महाराष्ट्राच्या मातीतील खेळ म्हटले की कबड्डी, खो-खो, कुस्ती अशी नावे घेतली जातात. कोल्हापुरात फुटबॉल, साताऱ्यात तिरंदाजी आणि मुंबईत क्रिकेटचे बीज मोठ्या प्रमाणावर रुजले आहे. मात्र, क्रीडाक्षेत्रातील सर्वांत प्रतिष्ठेची स्पर्धा मानल्या जाणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये मात्र महाराष्ट्राला नेमबाजांनी मोठा नावलौकिक मिळवून दिला आहे. कुस्तीगीर खाशाबा जाधव यांच्यानंतर महाराष्ट्राला ऑलिम्पिक पदकविजेता मिळण्यासाठी सात दशकांचा कालावधी लागला. ही प्रतीक्षा नेमबाज स्वप्निल कुसळेने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये संपवली. स्वप्निलच्या आधी महाराष्ट्राच्या नेमबाजांना ऑलिम्पिकमध्ये पदकापर्यंत पोहोचता आले नसले, तरी त्यांनी उल्लेखनीय यश मिळवले होते. ऑलिम्पिकमध्ये झळकलेल्या याच महाराष्ट्राच्या नेमबाजांविषयी…

स्वप्निल कुसळे

स्वप्निल कुसळे हे नाव आता महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचले आहे. नेमबाजीत कारकीर्द घडवण्याचा निर्णय घेतल्याच्या दशकभराहून अधिक काळानंतर स्वप्निलला ऑलिम्पिकमध्ये खेळण्याची संधी मिळाली आणि त्याने या संधीचा पुरेपूर फायदा घेतला. स्वप्निलने ५० मीटर रायफल थ्री-पोझिशन प्रकारात कांस्यपदक पटकावत इतिहास घडवला. नेमबाजीच्या सर्वांत अवघड मानल्या जाणाऱ्या या प्रकारात ऑलिम्पिक पदक जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला. त्याने अंतिम फेरीत जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेल्या चेक प्रजासत्ताकच्या जिरी प्रिवरातस्कीलाही मागे टाकले हे विशेष. कोल्हापूरच्या स्वप्निलने याआधी विश्वचषक नेमबाजी स्पर्धेतही वैयक्तिक रौप्यपदक मिळवले आहे. त्याने ५० मीटर रायफल थ्री-पोझिशनच्या सांघिक गटात सर्वाधिक यश संपादन केले आहे. सांघिक गटात विश्वचषक, जागतिक अजिंक्यपद आणि आशियाई क्रीडा या मोठ्या स्पर्धांमध्ये स्वप्निलने पदक पटकावले आहे.

maharashtra vidhan sabha election 2024 sudhir mungantiwar vs santosh singh Rawat Ballarpur Assembly constituency
लक्षवेधी लढत : मुनगंटीवार यांच्यासमोर कडवे आव्हान
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Sanskruti More, a visually challenged chess player, satara district
अंधत्वावर मात करून यशशिखर गाठणारी बुद्धीबळपटू संस्कृती मोरे
banana cultivation farmer kiran gadkari tried different experiment for banana farming
लोकशिवार: आंतरपिकातील यश !
Pankaja Munde At Rally In Parali Beed.
“डोळ्यांसमोर कमळ येईल, पण तुम्ही घड्याळाचेच बटन दाबा…” धनंजय मुंडेंच्या समोरच काय म्हणाल्या पंकजा? पाहा व्हिडिओ
Border Gavaskar Trophy History Stats Records Head to Head All You need To Know About India vs Australia Test Series
Border Gavaskar Trophy: भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेला ‘बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी’ हे नाव का देण्यात आलं? सर्वाधिक मालिका कोणी जिंकल्यात? वाचा इतिहास
Comrade Subhash Kakuste no more
सत्यशोधक कम्युनिस्ट नेते सुभाष काकुस्ते यांचे निधन
Ritika Sajdeh salutes Aaron Finch for defending husband Rohit Sharma after Sunil Gavaskar comment
Ritika Sajdeh : सुनील गावस्करांच्या वक्तव्यावर रोहितच्या बायकोची जबरदस्त प्रतिक्रिया, सोशल मीडियावर चाहत्यांचे वेधलं लक्ष

हेही वाचा >>> भारत आणि पाकिस्तान एकमेकांच्या ताब्यात असणार्‍या कैद्यांची देवाणघेवाण कशी करतात?

