साखर आणि सहकाराच्या राजकारणामुळे प्रथम काँग्रेस आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जाणारा दक्षिण-पश्चिम महाराष्ट्र आता पूर्णपणे भाजपच्या प्रभावाखाली आल्याचे या विधानसभा निवडणुकीने अधोरेखित केले. कोल्हापूर, सातारा आणि सांगलीतील एकूण २६ जागांपैकी एकट्या भाजपने १० जागा जिंकल्या आणि महायुतीला २३ जागांवर विजय मिळाला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
पश्चिम महाराष्ट्राचे राजकारण…
१९६० साली महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर त्याची सूत्रे यशवंतराव चव्हाण यांच्याकडे आली. स्वाभाविकच पश्चिम महाराष्ट्राचे महत्त्व राज्यभरात वाढत गेले. पुढे वसंतदादा पाटील मुख्यमंत्री झाले. बाजूच्या जिल्ह्यात शरद पवारांसारखे नेतृत्व पुढे येत राहिले. या सर्वाचा परिणाम म्हणजे या भागामध्ये काँग्रेस पक्ष तळागाळात रुजला. सुरुवातीच्या काळात शेकाप, प्रजा परिषद, जनता दल अशा पक्षांचे आव्हान होते. त्यातील अनेकांना काँग्रेसमध्ये वळवल्याने विरोध मावळात गेला. जनता दल, सोलापूर, इचलकरंजी वगळता डावे पक्ष निस्तेज बनले. काँग्रेसचे एकहाती वर्चस्व या भागात वाढत राहिले. राष्ट्रवादीचा उदय झाल्यानंतर दोन्ही पक्षांनी एकमेकांशी स्पर्धा करतानाच सत्ताकारणात आपलाच प्रभाव राहील याची पुरेपूर दक्षता घेतली. १९९० च्या दशकापासून भाजप – शिवसेनेचा काही प्रमाणात प्रभाव दिसू लागला. युती सरकारच्या काळात तो जाणवू लागला तरी पश्चिम महाराष्ट्रात प्रभाव राहिला तो दोन्ही काँग्रेसचाच.
हा भाग काँग्रेसच्या अधीन का राहिला?
पश्चिम महाराष्ट्रात उभय काँग्रेसचे वर्चस्व राहण्याची कारणे बरीच होती. त्यांचे राजकारण – समाजकारण सर्वस्पर्शी होते. त्याला भक्कम जोड होती सहकार – शैक्षणिक क्षेत्राची. राज्य मंत्रिमंडळातील प्रभावी नेतेही या भागातील पश्चिम महाराष्ट्राच्या या भागातील असत. त्यांनी सहकाराची मजबून वीण साधली. साखर कारखाने, दूध संघ, बँका, सूतगिरण्या या मोठ्या संस्थांसह गावगाड्यात सेवा संस्था, पाणी पुरवठा, पतसंस्था याचे जाळे विणले. अशा संस्थात उमद्या तरुणांना संधी देत नव्या नेतृत्वाची पायाभरणी करण्यावर भर दिला. याच्या जोडीला वसंतदादा पाटील यांनी विनाअनुदानित शिक्षण संस्था काढण्यास परवानगी दिल्यावर अभियांत्रिकी शिक्षण देणाऱ्या संस्थांचे पेव फुटले. खेड्यापाड्यातील उच्चशिक्षित तरुणांच्या फौजा वरिष्ठ पदावर नियुक्त होत राहिल्या. जोडीला ऊस – द्राक्षाच्या बागायती शेतीमुळे बरकतीची हिरवळ दाटली. पुढे कुटुंबे वाढली. शेतीचे क्षेत्र आकुंचन पावत गेले. नोकरी – उदरनिर्वाहाचे प्रश्न जाणवत गेले. उदास, विमनस्क तरुणांच्या भावनांना प्रथम शिवसेनेने साद घालत लढायला शिकवले. परिणामी बाप काँग्रेसमध्ये आणि पोर भगव्याच्या पाठी असे चित्र गावोगावी दिसू लागले. तुलनेने भाजपचे स्थान मागे राहिले.
भाजपचा प्रभाव कधीपासून?
राज्यात १९९५ मध्ये युतीचे सरकार आल्यानंतर पक्षाने ताकद देण्याचे धोरण स्वीकारले. बाळासाहेब ठाकरे, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांना मानणारा तरुण वर्ग झपाट्याने वाढू लागला. नगरपालिका, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत मध्ये भगवे झेंडे फडकू लागले. दुय्यम स्थानी असलेल्या भाजपला महत्त्व प्राप्त होऊ लागले ते २०१४ मध्ये पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी विराजमान झाल्यावर. याच वेळी राज्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनले. याच पट्ट्यात महत्त्वाची खाती असलेली मंत्रीपदे आली. त्यांच्या प्रभावाने तरुणाई भाजपकडे आकृष्ट झाली. याच काळात दोन्ही काँग्रेसमधील सहकार सम्राटांनी आपल्या बालेकिल्ल्याला धक्का लागल्याची भीती जाणवू लागल्याने हाती कमळ घेण्याचे चातुर्य दाखवले. भाजपत त्यांचे महत्त्व इतके वाढले, की मूळचे कार्यकर्ते मागेच राहिले. याच धनाढ्य आयारामांना उमेदवारी मिळत राहिली.
