ज्ञानेश भुरे
टेनिसमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय खेळाडू चमकत असतानाच आयोजनाच्या आघाडीवरही भारत मागे नव्हता. एटीपी २५० मालिकेतील स्पर्धेचे आयोजन गेली २७ वर्षे भारतात होत होते. मात्र, स्पर्धा संयोजकांनी आयोजनातून अंग काढून घेण्याचा निर्णय घेतला. टेनिसचा प्रसार, विकासाच्या मार्गावर असणाऱ्या भारतीय टेनिसला हा एक प्रकारे धक्काच बसला आहे. या निर्णयाचे भारतीय टेनिसवर नेमके काय परिणाम होतील याविषयीचा हा लेखाजोखा…

एटीपी २५० स्पर्धा म्हणजे नेमके काय?

आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या एटीपीच्या स्पर्धा मालिकेतील ही एक स्पर्धा. एटीपीच्या मालिकेत चार ग्रँड स्लॅम स्पर्धा, एटीपी फायनल्स, एटीपी १०००, एटीपी ५०० आणि एटीपी २५०, एटीपी चॅलेंजर्स अशा स्पर्धा होतात. टेनिसच्या एका हंगामात एटीपी २५० मालिकेच्या साधारण २० ते ३० स्पर्धा होतात. या स्पर्धेतील विजेत्या खेळाडूस २५० मानांकन गुण मिळतात. हे गुण खेळाडूच्या कारकीर्दीसाठी खूप महत्त्वाचे असतात. या स्पर्धेचे आयोजन करणे हेदेखील त्या देशासाठी अभिमानाचे असते. हा मान सहजासहजी मिळत नाही.

journey of India’s engagement with the Taliban
तालिबानचं भारताशी सख्य का वाढतंय?
ISKCON temple kharghar history
नवी मुंबईतील इस्कॉन मंदिराचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन……
4th-century CE Sanskrit inscription unearthed in PoK's Gilgit
Shaivism in POK: पाकव्याप्त काश्मीरमध्ये सापडला शिव उपासनेचा प्राचीन पुरावा; का ठरतोय हा संस्कृत कोरीव लेख महत्त्वाचा?
Mahakumbh First Amrit Snan on makar Sankranti
महाकुंभातील पहिल्या अमृतस्नानाचं महत्त्व काय? मकर संक्रांतीच्या दिवशीच याचे आयोजन का केले जाते?
indian tectonic plate
तिबेट खालील भारतीय टेक्टोनिक प्लेट दुभंगणार? भूवैज्ञानिकांनी व्यक्त केली चिंता; याचा काय परिणाम होणार?
india bangladesh fenching
भारत-बांगलादेश संबंध आणखी ताणले; सीमेवर कुंपण बांधण्यावरून सुरू झालेला वाद काय?
India successfully tests anti tank missile Nag Mk 2
शत्रूचा थरकाप उडवणाऱ्या ‘नाग’ क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी; पाकिस्तान-चीनच्या कारवायांना चाप बसणार?
PM Narendra Modi to launch 2 warships and one submarine in Mumbai on Jan 15
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नौदलात एकाच दिवशी दोन युद्धनौका, एक पाणबुडी दाखल… भारताच्या युद्धसज्जतेत किती भर?
Unlocking the Secrets of Adolescence from 30,000-Year-Old Skeletons
३०,००० वर्षांपूर्वीच्या सांगाड्यांमधून किशोरावस्थेचे उलगडले रहस्य; काय सांगते नवीन संशोधन?

भारतात ही स्पर्धा केव्हापासून सुरू झाली?

भारतात १९९६ मध्ये सर्वप्रथम ही स्पर्धा चेन्नईत खेळली गेली. तेव्हापासून सलग १३ वर्षे ही स्पर्धा चेन्नईत आयोजित केली जात होती. तमिळनाडू संघटनेने २०१८ मध्ये आयोजनास असमर्थता दर्शविल्यावर महाराष्ट्र टेनिस संघटनेने आयोजनाची जबाबदारी घेतली आणि ही स्पर्धा महाराष्ट्र टेनिस म्हणून ओळखली जाऊ लागली. यासाठी महाराष्ट्राबरोबर ५ वर्षांचा करार करण्यात आला होता. विशेष म्हणजे दक्षिण आशियात व भारतात होणारी ही एकमेव स्पर्धा होती.

LGBTQIA+ समुदाय म्हणजे काय? त्यांनी झेंड्यात बदल का केला आणि त्याचा अर्थ काय?

ही स्पर्धा भारतात का राहू शकली नाही?

