Maha Kumbh goes digital: प्रयागराजमधील महाकुंभ मेळ्यात छोट्याशा झोपडीत राहणारे विजयपुरी बापू हे नागा साधू आहेत. यांच्याकडे फक्त एक स्मार्टफोन आहे. सध्या ते इंटरनेट कनेक्टिव्हिटीच्या समस्यांशी झगडत आहेत. बापू म्हणतात, “मी माझ्या फोनवर भजनं ऐकतो आणि फोटो काढतो. मात्र, इंटरनेट नसल्यामुळे मी कुंभसाठी तयार केलेल्या कोणत्याही अ‍ॅप्सचा वापर करू शकत नाही.” यंदा उत्तर प्रदेश सरकारने डिजिटल क्रांतीच्या दिशेने मोठं पाऊल उचलत ‘डिजिकुंभ’ उपक्रम राबवला आहे. या उपक्रमांतर्गत संपूर्ण कुंभमेळ्याच्या मैदानात प्रगत डिजिटल पायाभूत सुविधा, कृत्रिम बुद्धिमत्तेवर (AI) आधारित यंत्रणा आणि सुरक्षा व व्यवस्थापनासाठी आधुनिक साधनांचे जाळे तयार करण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नियंत्रण आणि देखरेखीतील क्रांती

यंदा महाकुंभमधील देखरेख व नियंत्रण यासाठी उच्चस्तरीय उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मेळ्याचे इंटिग्रेटेड कमांड आणि कंट्रोल सेंटर या संपूर्ण यंत्रणेचा मेंदू आहे. इथे अधिकाऱ्यांना उच्चस्तरीय संगणक प्रणालीद्वारे संपूर्ण मैदानावर लक्ष ठेवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. प्रत्यक्ष निरीक्षणासाठी ५२-सीटर क्षमतेची चार विशेष केंद्रे तयार करण्यात आली आहेत. कुंभच्या संपूर्ण व्यवस्थापनासाठी २,७५० पेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. या कॅमेऱ्यांना कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने ४० कोटी भाविकांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी सक्षम केले आहे.

अधिक वाचा: १४४ वर्षांनंतर येणारा महाकुंभमेळा का महत्त्वाचा? कारण काय?

देशातील आतापर्यंतचा हा सर्वात मोठा फेस रेकग्निशन उपक्रम मानला जात आहे. याशिवाय, १०८ कॅमेरे वाहनांच्या नंबर प्लेटस् ओळखण्यासाठी खास तयार करण्यात आले आहेत, तर AI-आधारित तब्बल २६८ व्हिडिओ कॅमेरे गर्दीच्या हालचालींचे निरीक्षण करण्यास तैनात आहेत. वाहतूक व्यवस्थापनासाठी आणि पार्किंगची सोय करण्यासाठी २४० AI-आधारित प्रणाली तैनात करण्यात आली आहे.

सुरक्षेची हमी

डिजिटल यंत्रणेचा गैरवापर होण्याच्या भीतीबद्दल विचारले असता मेळ्याचे अधिकारी विजय किरण आनंद म्हणाले, “भारतीय कंपन्यांसाठी निविदा काढण्यात आल्या आहेत. त्यांचे सर्व्हर भारतात असल्यामुळे डेटा पूर्णपणे सुरक्षित आहे आणि कोणत्याही संस्था, व्यक्ती किंवा कंपन्या यांना यामध्ये प्रवेश मिळणार नाही.” यंत्रणेच्या अचूकतेबद्दल बोलताना ते म्हणाले, “गेल्या वर्षभरात आम्ही मशीन लर्निंग तंत्रज्ञानाचा वापर करत आहोत. हे मॉडेल दिवसेंदिवस अधिक अचूक होत आहे.” मात्र, AI प्रणालीसमोर काही अडचणी येऊ शकतात. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, “जास्त गर्दीमुळे एआयसाठी व्यक्तींमधील फरक ओळखणे कठीण होते. प्रकाशयोजना, हवामान आणि मोठ्या समूहांच्या अनियमित हालचाली यामुळे कॅमेऱ्यांच्या प्रतिमांची गुणवत्ता कमी होऊ शकते. याशिवाय, प्रत्यक्ष वेळेत डेटा प्रक्रिया करण्यासाठी प्रचंड संगणकीय शक्ती आवश्यक असते.”

सांकेतिक तंत्रज्ञानाचा उपयोग

परेड ग्राऊंड पोलिसांनी मेळ्याच्या कामासाठी व्हॉट्सअॅप ग्रुप्समध्ये सामील होण्यासाठी QR कोड्सचा वापर केला आहे. मात्र, यापलीकडे त्यांचे काम मुख्यतः वॉकी-टॉकी आणि अधूनमधून स्मार्टफोनच्या मदतीनेच चालते. कुंभमध्ये प्रथमच सायबर पोलिस स्टेशनची स्थापना करण्यात आली आहे. एका तात्पुरत्या तंबूत उभारलेल्या या पोलिस स्टेशनमध्ये सायबर टीम हरवलेले मोबाईल शोधण्यात व्यग्र आहे. आतापर्यंत नोंदवलेल्या २५ चोरींमध्ये फक्त ५ मोबाईल परत मिळवण्यात यश आले आहे. सायबर पोलिसांच्या १४ सदस्यीय टीमकडे देखरेखीबरोबरच सायबर गुन्ह्यांचे निराकरण करण्याचे कामही आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, “हे पोलिस स्टेशन तात्पुरते आहे. मेळा संपल्यानंतर प्रलंबित प्रकरणे स्थानिक पोलिसांना हस्तांतरित केली जातील.”

