Maha Kumbh Mela 2025: प्रयागराजमध्ये सध्या कडाक्याची थंडी पडली आहे. सर्वत्र धुकं पसरलंय आणि पावसाची शक्यता देखील आहे. तरीही, आज (सोमवारी, १३ जानेवारी) लाखो लोक शहरात दाखल झाले आहे आणि पहाटेच्या अंधाऱ्या आकाशाखाली गंगेच्या पाण्यात त्यांनी स्नान केलं आहे.

या वेळेस प्रयागराज महाकुंभ किंवा १२ वर्षांनी येणारं पूर्णकुंभाचे पर्व आहे. कुंभमेळ्याभोवती अनेक पुराणकथा व मिथकं प्रचलित आहेत. तसेच, त्याच्या नेमक्या उगमाबद्दल अनेक मतंमतांतरं आहेत. काहीजण मानतात की, या उत्सवाचा उल्लेख वेद आणि पुराणांमध्ये सापडतो. तर काहींच्या मते, हा सण केवळ दोन शतकांपूर्वीचा आहे. काहीही असलं तरी हा उत्सव पृथ्वीवरील भक्तांचा सर्वात मोठा मेळावा आहे,यात शंका नाही.

Bullet Train Bridge Collapse in Anand Gujarat
Bullet Train Bridge Collapse : बुलेट ट्रेन प्रकल्पाचा पूल कोसळला, तीन मजूर ठार; ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकले, बचावकार्य जारी
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
Karuna Sharma Cried
Karuna Sharma : उमेदवारी अर्ज बाद ठरल्याने ढसाढसा रडल्या करुणा शर्मा, धनंजय मुंडेंना म्हणाल्या, “तू राक्षस…”
saudi arabia snowfall
सौदी अरेबियाच्या रखरखीत वाळवंटात झाली चक्क बर्फवृष्टी; कारण काय?
donald trump latest marathi news
विश्लेषण: अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांची अनपेक्षित मुसंडी कशी?
samosa caucus
समोसा कॉकस म्हणजे काय? अमेरिकेच्या निवडणुकीत का चर्चेत?
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”

त्याच निमित्ताने कुंभ मेळा म्हणजे काय? आणि तो विशिष्ट चार शहरांमध्ये ठराविक कालावधीत का साजरा केला जातो? अर्धकुंभ आणि महाकुंभ म्हणजे काय? या सणाचा उगम काय आहे आणि लाखो लोक यात सहभागी का होतात? हे जाणून घेणं समायोचित ठरावं.

हिंदू धर्मातील अनेक प्रश्नांप्रमाणे या प्रश्नांची उत्तरं पुराणकथा, इतिहास आणि प्राचीन लोकांच्या अविरत श्रद्धेच्या मिश्रणात सापडतात.

अधिक वाचा: नागा साधू कोण आहेत? त्यांचा कुंभमेळ्याशी काय संबंध? त्यांनी हिंदू धर्माचे रक्षण कसे केले?

