गेल्या पाच वर्षांत सुमारे ५० हजार एकर क्षेत्रावरील द्राक्षबागांवर कुऱ्हाड चालवली आहे. द्राक्षबागा तोडण्यामागील कारणांचा आढावा….

राज्यातील द्राक्षबागांची स्थिती काय?

राज्यात द्राक्ष लागवडीखालील क्षेत्र साडेचार लाख एकर आहे. त्यापैकी सुमारे पन्नास हजार एकर क्षेत्रावरील द्राक्षबागा तोडून टाकण्यात आल्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्याचा पूर्वभाग, शिराळा तालुका वगळता उर्वरित सांगली जिल्हा, सोलापूर, पुणे, धाराशिव, नाशिक, धुळे जिल्ह्यांत द्राक्षबागा आहेत. राज्यात द्राक्ष लागवडीखालील सर्वांधिक क्षेत्र सांगली आणि नाशिक जिल्ह्यांत आहे. त्याखालोखाल सोलापूर आणि पुणे जिल्ह्यात द्राक्षबागा आहेत. नाशिक वगळता राज्याच्या अन्य भागातून द्राक्ष निर्यात फारशी होत नाही. सोलापूर, पुणे आणि सांगलीच्या काही भागातून द्राक्ष निर्यात होते. पण, नाशिक वगळता अन्य जिल्ह्यांतील द्राक्षे देशांतर्गत बाजारात विकली जातात. सांगली, सोलापूर जिल्ह्यांत बेदाणा निर्मिती मोठ्या प्रमाणावर होते. तासगाव येथील बेदाण्याला जीआय मानांकन मिळाले असून, तासगावचा बेदाणा जगप्रसिद्ध आहे. तर नाशिकच्या द्राक्षांना जगाची बाजारपेठ काबीज केली आहे.

Farmers in Washim district are cultivating chia crop along with traditional crops
वाशीम जिल्ह्यात पीक लागवडीच्या नव्या वाटा; ‘या’ पिकाला मिळतोय चांगला भाव
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Yenpure gang , Katraj , Leader Yenpure gang arrested
पुणे : कात्रज भागातील येनपूरे टोळीच्या म्होरक्याला बारामतीतून अटक, मोक्का कारवाईनंतर दोन वर्ष पसार
strawberry navi Mumbai marathi news
नवी मुंबई : एपीएमसीत लालचुटूक स्ट्रॉबेरींचा बहर, दरातही घसरण
Mumbai Municipal Corporation sent notice to developer for careless demolition of building
अंधेरीत बांधकाम व्यवसायिकाला पालिकेकडून नोटीस, इमारतीचे पाडकाम थांबवण्याचे आदेश
coconut prices increased loksatta news
बदलत्या हवामानामुळे नारळ उत्पादन घटले, श्रीफळ (नारळ) महागले
chaturang article
स्थलांतरातून बहरलेली खाद्यसंस्कृती
Raigad district administration will implement bamboo cluster scheme planting 35 lakh bamboos
रायगडात ३५ लाख बांबूची लागवड होणार

हेही वाचा >>>लैंगिक छळ प्रतिबंधक ‘पॉश’ कायदा राजकीय पक्षांना लागू होणार? हा कायदा पुन्हा चर्चेत येण्याचे कारण काय?

जागतिक द्राक्ष उत्पादनात भारत कुठे?