सायबर गुन्ह्यांची वाढती समस्या

सायबर फसवणुकीच्या प्रकरणांमध्येही वाढ होत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तंबू शहराच्या (कुंभ मेळ्यात उभारलेले तात्पुरते तंबूं शहर) नावावर पैसे उकळण्याचे प्रकार समोर आले आहेत. फसवणूक करणारे पीडितांना बनावट बँक खात्यांमध्ये पैसे हस्तांतरित करण्यास भाग पाडतात. “आम्ही जागरूकता मोहिमा राबविल्या आहेत, पण त्यांचा फारसा प्रभाव दिसत नाही. गुरुग्रामसारख्या ठिकाणांतील लोकही फसत असल्याने या मोहिमा किती प्रभावी आहेत यावर शंका येते,” असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

नदीच्या तळापर्यंत पसरलेले तंत्रज्ञान

पहिल्यांदाच उत्तर प्रदेश पोलिसांनी आधुनिक इमेजिंग तंत्रज्ञानासह पाण्याखालील ड्रोन गंगा नदीच्या तळावर गस्त घालण्यासाठी तैनात केले आहेत. हे ड्रोन आणि रिमोट-नियंत्रित लाईफ बुईज २४/७ पाण्याखालील देखरेखीची व्यवस्था करतात आणि Real-Time Data कमांड सेंटरकडे पाठवतात.

भविष्याच्या दृष्टीने डिजिटल क्रांती

सरकारने कुंभमधील गर्दी व्यवस्थापन अधिक सुलभ करण्यासाठी AI-आधारित चॅटबॉट तयार केला आहे. या चॅटबॉटची खास वैशिष्ट्ये म्हणजे तो ११ पेक्षा अधिक भाषांमध्ये कार्यक्षम आहे आणि गुगल मॅप्ससह सुसज्ज आहे. भाविकांना कुंभमधील विविध झोन, तंबू शहर, पार्किंग स्थळे आणि महत्त्वाच्या ठिकाणांचा रस्ता दाखवण्यासाठी चॅटबॉटचा वापर केला जातो. गुगल मॅप्सशी जोडलेला असल्यामुळे तो थेट नेव्हिगेशन सेवा देतो. याशिवाय, मैदानाचे १० झोन आणि २५ सेक्टर मध्ये विभाजन करण्यात आले आहे. भौगोलिक माहिती प्रणालीच्या (GIS) साहाय्याने प्रत्येक क्षेत्राचे मॅपिंग करण्यात आले आहे. कुंभमेळा पर्वोत्तर पुरवठा (Post-Event Supply Chain) व्यवस्थापनासाठी स्वयंचलित प्रणाली आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी ड्रोन तैनात करण्यात आले आहेत. ५३० प्रकल्पांची प्रगती ट्रॅकिंग करण्यासाठी रिअल-टाइम सॉफ्टवेअर, गुगल मॅप्ससह सर्व साइट्सचे एकत्रीकरण आणि साठा व्यवस्थापन प्रणाली कार्यरत आहे.

पोलिस यंत्रणा

कुंभसाठी ३७ हजारापेक्षा अधिक पोलिस कर्मचारी तैनात आहेत. यात १,३७८ महिला अधिकारी, सायबर तज्ज्ञ आणि गुप्तचर पथके समाविष्ट आहेत. आगीच्या जोखमींच्या परिस्थितीत उपाययोजना करण्यासाठी ३५ मीटर उंचीपर्यंत पोहोचू शकणाऱ्या थर्मल इमेजिंगने सुसज्ज अर्थोलिक वॉटर टॉवर्स तयार आहेत.

अधिक वाचा: Kumbh Mela 2025: कुंभमेळ्यावर ब्रिटिशांनी नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न का केला होता?

जागा वाटपातील अडचणी

तांत्रिक विकास असूनही काही मुद्द्यांवर तक्रारी आहेत. १५,००० लोक अजूनही वाटप न झालेल्या जमिनींबद्दल तक्रारी करत आहेत. प्रयागराज मेळा प्राधिकरणाच्या कार्यालयात, अनेक संघटनांनी त्यांच्या जमिनीचे वाटप प्रलंबित असल्याचे सांगितले. नाई सुधार समितीचे सरचिटणीस राजेश कुमार शर्मा म्हणतात, “आम्ही ऑनलाइन तंबू आरक्षित केले होते. पण इथे येऊन समजले की त्यावर दुसऱ्या पक्षाने दावा केला आहे.”

कुंभ: तंत्रज्ञान आणि श्रद्धेचा संगम

कुंभमेळ्याच्या डिजिटल क्रांतीने या ऐतिहासिक सोहळ्याला नव्या उंचीवर नेले आहे. AI-आधारित देखरेख, सायबर सुरक्षा आणि प्रगत साधनांचा वापर यामुळे कुंभ केवळ धार्मिकतेपुरता मर्यादित न राहता आधुनिक व्यवस्थापन आणि नवतंत्रज्ञानाचा आदर्श ठरतो आहे. कुंभ आता केवळ श्रद्धेचा नव्हे, तर तांत्रिक नवकल्पनेचा महोत्सव झाला आहे, या ठिकाणी भविष्याची झलक पाहायला मिळत आहे.