कुंभमेळ्याचा पुराणकथांतील उगम

संस्कृत शब्द कुंभ याचा अर्थ घडा आहे. पौराणिक कथेत म्हटल्याप्रमाणे, देवता आणि असुरांनी समुद्रमंथन केलं. तेव्हा धन्वंतरी अमृताने भरलेला घडा घेऊन प्रकट झाले. असुरांच्या हातात अमृत जाऊ नये, म्हणून इंद्राचा मुलगा जयंत हा घडा घेऊन पळाला. त्याला आणि घड्याला वाचवण्यासाठी सूर्य, त्याचा पुत्र शनी, बृहस्पती (ग्रह गुरु) आणि चंद्र यांनी त्याला साथ दिली. जयंत अमृत घेऊन पळत असताना हरिद्वार, प्रयागराज, उज्जैन आणि नाशिक-त्र्यंबकेश्वर या चार ठिकाणी अमृत सांडलं. जयंत १२ दिवस पळत होता आणि देवतांचा एक दिवस म्हणजे मानवांच्या १२ वर्षांसारखा मानला जातो. त्यामुळे कुंभमेळा सूर्य, चंद्र आणि गुरु यांच्या सापेक्ष स्थितीनुसार दर १२ वर्षांनी या ठिकाणी साजरा केला जातो. प्रयागराज आणि हरिद्वार येथे दर सहा वर्षांनी अर्धकुंभ आयोजित केला जातो. १२ वर्षांनी साजरा होणारा उत्सव पूर्णकुंभ किंवा महाकुंभ म्हणून ओळखला जातो. ही चारही ठिकाणं नद्यांच्या काठावर वसलेली आहेत. हरिद्वारला गंगा, प्रयागराजला गंगा, यमुना आणि पौराणिक सरस्वती यांचा संगम, उज्जैनला क्षिप्रा आणि नाशिक-त्र्यंबकेश्वरला गोदावरी नदी आहे. असं मानलं जातं की, कुंभमेळ्याच्या काळात, ग्रह-ताऱ्यांच्या विशिष्ट स्थितीत या नद्यांमध्ये स्नान केल्याने पापं धुतली जातात आणि पुण्यप्राप्ती होते.

कुंभमेळा हे साधू-संत आणि अन्य पवित्र व्यक्तींच्या भेटीचं ठिकाणही आहे. या मेळ्यातील साधूंचे आखाडे हे विशेष आकर्षण ठरतात. याठिकाणी सामान्य लोक या साधू-संतांना भेटू शकतात

नदी भारतीयांची जीवनदायीनी

हिंदू धर्मात गंगेचं महत्त्व सर्वश्रुत आहे. परंतु, असं मानलं जातं की क्षिप्रा नदी वराहाच्या (विष्णू अवतार) हृदयातून प्रकट झाली आहे. गोदावरीला अनेकदा ‘दक्षिणेची गंगा’ असंही म्हटलं जातं, असं गुजरातमधील वापी येथील पराशर ज्योतिषालय चालवणारे डॉ. दिपकभाई ज्योतिषाचार्य यांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितलं.

कुंभमेळ्याचे ठिकाण कसे ठरवले जाते?

हे ज्योतिषशास्त्रीय गणनांवर आधारित असते. कुंभमेळ्यांच्या १२ वर्षांच्या अंतराचं आणखी एक कारण म्हणजे गुरु ग्रहाला सूर्याभोवती एक परिभ्रमण पूर्ण करण्यासाठी १२ वर्षं लागतात. जेव्हा गुरु कुंभ राशीमध्ये (पाणी वाहणाऱ्या पात्राचे चिन्ह असलेली रास), सूर्य मेष राशीमध्ये आणि चंद्र धनु राशीमध्ये असतो, तेव्हा कुंभमेळा हरिद्वार येथे आयोजित होतो. जेव्हा गुरु वृषभ राशीमध्ये असतो आणि सूर्य व चंद्र मकर राशीमध्ये (म्हणूनच या काळात मकर संक्रांतीही येते) तेव्हा कुंभमेळा प्रयाग येथे होतो. जेव्हा गुरु सिंह राशीमध्ये असतो आणि सूर्य व चंद्र कर्क राशीमध्ये असतात. तेव्हा कुंभमेळा नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे होतो. म्हणून त्याला सिंहस्थ कुंभ असेही म्हणतात.

कुंभमेळ्याच्या इतिहासावर वाद

अनेक जण स्कंदपुराणाचा आधार घेत कुंभमेळ्याच्या प्राचीनतेचा पुरावा देतात. तर काहीजण सातव्या शतकातील चिनी प्रवासी ह्युएन त्सांग (Xuanzang) यांनी प्रयाग येथे एका मेळ्याचे वर्णन केल्याचा उल्लेख करतात.