भारतात महाराष्ट्र द्राक्ष लागवड आणि उत्पादनात आघाडीवर आहे. राज्यात प्रामुख्याने नाशिक, सांगली, पुणे, सोलापूर, सातारा, नगर, धुळे आणि धाराशिव जिल्ह्यांत द्राक्ष उत्पादन होते. महाराष्ट्रासह काही प्रमाणात कर्नाटक (महाराष्ट्र सीमाभाग), तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात द्राक्ष शेती होते. अगदी लेह – लडाखमध्येही स्थानिक, देशी द्राक्षवेली आहेत. सप्टेंबर महिन्यात (अनंत चतुर्दशीच्या सुमारास) द्राक्षे काढणीला येतात. पण महाराष्ट्र वगळता अन्य राज्यातील उत्पादनही नगण्य आहे. देशातून होणारी द्राक्ष आणि बेदाणा निर्यात प्रामुख्याने महाराष्ट्रातूनच होते. जागतिक पातळीवर विचार करता द्राक्ष उत्पादनात भारताचा सातवा क्रमांक लागतो. चीन १२० लाख टनांसह पहिल्या क्रमांकावर असून, त्या खालोखाल इटली, फ्रान्स, अमेरिका, तुर्कीयेनंतर भारताचा क्रमांक लागतो. भारतात सरासरी ३० ते ४० लाख टन द्राक्ष उत्पादन होते, त्यात महाराष्ट्राचा वाटा ९५ टक्क्यांपर्यंत आहे. राज्यातील द्राक्ष लागवडीखालील क्षेत्र सुमारे साडेचार लाख एकर होते, त्यात घट होऊन चार लाख एकरपर्यंत खाली आले आहे.

द्राक्षबागांसमोरील नेमक्या अडचणी काय?

द्राक्षबागांसाठी मुरमाड आणि पाण्याचा निचरा होणारी जमीन लागते. पाणी कमी पण, वेळेवर लागते. अलिकडे सर्वच द्राक्षबागांना ठिबक सिंचनाद्वारे पाणी दिले जात असल्यामुळे कमी पाण्यावरही द्राक्ष पीक घेतले जात होते. द्राक्षबागांना पहिला फटका बसला नोटबंदीचा. नोटाबंदीत द्राक्षे मातीमोल झाली. दरात मोठी घसरण झाली. नोटाबंदीपूर्वी मिळत असलेला दर २०२३ मध्येही मिळाला नाही. नोटाबंदीननंतर करोना टाळेबंदीचा सामना द्राक्ष शेतीला करावा लागला. करोना टाळेबंदीत मागणी अभावी द्राक्षे शेतातच पडून राहिली. त्यानंतर सतत द्राक्षांना मागणी घटत गेली, शिवाय दरातही पडझड होत राहिली. करोना आणि नोटाबंदीनंतर इंधन, मजुरीचा दर वाढत गेला. रासायनिक खते, औषधांच्या दरातही वाढ झाली. शेतीसाठी लागणाऱ्या सर्व औषधांवर, अवजारांवर जीएसटी आकारला जातो. इंधन, मजुरी, औषधांच्या दरात जितकी वाढ झाली, त्या तुलनेत द्राक्षांना वाढीव दर मिळाला नाहीच. उलट दर कमी मिळू लागल्यामुळे द्राक्ष बागायतदार शेतकरी अडचणीत आला. द्राक्ष शेतीसाठी मोठी आर्थिक गुंतवणूक करावी लागते. सातत्याने होत असलेल्या तोट्यामुळे ही आर्थिक गुंतवणूक अडचणीत आली. कर्जबारीपणा वाढू लागला. त्यामुळे शेतकऱ्यांनी द्राक्षबागा काढून कमी काळातील आणि कमी आर्थिक गुंतवणुकीच्या भाजीपाला, फळभाज्या, फुलशेतीला प्राधान्य दिले.

हेही वाचा >>>एलॉन मस्क यांचा अमेरिकन ग्रीन कार्डसाठी भारतीयाला पाठिंबा; प्रकरण काय? अरविंद श्रीनिवास कोण आहेत?

नैसर्गिक आपत्तींमुळे कंबरडे मोडले?

