-हृषिकेश देशपांडे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मुंंबईतील एका कार्यक्रमात नुकतेच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकत्र आले होते. या कार्यक्रमात दोघांची वक्तव्ये पाहता, शिवशक्ती-भीमशक्ती आघाडीची चर्चा पुन्हा सुरू झाली. युतीच्या दृष्टीने दोन्ही बाजूंनी सकारात्मक भूमिका घेतली असली, तरी भविष्यात आघाडी करायची झाल्यास जागावाटप मुद्दा कळीचा आहे. तसेच महाविकास आघाडी म्हणून दोन्ही काँग्रेसचे मतही तितकेच महत्त्वाचे आहे. भाजपविरोध या भूमिकेवर एकत्र येणे शक्य असले तरी, इतर व्यावहारिक बाजूंचा गुंता कसा सोडवणार?
दोन्ही काँग्रेसचे मत महत्त्वाचे…
प्रकाश आंबेडकर यांनी यापूर्वीच आघाडीबाबत आवाहन केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अशा आघाडीत कसे सामीर होणार? कारण प्रकाश आंबेडकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात फारसे सख्य नाही. त्याचप्रमाणे अकोला, अमरावतीसारख्या जिल्ह्यांत प्रकाश आंबेडकर यांच्या गटाचा प्रभाव आहे. तेथे त्यांचा सामना भाजपसह प्रामुख्याने काँग्रेसबरोबर आहे. त्यामुळे अशी व्यापक आघाडी केल्यास मग जागावाटप कसे करणार, हा एक मुद्दा आहे. मात्र गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आंबेडकर यांच्या अनेक उमेदवारांनी लक्षणीय मते घेतल्याने दोन्ही काँग्रेसला त्याचा फटका बसला होता. अगदी नांदेड लोकसभा मतदारसंघाचे उदाहरण घेऊ. गेल्या वेळी म्हणजे २०१९ म्हणजे भाजपचे प्रताप चिखलीकर यांनी काँग्रेसच्या अशोक चव्हाण यांचा ४० हजार मतांनी पराभव केला होता. तेथे प्रकाश आंबेडकर यांच्या उमेदवाराने १ लाख ९६ हजार मते मिळवली होती. विधानसभेलाही आंबेडकर यांच्या पक्षाने साडेचार टक्क्यांहून थोडी अधिक मते घेत दोन्ही काँग्रेसला अनेक ठिकाणी अडचणीत आणले होते. प्रकाश आंबेडकर यांना मानणारा एक वर्ग आहे. कार्यकर्त्यांचे उत्तम संघटन आहे. त्यामुळे ते ज्यांच्याशी आघाडी करतील ती हुकमी मते पारड्यात पडणारच.
लक्ष्य मुंबईच…
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दृष्टीने मुंबई पालिकेची निवडणूक कळीची आहे. यापूर्वी त्यांच्या पक्षाने २०११मध्ये रामदास आठवले यांच्याशी आघाडी केली होती. पुढे आठवले भाजपबरोबर गेले. मुंबईत अनेक प्रभागांत प्रकाश आंबेडकर यांना मानणारी मते आहेत. ही मते निकाल फिरवू शकतात. मुंबई पालिका राखण्यासाठी आंबेडकर यांची मदत उद्धव ठाकरे यांना होऊ शकते. केंद्र सरकार हुकूमशाही करत असल्याचा आरोप करत, उद्धव ठाकरे यांनी एकजुटीचे आवाहन केले आहे. त्याला प्रकाश आंबेडकरांनीही साद दिली आहे. त्यामुळे मराठी तसेच प्रकाश आंबेडकरांना मानणारा मतदार एकत्र आल्यास भाजपला निवडणूक कठीण जाईल हेही तितकेच खरे. यापूर्वी शिवसेनेने प्रकाश आंबेडकरांवर टीका केल्याची आठवण भाजप नेत्यांनी करून दिली आहे. मात्र आघाडीत दोघांचे हित असल्यास एकत्र येण्यात वैचारिक मतभिन्नता अडचण ठरत नाही हे महाविकास आघाडीच्या प्रयोगावरून स्पष्ट झाले आहे. मात्र मुद्दा आहे, राष्ट्रवादी काँग्रेसला घेऊन अशी आघाडी शक्य आहे काय, हा.
राष्ट्रवादीशी संघर्ष…
प्रकाश आंबेडकर यांनी वेळोवेळी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली आहे. राष्ट्रवादीनेही प्रकाश आंबेडकरांच्या राजकीय भूमिकांवर टीकास्त्र सोडले आहे. एकीकडे शिवसेनेला बरोबर घेतल्यास राष्ट्रवादी युतीत येण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. इतके पक्ष एकत्र आल्यावर जागावाटप हा कळीचा मुद्दा आहे. मुंबईत पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांची वस्ती असलेल्या भागांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभाव आहे. शिवसेनेकडे असलेल्या सध्याच्या शंभरावर जागा व पुन्हा जर काँग्रेस आघाडीत आल्यास त्यांना गेल्या वेळी जिंकलेल्या जागा तर सोडाव्याच लागतील. या साऱ्या परिस्थितीत मोठ्या आघाडीत जागावाटप कठीण आहे. मग बंडखोरी अन् उमेदवारांची पळवापळवी असे प्रकार घडतील. तरीही भाजपविरोध या एका सूत्रावर आघाडी शक्य आहे. शेवटी ४५ हजार कोटींचा अर्थसंकल्प असलेली मुंबई पालिकेतील सत्ता साऱ्यांनाच खुणावत आहे. याच सत्तेच्या आधारे राज्यात राजकारण करणे शक्य होते, त्याचे तरंगही इतर भागांत उमटतात.