अंजली भागवत

महाराष्ट्राच्या नेमबाजीतील सर्वांत प्रचलित नाव म्हणजे अंजली भागवत. आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध स्पर्धांतील अंजली यांच्या अलौकिक कामगिरीमुळे महाराष्ट्रातील नेमबाजीला वेगळाच हुरूप आला, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. सलग तीन ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा मान अंजली यांना मिळाला. त्यातही २००० सालची सिडनी ऑलिम्पिक स्पर्धा त्यांच्यासाठी खूपच खास ठरली. या स्पर्धेत १० मीटर एअर रायफल प्रकारात अंजली यांनी अंतिम फेरीपर्यंत मजल मारली आणि ऑलिम्पिकमध्ये अशी कामगिरी करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला नेमबाज ठरल्या. त्यांना या स्पर्धेसाठी अगदी ऐनवेळी थेट प्रवेश देण्यात आला होता आणि त्यांनी आपली गुणवत्ता सिद्ध केली. ऑलिम्पिकमध्ये कोणत्याही क्रीडा प्रकारात पीटी उषा (१९८४) यांच्यानंतर अंतिम फेरी गाठणाऱ्या अंजली या पहिल्या भारतीय महिला ठरल्या. त्यांनी आपल्या प्रथितयश आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत ३१ सुवर्ण, २३ रौप्य आणि सात कांस्यपदके जिंकली. २००३ मध्ये त्यांनी विश्वचषक स्पर्धेत ४०० पैकी ३९९ गुण घेताना सुवर्णपदक पटकावले होते. तसेच त्यांनी जागतिक क्रमवारीत अग्रस्थानही गाठले होते. त्या महिला रायफल थ्री-पोझिशन प्रकारातही खेळायच्या.

हेही वाचा >>> महाभारत ते मुघल साम्राज्य तब्बल पाच हजार वर्षांचा इतिहास; का महत्त्वाचे आहे हे संग्रहालय?

सुमा शिरूर

सुमा शिरूर यांनी नेमबाजीच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात देशासाठी यशस्वी कामगिरी केली. २००४ च्या आशियाई अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेतील पात्रता फेरीत त्यांनी ४०० पैकी ४०० गुणांचा वेध घेत विश्वविक्रम रचला होता. या स्पर्धेत त्या सुवर्णपदकाच्या मानकरी ठरल्या होत्या. २००४ मध्येच अथेन्स येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत सुमा यांनी १० मीटर एअर रायफल प्रकाराच्या वैयक्तिक गटात अंतिम फेरी गाठली होती. अखेर त्यांना आठव्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. मात्र, त्यानंतर दोन दशके भारताची एकही महिला नेमबाज ऑलिम्पिकमध्ये रायफल प्रकारात अंतिम फेरीपर्यंत पोहचू शकली नव्हती. अखेर सुमा यांच्या मार्गदर्शनाखालीच तयार झालेल्या रमिता जिंदाल आणि एलावेनिल वलारिवन यांनी यंदा पॅरिस ऑलिम्पिकची अंतिम फेरी गाठण्यात यश मिळवले.

