लोकसभा निवडणुकीत राज्यातील वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये पीछेहाट सहन करावी लागलेल्या भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस या महायुतीला मुंबईलगत असलेल्या महानगर प्रदेशाने मात्र चांगली साथ दिली. ठाणे, पालघर आणि रायगडच्या पट्ट्यातील एका जागेचा अपवाद सोडला तर सहापैकी पाच जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले. ठाणे, कल्याण, पालघर पट्ट्यातील लोकसभेतील महायुतीचा विजय हा निर्विवाद असा होता. पनवेल, अलिबाग, पेण पट्ट्यातही महायुतीच्या उमेदवारांना चांगली मते मिळाली. ठाणे आणि पालघर या दोन जिल्ह्यांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षांची चांगली ताकद आहे. या ठिकाणी विधानसभेच्या एकूण २४ आणि पनवेल, उरण, पेण, अलिबाग, कर्जत, श्रीवर्धन अशा ३० जागांवर महायुतीला यंदाही मोठ्या विजयाची अपेक्षा असली तरी महाविकास आघाडीचे आव्हान मोडून काढताना शिंदे-फडणवीस यांची कसोटी लागेल हे मात्र निश्चित.

ठाकरेंच्या बालेकिल्ल्यावर शिंदेंचा कब्जा?

मुंबईपाठोपाठ ठाणे जिल्हा हा एकेकाळी एकसंध शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात असे. २०१४ नंतर या जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलत गेली आणि येथे भाजपची ताकद शिवसेनेपेक्षाही अधिक वाढली. तरीही जिल्ह्यातील राजकारणाचा केंद्रबिंदू हा नेहमीच शिवसेना पक्ष राहीला. २०१४ नंतर ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री पद एकनाथ शिंदे यांच्याकडे आले. ठाणे, कल्याण डोंबिवली या महापालिकांवर शिंदे यांनी भाजपचे आव्हान मोडून काढत सत्ता आणली. नवी मुंबईसारख्या राज्यातील श्रीमंत महापालिकेतही एकसंध शिवसेना सत्तेच्या जवळ जाताना पहायला मिळाली. पालघर जिल्ह्यातील पालघर, बोईसर यासारख्या मतदारसंघात एकसंध शिवसेनेची ताकद वेळोवेळी दिसून आली. शिवसेना आणि ठाकरेंचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा हा संपूर्ण परिसर शिवसेनेतील फुटीनंतर मात्र एकनाथ शिंदे यांनी आपल्या कवेत घेतला आहे. भाजपची या भागात ताकद वाढत होतीच. शिंदे यांच्या फुटीमुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी एकेकाळचा बालेकिल्ला आता आव्हानात्मक ठरू लागला आहे.

present of MP Shrikant Shinde to promote Sulabha Gaekwad print politics news
सुलभा गायकवाडांच्या प्रचारासाठी अखेर खासदार शिंदे मैदानात
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Eknath shinde
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंच्या कामांना कोपरी पाचपाखाडी मतदारसंघात किती मार्क्स? काय म्हणत आहेत ठाणेकर?
bombay high court slams bmc officer over cm order
मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला महत्व नाही का? उच्च न्यायालयाची महापालिका प्रशासानाला विचारणा
Chief Minister Eknath shinde understanding of independent parties in Thane print politics news
ठाण्यातील स्वपक्षीय नाराजांची मुख्यमंत्र्यांकडून समजूत,प्रचाराला लागण्याचे आदेश; केळकर यांनाही कार्यकर्त्यांना जपण्याचा सल्ला
Srikant Shinde road show in front of Shiv Sena Bhavan to campaign for Sada Saravankar Mumbai
शिवसेना भवनसमोरून सदा सरवणकर यांच्या प्रचारार्थ श्रीकांत शिंदे यांचा रोड शो; महायुतीच्या कार्यकर्त्यांची गर्दी
Eknath Shinde, Naresh Mhaske,
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच महायुतीचे कर्णधार – खासदार नरेश म्हस्के
Eknath shinde late for rally
भंडारा: साडेतीन तास लोटूनही मुख्यमंत्र्यांचा पत्ता नाही, लोकांचा सभास्थळाहून काढता पाय

हेही वाचा >>> ३,००० कामगार, ४१२ दरवाजे, १३२ खोल्या अन् बरंच काही; जाणून घ्या ट्रम्प यांच्या होणाऱ्या अधिकृत निवासस्थानाची वैशिष्ट्यं

लोकसभेची पुनरावृत्ती होईल?