यामागे सर्वात मोठे कारण निधी उपलपब्धतेचे होते. दरवर्षी या स्पर्धेच्या आयोजनासाठी महाराष्ट्राला १५ कोटी रुपये खर्च करावे लागले. म्हणजेच २०१८ पासून पाच वर्षांत महाराष्ट्राने किमान ७५ कोटी रुपये खर्च केले. स्पर्धेच्या एकूण खर्चात ५.२ कोटी रुपये पारितोषिकासाठी असतात, तर उर्वरित रक्कम स्पर्धेशी निगडित तांत्रिक अधिकारी आणि खेळाडूंच्या व्यवस्थेसाठी खर्च होते. यासाठी महाराष्ट्र सरकार ५ कोटी रुपये देत होते. यात टाटा उद्योगसमूहाचा मोठा सहभाग होता. उर्वरित रक्कम महाराष्ट्र राज्य टेनिस संघटनेला उभी करावी लागायची. आता शिखर संघटनेकडून स्पर्धेवरील खर्चात वाढ करण्याची मागणी करण्यात आली. ही मागणी पूर्ण करणे कठीण असल्याने महाराष्ट्र टेनिस संघटनेने येथेच थांबण्याचा निर्णय घेतला.

प्रायोजक उभे करणे आव्हान होते का?

एखादी स्थानिक स्पर्धा आयोजित करायची झाली, तरी आयोजनाचा खर्च मोठा असतो. ही तर आंतरराष्ट्रीय स्पर्धा होती. याचा खर्च मोठा असणार यात शंकाच नाही. यासाठी प्रायोजकही मोठा मिळणे आवश्यक असते. मात्र, या स्पर्धेत भारताचा एकही आघाडीचा टेनिसपटू सहभागी होत नाही. महेश भूपती आणि लिएंडर पेस यांनी कधीच निवृत्ती पत्करली आहे. त्याचबरोबर जागतिक क्रमवारीत पहिल्या २०० खेळाडूंत एकही भारतीय खेळाडू नाही. सध्या भारताचा सुमित नागल हा २२५ व्या स्थानावर आहे. त्यानंतर दुसरा भारतीय खेळाडू मुकुंद शशिकुमार थेट ३७४ व्या स्थानावर आहे. त्यामुळेच मायदेशातील स्पर्धेतच आपले अव्वल खेळाडू खेळत नाहीत तेव्हा स्पर्धेसाठी प्रायोजकांना आणि प्रेक्षकांनाही आकर्षित करणे संयोजकांसमोर एक आव्हानच असते.

आयोजनाचा अधिकार सोडणे हा खरंच मोठा धक्का आहे का?

नक्कीच. एटीपी जागतिक मालिकेच्या प्रवाहात असण्याचे केवळ खेळासाठी नाही, तर आयोजन करणाऱ्या शहरासाठी अनेक फायदे असतात. आतापर्यंत या स्पर्धेत भारतात रॅफेल नदाल, कार्लोस मोया, स्टॅनिस्लास वाव्रींका आणि मरिन चिलिच सारखे एकापेक्षा एक मोठे खेळाडू खेळून गेले आहेत. असे मोठे खेळाडू खेळतात तेव्हा ती स्पर्धा अधिक प्रेक्षकांना आकर्षित करते आणि शहराचे महत्त्व वाढते. अनेक फ्रेक्षकांनी भेट दिल्यामुळे त्या शहराच्या पर्यटन महसुलात वाढ होते.

फिटनेससाठी चॅटजीपीटी वापरणे किती सुरक्षित? ‘एआय’ वैयक्तिक प्रशिक्षकाची जागा घेऊ शकतो?

खेळाडूंसाठी स्पर्धा गमावणे किती धक्कादायक?

या प्रश्नाचे उत्तर देताना निश्चितच मतमतांतरे असू शकतात. पण, सकृत दर्शनी भारतीय एकेरी खेळाडूंना फायदा होण्याचा विचार केला तर हा धक्का मानता येणार नाही. याचे मुख्य कारण म्हणजे एकेरातील भारतीय खेळाडूंची आंतरराष्ट्रीय स्तरावर निम्न क्रमवारी. यामुळे भारतीय खेळाडूंना मायदेशातही या स्पर्धेत खेळण्यासाठी वाईल्ड कार्डचा (थेट प्रवेश) आधार घ्यावा लागतो. महाराष्ट्रात पाच वर्षांत झालेल्या पाच स्पर्धेतून एकूण १२५० मानांकन गुण देण्यात आले. यातील भारतीय खेळाडू केवळ ८० गुण कमावू शकले. भारतीय खेळाडू कधीही दुसऱ्या फेरीच्या पुढे जाऊ शकले नाहीत. त्यामुळेच भारतीय खेळाडूंसाठी अशा मोठ्या स्पर्धेऐवजी चॅलेंजर्स मालिकेतील स्पर्धा खेळणे फायदेशीर ठरते. युकी भांब्रीने केपीआयटी चॅलेंजर स्पर्धेचा पुरेपूर वापर करताना २०१५ मध्ये पहिल्या १०० खेळाडूंत स्थान मिळविले होते. बंगळुरू चॅलेंजर स्पर्धा जिंकल्यानंतर सुमित नागलच्या कारकीर्दीला वेगळे वळण मिळाले. प्रज्ञेश गुणेश्वरननेही भारतातील चॅलेंजर स्पर्धेत खेळून चांगली कामगिरी दाखवत संधीचा फायदा करून घेतला.

Story img Loader