राही सरनोबत

स्वप्निलप्रमाणेच कोल्हापूरची असणाऱ्या राही सरनोबतने २०१२ लंडन आणि २०२० टोक्यो अशा दोन ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. या स्पर्धांत तिला अनुक्रमे १९ आणि ३२व्या स्थानावर समाधान मानावे लागले. ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये फार मोठी मजल मारता आली नसली, तरी राहीने अन्य जागतिक स्पर्धांमध्ये भारताचे नाव उंचावले आहे. नेमबाजीच्या २५ मीटर पिस्तूल प्रकारात खेळणाऱ्या राहीने २०१८च्या जकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली होती. आशियाई क्रीडा स्पर्धेत पदक जिंकणारी ती भारताची पहिली महिला नेमबाज ठरली. तसेच विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक कमावणारीही ती भारताची पहिली नेमबाज आहे. त्याआधी २०१४च्या ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेतही राहीने सुवर्णवेध घेतला होता.

दीपाली देशपांडे

स्वप्निल कुसळेच्या प्रशिक्षक म्हणून सध्या बऱ्याच चर्चेत असलेल्या दीपाली देशपांडे या स्वत:ही एक नामांकित नेमबाज होत्या. दीपाली यांनी २००४ च्या अथेन्स ऑलिम्पिकमध्ये रायफल थ्री-पोझिशन प्रकारातच सहभाग नोंदवला होता. त्यांनी एकूण ५७२ गुणांसह ३२ नेमबाजांच्या प्राथमिक फेरीत १९वे स्थान मिळवले होते. त्याआधी २००२ मध्ये बुसान येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत १० मीटर एअर रायफलमध्ये सांघिक गटात रौप्यपदक जिंकणाऱ्या भारतीय संघात त्यांचा समावेश होता. त्यांनी मलेशिया येथे २००४ मध्ये झालेल्या आशियाई नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदक जिंकले होते. खेळाडू म्हणून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी प्रशिक्षक म्हणून यशस्वी कारकीर्द घडवली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या स्वप्निल कुसळे, सिफ्त कौर सामरा, अंजुम मुद्गिल आणि अर्जुन बबुता या नेमबाजांचा यंदा पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभाग होता.

तेजस्विनी सावंत

स्वप्निल आणि राही यांच्याप्रमाणेच कोल्हापूरकर असणाऱ्या तेजस्विनी सावंतला २०२० टोक्यो ऑलिम्पिकमध्ये खेळण्याची संधी मिळाली होती. महिलांच्या ५० मीटर रायफल थ्री-पोझिशन प्रकारात ती ३३व्या स्थानी राहिली होती. त्याआधी २०१० मध्ये ती ५० मीटर ‘प्रोन’ प्रकारात जगज्जेती ठरली होती. राही सरनोबतच्या यशातही तेजस्विनीचे मोठे योगदान आहे. तेजस्विनीने २००६च्या मेलबर्न राष्ट्रकुल स्पर्धेत १० मीटर एअर रायफल प्रकारात वैयक्तिक सुवर्णयश मिळवले होते. २०१८च्या राष्ट्रकुल स्पर्धेत ती ५० मीटर थ्री-पोझिशन प्रकारात सुवर्णपदकाची मानकरी ठरली होती.

नेमबाजीत नक्की प्रकार किती?

अथेन्स येथे १८९६ मध्ये झालेल्या पहिल्या ऑलिम्पिकमध्ये नऊ खेळ खेळले गेले, ज्यात नेमबाजीचाही समावेश होता. पहिल्या ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीच्या केवळ पाच प्रकारांचा समावेश होता. मात्र, हळूहळू त्यात वाढ होत गेली. टोक्यो २०२० स्पर्धेत नेमबाजीच्या रायफल, पिस्तूल आणि शॉटगन मिळून १५ प्रकारांचा समावेश होता. रायफलचे १० मीटर एअर रायफल आणि ५० मीटर थ्री-पोझिशन हे प्रकार ऑलिम्पिकमध्ये खेळले जातात. पिस्तूलमध्ये २५ मीटर रॅपिड फायर, २५ मीटर आणि १० मीटर पिस्तूल यांचा समावेश असतो. शॉटगनमध्ये स्कीट आणि ट्रॅप हे प्रकार खेळले जातात.