द्राक्ष पिकाला अति थंडी, अति उष्णता, अति पाणी चालत नाही. नेमके याच्या विपरीत स्थिती गत तीन वर्षांपासून आहे. तीन वर्षे वर्षभर सलग पाऊस पडतो आहे. जून अखेरीस सुरू झालेला पाऊस नोव्हेंबर अखेरपर्यंत होत आहे. याशिवाय उन्हाळी, अवकाळी आणि वादळी वाऱ्यांसह पडणारा पाऊस वेगळाच. त्यात गारपिटीची, अति थंडीची आणि उन्हाळ्यात अति तापमानाची स्थिती असे द्राक्ष शेतीला एकूण प्रतिकूल हवामान राहिले आहे. अति पाण्यामुळे द्राक्ष वेलीला अपेक्षित घड लागत नाहीत. मुळे कुजतात, घड पिवळे पडून जिरून जातात. काढणीच्या वेळी हलका पाऊस झाला तरीही द्राक्षाचे नुकसान होते. फळकुज होते, द्राक्षे  सडतात. काढणीच्या वेळी वादळी वारे आल्यास द्राक्षबागा उन्मळून पडतात. गारपीट झाल्यास संपूर्ण पीक मातीमोल होऊन जाते. एकूणच नैसर्गिक आपत्तींमुळे द्राक्ष बागांचे कंबरडे मोडले आहे. द्राक्षबागांचे क्षेत्र कमी होण्यामागील मुख्य कारण नैसर्गिक आपत्ती हेच आहे.

द्राक्ष शेतीत नवे प्रयोग कोणते?

थॉमसन सिडलेसपासून तयार करण्यात आलेल्या सुधारित वाणांची म्हणजे लांब द्राक्षे सोनाक्का, माणिकचमन, सुपर सोनाक्का, अनुष्का सारख्या जातींच्या वाणाला घड लागण्याची क्षमता कमी झाली आहे. निर्यातीसाठी प्रसिद्ध असलेल्या नाशिकमध्येही द्राक्ष क्षेत्रात वेगाने घट होत आहे. आयात केलेल्या आणि पेटंट असलेल्या वाणाची लागवड वाढली आहे. पेटंट वाणाच्या रोपांसाठी, उत्पादित होणाऱ्या द्राक्षांवर पेटंटचा कर द्यावा लागतो. अशी काही पेटंटेड वाणे, जातींची लागवड नाशिकमध्ये वेगाने वाढू लागली आहे. दुसरीकडे बेदाणा निर्मितीसाठी प्रसिद्ध असलेल्या तासगावमध्येही गेली कित्येक वर्षे दर्जेदार बेदाण्याचा दर सरासरी २०० रुपये किलोच्या वर गेलेला नाही. त्यामुळे बेदाणा निर्मितीतही हळहळू घट होत आहे. सध्या खास बेदाणा निर्मितीसाठीची द्राक्ष लागवड कमी झाली आहे. बाजारात न विकली गेलेली किंवा मागणी नसल्यामुळे अनेक लांब वाणांच्या द्राक्षांपासून बेदाणा निर्मिती होत आहे. त्यामुळे बेदाणा उत्पादनाचे आकडे चांगले दिसत असले तरीही दर्जेदार बेदाणा उत्पादन घटत चालले आहे.  

कृषी विभाग, संशोधन संस्थांकडून अपेक्षाभंग?

राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, पुणे, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ आणि महाराष्ट्र राज्याचा कृषी विभागात अजिबात ताळमेळ नाही. त्यामुळे द्राक्ष लागवडीखालील नेमक्या क्षेत्राची माहितीही उपलब्ध नाही. द्राक्ष पिकाच्या वाढीसाठी विविध प्रकारच्या संजीवकांचा वापर केला जात आहे. त्यामुळे दर्जात्मक व गुणात्मक वाढ होते. पण, त्याचा अतिरेकी वापर सुरू आहे. अतिरेकी वापरामुळे द्राक्ष मण्यांची लांबी वाढत असली तरीही चवीवर परिणाम होत आहे. द्राक्ष वेलीला घड लागण्याची क्षमताही हळूहळू कमी होत आहे. संशोधन संस्था आणि द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांमध्ये पुरेसा आणि योग्य संवाद – समन्वय नसल्यामुळेही द्राक्ष उत्पादक आर्थिक अडचणीत आहेत. संशोधन संस्था म्हणून हवामान पूरक किंवा हवामान सहिष्णू वाणांची, निर्यातक्षम, वाईनसाठीची, बेदाण्यासाठीची वाणे विकसित करण्यात संशोधन संस्था अपयशी ठरल्या आहेत. या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून द्राक्षबागांचे क्षेत्र वेगाने घटत आहे.

dattatray.jadhav@expressindia.com

Story img Loader