळपटू चिटिंग करतात.

हेही वाचा >>> विश्लेषण : मुंबईप्रमाणे बंगळुरूमध्येही पाणी तुंबण्याचा प्रश्न का उद्भवला? वाचा नेमकी कारणं काय?

बुद्धीबळ खेळातील चिटिंग कशी रोखली जाऊ शकते?

ऑनलाईन खेळवल्या जाणाऱ्या बुद्धिबळ स्पर्धांमध्ये चिटिंग रोखणे हे मोठे आव्हान आहे. याच कारणामुळे अशा स्पर्धेच्या आयोजकांकडून उपायोजना केल्या जातात. बुद्धिबळपटूंना स्क्रीन शेअरिंग मोड ऑन करायला सांगितले जाते. तसेच वेब कॅमच्या माध्यमातून चिटिंग रोखण्याचा प्रयत्न केला जातो. रेकॉर्डिंग कॅमेरे बसवूनही चिटिंग रोखण्यासाठी प्रयत्न केला जातो.