ठाणे आणि पालघर पट्ट्यात लोकसभेच्या चारपैकी तीन जागांवर महायुतीने विजय मिळवताना वेगवेगळ्या विधानसभा क्षेत्रातही मोठे मताधिक्य मिळवल्याचे पहायला मिळाले. ठाण्यातील सहापैकी सहा, कल्याणातील सहापैकी पाच, भिवंडीत सहापैकी तीन तर पालघरमध्ये सहापैकी पाच विधानसभा क्षेत्रांत महायुतीच्या उमेदवारांना मोठे मताधिक्य मिळाले. रायगड जिल्ह्यात पनवेल, अलिबाग, पेण, श्रीवर्धन यासारख्या मतदारसंघात महायुतीच्या पारड्यात मतदारांनी मतांचे मोठे दान टाकले. उरण, कर्जतचा अपवाद वगळला तर महायुतीला या भागातील वातावरण पोषकच राहिले होते. या निकालाची पुनरावृत्ती करण्याचे मोठे आव्हान यावेळी महायुती आणि विशेषत: शिंदे-फडणवीस यांच्यापुढे असणार आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागामध्ये अनेक राजकीय, सामाजिक आव्हानांचा महायुती सामना करताना दिसत आहे. असे असताना महामुंबईचा हा पट्टा तुलनेने पोषक असल्याचा दावा महायुतीचे नेते करताना दिसत आहेत.

हेही वाचा >>> वृध्दांच्या लोकसंख्येचा दर वाढता, काय आहेत आव्हानं?

मविआतील विसंवाद महायुतीसाठी पोषक?

लोकसभा निवडणुकांना सामोरे जात असताना रायगड जिल्ह्यातील शेतकरी कामगार पक्ष हा महाविकास आघाडीचा भाग होता. त्यामुळे उरण, कर्जत मतदारसंघात महाविकास आघाडीला चांगले यश मिळाल्याचे पहायला मिळाले. पनवेलमध्येही महायुतीच्या उमेदवाराचे मताधिक्य घटविण्यात या आघाडीला यश आले. तुलनेने अलिबाग, पेण, श्रीवर्धन पट्ट्यात मात्र शेकाप आणि उद्धव सेनेचे गणित फारसे जमले नव्हते. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी कशा प्रकारे महायुतीचा सामना करते याविषयी उत्सुकता होती. रायगड पट्ट्यात उद्धव सेना आणि शेकापची बोलणी सुरुवातीलाच फिस्कटल्याचे दिसून आले. उरणसारखा पोषक वाटणारा मतदारसंघ शेकाप, उद्धव सेना एकमेकांविरोधात लढवत आहेत. नवी मुंबईत गणेश नाईक विरोधक एकवटत असताना संदीप नाईक यांना पक्षात घेऊन शरद पवार यांनी शून्यातील लढतीत जीव फुंकला. असा चतुरपणा ऐरोलीत उद्धव ठाकरे यांना दाखविता आलेला नाही. पालघर पट्ट्यातही उद्धव सेनेला अधिक चांगले उमेदवार देता आले असते अशी चर्चा आता रंगली आहे.

महायुतीतील हेवेदावे उमेदवारांसाठी डोकेदुखी?

रायगडच्या तुलनेत ठाणे जिल्ह्यात मात्र महाविकास आघाडीत फारसा विसंवाद दिसलेला नाही. मुळात शिंदे यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे यांच्याकडे ठाणे जिल्ह्यात फारसे गमविण्यासारखे काही राहीलेले नाही. हाताच्या बोटावर जे उमेदवार राहिले आहेत त्यांना रिंगणात उतरविण्याशिवाय ठाकरे यांच्याकडे पर्यायही नव्हता. दुसरीकडे भाजप आणि शिंदेसेनेत जवळपास प्रत्येक मतदारसंघात नाराजी, हेवेदावे सुरू आहेत. कल्याण ग्रामीणमध्ये भाजपच्या सुलभा गायकवाड यांच्या विरोधात महेश गायकवाड रिंगणात आहेत. नवी मुंबईत संपूर्ण शिंदेसेना भाजपचे गणेश नाईक यांचा पाडाव करण्यासाठी एकवटली आहे. ठाण्यात संजय केळकर नको, असा सूर अजूनही शिंदेसेनेत आळवला जात आहे. शहापूरात दौलत दरोडा यांच्याविरोधात शिंदेसेनेकडून या भागातील नेते निलेश सांबरे यांना बळ दिले जात असल्याची चर्चा आहे. पालघरात विक्रमगड मतदारसंघात भाजप आणि शिंदेसेनेत जमेनासे झाले आहे. मिरा-भाईंदर मतदारसंघात भाजपमध्येच जुंपली आहे. पालघर मतदारसंघात राजेंद्र गावित यांचे पुन्हा-पुन्हा पुनर्वसन करून शिंदे-फडणवीस नेमके काय साधत आहेत असा सवाल सर्वसामान्य कार्यकर्त्यांना पडला आहे. पोषक वातावरण दिसत असतानाही या सर्वातून वाट काढत मोठ्या विजयाला गवसणी घालण्याचे आव्हान मात्र शिंदे-फडणवीस यांना पेलावे लागणार आहे.