बनारस हिंदू विद्यापीठाच्या (BHU) ज्योतिष विभागाचे प्रमुख प्राध्यापक गिरीजाशंकर शास्त्री म्हणतात, “आपण आज जसा कुंभमेळा पाहतो तसा कोणताही उल्लेख कोणत्याही शास्त्रात स्पष्टपणे सापडत नाही. समुद्रमंथनाचा उल्लेख अनेक ग्रंथांमध्ये आहे. पण, चार ठिकाणी अमृत सांडल्याचा उल्लेख नाही. स्कंदपुराणात कुंभमेळ्याचा उगम असल्याचं सांगितलं जातं, पण सध्याच्या उपलब्ध पुराणांमध्ये तो उल्लेख दिसतं नाही.”

डॉ. दीपकभाई ज्योतिषाचार्य यांनी असेही निदर्शनास आणले की गोरखपूरच्या गीता प्रेसने प्रकाशित केलेल्या महाकुंभ पर्व नावाच्या पुस्तकात ऋग्वेदात कुंभमेळ्यात सहभागी होण्याचे फायदे सांगणारे श्लोक असल्याचा दावा आहे. अनेकांचा विश्वास आहे की, ८ व्या शतकातील हिंदू तत्त्वज्ञ आदी शंकराचार्य यांनी या चार ठराविक काळातील मेळ्यांची स्थापना केली. जिथे हिंदू साधू, पंडित आणि विचारवंत एकत्र येऊन चर्चा करू शकतील, विचार मांडू शकतील आणि सामान्य जनतेला मार्गदर्शन करू शकतील.

ऑस्ट्रेलियाच्या युनिव्हर्सिटी ऑफ न्यू साउथ वेल्समधील दक्षिण आशियाई आणि जागतिक इतिहासाच्या सहयोगी प्राध्यापिका कामा मॅकलीन यांनी लिहिले आहे की, ह्युएन त्सांगने जरी मेळ्याचा उल्लेख केलेला असला तरी तो कुंभमेळ्याचाच होता, हे निश्चित करता येत नाही. त्यांच्या मते, प्राचीन काळातील माघमासातील माघमेळा प्रयाग येथे भरत असे. ज्याला १८५७ च्या उठावानंतर प्रयागातील पंडितांनी ‘अजोड’ कुंभ म्हणून पुनर्प्रसिद्ध केलं, जेणेकरून ब्रिटिशांनी त्यामध्ये हस्तक्षेप करू नये. परंतु, सर्वच इतिहासकार या मताशी सहमत नाहीत.

प्रयागराज विद्यापीठाचे प्राचीन इतिहासाचे सेवानिवृत्त प्राध्यापक आणि सोसायटी ऑफ पिल्ग्रिमेज स्टडीजचे सरचिटणीस प्रा. डी. पी. दुबे यांनी कुंभमेळ्याचा अभ्यास केला असून त्यावर विपुल लिखाण केले आहे. त्यांच्या मते, हरिद्वार येथील मेळा हा पहिला कुंभमेळा असल्याची शक्यता आहे. कारण या ठिकाणी गुरु ग्रह कुंभ राशीत असतो.

अधिक वाचा: कुंभमेळ्यावर ब्रिटिशांनी नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न का केला होता?