हेही वाचा : World’s oldest ALPHABET: ४,४००० वर्षे जुन्या वर्णमालेचा शोध; हा शोध नेमकं काय सूचित करतो?
भाजपचा रणनीतीतील बदल कोणता?
पश्चिम महाराष्ट्रातील राजकारणी हे प्रामुख्याने मराठा समाजाचे होते. सहकारी संस्थांत त्यांचाच शब्द चालत असे. या प्रक्रियेत इतर मागासवर्गीय, भटक्या जाती, मागासवर्गीय यांना नावापुरते स्थान होते. ही बाब भाजपने या भागात प्रभावीपणे अधोरेखित करायला सुरुवात केली. त्यातून या समाजाच्या सुशिक्षित पिढीचा कल भाजपकडे राहिला. याचा फायदा गेल्या दहा वर्षांत भाजपचे खासदार, आमदारांची संख्या वाढण्यात झाला. या वर्गाला भाजपने गोंजारत ठेवले. दुसरीकडे, लोकसभा – विधानसभेवेळी मराठा समाजाचे उमेदवार कधी दिले ते या वर्गाच्या लक्षात येणार नाही अशी चाल खेळली. मराठा आंदोलन तापल्यावर भाजपने या भागातील ओबीसी वर्गाची पाठराखण करण्याची चतुराई दाखवली.
हेही वाचा : पाकिस्तानात गृहयुद्ध भडकणार? इम्रान खानच्या समर्थकांचे हिंसक आंदोलन; पाकिस्तानमध्ये नक्की घडतंय तरी काय?
विधानसभेला भाजपचा प्रभाव कसा वाढला?
पश्चिम महाराष्ट्रामध्ये दोन्ही काँग्रेससह उद्धव ठाकरे गटाने पुरोगामी विचारसरणीला महत्त्व दिले. त्याचा फायदा त्यांना लोकसभेला झाला. ही बाब हेरून भाजपने रणनीतीत बदल केला. हेच तिन्ही पक्ष मुस्लिम समाजाचे लांगुलचालन कसे करत आहेत, हे भाजपने प्रभावीपणे मांडले. देवेंद्र फडणवीस यांनी तर मुस्लिम नेता सज्जाद नोमानी यांच्या भाषणाचा संदर्भ देत ‘लाव रे तो व्हिडिओ’ म्हणत महाविकास आघाडीने मुस्लिम अनुनयाचे काम कसे चालवले हे अत्यंत आक्रमकपणे लोकांसमोर आणले. व्होट जिहादला हिंदूंनी धर्मयुद्धाने प्रत्युत्तर दिले पाहिजे हे ठासून मांडले. या भागातील विशाळगड अतिक्रमण, कोल्हापूरातील दंगल, प्रतापगड कबर या प्रश्नांना चर्चेत आणून हिंदूंवर कशा पद्धतीने अन्याय होत आहे हे बिंबवले. लव्ह जिहाद विरोधात हजारोंचे मोर्चे काढले. कणेरी मठ, संत संमेलन, भिडे गुरुजी, वारकरी संप्रदाय, विचारवंतांची व्याख्याने अशा मात्रा लागू पडणाऱ्या प्रभावी यंत्रणेचा वापर करून हिंदूंच्या भावना चेतवत ठेवल्या. परिणामी धार्मिक एकीकरणाचे राजकारण महायुतीच्या मतयंत्रात अलगद शिरले. दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्रातील महापूर, सिंचन प्रश्न, शेती प्रश्न सोडवण्यासाठी नानाविध योजना केवळ जाहीर केल्या नाहीत तर थेट निधीही देऊन, बोलणारे नव्हे तर कृती करणारे शासन आहे याचा दाखला दिला. एकूणच विकासाचे मनोहारी स्वप्न आणि दुसरीकडे हिंदुत्वाचा हुंकार अशा दोन्ही मार्गाचा पेरणी केल्याने मतांची मशागत भरभरून झाली. त्याला लाडक्या बहिणींचा भरगोस प्रतिसाद मिळाल्याने भाजपचे कोठार मतांनी पुरेपूर भरून गेले. इतके की कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात महायुतीचे सारेच्या सारे उमेदवार विधिमंडळात पोहचले. सांगलीतही पाच विरुद्ध तीन असे महायुतीचेच पारडे झुकते राहिले. एकूणच सह्याद्रीवरील उभय काँग्रेसचा तिरंगा झेंडा जाऊन महायुतीचा भगवा दिमाखात फडकू लागला आहे.