प्रा. दुबे म्हणतात की, “कुंभमेळ्याचा उगम गंगा नदीच्या पूजनाशी संबंधित आहे. गंगा नदीला उत्तर मैदानी भागातील जीवनदायिनी शक्ती मानली जाते. पवित्र नद्यांच्या काठावर मेळे आयोजित करणे ही प्राचीन हिंदू परंपरा आहे. प्रवासी साधूंनी हळूहळू पवित्र नद्यांच्या काठावर चार कुंभमेळे आयोजित करण्याची कल्पना पसरवली. जिथे सामान्य लोक आणि संन्यासी एकत्र येऊ शकत. यात्रेबरोबरच अशा मोठ्या मेळ्यांमुळे प्रभाव निर्माण करण्याची आणि अनुयायी मिळवण्याची संधी मिळत असे,” असं त्यांनी इंडियन एक्स्पेसला सांगितलं.
दुबे यांनी ‘कुंभ मेळा: पिल्ग्रिमेज टू द ग्रेटेस्ट कॉस्मिक फेअर’ या पुस्तकात मुघल काळातील नोंदी आणि संन्यासी आखाड्यांच्या नोंदींचा उल्लेख केला आहे. त्यांनी लिहिलं आहे की, “कुंभमेळ्याचं आयोजन १२ व्या शतकानंतर कधीतरी सुरू झालं. हा धार्मिक सण भक्ती चळवळीच्या उत्कर्षाच्या काळात आकाराला आला असावा. ज्यामध्ये हिंदू संतांनी आणि सुधारकांनी सामाजिक-धार्मिक सुधारणांची चळवळ सुरू केली.”

कुंभमेळ्यात लोक नेमकं काय करतात?

काही लोक फक्त एक पवित्र स्नान करून पापक्षालनासाठी येतात. तर काहींना कल्पवासी म्हणतात कारण ते नद्यांच्या काठावर राहतात. ते आपल्या दैनंदिन जीवनातील संघर्ष थांबवून आध्यात्मिक पुण्य मिळवण्यासाठी इथे वेळ घालवतात. इथे अनेक प्रकारचं दान केलं जातं. मोठ्या जमावासोबत व्यापाराचं महत्त्वही येतं. कुंभमेळा स्थानिक समुदायांसाठी महत्त्वाच्या बाजारपेठेच काम करतो. ऐतिहासिक नोंदींमध्ये मेळ्याच्या बाजारात व्हेनेशियन नाणी आणि युरोपीय खेळणीही दिसल्याचा उल्लेख आहे.

डॉ. दीपकभाई म्हणतात, “कुंभ पर्व सामान्य लोकांसाठी पुण्य मिळवण्यासाठीची संधी आहे. मकर संक्रांती, वसंत पंचमी यांसारखे काही दिवस स्नानासाठी विशेष शुभ मानले जातात. गहू, तूप भरलेल्या कुंभाचं दान इथे केल्यास पुण्य मिळतं. भाविक साधूंना भेटू शकतात आणि त्यांच्याकडून धार्मिक व आध्यात्मिक मार्गदर्शन मिळवू शकतात.”

अधिक वाचा: १४४ वर्षांनंतर येणारा महाकुंभमेळा का महत्त्वाचा? कारण काय?

शाही स्नानाचा रक्तारंजित इतिहास

कुंभमेळ्यात वेगवेगळे साधूंचे आखाडे आपली छावणी उभी करतात. ते मोठ्या मिरवणुकीसह शाही स्नान करतात. पूर्वी कोणता अखाडा पहिले स्नान करणार यावरून रक्तरंजित संघर्ष होत असे, त्यामुळे आता यासाठी ठरलेली क्रमवारी पाळली जाते. बीएचयूचे निवृत्त इतिहास प्राध्यापक राकेश पांडे म्हणतात, “कुंभमेळ्याने इतिहासात समाजाला संघटित करण्यात आणि जागरूकता निर्माण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आज मेळ्याच्या वेळा आणि ठिकाणं जाहीर करणं सोपं आहे.परंतु, शतकांपूर्वी साधूंनी ज्योतिषीय गणना करून हाच संदेश पसरवला. रेल्वे किंवा मोटारी नसताना आणि आरामदायक तंबूंच्या पर्यायांशिवाय लोक फक्त श्रद्धेच्या जोरावर प्रवास करायचे. स्वातंत्र्य चळवळीच्या काळातही मेळे हे राष्ट्रवादी विचार पसरवण्याचं ठिकाण ठरले होते.”

Story img Loader